In this Article
अंडी हा प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. अंड्याला सुपरफूड असे देखील म्हणतात. बाळाला अंडे द्यावे किंवा नाही अशी शंका बऱ्याच पालकांच्या मनात असते. तुम्ही त्यापैकीच एक पालक असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. बाळाचा आहारात अंड्याचा समावेश करण्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
लहान मुले अंडी कधी खाऊ शकतात?
आठ महिन्यांच्या बाळाच्या आहारात अंड्याचा समावेश अगदी सुरक्षितपणे केला जाऊ शकतो. बाळाला अंड्याचा पांढरा भाग एक वर्षानंतर दिला जाऊ शकतो. जगाच्या काही भागांमध्ये, बाळ ६ महिन्यांचे झाल्यावर बाळाला अंडे देतात. त्यामुळे त्यांना ह्या सुपरफूडची ऍलर्जी होत नाही. परंतु तुमच्या बाळाला अंडी खायला देण्यापूर्वी आपल्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या.
अंड्याचे पौष्टिक मूल्य
आईच्या दुधानंतर अंडी हा उत्तम प्रतीच्या प्रथिनांचा स्रोत असतो. एका अंड्यामध्ये तांबे, जस्त, सेलेनियम, कॅल्शियम, लोह, कोलेस्टेरॉल, फॅट, फॅटी ऍसिडस् आणि व्हिटॅमिन डी, बी १२, ई कोलीन आणि फोलेट ह्या सारखी जीवनसत्त्वे असतात. हे सर्व पोषक घटक मुलांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी आवश्यक आहेत. खालील तक्त्यामध्ये एका अंड्यातील पोषक घटक दिलेले आहेत (सर्व्हिंग साइज ५० ग्रॅम):
कॅलरीज | ६८ |
एकूण चरबी | ४.५ ग्रॅम |
संतृप्त चरबी | १.५ ग्रॅम |
ट्रान्स फॅट | ० ग्रॅम |
कोलेस्ट्रॉल | १८३ मिग्रॅ |
सोडियम | ६१.५ मिग्रॅ |
एकूण कार्बोहायड्रेट | ० मिग्रॅ |
आहारातील फायबर | ० ग्रॅम |
एकूण साखर | ० ग्रॅम |
प्रथिने | ६.६ ग्रॅम |
व्हिटॅमिन डी | ०.४३ एमसीजी |
कॅल्शियम | २५ मिग्रॅ |
लोह | ०.९ मिग्रॅ |
पोटॅशियम | ६९ मिग्रॅ |
तुम्ही बाळाला आधी अंड्यातील पिवळा बलक आणि नंतर पांढरा बलक खायला द्याल, त्यामुळे अंड्याचे पौष्टिक मूल्य स्वतंत्रपणे समजून घेण्यासाठी या दोन घटकांची झटपट तुलना करूया.
अंड्यातील पिवळ बलक आणि पांढऱ्या भागाची तुलना
अंड्यातील पिवळ बलक आणि अंड्याचा पांढरा भाग ह्या दोन्हीमध्ये पोषक तत्वे जास्त प्रमाणात असतात, अंड्याच्या पांढऱ्या बलकामध्ये कॅलरीज कमी असतात तसेच त्यामध्ये कार्बोदके आणि चरबी नसते. याशिवाय, अंड्यांमध्ये आढळणाऱ्या सर्व पोषकतत्त्वांपैकी निम्म्याहून अधिक पोषक तत्त्वे अंड्याच्या पांढऱ्या भागात असतात. परंतु, हे ऍलर्जीचे कारण म्हणून ओळखले जाते, आणि म्हणूनच, सुरुवातीला बाळाला फक्त अंड्यातील पिवळ बलक देण्यास सांगितले जाते.
अंड्यातील पिवळ बलक आणि अंड्याच्या पांढऱ्या भागाची तपशीलवार माहिती पाहूया.
अंड्याचा पांढरा भाग:
वर नमूद केल्याप्रमाणे, अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये कार्बोहायड्रेट आणि चरबी नसते. शिवाय एका अंड्यामध्ये आढळणाऱ्या सर्व पोषक तत्वांपैकी निम्म्याहून अधिक पोषक तत्वे अंड्याच्या पांढऱ्या भागात असतात. एका अंड्याच्या पांढऱ्या भागात सुमारे चार ग्रॅम प्रथिने असतात.
अंड्याचा बलक:
अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये चरबी, संतृप्त चरबी आणि कोलेस्ट्रॉल असते. त्यामुळे पालकांना चिंता वाटू शकते. परंतु ह्या पोषक घटकांसोबत, अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये आवश्यक फॅटी ऍसिडस्, जीवनसत्त्वे देखील असतात. तसेच त्यामध्ये लोह आणि कॅल्शियम देखील जास्त असते. हे सर्व बाळाच्या विकासासाठी आवश्यक आहे. त्याबरोबरच, अंड्यातील पिवळ्या बलकामुळे लहान बाळांना ऍलर्जी होत नाही. म्हणून, बाळाचे स्तनपान सोडवताना अंड्याचा पिवळा बलक बाळाला देण्यास सांगितले जाते.
आता अंड्याचे आरोग्यदायी फायदे पाहूया.
लहान मुलांसाठी अंड्याचे फायदे
अंड्यांमध्ये खनिजे, जीवनसत्त्वे आणि इतर अनेक पोषक घटक देखील असतात. आणि हे घटक लहान बाळांच्या विकासासाठी आणि वाढीसाठी फायदेशीर असतात. तुमच्या बाळाला अंडी खायला देण्याचे काही फायदे येथे दिलेले आहेत
१. पचन आणि प्रतिकारशक्ती
अंड्यांमध्ये कॅल्शियम, सेलेनियम आणि झिंक यांसारखे खनिज पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. ह्या घटकांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नवजात बाळांमध्ये नवीन पेशींचे उत्पादन लक्षणीय प्रमाणात असते. अंड्यांमध्ये फोलेट भरपूर प्रमाणात असते आणि ते पेशींच्या पुनरुत्पादनास मदत करते. अंड्याचा पांढरा भाग शरीरात योग्य सोडियम आणि पोटॅशियमचे प्रमाण राखण्यास मदत करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अंडी, विशेषतः अंड्यातील पिवळ बलक, लहान मुलांना खाण्यास आणि पचण्यास सोपा असतो. कृपया लक्षात ठेवा की अंड्याचा पांढरा भाग एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना देऊ नये
२. मेंदूचा विकास
अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये कोलीन आणि कोलेस्टेरॉल असते. आणि हे घटक लहान मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असतात. कोलेस्टेरॉल चरबीच्या पचनास मदत करते. हार्मोन्स तयार करण्यास देखील कोलेस्टेरॉलची मदत होते कारण संप्रेरक–उत्पादक ग्रंथी त्याचा वापर करतात आणि आपल्या शरीरात आढळणारे विविध हार्मोन्स तयार करतात. कोलीन हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीत आणि मज्जासंस्थांच्या योग्य कार्यास मदत करते.
३. यकृताचे कार्य
अंड्यांमधील सल्फर हे केराटीन आणि कोलेजनच्या उत्पादनात मदत करते तसेच व्हिटॅमिन बी १२ शोषण्यासाठी सुद्धा त्याची मदत होते. यकृताच्या योग्य कार्यासाठी हे महत्त्वपूर्ण आहे.
४. डोळ्यांचे आरोग्य
ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारखे अँटिऑक्सिडंट देखील अंड्यांमध्ये आढळतात. हानिकारक प्रकाश आणि अतिनील प्रकाशामुळे डोळ्यांचे होणारे नुकसान ल्युटीन मुळे वाचते. दृष्टी कमी होण्यापासून रोखण्यासाठी दोन्ही अँटिऑक्सिडंट्स महत्त्वपूर्ण आहेत. हे दोन्ही अँटिऑक्सिडंट्स अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये आढळतात.
त्यामुळे, आता तुम्हाला अंड्यांचे आरोग्यदायी फायदे माहित आहेत परंतु आता तुम्ही अंडी खरेदी कशी करावीत असा विचार करत असाल. अंडी निवडताना आणि साठवताना तुम्हाला काही मुद्दे लक्षात ठेवावे लागतील.
अंडी कशी निवडावी?
ताजी अंडी निवडण्यासाठी वर नमूद केलेल्या मुद्द्यांव्यतिरिक्त, अंडी ताजी आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही ही पुढे दिलेली चाचणी देखील करून पाहू शकता. एक वाटी पाणी घ्या आणि त्यात हलक्या हाताने एक अंडे टाका. ताजी अंडी बुडतील तर शिळी अंडी तरंगतील कारण अंड्यांमध्ये हवेचा कप्पा असतो. जसजशी अंडी मोठी होतात तसतसे हवेचा कप्पा वाढतो, त्यामुळे अशी अंडी पाण्यावर तरंगतात.
अंडी कशी साठवायची?
लहान मुले एकाच दिवसात खरेदी केलेली सर्व अंडी खाऊ शकत नाहीत. म्हणूनच, अंडी ताजी ठेवण्यासाठी अंडी योग्यरीत्या साठवली जाणे महत्वाचे आहे. जोपर्यंत तुमचे बाळ ते खाऊ शकत नाही तोपर्यंत अंडी ताजी ठेवण्यासाठी खालील उपाय करावेत
- सांगितलेल्या कालबाह्य तारखेपूर्वी किंवा खरेदीच्या सात दिवसांच्या आत अंडी वापरण्याचा प्रयत्न करा.
लहान बाळांसाठी अंडी शिजवण्यासाठी काही टिप्स
एकदा तुमचे बाळ एक वर्षाचे झाले की, त्याला तुम्ही अंडी उकडून, तळून किंवा स्क्रॅम्बल करून देऊ शकता. तुम्ही कस्टर्ड, ओट्स, मॅश केलेले बटाटे इत्यादी पदार्थांमध्ये एखादा घटक म्हणून अंड्याचा समावेश करू शकता. लक्षात घ्या कि कच्चे अंडे घातलेले पदार्थ जसे की घरगुती आईस्क्रीम किंवा भाजलेले पदार्थ लहान बाळांना खायला घालू नयेत. लहान बाळांची पचनसंस्था अजूनही विकसित होत आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या बाळासाठी अंडी शिजवण्याची विचार करता तेव्हा तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत
- बाळाला अंड्याच्या चवीची सवय होण्यासाठी वेळ द्या. सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणात देऊ पहा आणि हळू हळू प्रमाण वाढवा.
- तुमचे बाळ जे खाते आहे तेच त्याला खायला द्या. सक्तीने आहार देऊ नका.
- जर बाळाचे वय एक वर्षापेक्षा कमी असेल तर अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये साखर किंवा मीठ घालू नका.
- अर्ध्या उकडलेल्या अंड्यांमध्ये रोगजनक घटक असू शकतात. बाळाची प्रतिकारशक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसल्यामुळे बाळ त्याचा प्रतिकार करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या बाळाला फक्त उकडलेली अंडी खायला दिली पाहिजेत.
अंड्यांबद्दल आणि ते तुमच्या बाळाला कसे खायला द्यावे याबद्दलच्या तुमच्या सामान्य प्रश्नांचे निराकरण केले गेले आहे अशी आम्ही आशा करतो. आता अंड्यांच्या काही पाककृती पाहुयात का? येथे अंड्याच्या काही पाककृती दिलेल्या आहेत. ह्या पाककृती तुम्ही तुमच्या बाळासाठी करून बघू शकता. तुमच्या बाळाला निरोगी आणि मजबूत बनवण्यासाठी ह्या पाककृतीपासून बाळाला आवश्यक पोषण मिळू शकते.
आपल्या बाळासाठी अंड्याच्या काही पाककृती
अंड्यांच्या काही पाककृती खाली दिलेल्या आहेत. ह्या पाककृती शिजवायला सोप्या आणि तुमच्या लहान मुलाला खायला घालण्यासाठी योग्य आहेत.
१. उकडलेले अंडी
वर नमूद केल्याप्रमाणे, एक वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलांना उकडलेले अंडी देता येते. बाळाला चवीची सवय लावण्यासाठी मीठ किंवा साखर न घालता उकडलेली अंडी द्यावीत. परंतु, जर बाळाला अशी अंडी खाणे अजिबात आवडत नसेल, तर तुम्ही चवीसाठी चिमूटभर मीठ घालू शकता. तुम्ही तुमच्या बाळाला फक्त अंड्यातील पिवळा बलक खायला देऊ शकता.
सहसा, लोक अंडी उकडण्यासाठी दहा मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळ सतत उकळतात, त्यामुळे अंड्याचा पांढरा रंग तसेच चव आणि पोत खराब होते. अंडी खायला कठीण जाते. अंडी शिजवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे:
साहित्य:
- १ अंडे
- २ ते ३ कप पाणी
कृती:
- एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये अंडी ठेवून ८–१० मिनिटे उकळवत ठेवा.
- अंडी सोलून, लहान तुकडे करा आणि सर्व्ह करा.
२. स्क्रॅम्बल्ड एग
तुमच्या बाळासाठी स्क्रॅम्बल्ड एग बनवण्यासाठी खाली दिलेली कृती करून पहा. एक वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांसाठी किंवा जर तुम्ही त्यांच्या जेवणात तेलाचा समावेश केला नसेल तर तुम्ही ही रेसिपी वगळू शकता. स्क्रॅम्बल्ड एग बाळासाठी पचायला थोडे जडजाऊ शकते , म्हणून जेव्हा तुम्ही ही डिश तुमच्या लहान बाळाला देताना काळजी घ्या.
साहित्य:
- १ अंडे
- १ टीस्पून तेल/लोणी
- एक चिमूटभर मीठ
- चिमूटभर मिरपूड (पर्यायी)
कृती:
- एका लहान वाडग्यात अंडी फोडून घ्या.
- अंड्यातील पिवळ बलक फोडण्यासाठी काटाचमच्याने तो फेटून घ्या आणि अंड्याच्या पांढऱ्या भागात अर्धवट मिसळून घ्या.
- मध्यम आचेवर एक लहान कढई ठेवा.
- कढई गरम झाल्यावर त्यावर एक चमचा तेल/लोणी घाला आणि थोडी फेटलेली अंडी घाला.
- हलकेच फेटून घ्या आणि ते शिजेपर्यंत किंवा घट्ट होईपर्यंत चमच्याने हलवत रहा.
- चिमूटभर मीठ आणि मिरपूड घालून सर्व्ह करा.
३. भाज्या आणि अंडी घालून केलेला भात
ही पाककृती मोठ्या मुलांसाठी आहे. थोडे कमी तिखट असलेले मोठ्या माणसांचे पदार्थ खाऊ शकणाऱ्या मुलांसाठी ही रेसिपी आहे. तुम्ही अंडी घालून केलेला भात कसा करू शकता ह्याची रेसिपी खाली दिलेली आहे:
साहित्य:
- १ कप शिजवलेला भात
- १ उकडलेले अंडे, बारीक चिरून
- १/४ कप शिजवलेल्या भाज्या (गाजर, ब्रोकोली, फ्रेंच बीन्स इ.)
- १ टीस्पून तेल/लोणी
- आवश्यकतेनुसार मीठ
कृती:
- कढईत थोडे तेल/बटर गरम करा.
- शिजवलेल्या भाज्या घाला.
- शिजवलेला भात, चिरलेली अंडी घालून मिक्स करा.
- आवश्यक असल्यास मीठ घाला.
४. आमलेट
तुमच्या मुलांसाठी अंड्याची ही सोपी पाककृती आहे . अंड्याचे ऑम्लेट सर्व प्रकारच्या ब्रेडसोबत किंवा तसेच खाऊ शकतो. तसेच,ज्या मुलांना ह्या रेसिपीतील प्रत्येक घटकाची ओळख करून दिलेली आहे अश्या मोठ्या मुलांसाठी हि रेसिपी योग्य आहे.
साहित्य:
- १ अंडे
- चवीनुसार मीठ
- चिमूटभर मिरपूड (पर्यायी)
- २ टीस्पून तेल/लोणी
कृती:
- एक अंडे घेऊन त्यात मीठ आणि मिरपूड घाला आणि नंतर चांगले फेटून घ्या.
- गरम पॅनमध्ये तेल/बटर घाला आणि त्यावर हे मिश्रण घाला.
- दोन्ही बाजूनी प्रत्येकी २० ते ३० सेकंद शिजू द्या.
येथे काही वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आहेत. तुम्हाला तुमच्या लहान मुलाला अंडी देताना त्यांची मदत होऊ शकेल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
१. अंड्याच्या कोणत्या भागाची बाळांना ऍलर्जी होऊ शकते?
अंड्याच्या पांढऱ्या भागात चार प्रथिने असतात त्यामुळे लहान बाळांना ऍलर्जी होऊ शकते. अंड्यातील पिवळ्या बलकापासून ऍलर्जी होणे अत्यंत दुर्मिळ आहे. परंतु, मुले ५ वर्षांची झाल्यावर ह्या ऍलर्जीवर मात करू शकतात.
२. तुम्ही तुमच्या बाळाला दररोज अंडी खायला देऊ शकता का?
होय, तुम्ही तुमच्या मुलांना दररोज अंडी देऊ शकता. बाळाला किती अंडी देऊ शकता हे त्याचे वय आणि आहारावर अवलंबून असते. त्यापेक्षा जास्त अंडी न देण्याचा बाळाला सल्ला दिला जातो. तुम्ही तुमच्या बाळाला किती अंडी देऊ शकता हे तुम्ही बालरोगतज्ञ/आहारतज्ञांकडून तपासून घेऊ शकता.
३. तुम्ही ८ महिन्यांच्या बाळाला किती अंड्यातील पिवळा बलक देऊ शकता?
आठ महिन्यांच्या मुलाला दररोज फक्त एका अंड्यातील पिवळा बलक द्यावा असा सल्ला दिला जातो.
४. तुम्ही तुमच्या बाळाला अंड्यातील पिवळा बलक मऊ उकडून किंवा तसाच देऊ शकता का?
बाळाला अंड्यातील पिवळा बलक तसाच देण्याची शिफारस केली गेलेली नाही, कारण अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये साल्मोनेला एन्टरिटिडिस नावाचा बॅक्टेरिया असू शकतो, त्यामुळे मुलांना संसर्ग होऊ शकतो. अंडी पूर्णपणे शिजवल्यावर साल्मोनेला एन्टरिटायडिस नष्ट होतो. अंड्यातील पिवळा बलक संपूर्णपणे न शिजवता फक्त गरम केल्यास ते साल्मोनेला एन्टरिटिडिस जीवाणू मारण्यासाठी पुरेसे नाही. संसर्ग झाला आहे कि नाही हे समजण्यासाठी, सॅल्मोनेलाची लक्षणे दिसणे आवश्यक आहे. संक्रमित व्यक्तीमध्ये आढळणारी अतिसार, ताप आणि ओटीपोटात जळजळ होण्याची लक्षणे चार ते सात दिवस टिकतात.
बहुतेक पालकांना त्यांच्या बाळाच्या आहारात अंड्यांचा समावेश करण्याची भीती वाटते. परंतु बाळ एक वर्षाचे झाल्यावर त्याला अंडी देणे सुरक्षित मानले जाते. ह्या लेखात चर्चा केल्याप्रमाणे, सावधगिरी बाळगल्यास, बाळासाठी अंडी केवळ सुरक्षितच नाहीत तर फायदेशीर देखील आहेत.
आणखी वाचा:
बाळांना गूळ (जागरी) देणे
बाळांसाठी दलिया – आरोग्यविषयक फायदे आणि रेसिपीज