गर्भधारणेचे आठवडे

गर्भधारणा: ४१वा आठवडा

तुम्ही जेव्हा तुमच्या बाळाला बघाल, तेव्हा त्या भावनांचे वर्णन शब्दांमध्ये करता येणार नाही! जर तुमचा गर्भारपणाचा ४१वा आठवडा चालू असेल, तर तुमच्या बाळाला अजून थोडा वेळ तुमच्या पोटातच राहावेसे वाटत असण्याची शक्यता आहे! तथापि, जरी तुमची आणि तुमच्या बाळाची अजूनही भेट झालेली नसली तरी सुद्धा गर्भारपणाच्या शेवटच्या टप्प्यावर असताना त्याविषयी माहिती असल्यास तुम्हाला काळजीचे काहीही कारण नाही ह्याची खात्री पटते.

गर्भारपणाच्या ४१व्या आठवड्यातील तुमचे बाळ

तुमच्या आणि बाळाच्या भेटीचा क्षण अगदी जवळ आला आहे! तथापि जर तुमचा चिमुकला अजूनही तुमच्या पोटात असेल तर, सगळं काही ठीक आहे ना ह्याची खात्री करा. खाली दिलेल्या काही गोष्टी आहेत ज्यांची अपेक्षा तुम्ही प्रसूती नंतर करू शकता.

बाळाचा आकार केवढा असतो?

गर्भारपणाच्या ४१व्या आठवड्यात बाळ कलिंगडाइतके मोठे असते. बाळाची लांबी २०-४० इंच इतकी असते आणि वजन ३. ६८ किलोग्रॅमस इतके असते.

शरीरात होणारे बदल

गर्भारपणादरम्यान तुमच्या शरीरात बदल होतात. स्तन, पोट तसेच तुमच्या पचनसंस्थेमध्ये खूप बदल होतात. गर्भारपणाच्या ह्या शेवटच्या टप्प्यावर तुमचे शरीर प्रसूतीच्या प्रक्रियेसाठी तयार असते. ह्या कालावधीत तुमची प्रसूती होण्याची खूप जास्त शक्यता असते, काहीं जणींच्या बाबतीत हा कालावधी जास्त असतो. तुम्ही प्रसूतीकाळात आहात हे कसे ओळखाल?

४१व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

प्रसूतीची लक्षणे कोणती आहेत?

गर्भारपणाच्या ४१व्या आठवड्यात, प्रसूतीची लक्षणे तुम्हाला माहित असली पाहिजेत. प्रसूतीची काही लक्षणे खालीलप्रमाणे: अशी लक्षणे आढळ्यास जवळच्या दवाखान्यात जाणे किंवा डॉक्टरांना फोन करणे अतिशय जरुरी आहे. तुम्हाला वरील लक्षणे जरी आढळली नाहीत तरीही काळजीचे कारण नाही कारण प्रसूतीची लक्षणे केव्हाही अचानक सुरु होऊ शकतात.

गर्भारपणाच्या ४१ व्या आठवड्यात प्रसूती प्रेरित करणे

गर्भारपणाचा कालावधी १ महिन्यांनी वाढणे म्हणजे शारीरिक आणि मानसिक ताणामध्ये वाढ होते. तसेच ह्या ताणात भर म्हणजे तुमचे मित्रमैत्रिणी आणि कुटंबातील सदस्य, प्रसूतीला का उशीर होतोय म्हणून खूप प्रश्न विचारतील. जेव्हा प्रसूती प्रेरित केली जाते तेव्हा काही स्त्रिया खूप वेदनादायी आणि तीव्र कळांमुळे त्रस्त होतील. काही जणींच्या मते, प्रसूतीगृहापेक्षा घरीच कळा सुरु होण्याची वाट बघणे ठीक असते. जरी प्रसूतीचा कालावधी वाढला तरी, त्यामुळे बाळाला खूप धोका असतो. प्रसूती प्रेरित करण्याचे खूप मार्ग आहेत, ते खालीलप्रमाणे:

गर्भधारणेच्या ४१व्या आठवड्यात पोटाचा आकार

गर्भारपणाच्या ४१ आठवडे म्हणजे ९ महिने आणि एक आठवड्यांचा काळ. आता पोटाचा भर खूप जास्त वाढला असून त्यामुळे अस्वस्थता सुद्धा वाढली आहे. आजूबाजूला हालचाल करणे अवघड झाले आहे, परंतु डॉक्टर्स हालचाल करत राहण्याचा सल्ला देतात त्यामुळे नैसर्गिकरित्या प्रसूती सुरु होते. तुमच्या बसण्याची, झोपण्याची स्थिती योग्य आहे ह्याची खात्री करा. बसताना आणि उठताना कशाचातरी आधार घ्या, कारण पोट खूप जड झाले आहे.

गर्भधारणेच्या ४१व्या आठवड्यातील सोनोग्राफी

बाळ आणि बाळाची स्थिती नॉर्मल आहे की नाही हे बघण्यासाठी सोनोग्राफी  करून घेण्याचा सल्ला डॉक्टर्स देतात. सोनोग्राफी वरून प्रसूती प्रवृत्त करावी किंवा कसे ह्याचा डॉक्टरांना अंदाज येतो.

आहार कसा असावा?

नेहमी लागणाऱ्या पोषणमूल्यांव्यतिरिक्त बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या पोषणमूल्यांनी समृद्ध अन्नपदार्थांचा समावेश आहारात केला पाहिजे. असा आहार तुम्ही प्रसूती होईपर्यंत घेतला पाहिजे. वजन कमी होण्यासाठी आहार कमी करू नका. पोषणमूल्यांनी समृद्ध आहार घेत रहा. तसेच भरपूर द्रवपदार्थ घेणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे.

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

परिस्थिती सुकर व्हावी म्हणून खाली काही टिप्स देत आहोत.

हे करा

हे करू नका

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

गर्भारपणाच्या ४१ व्या आठवड्यात, खरेदी कराव्यात अशा गोष्टींची यादी खाली दिली आहे. तुम्ही गर्भारपणाच्या ४० आठवड्यांऐवजी ४१ व्या आठवड्यात जेव्हा पदार्पण करता तेव्हा तुम्ही चिंताग्रस्त असणे खूप स्वाभाविक आहे. प्रसूतीची तारीख उलटून गेल्यावर हा ताण वाढतो. हे माहित करून घेणे खूप महत्वाचे आहे की ज्या स्त्रिया पहिल्यांदा आई होणार आहेत, त्यांच्यामध्ये असे होणे हे खूप सामान्यपणे आढळते. ह्या कालावधीत काही लक्षात ठेवण्याजोग्या गोष्टी खालीलप्रमाणे तुम्ही गर्भधारणे बाबतच्या सर्व गोष्टी माहित करून घेऊन स्वतःला शिक्षित करणे अतिशय महत्वाचे आहे, विशेषतः ४१ व्या आठवड्याविषयी (जर तुम्ही अजूनही गरोदर असाल तर) आणि प्रसूती नंतरच्या परिस्थितीला हाताळण्यासाठी तयार राहा. मागील आठवडा: गर्भधारणा: ४०वा आठवडा पुढील आठवडा: गर्भधारणा: ४२वा आठवडा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved