Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळाची काळजी बाळाच्या मालिशसाठी ऑलिव्ह ऑईल वापरण्याचे ७ फायदे

बाळाच्या मालिशसाठी ऑलिव्ह ऑईल वापरण्याचे ७ फायदे

बाळाच्या मालिशसाठी ऑलिव्ह ऑईल वापरण्याचे ७ फायदे

बाळांची मालिश आणि त्याचे फायदे ह्याविषयी आपण ह्यापूर्वी अनेक वेळा ऐकलेले आहे. बाळाची मालिश करून त्याच्या विकासाला चालना देण्याचा तो एक आनंददायी मार्ग आहे आणि ही पद्धत अनेक वर्षांपासून लोकप्रिय आहे. केवळ वापरलेल्या तेलाची निवड कालांतराने बदलली आहे. पारंपरिक नैसर्गिक तेलांमध्ये बाळांसाठी काय सर्वोत्तम आहे ह्याची काळजी घेतली जाते परंतु ही तेले अधिक सौम्य कशी केली जातील ह्याची काळजी आता घेतली जात आहे. का? कारण, तुमच्या बाळाची त्वचा मऊ, कोमल तसेच त्वचेच्या समस्यांपासून मुक्त राहावी म्हणून!. चुकीच्या मसाज ऑइलचा वापर केल्यामुळे बाळाला सर्दी होऊ नये असं तुम्हाला वाटतं, हो ना? आणि म्हणूनच ऑलिव्ह ऑईल ह्या सगळ्यापासून तुमची सुटका करते.

बाळांसाठी ऑलिव्ह ऑईलचे काय फायदे आहेत हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

बाळाच्या मालिशसाठी ऑलिव्ह ऑईलबाळाच्या मालिशसाठी ऑलिव्ह ऑइलचे ७ फायदे

सर्वात आरोग्यदायी आणि स्वादिष्ट स्वयंपाक तेल असण्याव्यतिरिक्त, ऑलिव्ह ऑइलचा वापर त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि सौंदर्यवाढीसुद्धा केला जातो. हे तेल तुमच्या बाळाच्या मसाजसाठी एक सोपा उपाय ठरतो परंतु त्यासाठी तुम्हाला चांगला पर्याय निवडणे गरजेचे आहे.

टीप: जर तुमच्या बाळाची त्वचा खराब झाली असेल किंवा बाळाला एक्झिमा होण्याची शक्यता असेल, तर ऑलिव्ह ऑइल बाळाच्या मसाजसाठी सर्वोत्तम पर्याय असू शकत नाही. तुमच्या बाळाला मसाज करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल वापरण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

. सर्व हवामानात वापरता येणारे मालिशसाठीचे तेल

सर्व मातांना ह्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो! काही तेले फक्त हिवाळा अथवा उन्हाळ्यात वापरता येतात कारण इतर कोणत्याही वेळी त्यांचा वापर केल्यास तुमच्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पण ऑलिव्ह ऑइलच्या बाबतीत असे नाही. तुमच्या बाळाला मसाज करण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑइल किती प्रमाणात वापरणार आहात याचा विचार करणे आवश्यक आहे. हिवाळ्यात जेव्हा त्वचा कोरडी असते तेव्हा भरपूर प्रमाणात ऑलिव्ह ऑइल वापरा आणि उन्हाळ्यात कमी प्रमाणात वापरा. लक्षात ठेवा, ज्या त्वचेला कमी आर्द्रतेची गरज असते त्या त्वचेसाठी ऑलिव्ह ऑइल खूप जड असू शकते. म्हणून, ऑलिव्ह ऑइल घेताना त्वचेच्या प्रकारानुसार घ्या.

. मॉइस्चरायझिंग गुणधर्म आहेत

ऑलिव्ह ऑइलच्या मॉइश्चरायझिंग गुणधर्मांचा उपयोग करून घेऊन तुमच्या लहान बाळाच्या मुलायम त्वचेचे रक्षण करा. सौम्य, सुखदायक ऑलिव्ह ऑइलने मसाज केल्याने तुमच्या बाळाची त्वचा नितळ आणि मऊ होण्यास मदत होऊ शकते! ऑलिव्ह ऑइलमध्ये स्क्वेलीन असते. त्वचेला सजलीत करणारा हा घटक आहे. हा घटक बाळाच्या त्वचेमध्ये झिरपतो आणि बाळाची त्वचा मऊ करण्यास मदत करतो.

. बाळाला क्रॅडल कॅप स्केल ही समस्या असल्यास त्वचेचे खवले सैल करण्यास मदत होते

क्रॅडल कॅप ही एक त्वचेची एक स्थिती आहे. ह्या स्थितीमध्ये बाळाच्या टाळूवर कोरडे खवल्यांचे थर निर्माण होतात. ह्या समस्येमुळे बाळाला फारसा त्रास होत नाही परंतु ते बघताना त्रास होतो. क्रॅडल कॅपमुळे तयार झालेले त्वचेवरील खवले सैल करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल उपयुक्त आहे. फक्त ऑलिव्ह ऑइलने बाळाच्या डोक्याला मसाज करा आणि 10 ते 20 मिनिटे राहू द्या. सौम्य शैम्पूने तेल स्वच्छ धुवून टाका आणि सैल झालेले हे त्वचेचे खवले काढून टाकण्यासाठी कंगव्याचा वापर करा. तुम्हाला हवे असलेले अनुकूल परिणाम एक दोन वेळा ऑलिव्ह ऑईलचा वापर केल्यानंतर लगेच दिसून येतील.

बाळाला क्रॅडल कॅप स्केल ही समस्या असल्यास त्वचेचे खवले सैल करण्यास मदत होते

. सर्दी खोकला झाल्यास लक्षणीयरित्या परिणामकारक

हिवाळा जवळ येत असताना, तुमच्या बाळाला त्रास देणाऱ्या भयंकर सर्दी खोकल्याला सुरुवात होते! तुमच्या बाळाच्या छातीवर नीलगिरीचे रेडिएटा तेल आणि ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब ह्या मिश्रणाने मसाज केल्याने सर्दी, खोकला आणि श्वासोच्छवासाच्या त्रासावर लक्षणात्मक आराम मिळू शकतो. अधिक बरे वाटण्यासाठी तुम्ही तुमच्या लहान बाळाच्या तळहातावर किंवा बाळाच्या तळव्यावर तेल लावू शकता!

. डायपर रॅशेस प्रतिबंधित करते आणि बरे करते

आई आणि बाळ दोघांसाठी सुद्धा डायपर रॅश सारखी समस्या त्रासदायक ठरते. तुमच्या बाळाला जिथे डायपर रॅश झालेली असते त्या भागाला ऑलिव्ह ऑईलने मसाज करून पुरळ येणार नाहीत ह्याची काळजी घ्या.

. चांगली झोप लागण्यास मदत होते

ऑलिव्ह ऑइलमध्ये आरामदायी गुणधर्म आहेत आणि ते तुमच्या बाळाला शांत करू शकतात आणि झोप लागण्यास मदत करू शकतात. तुमच्या बाळाच्या पायाच्या तळव्याला ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब चोळा आणि जोपर्यंत बाळाला गाढ झोप लागत नाही तोपर्यत मालिश करा.

चांगली झोप लागण्यास मदत होते

. केसांच्या आरोग्यासाठी चांगले

ऑलिव्ह ऑइल तुमच्या बाळाचे केस मजबूत करते. केस खरखरीत झालेले असल्यास मऊ करते. ऑलिव्ह ऑइल व्हिटॅमिन ईचा एक चांगला स्रोत देखील आहे. ऑलिव्ह ऑईल मुळे केसांचा पोत चांगला होऊन केस मऊ होतात.

ऑलिव्ह ऑइलचे अनेक फायदे असले तरी ते वापरताना तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

बेबी मसाजसाठी ऑलिव्ह ऑईल वापरताना घ्यावयाची काळजी

हे सावधगिरीचे उपाय तुम्हाला तुमच्या लहान बाळाच्या त्वचेची पूर्ण काळजी घेण्यास मदत करतील.

  1. तुमच्या बाळाला त्वचेची ऍलर्जी/एक्झिमा असल्यास ऑलिव्ह ऑइल लावू नका.
  2. ऑलिव्ह ऑइल वापरल्यानंतर बाळाला पुरळ उठत असेल तर ते वापरणे थांबवा.
  3. प्रिझर्व्हेटिव्हसह ऑलिव्ह ऑइल टाळा, त्याला काहीवेळा रूटीन ऑलिव्ह ऑइल देखील म्हटले जाते, कारण ते बाळाच्या मऊ त्वचेसाठी हानिकारक असू शकते.

तुमच्या बाळाला मसाज करताना, डोक्यापासून पायापर्यंत मालिश करा. तुमच्या बाळासाठी ऑलिव्ह ऑइल मसाज सर्व ऋतूंसाठी उत्तम आहे कारण ते त्वचेचे आणि केसांचे पोषण करते, तसेच ऑलिव्ह ऑईलचे इतर देखील फायदे आहेत. इतर माता सुद्धा वापरत असतील अश्या दर्जेदार एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईलची तुम्ही निवड करा. तुमच्या बाळाची त्वचा लवकरच सुंदर होईल!

आणखी वाचा:

तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी नारळाच्या तेलाचे सर्वोत्तम फायदे
बाळाच्या मालिशसाठी विविध तेलं : तुमच्या बाळासाठी कुठलं तेल योग्य आहे?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article