In this Article
- व्हिडिओ: सी-सेक्शन नंतरचा आहार (कुठले अन्नपदार्थ खावेत आणि टाळावेत)
- प्रसूतीनंतर पोषण महत्वाचे का आहे?
- सिझेरियन सेक्शन प्रसूतीनंतर घ्यावयाचा आहार
- सी-सेक्शन नंतरचा सर्वोत्तम आहार
- सिझेरिअन प्रसूतीनंतरची झीज भरून काढण्यासाठी काही भारतीय मसाल्याचे पदार्थ
- सिझेरियन प्रसूतीनंतर कोणते पदार्थ टाळावेत?
- तुमच्या सिझेरिअन प्रसूती नंतरच्या आहाराचा उत्तम फायदा मिळण्यासाठी महत्वाच्या टिप्स
एखादी आरोग्यविषयक गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे किंवा अनपेक्षित परिस्थितीमुळे सी-सेक्शन प्रसूती होते. सी-सेक्शनद्वारे प्रसूतीची प्रक्रिया कठीण आणि वेदनादायक असू शकते. सी सेक्शन प्रसूतीमुळे आईला मानसिक आणि शारीरिक थकवा येऊ शकतो. शस्त्रक्रियेतून बरे होण्यासाठी, आईला पुरेशी विश्रांती आणि संतुलित आहार घेणे आवश्यक असते. सी सेक्शननंतर पहिल्या काही आठवड्यांमध्ये आईकडे नीट लक्ष देणे आवश्यक असते. प्रसूतीच्या तणावातून मानसिक आणि शारीरिकरित्या बरे होण्यासाठी तिला मदत केली पाहिजे.
व्हिडिओ: सी-सेक्शन नंतरचा आहार (कुठले अन्नपदार्थ खावेत आणि टाळावेत)
प्रसूतीनंतर पोषण महत्वाचे का आहे?
प्रसूतीनंतर आईचा आहार अत्यंत महत्त्वाचा ठरतो कारण त्यामुळे आई लवकर बरी होण्यासाठी मदत होते. तसेच आईला नवजात बाळाला स्तनपान देण्याची गरज असते. पहिल्या काही महिन्यांत आईचे दूध हे बाळाच्या पोषणाचा एकमेव स्त्रोत असतो , त्यामुळे आईला सकस आहार मिळेल याची काळजी घेणे आवश्यक असते. पुरेशी विश्रांती आणि चांगला आहार घेतल्यास सी-सेक्शन दरम्यान गर्भाशय आणि पोटाला झालेली जखम लवकर भरून येण्यास मदत होईल. आईला योग्य पोषण मिळाल्या गरोदरपणात वाढलेले वजन कमी करण्यास मदत होईल.
सिझेरियन सेक्शन प्रसूतीनंतर घ्यावयाचा आहार
बाळाचे योग्य पोषण होण्यासाठी आणि आईचे शरीर लवकर बरे होण्यासाठी तसेच अन्नपदार्थांचे योग्य पचन आणि पोटावर ताण न पडणाऱ्या आतड्याच्या हालचालींसाठी चांगला आहार देखील महत्त्वाचा आहे. सिझेरियन प्रसूतीनंतर लगेचच घेतला जाणारा आहार हा प्रथिने, खनिजे, कॅल्शियम, फायबर आणि लोह यासारख्या महत्त्वपूर्ण पोषक तत्वांनी समृद्ध असावा.
बद्धकोष्ठता ही प्रसूतीनंतर महिलांना भेडसावणाऱ्या प्रमुख समस्यांपैकी एक आहे. बद्धकोष्ठतेची अनेक कारणे आहेत, उदा: प्रसूतीपूर्व पूरक आहारातील लोहाचे प्रमाण, शस्त्रक्रियेदरम्यान वापरलेली औषधे, निर्जलीकरण आणि प्रसूतीनंतर कमकुवत पेल्विक स्नायू इत्यादी. परंतु, नव्यानेच आई झालेल्या स्त्रियांना बद्धकोष्ठतेचा त्रास होण्यामागे मानसिक कारण सुद्धा असू शकते. टाक्यांवर परिणाम होण्याची किंवा त्यांना दुखापत होण्याची भीती त्यांना असते.
प्रसूतीनंतरच्या शारीरिक बदलांमुळे बद्धकोष्ठता होऊ नये म्हणून खालील गोष्टी करा
- उबदार द्रवपदार्थ प्या
- तंतुमय पदार्थ खा (खाली तपशीलवार वर्णन केले आहे)
- कॅफिन टाळा
सी-सेक्शन नंतरचा सर्वोत्तम आहार
सिझेरियन प्रसूतीनंतर काय खावे आणि काय टाळावे यासह आहार योजना आखताना काळजीपूर्वक नियोजन केले पाहिजे. पुरेशा प्रमाणात आईला पोषक तत्वे मिळाली पाहिजेत असा आहार असावा. लवकर बरे होण्यासाठी सी-सेक्शन नंतर आईच्या आहारात समाविष्ट केल्या पाहिजेत अश्या गोष्टी खाली दिलेल्या आहेत:
१. प्रथिने, खनिजे आणि कॅल्शियम युक्त अन्न
प्रथिने नवीन ऊतक पेशींच्या वाढीस मदत करतात त्यामुळे झीज भरून निघण्यास मदत होते. जास्त प्रमाणात प्रथिने असलेले अन्नपदार्थ ऊतींची दुरुस्ती करण्यास मदत करतात. शस्त्रक्रियेनंतर स्नायूंची शक्ती टिकवून ठेवतात. दुसरीकडे, कॅल्शियम, हाडे आणि दात मजबूत करते, स्नायूंना आराम देते, रक्त गोठण्यास मदत करते आणि ऑस्टियोपोरोसिस टाळण्यास मदत करते. स्तनपानादरम्यान, २५० ते ३५० मिलिग्रॅम कॅल्शियम नवजात बाळाला मिळते.
- स्किम्ड मिल्क, कमी चरबी असलेले दही, चीज,ह्यासारखे दुग्धजन्य पदार्थ, बीन्स आणि वाळलेले वाटाणे यासारख्या अन्नपदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि जीवनसत्वे असतात.
- डाळींमध्ये प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते.
- तिळात लोह, तांबे, कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते.
२. संपूर्ण धान्य
पास्ता, ब्राऊन ब्रेड आणि ब्राऊन राईस यांसारखे संपूर्ण धान्य पदार्थ तुमच्या आहाराचा एक भाग बनले पाहिजेत कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात कर्बोदके असतात. त्यामुळे उर्जेची पातळी आणि आईच्या दुधाचे उत्पादन राखण्यास मदत होते. समृद्ध संपूर्ण धान्य उत्पादनांमध्ये लोह, फायबर आणि फॉलिक अॅसिड असते आणि ते बाळाच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आवश्यक असते. ज्या स्त्रियांना रात्री झोप येत नाही आणि सकाळी चिडचिड होते त्यांनी त्यांच्या दिवसाची सुरुवात धान्याच्या न्याहारीने करावी.
३. भरपूर प्रमाणात जीवनसत्वे असलेले अन्नपदार्थ
जीवनसत्वांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात आणि ते ऊतींच्या दुरुस्तीसाठी मदत करतात. जीवनसत्त्वे शरीरात कोलॅजेन तयार करण्यास मदत करतात. हे कोलॅजेन, अस्थिबंधन आणि त्वचा तयार करण्यास मदत करतात.
- ब्रोकोली, पालक आणि मेथीची पाने यासारख्या भाज्या जीवनसत्त्वे अ आणि क, आहारातील कॅल्शियम आणि लोह यांचे चांगले स्रोत आहेत.
- संत्री, पपई, टरबूज, स्ट्रॉबेरी, द्राक्ष आणि रताळे यांसारख्या भाज्या आणि फळांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, ह्या भाज्या आणि फळे संक्रमणांचा सामना करण्यास आणि प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
४. भरपूर तंतुमय पदार्थ असलेले अन्नपदार्थ
बद्धकोष्ठता जखमा आणि चीरांवर दबाव टाकून बरे होण्याच्या प्रक्रियेस विलंब करू शकतात. तंतुमय पदार्थांमुळे पचन चांगले होऊन बद्धकोष्ठता टाळली जाते.
- कच्ची फळे आणि भाज्यांमध्ये तंतुमय पदार्थ असतात आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देतात.
- ओट्स आणि नाचणीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि ते कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, प्रथिने आणि लोहाचे समृद्ध स्रोत देखील असतात.
- प्रथिने आणि तंतुमय पदार्थांसाठी आहारात मसूर, हरभरे आणि कडधान्यांचा समावेश केला जाऊ शकतो.
५. पचण्यास सोपे अन्नपदार्थ
बाळंतपणानंतर शरीरात वायू जमा होतो. नव्यानेच आई झालेल्या स्त्रियांनी गॅस आणि बद्धकोष्ठता निर्माण करणारे अन्नपदार्थ खाऊ नयेत. सी-सेक्शननंतरच्या कालावधीत, तुम्ही जंक फूड आणि कार्बोनेटेड पेये यांचे सेवन टाळले पाहिजे आणि सूप, कॉटेज चीज, मटनाचा रस्सा, दही आणि शरीराद्वारे सहज पचल्या जाणार्या इतर पदार्थांचे सेवन करावे.
६. लोह समृध्द अन्नपदार्थ
लोह शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी राखते. आणि रक्तवाढीस मदत करते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा लोहाची मदत होते. अंड्यातील पिवळ बलक, लाल मांस, ऑयस्टर, गोमांस यकृत आणि सुकामेवा यासारख्या खाद्यपदार्थांमध्ये लोहाचे खूप जास्त प्रमाण असते. १९ वर्षांवरील महिलांसाठी लोहाचे दररोजचे सेवन ९ मिग्रॅ इतके आहे. जास्त लोहाच्या सेवनाने बद्धकोष्ठता होऊ शकते आणि ते टाळले पाहिजे.
७. द्रव
भरपूर द्रव प्यायल्याने डिहायड्रेशन आणि बद्धकोष्ठता दूर राहण्यास मदत होते. द्रवपदार्थ योग्य प्रमाणात घेतल्यास पचन सुलभ होते आणि शस्त्रक्रियेनंतर बरे होण्यास मदत होते. नारळाचे पाणी, कमी चरबीयुक्त दूध, लिंबूवर्गीय नसलेल्या फळांचे रस, हर्बल चहा, ताक आणि सूप यासारखे द्रवपदार्थ हे आवश्यक पोषक तत्वांचे चांगले स्रोत आहेत. तसेच तुम्ही रोज ८ ते १० ग्लास पाणी प्यावे.
कॅल्शियम-फोर्टिफाइड ड्रिंक्स, कमी चरबीयुक्त दही आणि दूध यांसारखे द्रवपदार्थ बाळाच्या आईच्या दुधाचा पुरवठा सुधारण्यासाठी मदत करतात. स्तनपान हे बाळाच्या दैनंदिन आहाराचा महत्वाचा भाग आहे. कॉफी, चहा आणि एनर्जी ड्रिंक्स यांसारखी कॅफिनयुक्त पेये टाळावीत कारण त्यामुळे तुमच्या बाळाच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो.
८. दुग्धजन्य पदार्थ
दूध, कमी चरबीयुक्त दही आणि चीज यांसारखी कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांमध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि बी आणि डी जीवनसत्त्वांचे चांगले प्रमाण असते. ही खनिजे स्तनपान करणाऱ्या मातांसाठी आवश्यक आहेत आणि दररोज किमान ५०० मिली दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केले पाहिजे.
९. भाज्या आणि फळे
सर्व फळे आणि भाज्या नवीन आईसाठी आवश्यक असतात. विशेषतः हिरव्या भाज्या विशेषतः चांगल्या असतात कारण त्यामध्ये जीवनसत्त्वे, लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. सोयाबीन, पालक आणि ब्रोकोली व्यतिरिक्त, मेथीच्या भाजीचा जेवणात समावेश करणे चांगले असते. मशरूम आणि गाजर हे शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत. स्तनपान करणाऱ्या मातांना ब्लूबेरीच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांचा आणि व्हिटॅमिन सी समृद्ध लिंबूवर्गीय फळांचा फायदा होऊ शकतो.
१०. इतर पदार्थ
वर नमूद केलेल्या खाद्यपदार्थांव्यतिरिक्त, भारतीय स्वयंपाकामध्ये आवश्यक असलेल्या मसाल्यांचा समावेश केल्यास, नवीन आईला बाळंतपणामुळे येणाऱ्या शारीरिक गरजांचा सामना करण्यास मदत होईल. जिरे, मेथी, हळद, आले आणि लसूण आणि ओवा हे औषधी गुणधर्म असलेले काही मसाले आहेत. ओव्यासारखे काही मसाल्याचे पदार्थ अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल असतात, तर हळद जळजळ कमी करण्यास मदत करते.
सिझेरिअन प्रसूतीनंतरची झीज भरून काढण्यासाठी काही भारतीय मसाल्याचे पदार्थ
भारतीय खाद्यपदार्थांमध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्त्वे यांसारख्या पोषक तत्वांचा भरपूर प्रमाणात समावेश असतो आणि भारतीय पदार्थांचा समावेश असलेली चांगली आहार योजना, बाळाच्या आईच्या पोषणविषयक गरजा पूर्ण करू शकते. मेथी दाणे, बडीशेप, जिरे, पालक, मसूर डाळ, ओट्स आणि दलिया यासारख्या भारतात सामान्यतः वापरल्या जाणार्या खाद्यपदार्थांमुळे आईच्या दुधाचे उत्पादन वाढण्यास मदत होते.
भारतीय मसाल्याच्या पदार्थांचा जर आईच्या आहारात समावेश केलेला असेल तर सी-सेक्शन प्रसूतीनंतर लवकर बरे होण्यासाठी त्याची मदत होते.
- हिंग/हिंग:गरोदरपणाच्या आहारात हिंगाचा समावेश केल्याने पचन चांगले होईल आणि प्रसूतीनंतर निर्माण होणारी गॅसची समस्या कमी होण्यास त्यामुळे मदत होईल.
- जिरे:जिरे पचनास मदत करतात आणि दूध उत्पादनात देखील त्यामुळे मदत होते.
- ओवा:ओवा खाल्ल्यास पचनास मदत होते आणि पचनसंस्थेसाठी ते चांगले असते. आईच्या दुधाद्वारे ओव्यांतील घटक बाळापर्यंत पोहोचतात आणि बाळाच्या हालचाली आणि पचन नियंत्रित करण्यास मदत होते.
सिझेरियन प्रसूतीनंतर कोणते पदार्थ टाळावेत?
सी- सेक्शननंतर , तुम्हाला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे तुमच्या नेहमीच्या कामांवर मर्यादा येतात. तुम्ही कोणतीही शारीरिक हालचाल करू शकणार नसल्यामुळे, तुम्ही जे खात आहात त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. पचायला बराच वेळ लागेल असे काहीही खाणे टाळणे आणि थकवा वाढवणारे खाद्यपदार्थ टाळणे महत्त्वाचे आहे. तसेच, प्रसूतीच्या तणावातून बरे होण्यासाठी, शरीराला पौष्टिक आणि हलके अन्न आवश्यक आहे. हे अन्न आवश्यक खनिजांसह पूरक अन्न असते आणि कोणताही प्रतिकूल परिणाम टाळण्यास मदत करते. शिफारस केलेल्या खाद्यपदार्थांप्रमाणेच असे खाद्यपदार्थ प्रसूतीनंतर टाळले पाहिजेत.
- मसालेदार अन्न टाळा कारण त्यामुळे जठराचा त्रास होऊ शकतो आणि बाळाला स्तनपान दिल्यास बाळाला सुद्धा मसाल्याची चव लागू शकते.
- कार्बोनेटेड पेये आणि लिंबूवर्गीय ज्यूसचे सेवन करू नये कारण त्यामुळे गॅस होऊ शकतो.
- कॉफी आणि चहा सारख्या कॅफिनयुक्त पेयांचे सेवन करणे टाळले पाहिजे कारण कॅफिनमुळे बाळाच्या वाढीमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.
- अल्कोहोल टाळले पाहिजे कारण त्यामुळे आईच्या स्तनपानाच्या क्षमतेमध्ये व्यत्यय येऊ शकतो आणि बाळाची वाढ आणि विकास नीट होत नाही.
- गॅस निर्माण करणाऱ्या पदार्थांपासून दूर राहा. उडदाची डाळ, छोले, चवळी, राजमा, चणे, बेसन, लोणचे, हिरवे वाटाणे, सुके वाटाणे आणि फ्लॉवर, कोबी, भिंडी, ब्रोकोली आणि कांदे यांसारखे खाद्यपदार्थ प्रसूतीच्या दिवसापासून किमान ४० दिवस टाळावेत.
- थंड आणि न शिजवलेले अन्नपदार्थ मेनूमधून वगळले पाहिजेत.
- आंबवलेले, तळलेले आणि फास्ट फूड पूर्णपणे टाळावे.
- सी-सेक्शननंतर पहिले ३-४ दिवस तूप आणि तांदूळ टाळा.
तुमच्या सिझेरिअन प्रसूती नंतरच्या आहाराचा उत्तम फायदा मिळण्यासाठी महत्वाच्या टिप्स
तुम्ही जे खात आहात त्यातून सर्वोत्तम मिळविण्यासाठी तुमच्या आहाराच्या संदर्भात लक्षात ठेवण्याच्या काही मूलभूत टिप्स खालीलप्रमाणे आहेत:
- दिवसभरात तीनदा जेवण्याऐवजी, दिवसभर थोडे थोडे म्हणजे पाच ते सहा वेळा खा.
- जेवणामध्ये दोन तासांचे अंतर ठेवा. जर तुम्हाला भूक लागली असेल तर मध्ये काही फळे किंवा सुक्यामेव्याचा नाश्ता करा.
- हळहळू जेवण करा. अन्न गिळण्यापूर्वी ते व्यवस्थित चावून खा. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना या दरम्यान तुमच्या बाळाची काळजी घेण्यास सांगा जेणेकरून तुम्ही शांततेत जेवण करू शकाल.
- जेव्हा शक्य असेल तेव्हा झोपा. आजूबाजूच्या नवजात बाळासाठी चांगली झोप घेणे कठीण असू शकते, परंतु चांगली झोप झाल्यास शरीराची झीज भरून निघण्यास आणि अधिक जलद बरे होण्यास मदत होईल म्हणून वारंवार डुलकी घेणे सुनिश्चित करा.
- घरी न शिजवलेले अन्न खाणे टाळावे. फक्त घरी शिजवलेले अन्न खा आणि तुमच्या जेवणात भरपूर ताज्या पदार्थांचा समावेश करा.
सी-सेक्शन प्रसूतीनंतरचा काळ कठीण आणि आव्हानात्मक असू शकतो. लवकर बरे होण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे. चांगला, पौष्टिक आहार तुम्हाला शस्त्रक्रियेतून बरे होण्यासाठी मदत करू शकतो. तसेच चांगला आहार घेतल्यास तुम्ही आणि तुमचे बाळ निरोगी राहू शकत
आणखी वाचा:
सिझेरिअन प्रसूतीनंतर वजन कसे कमी करावे
सिझेरियन प्रसूती नंतरची पाठदुखी: कारणे आणि उपचार