Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण बाळांसाठी नाचणी – आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती

बाळांसाठी नाचणी – आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती

बाळांसाठी नाचणी – आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती

निरोगी आहार ह बाळाची निरोगी वाढ आणि विकासासाठी महत्वाचा असतो. निरोगी खाणे लवकर सुरु करणे केव्हाही चांगले असते. आपल्या बाळास निरोगी खायला घालून तुम्ही बाळासाठी तंदुरुस्त जीवनशैलीचा पाया घालत आहात. तुमच्या मुलाच्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे असे पोषक धान्य म्हणजे नाचणी होय, जे त्याच्या असंख्य फायद्यासाठी सुपरफूड म्हणून ओळखले जाते.

नाचणी म्हणजे काय?

नाचणी, ज्याला फिंगर मिलेट किंवा रागी म्हणूनही ओळखले जाते, त्यामध्ये प्रथिने, लोह आणि कॅल्शियम जास्त प्रमाणात असतात. भारत हा जगभरात, नाचणीचे उत्पादन करणारा एक अग्रगण्य देश आहे. या संपूर्ण धान्यात फेनिलालाइन, मेथिओनिन, आइसोल्यूसीन आणि ल्युसीन ह्यासारखी महत्त्वपूर्ण अमीनो ऍसिड्स असतात. दुष्काळ असतानाही नाचणीची लागवड करता येते.

बाळांसाठी नाचणीचे आरोग्यविषयक फायदे

आईवडिलांच्या मनात बऱ्याचदा येणारा एक प्रश्न असा आहे की नाचणी बाळांसाठी चांगली असते का? याचे उत्तर होय आहे. नाचणी आवश्यक पोषक मूल्यांनी समृद्ध आहे आणि सहा महिन्यांच्या वयाच्या पासूनच, मुलांच्या आहारात ह्या निरोगी धान्याचा समावेश करता येऊ शकतो. आपल्या बाळास ह्या सुपर धान्यपासून मिळणारे काही आरोग्य फायदे येथे दिलेले आहेत:

  • कॅल्शियमचा समृद्ध स्रोत

नाचणीतील कॅल्शियमचे प्रमाण अत्यंत जास्त आहे आणि म्हणूनच आपल्या मुलाच्या वाढत्या हाडांसाठी फायदेशीर आहे. हाडांच्या फ्रॅक्चर होण्याचा धोका कमी करण्यास आणि कॅल्शियमच्या सप्लिमेंट्सची आवश्यकता दूर करण्यास नाचणी मदत करते. त्याशिवाय, नाचणी मानवी शरीरामध्ये रक्ताचे उत्पादन सुधारते.

  • तंतुमय पदार्थांमुळे पचन सुधारते आणि बाळाला पोट भरल्याची भावना देते

नाचणीमधील तंतुमय पदार्थांमुळे पचन सुधारते आणि आपल्या बाळाचे पोट जास्त काळ भरलेले राहते. नाचणीत आढळणारे अमीनो ऍसिड्स यकृताभोवतीची चरबी कमी करतात आणि बाळाच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतात, अशा प्रकारे बाळाला लठ्ठपणापासून दूर ठेवण्यास मदत होते.

  • नैसर्गिक लोहाचा समृद्ध स्रोत

नाचणीमध्ये असलेले नैसर्गिक लोह मुलांमधील ऍनिमिया रोखू शकते. अंकुरलेल्या नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे लोह शोषण्यास मदत होते. नाचणीमधील उच्च पौष्टिक सामग्रीमुळे, बाळांमधील कुपोषण प्रतिबंधित होते.

  • एक नैसर्गिक विश्रांतीदायक आहे

नाचणीमध्ये लक्षणीय प्रमाणात असलेल्या अँटिऑक्सिडेंट्समुळे शरीर रिलॅक्स होते आणि मुलांमध्ये निद्रानाश, चिंता आणि डोकेदुखीसारख्या समस्या टाळण्यास मदत होते.

  • मधुमेहाचा धोका कमी करते

फायबर आणि पॉलिफेनॉल मोठ्या प्रमाणात असल्याने मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत करते. नाचणी समाविष्ट असलेल्या जेवणात ग्लायसेमिक प्रतिसाद कमी असतो.

  • त्वचा आणि केस सुधारते

नाचणीमध्ये मेथिओनिन असल्याने बाळाची त्वचा आणि केस निरोगी राहण्यास प्रोत्साहित करते.

आपल्या बाळासाठी नाचणीच्या पाककृती

आपल्या छोट्या बाळासाठी पौष्टिक आहार करण्यासारखे दुसरे काम नाही. त्यासाठी नाचणी आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी.

. घरगुती नाचणीच्या लापशीची पाककृती

घरगुती नाचणीच्या लापशीची पाककृती

बाळांसाठी नाचणीच्या लापशीची रेसिपी, तसेच नाचणी पेय बनवण्याची पद्धत येथे दिलेली आहे

साहित्य:

  • १ कप पाणी
  • १ टीस्पून तूप
  • /२ कप दूध
  • २ चमचे नाचणी पावडर
  • किसलेला गूळ एक चिमूटभर

लापशीसाठी नाचणीची पावडर तयार करणे:

१. स्वच्छ धुवून नाचणी स्वच्छ कपड्यावर पसरवून उन्हात वाळवा
२. नाचणी पूर्णपणे कोरडे झाल्यानंतर खमंग वास येईपर्यंत मध्यम आचेवर भाजून घ्या
३. भाजलेली नाचणी एका प्लेटवर ठेवा आणि थंड होऊ द्या
४. थंड केलेली नाचणी बारीक वाटून घ्या
५. पावडर एका हवाबंद डब्यात ठेवा
६. आपल्या आवश्यकतेनुसार वापरा

नाचणीची लापशी तयार करण्याची कृती:

१. गॅसवर पॅन ठेवून त्यात तूप गरम करावे
२. नंतर दोन चमचे नाचणीची पावडर घाला आणि हलकेच परतून घ्या
३. एक कप पाण्यात आणि अर्धा कप दुधात ती मिसळा
४. मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत ढवळत रहा. गाठी होणार नाहीत ह्याची काळजी घ्या
५. किसलेला गूळ घाला आणि तो पूर्णपणे विरघळेपर्यंत मिक्स करीत रहा
६. तुम्हाला हवे तसे मिश्रण झाल्यावर गॅस बंद करा

. नाचणी पेय करण्याची पाककृती

एक कप नाचणी दोन कप पाण्यात काही तास भिजवा. रस काढण्यासाठी भिजवलेल्या नाचणीला थोडेसे पाणी घालून बारीक करून घ्या. नंतर हा रस दुधात मिसळा नंतर थोडासा गूळ किंवा साखर घाला अधिक दूध घालून आवश्यकतेनुसार पातळ करा.

. नाचणी इडली पाककृती

ही पौष्टिक नाचणी इडली पाककृती सात महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी आदर्श आहे.

साहित्य:

  • /२ कप नाचणी
  • /४ कप उडीद डाळ
  • पोहे १/४ कप (सपाट तांदूळ)
  • १ किसलेले गाजर

नाचणी इडलीची पाककृती

१. उडीद डाळ आठ ते नऊ तास पाण्यात भिजत ठेवावी
२. पोहे तीन ते चार तास धुवून भिजवा
३. भिजलेली उडीद डाळ एक मऊ पेस्ट येईपर्यंत बारीक वाटून घ्या. आवश्यक असल्यास पाणी घाला
४. भिजलेला पोहे घालून मिक्स होईपर्यंत बारीक वाटून घ्या
५. वेगळ्या भांड्यात थोडे नाचणीचे पीठ घ्या, आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि मऊ पेस्ट येईपर्यंत मिक्स करा
६. त्यात उडीद डाळ आणि पोहे पीठ घाला आणि चांगले मिक्स करा
७. मिश्रण झाकून ठेवा आणि रात्रभर ते आंबू द्या
८. दुसऱ्या दिवशी सकाळी पिठात किसलेले गाजर घाला आणि मिक्स करा. इडली पिठ आता वापरण्यास तयार आहे
९. इडलीच्या साच्यांना थोडे तेल लावा आणि प्रत्येकामध्ये एक चमचा पिठ घाला
१०. इडली कुकरमध्ये १०-१५ मिनिटे स्टीम करा

घ्यावयाची खबरदारी

तुमच्या बाळाशी संबंधित इतर सर्व गोष्टींप्रमाणेच, जेव्हा तुम्ही बाळासाठी घरी नाचणी लापशी बनवता तेव्हा स्वच्छता राखणे खूप महत्वाचे आहे. बाळाला भरवण्याआधी सर्व भांडी पूर्णपणे निर्जंतुकीकरण केलेली असल्याची खात्री करा. तसेच तुमचे हात साबणाने स्क्रब केले असल्याचे सुनिश्चित करा.

तुमच्या वाढत्या बाळासाठी नाचणीइतके आरोग्यविषयक फायदे दुसरे कुठलेच धान्य देत नाही. जितक्या लवकर तुम्ही बाळाच्या दैनंदिन आहारात नाचणीचा समावेश कराल तितक्या लवकर बाळाला त्याचे फायदे मिळण्यास सुरुवात होईल. तुमच्या रेसिपीनुसार, नाचणी पावडर, संपूर्ण नाचणी, अंकुरलेली नाचणी आणि नाचणी पीठ आपण निवडू शकता असे काही पर्याय आहेत.

अस्वीकरण: ही माहिती केवळ मार्गदर्शक आहे आणि पात्र व्यावसायिकांच्या वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही.

आणखी वाचा:

बाळांसाठी अद्रक – आरोग्यविषयक फायदे आणि सुरक्षिततेचे उपाय
बाळासाठी भाज्यांच्या सर्वोत्तम ५ प्युरी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article