Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळाची काळजी बाळाच्या झोपेविषयी बाळ रात्री रडत असल्यास काय कराल?

बाळ रात्री रडत असल्यास काय कराल?

बाळ रात्री रडत असल्यास काय कराल?

बाळ होणे ही आयुष्य बदलावणारी घटना आहे. लहान बाळाला वाढवणे हे काही सोपे काम नाही ह्याची तुम्हास जाणीव असेल अशी आम्हाला खात्री आहे. तुम्हाला बाळाला दूध देण्याचे वेळापत्रक, आवश्यकतेनुसार झोप आणि लसीकरणाच्या वेळापत्रक इत्यादी गोष्टी हाताळाव्या लागतात, परंतु त्यासोबत आणखी एक गोष्ट हाताळावी लागते आणि ती म्हणजे आपल्या बाळाला रडणे.

सुरुवातीला बाळ त्याच्या गरजांसाठी रडण्याद्वारेच आपल्याशी संवाद साधत असते. परंतु बाळ काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे त्याचा अर्थ सांगणे अवघड आहे. परंतु काळजी करू नका आपल्या बाळासाठी कुठला उपाय लागू होतो यावर अवलंबून परिस्थितीशी सामना करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत.

बाळे रात्री का रडतात?

नवजात बाळ रात्रभर आणि वारंवार रडत रहाणे सामान्य असते. परंतु बाळ जसे मोठे होते तसे रडण्याची वारंवारिता कमी झाली पाहिजे. रात्री मुले का रडतात याची काही सामान्य कारणे येथे आहेत.

. भूक लागणे

बाळांचे पोट लहान असते आणि पहिल्या काही महिन्यांत बर्‍याचदा बाळाला दूध देणे आवश्यक असते. बर्‍याच बाळांना दर दोन ते तीन तासांनी पाजावे लागेल. बाळाच्या भुकेच्या लक्षणांवर लक्ष ठेवा, जसे की बाळाने बोटे त्याच्या तोंडात घालणे गडबड करणे आणि ओठ चोखणे इत्यादी. बाळ रडण्याआधीच बाळाला पाजल्यास तुमची रात्र शांततेत जाईल.

. गॅसच्या समस्येमुळे अस्वस्थता

बाळांना गॅसचा त्रास होण्याची प्रवृत्ती असते आणि त्यांना आराम मिळावा यासाठी ढेकर काढण्याची किंवा गॅस पास करण्याची आवश्यकता असू शकते. स्तनपान देताना किंवा बाटलीतून दूध घेत असताना बाळ हवा आत घेते. आपल्या बाळाला पोटावर झोपवणे आणि त्याच्या पाठीवर हळूवारपणे मालिश करणे उपयुक्त ठरू शकते

. डायपर गलिच्छ किंवा ओला होणे

काही बाळे ओला किंवा गलिच्छ डायपर थोड्या काळासाठी सहन करू शकतात तर इतरांना तो त्वरित बदलण्याची आवश्यकता असू शकते. बाळाला नवीन डायपर लावल्यास बाळ पुन्हा झोपी जाण्यास मदत होते. बाळाचा डायपर पटकन बदला आणि ते करताना बाळाशी संवाद साधू नका, त्यामुळे बाळ पुन्हा झोपी जाण्यास मदत होईल.

. धीर धरण्याची गरज

अंधारात एकटे राहणे आपल्या बाळासाठी एक भीतीदायक बाब असू शकते. तुमचे लक्ष वेधून घेण्यासाठी बाळ कदाचित मोठ्याने रडू लागेल, तुम्ही बाळाच्या जवळच असणे चांगले.

. थंडी वाजणे

जर आपल्या बाळाला थंडी वाजत असेल तर तो रडण्याची शक्यता आहे. बाळाला हलके कपडे एकावर एक घातल्यास त्याला उबदार राहण्यास मदत होते. तथापि, बाळाला जाड कपड्यांचे थर घातले जात नाहीत ना हे सुनिश्चित करा, कारण त्यामुळे एसआयडीएसचा धोका आहे.

. दात खाणे समस्या

जर आपले बाळ विनाकारण रात्री रडत असल्याचे दिसत असेल तर, दात खाणे हे कारण आहे का ते तपासा. दातदुखीचा त्रास चार महिन्यांपासून सुरू होऊ शकतो आणि त्यामुळे जास्त प्रमाणात लाळ गळू शकते तसेच हाताला येईल ती गोष्ट बाळ चावू लागते. जर आपल्या लहान मुलास आधीच दात येणे सुरू झाले असेल तर हिरड्या हळुवारपणे मालिश करा आणि रेफ्रीजरेट केलेले बेबी टीदर्स बाळाला द्या त्यामुळे बाळाची चिडचिड कमी होण्यास मदत होऊ शकते.

. खूप उत्तेजित होणे

आपल्या बाळाला एखाद्या सामाजिक कार्यक्रमात किंवा शॉपिंग ट्रिपवर बाहेर नेणे कधीकधी त्याच्यासाठी खूपच रोमांचक ठरते. जर हा अनुभव संपल्यानंतर लगेच झोपवले (उदा: आपल्या बाळाच्या निजायची वेळ आधी घरी पोचणे किंवा तो घरी येताना झोपला असेल तर) तर त्याचा परिणाम म्हणजे बाळ रात्री रडू शकते. बाळाला थोडावेळ त्याच्या ओळखीच्या ठिकाणी ठेवणे आणि नंतर बिछान्यावर नेल्यास हि समस्या सुटण्यास मदत होऊ शकते.

. आजारी वाटणे

आजारी, थकवा असल्यासारखे वाटणे आणि दमून गेल्यास प्रौढांनाही रडण्याची इच्छा होते! जर तुमचे बाळ नेहमीपेक्षा जास्त रडत असेल किंवा वेगळे वाटत असेल तर ते कदाचित एखाद्या आजारामुळे असू शकते. ताप, खोकला, उलट्या होणे किंवा भूक न लागणे अशी काही लक्षणे आपल्या मुलास आहेत की नाही ह्याची तपासणी करा. हे कारण असल्याचे दिसत असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

रडणे किती काळ टिकते?

लवकर हस्तक्षेप केल्यास समस्या दूर होऊ शकते आणि तुमची व बाळाची रात्र शांततेत जाऊ शकते. बाळाचे रडणे हाताळण्याचा योग्य पद्धतीचा अवलंब करुन तुम्ही तुमच्या बाळाच्या वागण्यात दोन आठवड्यांतच बदल घडवून आणू शकता. परंतु हे काम तुमच्या बाळाचे वय वाढत असताना अधिक कठीण होते. एक वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलांना खूप झोप आणि थकवा आलेला असताना ती मुले झोपायला जाताना त्रास देतात. त्यांच्या वेळापत्रकात झालेल्या बदलांमुळे बाळे तासन्तास रडू शकतात. मुल लहान असताना आपण उपाययोजना न केल्यास, रडणे तीन किंवा चार वर्षांच्या वयापर्यंत टिकू शकते.

बाळ रात्रभर केव्हा झोपू शकेल?

दोन महिन्यांपेक्षा कमी वयाची बाळे दुधासाठी दररोज रात्री कमीतकमी दोन वेळा जागे होण्याची शक्यता असते. दोन महिन्यांपासून चार महिन्यांपर्यंत बाळ रात्री एकदा दुधासाठी उठते. चार महिन्यांनंतर,फॉर्मुला घेणारी बाळे रात्री सुमारे सात तास सरळ झोपू शकतात. स्तनपान घेणारी बाळे पाचव्या महिन्यापासून रात्री न उठता झोपायला हवीत. या वयोगटातील सर्व सामान्य मुलांसाठी हे खरे आहे; रात्री बाळाला न घेता किंवा न झुलवता त्यांना झोप लागायला हवी.

रात्रीचे बाळ रडू लागले तर तुम्ही त्याचे सांत्वन करू शकता का ?

या विषयावर दोन प्रकारची मते आहेत. एक मत असे आहे की एकदा कुणीही प्रतिसाद देत नाही हे समजल्यावर बाळ विनाकारण रडणे थांबवतील. दुसरी विचारसरणी अशी आहे की प्रत्येक वेळी जेव्हा बाळ रडते तेव्हा त्याला घेतले पाहिजे आणि त्यांचे सांत्वन केले पाहिजे, कोणत्याही कारणास्तव बाळाला एकटे सोडू नये. आपण कोणत्या मार्गाने जायचे आहे हे ठरविणे आपल्यावर अवलंबून आहे

जर तुम्ही त्याला रडत ठेवले तर तुमच्या बाळाला इजा होईल का?

असा विश्वास आहे की बाळाला रडू देणे दीर्घकाळापर्यंत त्याच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी हानिकारक ठरू शकते. परंतु या दाव्याचे समर्थन करण्यासाठी पुरावा नाही. तथापि, बहुतेक झोपेच्याप्रशिक्षण पद्धतींनी असे सुचवले आहे की पालकांनी आपल्या बाळाच्या थोड्या रडण्याला त्वरित प्रतिसाद देणे थांबवावे. परंतु त्यामुळे पालक आणि बाळ यांच्यातील बंध वेगळे करणे देखील समाविष्ट आहे. काही संशोधकांचे मत आहे की झोपेच्या प्रशिक्षण पद्धतीमध्ये बाळाला कितीही काळ रडू दिले जाते परंतु त्यामुळे बाळाच्या नैसर्गिक जैविक चक्रात व्यत्यय आल्यामुळे बाळाच्या शारीरिक, भावनिक, सामाजिक आणि वर्तणुकीच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो.

रात्री आपल्या रडणार्‍या बाळाला कसे शांत करावे?

 • जर तुमचे बाळ त्याच्या सर्व गरजा पूर्ण झालेल्या असूनही रात्री रडत जागे होत असेल तर त्याला कदाचित ही सवय लागलेली असेल. येथे काही उपाय आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या बाळाला (चार महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या) शांत राहण्यास आणि रात्री झोपण्यास मदत करू शकता.
 • जेव्हा बाळाला थोडी गुंगी येते तेव्हा त्याला क्रिबमध्ये किंवा पलंगावर ठेवा. बाळाचे झोपण्याआधीचे विधी पूर्ण झाले नसले तरीही बाळाला क्रिबमध्ये ठेवा. बाळ जागे असताना त्याची स्मरणात शेवटी पलंग किंवा क्रिब असला पाहिजे तुम्ही नाही. मध्यरात्री झोपेतून उठल्यावर ह्यामुळे बाळाला स्वतःचे स्वतः झोपी जाण्यास ह्यामुळे मदत होते. जर बाळ झोपेच्या वेळी रडणे थांबवत नसेल तर दर पाच ते पंधरा मिनिटांच्या अंतराने त्याच्याकडे जा. तुम्ही बाळाच्या भेटी दरम्यानचा कालावधी वाढविणे सुरू ठेवू शकता. तथापि, बाळाला अस्वस्थ होऊ देऊ नका; जर तो अत्यंत घाबरलेला दिसत असेल तर तो शांत होईपर्यंत त्याला घ्या. तो शांत होईपर्यंत आपण काही क्षण खोलीत बसू शकता, परंतु बाळाला झोप लागण्यापूर्वी बाळापासून दूर व्हा.
 • रात्रीच्या वेळी आपल्या बाळास क्रिब किंवा पलंगाच्या बाहेर घेऊ नका. आपल्या बाळाला झोप येईपर्यंत झुलवणे किंवा त्याला आपल्या पलंगावर थोडा काळ आणल्यास मूळ उद्धेश सध्या होणार नाही.
 • तुमचे बाळ सहा महिने किंवा त्याहून मोठे असल्यास बाळाला सॉफ्ट टॉय किंवा ब्लँकेट सारख्या सुरक्षित वस्तूशी ओळख करून द्या. रात्री झोपेतून उठल्यावर आपल्या बाळासाठी हे खूप आरामदायक असेल आणि रात्री तुमच्याऐवजी तो लवकरच या वस्तुंना बिलगून राहू शकेल.

तुम्ही तुमच्या बाळासाठी नियमित झोपेचे वेळापत्रक निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यासाठी इतर काही गोष्टी आहेत त्या खालीलप्रमाणे:

 • बाळाची झोप दोन तास किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी करणे आणि दिवसात फक्त दोन वेळा बाळाला झोपू देणे.
 • शक्यतो रात्री बाळाचा ओला डायपर बदलणे टाळणे; परंतु आवश्यक असल्यास, बाळाला उत्तेजित होण्यापासून रोखण्यासाठी दिवे धूसर ठेवा.

तुमच्या बाळासाठी झोपेचे प्रशिक्षण

झोप प्रशिक्षण म्हणजे तुमच्या बाळाला स्वत: झोपायला शिकवण्यासाठी वापरली जाणारी पद्धत. एकदा हे उद्दीष्ट गाठले की तुमचे बाळ रात्रभर झोपण्याची शक्यता असते. काही बाळांना झोपेची ही कला सहजपणे अवगत होते, तर काहींना वेळ लागू शकतो. झोपेच्या प्रशिक्षणाचे दोन मार्ग आहेत नियंत्रित रडणे आणि अश्रू नसण्याची पद्धत. प्रत्येकाचे फायदे आणि तोटे पाहिल्यानंतर निवड दोन्ही दोघांवर अवलंबून असते. हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, एकदा प्रशिक्षण घेतल्यानंतर लगेच जादू होत नाही. झोपेचे प्रशिक्षण केव्हा सुरू करावे याबद्दल कोणतेही विशिष्ट वय निर्दिष्ट केलेले नाही. पालक मोठ्या संख्येने झोपेचे प्रशिक्षण मार्ग निवडतात कारण ते यापुढे झोपेच्या समस्येस सामोरे जाऊ शकत नाहीत. तज्ञांचे मत आहे की वयाच्या तीन महिन्यानंतर मुले पूर्णपणे झोपण्यास सक्षम असतात

ओरडणे / रडणे / फरबर पद्धत काय आहे?

डॉ. रिचर्ड फेबर नावाच्या एका डॉक्टरांद्वारे तयार केलेली ही पद्धत आहे. ह्या पद्धतीनुसार बाळाला शांत करण्याआधी थोडा वेळ रडू दिले जाते. डॉ. फेबर यांनी ह्या विषयावर एक पुस्तक देखील लिहिले आहे आणि ते सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या बाळांवर आदर्शपणे लागू केले जाऊ शकते. सुचविलेली पद्धत खालीलप्रमाणे आहेः

 • बाळा जेव्हा खूप गुंगी आलेली असते तेव्हा हळूवारपणे त्याला क्रिबमध्ये किंवा बिछान्यावर ठेवा.
 • आपल्या बाळाला शुभ रात्रीचे चुंबन द्या आणि खोलीबाहेर जा.
 • जर बाळाने लगेच रडण्यास सुरुवात केली तर आत जाण्यापूर्वी काही क्षण थांबा.
 • तुमच्या बाळाचे हळू आवाजात सांत्वन करा आणि प्रकाश मंद असुद्या किंवा दिवे बंद करा. बाळाला उचलून घेऊ नका किंवा खायला घालू नका.
 • तरीही आपले मूल रडत असेल तर खोलीबाहेर जा.
 • आपल्या बाळाला झोप लागेपर्यंत तुम्ही ह्या चरणांची पुनरावृत्ती करा. तुम्ही पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी तुम्हाला काही प्रयत्न करावे लागण्याची शक्यता आहे.
 • आपल्या मुलाला शांत होण्यासाठी आणि झोपेचा प्रयत्न करण्यासाठी जास्त वेळ देऊन प्रत्येक भेटी दरम्यान वेळ निश्चित करा.
 • जर बाळ रात्री पुन्हा उठला असेल तर त्याच प्रक्रियेची पुनरावृत्ती करा.

डॉ. फेबर यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे आठवडाभरात मुले झोपायला सक्षम होतात. असे मानले जाते की हे तंत्र कार्य करते कारण बऱ्याच बाळांना समजते की रडण्यामुळे त्यांना घेतले जाते किंवा खायला मिळते. बरीच मोठी बाळे स्मार्टपणे त्या परिस्थितीचा उपयोग करतात. कितीही रडले तरीसुद्धा आपल्याला कोणीही घेणार नाही हे ह्या पद्धतीमुळे बाळांना समजते. हे समजल्यावर बाळ विनाकारण रडणे थांबवण्याची शक्यता आहे.

तथापि, या पद्धतीवरही बर्‍यापैकी टीका होत आहे. असहाय्य बाळाला रडू देण्याची प्रक्रिया पालकांना अत्यंत क्लेशकारक वाटते, म्हणूनच बाळाचे रडणे खूप जास्त वाढते तेव्हा बरेचसे पालक दुसऱ्या किंवा तिसर्‍या रात्री ही पद्धत सोडून देतात. जर बाळाच्या रडण्याकडे पालकांनी लक्ष देणे कमी केले तर ह्या पॉईंटनंतर सुधारणा अपेक्षित असते (सुमारे ३ ते ४ दिवसानंतर)

तुमच्या रडणार्‍या बाळासाठी हळूहळू अंतर ठेवण्याचे तंत्र

बाळाला विनाकारण रात्री रडण्यापासून रोखण्यास मदत करणारी एक पद्धत म्हणजे हळूहळू अंतर ठेवण्याचे तंत्र होय. बाळ जागे झाल्यावर तुम्ही त्याला परत झोपी जाण्यास मदत करण्याऐवजी ही पद्धत टप्प्याटप्प्याने ते काम करते. तुम्ही ते कसे करू शकता ते पाहुयात.

 1. पहिले दोन दिवस, बाळाच्या खोलीच्या बाहेर पडण्याआधी बाळ पूर्णपणे झोपले असल्याची खात्री होईपर्यंत तिथेच थांबा.
 2. नंतर, बाळ पूर्ण झोपण्याआधी हळूहळू खोलीबाहेर येणे सुरू करा.
 3. जर बाळाने तुम्हाला रूम बाहेर जाताना पहिले आणि बाळ रडू लागले तर परत या आणि त्याला जवळ न घेता हळू आवाजात धीर द्या. तो शांत झाल्यावर निघून जा.
 4. पहिल्या काही दिवसात असे र्‍याच वेळा घडू शकते आणि तो झोपी जाईपर्यंत तुम्हाला बाळाच्या खोलीबाहेर जाणे आत येणे सुरु ठेवावे लागू शकते.
 5. मग, झोपेत असताना त्याला क्रिबमध्ये किंवा कॉटवर ठेवण्यास सुरूवात करा आणि जेव्हा बाळ जागा होतो तेव्हा त्याच्या जवळच बसा.
 6. दररोज, तुमच्या आणि बाळाच्या मध्ये तुम्ही दाराजवळ जाईपर्यंत अंतर वाढवा.
 7. दाराच्या बाहेर जा परंतु जवळच रहा जेणेकरुन बाळ रडत असेल तर तुम्हाला ते समजेल.
 • या पद्धतीद्वारे, सुमारे काही आठवड्यांत, आपण झोपेच्या वेळी आपल्या बाळाला पाळण्यात ठेवून बाहेर जाऊ शकता. त्यामुळे बाळ स्वतःचे स्वतः झोपण्यास सक्षम होईल. तसेच, या तंत्राचा अधिकाधिक फायदा घेण्यासाठी खालील टिप्स लक्षात ठेवाः
 • जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला योग्यरीत्या हाताळू शकता असे वाटते तेव्हाच हे करून पहाणे चांगले. चार महिने हे योग्य वय आहे.
 • ही पद्धत वापरताना मध्येच थांबू नका नाहीतर आधी केलेले सगळे प्रयन्त वाया जाऊ शकतात.

आपण डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

बर्‍याच वेळा, रडणाऱ्या बाळाच्या गरजा पूर्ण केल्यास ते शांत होते किंवा तुम्ही जवळ असल्यावर ते शांत होते. परंतु, कधीकधी बाळ रात्री खूप रडत असेल तर बाळ आजारी असण्याची शक्यता असते. बाळाचे रडणे थांबले नाही तर आपण बालरोगतज्ञांशी संपर्क साधावा आणि पुढील पैकी एक स्पष्ट असेल:

 • शारीरिक अस्वस्थता किंवा आजाराची लक्षणे, जसे की तीव्र ताप, पुरळ इत्यादी
 • बाळामध्ये भीती किंवा तणावची चिन्हे
 • उपाय करूनसुद्धा तुमच्या बाळाच्या वागणुकीत अगदी दोन आठवड्यांत अगदी थोडाही बदल होणार नाही
 • शारिरीक आणि भावनिक वाढीचे टप्पे गाठण्यासाठी प्रत्येक बाळाची स्वतःची टाइमलाइन असते. झोपेच्या वेळापत्रकांचा विचार केला तर हे वेगळे नाही. तसेच, जेव्हा बाळ आजार असेल किंवा तो विकासाच्या टप्प्यावर असेल तर झोपेचे रुटीन बिघडू शकते. अशा प्रकारे, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की बाळ वाढवताना वेळ, संयम आणि बरेच प्रयत्न आवश्यक असतात.

आणखी वाचा:

बाळाला रात्री कसे झोपवावे?
बाळाला गुंडाळणे – योग्य पद्धतीने ते केव्हा आणि कसे करावे?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article