टॉडलर (१-३ वर्षे)

१३ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमच्या १३ महिन्याच्या बाळामध्ये बरेच बदल होत असल्याचे तुम्हाला दिसून येईल. बाळ अधिक स्वतंत्र होईल आणि वेगवेगळ्या गोष्टींबद्दल त्याला कुतूहल वाटू लागेल. त्याने कदाचित काही पावले टाकण्यास सुरुवात केलेली असेल आणि अडखळत चालू लागला असेल. ह्या लेखात, आपण आपल्या १३ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास याबद्दल चर्चा करणार आहोत.

व्हिडिओ: १३ महिन्यांचे बाळ - वाढ, विकास, क्रियाकलाप आणि काळजीविषयक टिप्स

https://www.youtube.com/watch?v=nHkIeF5M39U&feature=emb_title&ab_channel=FirstCryParenting

१३ महिन्यांच्या लहान बाळांचा विकास

तुमचे छोटे बाळ घरातील प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करेल. म्हणून तुमच्या बाळासोबत काही मजेदार क्षण टिपण्यासाठी तयार रहा. बाळाचे हे वय तुम्हाला जरी थोडे थकवणारे असले तरी सुद्धा तुमच्या बाळाच्या बाललीला पाहणे तुम्ही चुकवू शकणार नाही. तुमच्या बाळाच्या कृतींबद्दल थोडे जागरूक आणि सावध रहा कारण तुमचे बाळ काय पहात असेल ह्याकडे तुमचे लक्ष सुद्धा गेले नसेल. पुढील परिच्छेदांमध्ये, आम्ही तुमच्या बाळाच्या शारीरिक, सामाजिक आणि संज्ञानात्मक विकासाबद्दल आणि तुमचे १३ महिन्यांच्या बाळ आणखी कोणते टप्पे गाठू शकेल हे दिलेले आहे.

शारीरिक विकास

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, सरासरी १३ महिन्यांच्या बाळाचे वजन मुली आणि मुलांसाठी अनुक्रमे अंदाजे २०.२ पौंड आणि २१.८ पौंड असते आणि ह्या वयाच्या बाळांची सरासरी उंची मुलींसाठी २९.६ इंच आणि मुलांसाठी ३०.३ इंच असू शकते. हे वजन आणि उंचीचे सरासरी मापदंड आहेत, परंतु प्रत्येक बाळ वेगळे असते आणि जर तुमचे बाळ या पॅरामीटर्समध्ये बसत नसेल, तर घाबरून जाण्याची गरज नाही. खाली काही सामान्य शारीरिक विकासाचे टप्पे आहे. विकासाचे हे टप्पे १३ महिन्याचे बाळ साध्य करू शकते:

सामाजिक आणि भावनिक विकास

ह्या वयात तुमच्या बाळाला भावनांची चांगली समज आहे आणि बाळ वेगवेगळ्या भावना दर्शवते. तुमच्या बाळाने या वयात आत्मसात केलेली काही सामाजिक आणि भावनिक कौशल्ये येथे दिलेली आहेत.

संज्ञानात्मक आणि भाषा विकास

तुमचे लहान मूल या टप्प्यावर खूप माहिती आत्मसात करून त्यावर प्रक्रिया देत असते. बाळ आश्चर्यचकित आणि निराश देखील वाटू शकते आणि ह्या भावना अगदी सामान्य आहेत. ह्या काळात, तुमचे लहान मूल भाषा आणि संज्ञानात्मक विकासाच्या क्षेत्रात खालील टप्पे गाठण्यात सक्षम आहे:

वागणूक

तुमच्या लहान बाळाचे जग जसजसे विस्तारते तसतशा त्याच्या भावनांचा विस्तार सुद्धा वाढतो तुम्हाला तुमच्या बाळाचे वर्तन बदलत असल्याचे दिसून येईल. त्याला आता काय हवे आहे हे तुम्हाला अधिक स्पष्ट होत जाते. तुमचे बाळ बिघडत आहे का? तर नाही. तुमचे बाळ जे काही पाहत आहे ते फक्त आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला तुमच्या लहान बाळासोबत खूप संयम राखण्याची गरज आहे कारण तुमच्यासाठी आता गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे करणे सोपे होणार नाही. ह्या टप्प्यावर बाळाला राग येणे, वेगळे होण्याची चिंता आणि इतर बदलत्या वागणुकीना सामोरे जाण्यासाठी स्वत: ला तयार करा.

अन्न आणि पोषण

तुमच्या १३-महिन्याच्या बाळाला दिवसाला अंदाजे १००० कॅलरी लागतात, तुम्ही कॅलरीची ही मर्यादा पाळणे आवश्यक नाही. सोप्या शब्दात, या वयापर्यंत, तुमच्या बाळाला तुम्ही जे काही खात आहात त्यापैकी एक चतुर्थांश अन्नाची गरज असू शकते. ह्या वयात तुमच्या बाळाला अन्नपदार्थांविषयी आवड निवड निर्माण होऊ शकते आणि तुम्ही त्यासाठी तुमच्या बाळाला मदत करू शकता. तुम्ही तुमच्या बाळाला विविध चवींचा परिचय करून देऊ शकता परंतु जर तुमच्या बाळाला काही खाद्यपदार्थ आवडत नसतील तर ते सक्तीने देणे टाळा. तुमच्या १३-महिन्याच्या बाळाच्या आहाराच्या वेळापत्रकात तीन मुख्य जेवण आणि दोन लहान जेवण किंवा स्नॅक्स असू शकतात. तुम्ही त्याला फळे, भाज्या, तृणधान्ये आणि दुग्धजन्य पदार्थ इ. योग्य प्रमाणात द्या.

जर तुम्ही घन पदार्थांकडे वळला नसेल, तर तुम्ही तुमच्या बाळाला पूर्ण चरबीयुक्त दूध देणे सुरू करू शकता. ही अशी वेळ असते जेव्हा तुमच्या बाळाच्या मेंदूचा विकास होत असतो आणि मेंदूच्या विकासासाठी त्याला चांगल्या प्रमाणात चरबीची आवश्यकता असते. जरी तुम्हाला तुमच्या बाळाचे स्तनपान बंद करायचे असेल तर त्यासाठी ही चांगली वेळ आहे आणि जर तुम्हाला ते पुढे चालू ठेवायचे असेल, तर तुम्ही ते दोन वर्षापर्यंत सुरु ठेवू शकता.

या टप्प्यावर तुम्ही तुमच्या बाळाचा आहार आणि पोषणाला योग्य महत्त्व देणे महत्त्वाचे आहे. तुमच्या बाळाचे वजन आणि वाढीचे निरीक्षण करत रहा जर बाळ नीट खात नसेल आणि जर त्याचे वजन पुरेसे वाढत नसेल तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. योग्य वाढ आणि विकासासाठी तुम्ही तुमच्या १३ महिन्यांच्या बाळाच्या आहारात कशाचा समावेश करू शकता ह्यावर चर्चा करा.

झोप

तुमच्या लक्षात येईल की १३ महिन्यांपर्यंत तुमचे बाळ अधिक स्थिर झालेले असेल आणि जवळजवळ त्याचा झोपेचा नित्यक्रम ठरलेला असेल. तथापि, काहीवेळा दात येणे, विकासाच्या समस्या आणि काहीवेळा आजारपणामुळे ही पद्धत विस्कळीत होऊ शकते. परंतु, तुमचे बाळ २४ तासांत सरासरी ११ ते १४ तास झोपत असेल. ही झोप पुढे एक किंवा दोन वेळा दिवसाची झोप आणि एक अखंड रात्रीच्या झोपेत विभागली जाऊ शकते

तुमच्या लहान मुलाला सहज विचलित होणे खूप सामान्य आहे आणि तो झोपायलाही नकार देऊ शकतो. ह्याचे कारण म्हणजे बाळाला आजूबाजूच्या गोष्टींचा खूप मोह होतो आणि झोप त्याला निरर्थक वाटू शकते. जर तुमच्या बाळाला अजूनही झोप येत नसेल तर त्याला झोपण्यास भाग पाडू नका. झोपेसाठी वातावरण तयार करणे आणि वेळापत्रकाचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच झोपण्यापूर्वी तुमच्या बाळाला कोमट पाण्याने आंघोळ घालणे हा चांगली झोप येण्याचा एक मार्ग आहे.

खेळ आणि उपक्रम

तुमचे बाळ आता पूर्वीपेक्षा जास्त सक्रिय आणि खेळकर झाले आहे आणि त्याला फक्त खेळायचे आहे आणि मजा करायची आहे. पण त्याला लगेच कंटाळा येतो आहे हे लगेच तुमच्या लक्षात येईल. तुमच्या बाळाला एकाच वेळी सक्रिय आणि आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही काय करू शकता हा प्रश्न आहे. परंतु आता काळजी करू नका, येथे आमच्याकडे काही मजेदार खेळ आहेत ज्यामध्ये तुम्ही तुमच्या लहान मुलाला गुंतवू शकता.

तेरा महिन्यांच्या बाळासाठी लसीकरण

तुमच्या बाळाच्या लसीकरणाचे वेळापत्रक आणि आरोग्य तपासणीच्या वेळांचे पालन करणे खूप महत्वाचे आहे. परंतु, जर तुम्ही तुमच्या १२ महिन्यांच्या बाळाचे कोणतेही लसीकरण चुकवले असेल, तर तुम्ही ते आता करून घेऊ शकता. तुमचे डॉक्टर तुमच्या बाळासाठी शिफारस करू शकतील अशा काही एक वर्षाच्या लसी येथे आहेत:

पालकांसाठी टिप्स

पालकांनी त्यांच्या १३ महिन्यांच्या बाळाची चांगली काळजी घेण्यासाठी येथे काही टिप्स येथे दिलेल्या आहेत:

डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्यावा?

पालकांनी त्यांच्या बाळाची वाढ आणि विकासाच्या टप्प्यांची त्याच वयाच्या इतर मुलांशी तुलना करणे सामान्य आहे. प्रत्येक बाळ वेगळे असते आणि म्हणूनच तुलना करणे उचित नाही. परंतु, जर तुमच्या बाळाने ह्या वयात गाठले पाहिजेत ते सामान्य टप्पे साध्य केले नाहीत तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तुमच्या बाळाच्या विकासातील विलंब तुम्हाला दिसल्यास, तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोला:

जर तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे किंवा या वयातील बाळासाठी सामान्य वाटत नसलेली कोणतीही लक्षणे दिसल्यास, तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मागील आठवडा: तुमच्या १२ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved