In this Article
- लहान मुलांमध्ये आढळणारा हर्निया म्हणजे काय?
- बाळांना आणि लहान मुलांना होणाऱ्या हर्नियाचे प्रकार
- लहान मुलांना होणाऱ्या हर्नियाची कारणे काय आहेत?
- मुलांना होणाऱ्या हर्नियाची चिन्हे आणि लक्षणे
- हर्नियाचे निदान
- बाळांमधील हर्नियावर उपचार
- जोखीम आणि गुंतागुंत
- बाळाच्या हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतरची पुनर्प्राप्ती
- लहान मुलांमध्ये हर्नियावर उपचार करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत का?
हर्निया ही त्वचेखाली येणारी गाठ आहे. पोट किंवा जांघेकडील भागात ही गाठ तयार होते. हर्निया मुख्यतः ओटीपोटाकडील भागात होतो. परंतु मांड्यांचा वरचा भाग, नाभी आणि मांडीचा सांधा यांसारख्या भागात देखील आढळू शकतो. पोट आणि ओटीपोटाकडील स्नायू एक भित्तिका तयार करतात. आणि आतड्यांसारखे अवयव सामावून घेतात.
लहान मुलांमध्ये आढळणारा हर्निया म्हणजे काय?
लहान मुलांच्या ओटीपोटाच्या ऊतींमध्ये एक लहान छिद्र असते, जिथे नाळ जोडली जाऊ शकते. जेव्हा बाळ गर्भाशयात असते तेव्हा ही नाळ आईला बाळाशी जोडते. जन्माच्या वेळी किंवा नंतर, जसजसे हे बाळ मोठे होते तसे स्नायूंमधील हे छिद्र बंद होते. काही वेळा जेव्हा तेथील स्नायूंची वाढ नीट होत नाही तेव्हा तिथे एक छोटी पोकळी किंवा छिद्र तयार होते. जर आतडे किंवा ऊती ह्या छिद्रात अडकून पिळले गेले तर त्याची परिणीती हार्निया मध्ये होते.
बाळांना आणि लहान मुलांना होणाऱ्या हर्नियाचे प्रकार
हर्निया होतो तेव्हा र्फॅटी टिश्यू किंवा अवयव आसपासच्या स्नायूंच्या भित्तिकेच्या पोकळीतून बाहेर ढकलले जातात. बहुतेकदा, लहान मुले जेव्हा जन्माला येतात तेव्हा त्यांच्या शरीरात ओटीपोटाकडील भागात काहीवेळा छिद्रे असतात, परंतु सहसा अशी छिद्रे केव्हातरी बंद होतात. जर ही छिद्रे बंद झाली नाहीत तर संयोजी ऊतक या छिद्रांमधून पिळवटून बाहेर पडतात आणि परिणामी बाळांना हर्निया होतो. लहान मुलांमध्ये आढळणारे हर्नियाचे दोन सर्वात सामान्य प्रकार आहेत:
1.नाळेशी संबंधित (अंबिलिकल) हर्निया
अशा प्रकारचा हर्निया नाभीभोवती होतो. काहीवेळा, बाळांच्या जन्माच्या वेळी नाभी भोवतीच्या स्नायूंमध्ये छिद्र असते. ओटीपोटाकडील स्नायूंची भित्तिका किंवा लहान आतडे ह्या छिद्रातून बाहेर पडू शकतात, त्यामुळे अश्या प्रकारच्या हर्नियाला नाभीचा हर्निया म्हणून ओळखले जाते. अश्या प्रकारच्या हर्नियाचा आकार २ सेंटीमीटर आणि ६ सेंटीमीटरपेक्षा जास्त असतो. सहसा, नवजात मुलांमध्ये आढळणाऱ्या अश्या प्रकारच्या हर्नियामुळे लहान मुलांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. आणि डॉक्टर तो सहज पुन्हा आत ढकलू शकतात. बहुतेक नाभीचा हर्निया आपोआप बरा होतो कारण दोन वर्षात हे स्नायूंचे छिद्र आपोआप बरे होते.
2. इन्गुइनल हर्निया
बाळ मुलगा आहे की मुलगी ह्यावर इन्गुइनल हर्नियाचे प्राथमिक कारण अवलंबून असते. आतड्याचा काही भाग किंवा पडदा ओटीपोटाकडील भागातून बाहेर पडणे हे इन्गुइनल हर्नियाचे प्रमुख कारण आहे. मुलांमध्ये, हा हर्निया जांघेकडील भागातून अंडकोष असलेल्या ग्रंथींपर्यंत पोहोचू शकतो. ह्या ग्रंथींना इंग्रजीमध्ये स्क्रोटम असे म्हणतात. मुलींसाठी, हा फुगवटा अंडाशयातून किंवा बीजवाहिन्यांमधून जांघेकडील भागात सरकतो आणि योनीभोवतीच्या बाहेरील भागापर्यंत वाढू शकतो.
लहान मुलांना होणाऱ्या हर्नियाची कारणे काय आहेत?
हर्निया सामान्यत: बाळाच्या ओटीपोटाचे स्नायू पूर्णपणे विकसित नसल्यास किंवा स्नायूंच्या भित्तिकांमध्ये दोष असल्यास उद्भवू शकतो. अकाली जन्मलेल्या बाळांच्या बाबतीत, जांघेकडील भागात छिद्र आढळते. बाळाचे स्नायू विकसित झालेले नसल्यामुळे किंवा पोटाचा दाब पेलण्यासाठी हे स्नायू सक्षम नसल्यामुळे असे होऊ शकते.
1.नाळेचा हर्निया होण्याची कारणे
जन्माच्या वेळी, बाळाच्या नाळेभोवती स्नायूंची गोलाकार रिंग असते. बाळाच्या जन्माच्या आधी ही रिंग नाहीशी होते. जेव्हा ही रिंग आपोआप नाहीशी होत नाही तेव्हा नाळेचा हार्निया होतो.
2. इन्गुइनल हर्नियाची कारणे
त्याचे प्राथमिक कारण म्हणजे पिशवी (सॅक) तयार होते. ही पिशवी जन्मत:च बंद झाली पाहिजे. परंतु तसे न झाल्यास, पोटाचे स्नायू रिंग मधून जांघेकडील भागाच्या दिशेने पिळवटले जातात. मुलांच्या बाबतीत, हा अडकलेला अवयव आतड्याचा भाग असू शकतो, तर मुलींच्या बाबतीत, तो आतड्याचा किंवा अंडाशयाचा भाग असू शकतो.
मुलांना होणाऱ्या हर्नियाची चिन्हे आणि लक्षणे
बाल्यावस्थेत आणि बालपणात, शारीरिक दबाव पडल्यावर किंवा ताण आल्यानंतरच ऊती सामान्यतः बाहेर पडतात. रडणे, खोकणे किंवा शिंकणे इत्यादी क्रियांमुळे हा ताण किंवा दबाव येऊ शकतो. अश्या केसेस मध्ये, दिसणारा फुगवटा सहसा स्वतःच आपोआप नाहीसा होतो. अश्या प्रकारच्या हर्नियाचा त्रास होत नाही आणि हर्निया कमी केला जाऊ शकतो.
1. नाळेचा हर्निया
मूल मोठे झाल्यावर नाळेचा हार्निया आपोआप नाहीसा होतो. काही वेळा नाळ अडकल्यास अश्या प्रकारचा हार्निया आपोआप बरा होत नाही. ताप, बद्धकोष्ठता, तीव्र ओटीपोटात दुखणे, उलट्या होणे, लालसरपणा, पोट फुगणे इत्यादी लक्षणांचा समावेश होतो.
2. इन्गुइनल हर्निया
ह्या प्रकारच्या हर्निया मध्ये गाठ नाहीशी होत नाही, परंतु त्याऐवजी ती छिद्रामध्ये अडकते आणि संपूर्ण वेळ फुगलेली राहते. ह्याचे लक्षण म्हणजे बाळ रडायचे थांबत नाही कारण ही गाठ बाळासाठी कठीण आणि वेदनादायक असते. लहान मुलांमध्ये आढळणारे आणखी एक लक्षण म्हणजे जांघेकडील भागाला अचानक सूज येऊ लागते. आपोआप कमी होणाऱ्या हार्नियाच्या प्रकारामध्ये बाळावर ताण आल्यावरच फुगवटा दिसतो अन्यथा तो दिसत नाही. पीळ पडलेल्या किंवा अडकलेल्या हर्नियाच्या बाबतीत, मुलाला वेदना होऊ शकते, बाळ चिडचिड करू लागते, त्याला उलट्या होतात आणि बाळ रडायचे थांबत नाही.
हर्नियाचे निदान
हर्नियाचे निदान ही डॉक्टरांसाठी एक सोपी प्रक्रिया आहे. तपासणी दरम्यान, डॉक्टर मुलाचे पोट, मांड्यांचा आतील भाग, जांघेकडील भागाच्या दोन्ही बाजू आणि मुलांचे अंडकोष तपासतात. मुलाला खोकला येत असेल,मूल रडत असेल किंवा त्याला ताण वाटत असेल तेव्हा तो फुगवटा वाढतो की नाही हे तपासतात, तसेच शस्त्रक्रिया आवश्यक आहे की नाही हे ठरवतात. हर्नियाला आत ढकलले जाऊ शकते का आणि तो अडकला आहे का किंवा पीळ पडला आहे का हे सुद्धा तपासतात. गुंतागुंत तपासून पाहण्यासाठी डॉक्टर पोटाचा एक्स-रे आणि अल्ट्रासाऊंड करू शकतात आणि संसर्ग झाला आहे का हे तपासण्यासाठी रक्ताची चाचणी करू शकतात.
बाळांमधील हर्नियावर उपचार
बाळांमध्ये हर्निया शस्त्रक्रियेने काढून टाकण्याची गरज हार्नियाच्या तीव्रतेवर अवलंबून असते. काहींसाठी, हार्निया फक्त आत ढकलला जाऊ शकतो, तर काहींसाठी, शस्त्रक्रिया आवश्यक असते. शस्त्रक्रिया एक तास चालते आणि सामान्य भूल दिली जाते.
1. नाळेचा हर्निया
नाळेच्या हर्नियासाठी, शस्त्रक्रिया केवळ पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी केली जाते. शस्त्रक्रियेची निवड करण्यापूर्वी, डॉक्टर हर्निया वेदनादायक आहे का, एक वर्षानंतर कमी होतो आहे का, मूल ३ किंवा ४ वर्षांचे होईपर्यंत नाहीसा होत नाहीये का किंवा अडकलेला नाहीये ना ह्यासारख्या बाबी तपासून पहिल्या जातात. शस्त्रक्रियेदरम्यान नाभीवर किंवा फुगवटाच्या ठिकाणी छेद घेतला जातो, आणि आतडयांचे ऊतक पोटाच्या भित्तिकेतून मागे ढकलले जातात आणि छिद्र नंतर टाके घालून बंद केले जाते.
2. इन्गुइनल हर्निया
इन्ग्यूनल हार्निया असलेल्या बाळांना पीळ पडण्याचा धोका मोठ्या मुलांपेक्षा जास्त असतो. म्हणूनच, लहान मुलांमध्ये इन्गुइनल हर्नियाच्या शस्त्रक्रियेस उशीर करू नये. या प्रक्रियेमध्ये शल्यचिकित्सक जांघेकडील भागात २ ते ३ सें.मी.चा एक लहान छेद घेतात आणि आतडे परत योग्य स्थितीत ढकलतात. नंतर पुन्हा हर्नियापासून बचाव होण्यासाठी स्नायूंच्या भित्तिकेला टाके घातले जातात.
जोखीम आणि गुंतागुंत
हर्निया कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय होऊ शकतो. ओटीपोटावर दाब पडल्याने हर्निया होतो आणि जेव्हा दाब नसतो तेव्हा हार्निया नाहीसा होतो.
इन्गुइनल हर्निया मुख्यत अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये आढळतो. अश्या प्रकारचा हार्निया १ ते २ टक्के मुलांमध्ये आढळतो आणि मुख्यतः मुलींपेक्षा मुलांवर ह्याचा परिणाम जास्त होतो. नाळेचा हार्निया होणे खूप सामान्य आहे आणि सुमारे १० टक्के मुलांना अश्या प्रकारचा हार्निया होतो. हार्नियाचा हा प्रकार मुलींमध्ये आणि अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये आढळणे अधिक सामान्य आहे.
इन्गुइनल हर्नियामध्ये काही गुंतागुंत निर्माण होऊ शकते आणि त्यावर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. आतडी अडकून पीळ पडू शकतो. आतड्याचा हा भाग, पोटाच्या भित्तिकेतून मागे ढकलला जाऊ शकत नसल्यास, पुरेसा रक्तपुरवठा होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत, डॉक्टर परिस्थिती आणखी बिघडण्या आधी हर्नियावर त्वरित शस्त्रक्रिया करण्याची शिफारस करतात.
बाळाच्या हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतरची पुनर्प्राप्ती
साधारणपणे, मुलामध्ये नाभीसंबधीचा हर्निया दुरुस्तीची शस्त्रक्रिया एका तासाच्या आत केली जाते, बहुतेक बाळांना शस्त्रक्रियेनंतर काही तासांत घरी नेले जाऊ शकते. एकदा मूल घरी आले की, त्याला पुरेशी विश्रांती मिळावी यासाठी त्याला घरातच राहावे लागते आणि काही दिवस डे-केअर किंवा शाळेत जाणे टाळावे लागते. त्याला काही दिवस वेदना शामक औषधे देखील लिहून दिली जाऊ शकतात. हर्नियाच्या शस्त्रक्रियेतून बरे होण्यास २ ते ३ दिवसांचा कालावधी लागतो. टाके बरे होईपर्यंत त्याला शस्त्रक्रियेनंतर २ दिवस स्पंज बाथ द्यावा. हालचाल केल्यास मुलाला जांघेकडील भागात खेचल्यासारखे वाटू शकते.
लहान मुलांमध्ये हर्नियावर उपचार करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत का?
बाळाला हर्नियाचा त्रास होत असताना, वैद्यकीय उपचारांव्यतिरिक्त, तुम्ही काही उपायांनी तुमच्या मुलाला मदत करू शकता. नाळेच्या हर्नियावर उपचार करण्यासाठी काही घरगुती उपाय खाली नमूद केले आहेत:
- पाणी:प्रत्येक आहारानंतर तुमच्या बाळाला पुरेसे पाणी द्या. पाणी प्यायल्याने प्रणाली स्वच्छ होण्यास मदत होते आणि नाभीसंबधीचा हर्नियाची समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. ह्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि पचन सुलभ होते.
- कोरफड:तुम्ही कोरफडीचा गर काढू शकता आणि तुमच्या मुलाचे वय ६ महिन्यांपेक्षा जास्त असल्यास त्यांच्यासाठी तयार केलेल्या अन्नात घालू शकता. जर तुमचा मुलगा लहान असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर त्याला काही चमचे कोरफडीचा गर देऊ शकता.
- नारळाचे तेल आणि ऑलिव्ह ऑईल:नारळाचे तेल आणि ऑलिव्ह ऑइल हे लहान मुलांमधील नाळेचा हर्निया कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. दिवसातून ५ ते ६ वेळा नारळ किंवा ऑलिव्ह तेलाने मुलाच्या पोटाला नियमितपणे मसाज करण्यास सांगितले जाते.
- बेरी:नाळेच्या हार्नियासाठी सर्वोत्तम नैसर्गिक उपचारांपैकी एक मानला जातो, कारण त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात आणि फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.
- हिरव्या भाज्या:ब्रोकोली, शिमला मिरची, काकडी आणि पालक यांसारख्या ताज्या हिरव्या भाज्यांमध्ये उच्च प्रमाणात फायबर सामग्री, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात आणि ते हार्नियापासून बचाव करण्यास मदत करतात.
हर्निया अत्यंत धोकादायक नसला तरीही तुमच्या मुलासाठी वेदनादायक असू शकतो. लक्षणे लवकर ओळखणे आणि डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे चांगले.
आणखी वाचा:
बाळ रात्री रडत असल्यास काय कराल?
बाळाचे ओठ फुटणे: कारणे, लक्षणे आणि उपाय