अन्य

अंगावरील दुधाचा कमी पुरवठा

प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व हा सर्वात सुंदर टप्पा असतो. अपार वेदना सहन करून एका नवीन जीवाला जन्म देतानाचा अनुभव खूप मौल्यवान असतो. परंतु ह्याच कारणामुळे, गर्भारपण आणि प्रसूती ह्याविषयी मनात खूप भीती सुद्धा असते. आणि आपण बाळाला नीट स्तनपान देऊ शकू का ही त्यापैकीच एक भीती. नाजूक बाळ आणि त्याला स्तनपान करण्याची आईची जबाबदारी ह्यामुळे जर दूध कमी येत असेल तर ती खूप संवेदनशील बाब ठरते. स्तनपान करणाऱ्या आईला कुठल्या समस्या येतात ह्याची चर्चा आपण ह्या लेखात करणार आहोत. तसेच त्यावरील उपाय सुद्धा इथे सांगितले आहेत.

दूध कमी येणे म्हणजे काय?

मातृत्वाच्या सुरुवातीला आईला दूध कमी येत असल्याने स्तनपानाची समस्या येऊ शकते. बाळाची गरज भागेल इतके दूध जर आईला येत नसेल तर दूध कमी येते आहे असे मानले जाते. बऱ्याच स्त्रियांना खालील परिस्थतीत आपल्याला कमी दूध येते आहे असे वाटते. वरील सर्व गोष्टी लगेचच खोडून काढल्या पाहिजेत कारण त्याचा दूध कमी येण्याशी काहीही संबंध नाही.

दूध कमी येत असल्याची लक्षणे

बाळाला दूध पुरत नसेल तर दूध कमी येत असल्याचे संकेत बाळाकडून दिले जातात. दुर्दैवाने, बऱ्याच पालकांना असे वाटत राहते की बाळाची वाढ होण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यापैकी काही बदल खालीलप्रमाणे:

कमी दूध येण्याची कारणे काय आहेत?

अनेक घटक आईच्या दुधावर परिणाम करीत असतात. ते बाळाच्या किंवा आईच्या तब्येतीशी निगडित असू शकतात किंवा तो प्रश्न कॉमन असू शकतो. हे घटक आणि प्रश्न गंभीरपणे पहिले पाहिजेत जेणेकरून भविष्यात बाळाला काही समस्या यायला नको. आईच्या आरोग्याशी निगडित कमी दूध येण्याची कारणे हे सगळे प्रश्न अगदी संयमाने आणि तज्ञ डॉक्टरांच्या योग्य मार्गदर्शनाखाली सोडवले पाहिजेत. आहार आणि जीवनशैलीमधील बदल ह्यामुळे दूधनिर्मिती होऊ शकते. स्तनपान देत असताना मध्ये मध्ये दूध पंप करून काढून घेतले पाहिजे त्यामुळे शरीराला जास्त दुधाच्या मागणीची सवय होते.

बाळाच्या आरोग्याशी निगडित कमी दुधाची कारणे

बाळ नुकतेच जन्मलेले असल्याने बाळाला नीट दूध मिळत नाही, त्यामुळे त्यांच्याकडे डॉक्टर किंवा त्या क्षेत्रातील तज्ञ ह्यांचे विशेष लक्ष असणे जरुरीचे आहे

इतर कारणे

जर पुरेशा प्रमाणात तुम्हाला दूध येत नसेल तर ते काळजीचे कारण आहे का?

नाही. काही वेळा विशिष्ट अन्नपदार्थांमुळे दूध निर्मिती प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. दुसरे कारण म्हणजे शरीरात संप्रेरकांचे असंतुलन हे होय. बऱ्याच वेळेला डॉक्टरांशी बोलून किंवा काही औषधे घेऊन त्यावर उपचार करता येतात. ह्या मधल्या काळात बाळाला फॉर्मुला दूध तुम्ही देऊ शकता. त्यामुळे बाळाच्या पोषणाच्या गरजा भागतील.

दुधाचा पुरवठा कमी होत आहे हे कसे ओळखावे?

जर दूध येणे वाढले नाहीत तर डॉक्टरांशी किंवा सल्लागाराशी संपर्क साधला पाहिजे. ते तुम्हाला रक्ताची चाचणी करायला सांगू शकतात आणि लाल रक्तपेशींची संख्या तपासून पाहू शकतात त्यावरून ऍनिमिया तर नाही ना हे सुद्धा बघितले जाते. शरीर स्वतःचे स्वतः ह्या समस्या हाताळते आणि बरेचसे प्रश्न वैद्यकीय हस्तक्षेपाशिवाय सोडवले जातात. परंतु, काही प्रश्नांसाठी तुम्हाला वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते.

दूध कमी येत असेल तर त्याचा बाळावर कसा परिणाम होतो?

हे सर्वज्ञात आहे की बाळाचा प्रथम आहार म्हणजे आईचे दूध असतो. आणि तो कमी पडला तर बाळाची वाढ नीट होत नाही. सुरुवातीच्या काळात जर दूध कमी पडले तर मानसिक विकास होत नाही आणि शारीरिक विकासावर पण मर्यादा येतात त्यामुळे बाळाच्या विकासात त्रुटी राहतात.

बाळाला पुरेसे दूध मिळत असल्याची लक्षणे

खालील लक्षणांवरून बाळाला पुरेसे दूध मिळत आहे हे समजते

स्तनपानासाठी दुधाचा पुरवठा कसा वाढवावा?

बाळाच्या वाढीसाठी योग्य पोषण मिळण्यासाठी बाळाला पुरेसे दूध मिळणे जरुरी असते आणि दूध वाढवण्यासाठी खूप वेगवेगळे मार्ग असतात.

स्तनपान वाढवणारे सर्वोत्तम अन्नपदार्थ

आपणलक्षात घेतले पाहिजे की हे खाद्य पदार्थ खाल्ल्यास आईचे दूध वाढते ह्यास कुठलाही शास्त्रीय पुरावा नाही परंतु बरेच लोक असे म्हणतात की ह्या अन्नपदार्थांमुळे दूध वाढते,

पूरक औषधांची केव्हा गरज भासते?

बाळाच्या जन्माच्या दिवसापासून आईने पूरक औषधे घेतली पाहिजेत जेणेकरून आई लवकरात लवकर स्तनपानास तयार होईल. असे केल्याने आई बाळासाठी चांगल्या प्रमाणात दूध निर्मिती करू शकते. वैद्यकीय तज्ञांनुसार पहिल्या सहा आठवड्यात चांगले दूध येणे जरुरी आहे कारण बाळाच्या विकासात त्यामुळे भविष्यात काही प्रश्न येणार नाही.

दूध कमी येत असेल तर स्तनपान देणे योग्य आहे का?

जरी आईला दूध कमी येत असले तरी स्तनपान देणे हे अगदी योग्य आहे. त्यामुळे स्तनांना दूध निर्मितीस उत्तेजना मिळेल आणि बाळाच्या मागणीइतकी दूध निर्मिती होण्यास मदत होईल. स्तन जोपर्यंत दुधाची निर्मिती करत नाहीत तोपर्यंत बाळाला लागेल तसे फॉर्मुला दूध द्यावे. त्यामुळे बाळाला पोषण कमी पडणार नाही आणि बाळाची योग्य वाढ होईल आणि बाळ निरोगी आणि सशक्त होईल. निष्कर्ष वेगवेगळ्या रिपोर्ट्स आणि सर्वेक्षणाद्वारे असे लक्षात येते की दूध कमी येण्याचे कारण बरेच वेळा मानसिक असते. जर दूध कमी आले तर त्याचा बाळाच्या आरोग्यावर आणि वाढीवर परिणाम होतो. परंतु, हा काही दीर्घकाळ राहणारा प्रश्न नाही, वेगवेगळे उपाय वापरून तो सोडवता येऊ शकतो. अगदी सर्वात वाईट परिस्थितीतही, 'वेट नर्स' घेण्याचा पर्याय असतो ज्यामुळे बाळाला तात्पुरती मदत होऊ शकते. आणखी वाचा: प्रसूतीनंतर त्वचेची काळजी प्रसूतीनंतर स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी प्रभावी उपाय
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved