अगदी नुकतेच आई बाबा झालेले आपण आपल्या बाळाची जीवापाड काळजी घेत असतो. आपले बाळ वाढवताना कुटुंबातील मोठ्या सदस्यांनी आणि मित्रमैत्रिणींनी दिलेला प्रत्येक सल्ला आपण ऐकत असतो. ह्यामध्ये बऱ्याचशा पूर्वापार चालत आलेल्या दंतकथा सुद्धा असतात आणि मग आपण सुद्धा जुन्या काल्पनिक कथांवर विश्वास ठेऊ लागतो. पण आपण त्यामागची सत्यता तपासून पहिली पाहिजे. तुम्हाला काही त्यामागची कारणे जाणून घ्यायची असतील तर हा लेख वाचा. ह्या लेखामध्ये बाळाला वाढवताना सामान्यपणे ज्या दंतकथांवर विश्वास ठेवला जातो, त्यामागची सत्यता मांडली आहे.
नवजात बाळाची काळजी: दंतकथा आणि त्यामागील सत्य
जेव्हा तुम्हाला बाळाची चाहूल लागते, आपल्या आजूबाजूचे सर्वजण तुम्हाला आरोग्यपूर्ण गर्भारपणासाठी वेगवेगळे सल्ले आणि सूचना देत असतात. जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा सगळ्यांचे लक्ष आता बाळाकडे असते. आणि तुमचा गोंधळ उडतो की नक्की काय करावे? पण तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही. आम्ही येथे काही प्रसिद्ध दंतकथांमागची सत्यता आपल्यासाठी उलगडून दाखवणार आहोत.
१. बाळाला तेलाने मसाज करणे ही जुनी पद्धत आहे.
तथ्य: बाळाला तेलाने मसाज करणे हा भारतीय संस्कृतीचा पूर्वीपासून एक भाग आहे enlignepharmacie.com. म्हणून बाळाला मसाज करू नये असे नव्हे. बाळाला तेलाने मसाज केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि बाळाला चांगली झोप लागते.
२. दात येताना बाळाला ताप येतो.
तथ्य: बाळाला दात येण्याची सुरुवात बाळ ६ महिन्याचे असल्यापासून होते आणि दात येण्याची प्रक्रिया बाळ २ वर्षांचे होईपर्यंत चालू रहाते. लहान बाळांची प्रतिकारशक्ती कमी असते म्हणून त्यांना लवकर संसर्ग होतो आणि ही छोटी बाळे लवकर आजारी पडतात. जर बाळाला ताप असेल आणि नेमकी तेव्हाच दात येण्याची प्रक्रिया सुरु असेल तर, ह्याचा अर्थ असा नाही की दात येत असल्यामुळे बाळाला ताप आला. दात येताना बाळाच्या शरीराचे तापमान थोडे वाढू शकते, पण त्याला ताप म्हणता येणार नाही. पण जर बाळाला ताप आला असेल तर तो दात येत असल्यामुळे आहे असे गृहीत धरू नका. बाळाला आपल्या वैद्यांकडे घेऊन जा आणि त्यांचा सल्ला घ्या.
३. बाळाला खूप वेळ मांडीवर किंवा कडेवर घेतल्यास बाळाला तशीच सवय लागते.
तथ्य: बाळासाठी सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये “रडणे” हे एकच संवाद साधण्याचे माध्यम असते. बाळ रडून आपल्या आई बाबांचे लक्ष वेधत असते, आणि त्याला काय हवंय हे सांगत असते. तसेच सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये बाळाला आईचा स्पर्श हवा असतो. त्यामुळे जर तुम्ही बाळाला कडेवर किंवा मांडीवर घेत असाल तर त्यामध्ये चूक असे काही नाही. तुम्ही बाळाला कोणतीही वाईट सवय नाही लावत आहात. फक्त पूर्णवेळ बाळाला कडेवर घेणे टाळा.
४. स्तनपान करणाऱ्या मातांनी अगदी सपक (Bland ) अन्नपदार्थांचे सेवन केले पाहिजे.
तथ्य: तुम्ही स्तनपान करत आहात म्हणून तुम्हाला काही ऍलर्जिक अन्नपदार्थ वर्ज्य करण्यास सांगितले जाऊ शकतात. उदा: शेंगदाणे, दुग्धजन्य पदार्थ, मासे इत्यादी. पण ह्याव्यतिरिक्त तुम्ही रोजचे नेहमीचे जेवण जेऊ शकता. त्यामुळे स्तनपानाद्वारे बाळाला वेगवेगळ्या चवीची ओळख होते. तथापि तुम्ही अल्कोहोल, कॅफेन टाळले पाहिजे. तसेच खूप मसालेदार अन्नपदार्थ खाऊ नका.
५. जन्मानंतर बाळांना लगेच आईजवळ दिल्यास त्यांचे बंध अधिक घट्ट जुळतात.
तथ्य: जन्मानंतर बाळाला आईचा स्पर्श मिळणे, बाळासाठी अतिशय महत्वाचे आहे, सिझेरिअन किंवा अकाली जन्मलेल्या बाळांच्या बाबतीत हे शक्य नसते. परंतु तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही, कारण फक्त काही तास किंवा दिवस बाळाला आईपासून दूर ठेवल्याने त्या दोघांमधील आयुष्यभराच्या बंधनावर परिणाम होणार नाही. तुम्हाला बाळाबरोबर नंतर खूप वेळ घालवायला मिळणार आहे.
६. वरचे दूध पिणारी बाळे जास्त तंदुरुस्त असतात.
तथ्य: जन्मानंतर पहिले ६ महिने बाळाला फक्त स्तनपान दिले पाहिजे. पण काही कारणास्तव तुम्हाला स्तनपान देणे शक्य नसेल तरच तुम्हाला बाळाला फॉर्मुला दूध देण्याचा सल्ला दिला जातो. वरचे दूध, स्तनपानाइतके आरोग्यपूर्ण नसते. स्तनपानातील दुधामध्ये भरपूर प्रमाणात पोषणमूल्ये आणि अँटीबॉडीज असतात. फॉर्मुला दुधामध्ये ते नसतात.
७. काजळामुळे बाळाचे डोळे सुंदर आणि निरोगी होतात.
तथ्य: बाळाला काजळ किंवा कुठलेही सौंदर्यप्रसाधन लावू नये. काजळ लावल्याने बाळाचे डोळे सुंदर किंवा आरोग्यपूर्ण होत नाहीत. बाळाचे डोळे आणि त्वचा खूप नाजूक असते, त्यामुळे बाळासाठी कुठल्याही सौंदर्यप्रसाधनांचा वापर करू नये, अगदी घरी केलेले काजळ सुद्धा बाळाला लावू नये. त्यामुळे बाळाला ऍलर्जी किंवा संसर्ग होऊ शकतो.
८. ग्राईप वॉटर किंवा गुटी दिल्याने बाळाचे पाचन सुधारते.
तथ्य: बाळांची पचनसंस्था खूप नाजूक असते, आणि त्यांच्या नाजूक पोटासाठी फक्त आईचे दूध उत्तम असते. खूप जणांचा असा अंधविश्वास असतो की जन्मानंतर एक महिन्याने बाळाला ग्राईप वॉटर द्यायला पाहिजे. पण बाळाला पहिले ६ महिने स्तनपानाशिवाय बाहेरील अन्य पदार्थ/द्रव देणे टाळावे.
९. नवीन जन्मलेल्या बाळाला घरातच ठेवले पाहिजे.
तथ्य: अगदी नुकतंच जन्मलेलं बाळ खूप नाजूक असते त्यामुळे बाळाकडे अगदी काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवे. पण बाळाला बाहेर घेऊन जाण्यास हरकत नाही, बाळाला मोकळा श्वास घेता येईल. पण हवामान खूप तीव्र असेल तर मात्र बाळाला बाहेर घेऊन जाणे टाळायला हवे. बाळाला बाहेरच्या वातावरणात घेऊन गेल्याने बाळाची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
१०. रात्री झोपताना बाळाला फॉर्मुला दूध दिल्याने बाळाला गाढ झोप लागते.
तथ्य: बाळाला फक्त स्तनपान दिले पाहिजे apothekefurmanner.de. बाळाला बाटलीने दूध देणे प्रकर्षाने टाळायला हवे. पण तुम्ही बाळाला फॉर्मुला दूध देत असाल तर बाळ ४-५ महिन्यांचे होईपर्यंत तुम्ही हवाबंद डब्यातले अन्न देणे टाळले पाहिजे, त्यामुळे बाळाच्या तब्येतीत गुंतागुंत निर्माण होऊ शकते. तसेच बाळाला स्थूलत्वाचा धोका निर्माण होतो.
११. बाळाला पाणी सुद्धा दिले पाहिजे.
तथ्य: बाळाला पहिले सहा महिने पाणी देऊ नये कारण स्तनपानामध्ये बाळाची तहान भागवण्याइतके पुरेसे पाणी असते.
१२. बाळाच्या नाजूक त्वचेसाठी साबणापेक्षा डाळीचे पीठ आणि हळद वापरणे चांगले असते.
तथ्य: नैसर्गिक गोष्टी चांगल्या असतात ह्यात काहीच शंका नाही. पण ह्या नैसर्गिक पदार्थांची सुद्धा बाळाला ऍलर्जी होऊ शकते. त्यामुळे आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने जी उत्पादने बाळासाठी योग्य असतील ती वापरावीत. बाळाच्या नाजूक त्वचेसाठी जी उत्पादने आधीच तपासली गेली आहेत, अशीच उत्पादने वापरावीत.
१३. पोटावर झोपवल्यास बाळाला चांगली झोप लागते.
तथ्य: बाळांना नेहमीच पाठीवर झोपवले पाहिजे. बाळांना कधीही पोटावर झोपवू नये.
१४. तुम्हाला लगेच बाळाविषयी प्रेमभावना जागृत होते.
तथ्य: तुम्हाला बाळाला पाहताक्षणीच त्याच्याविषयी प्रेम भावना जागृत झाली नाही तर वाईट वाटते. पण तुम्हाला तसे वाटणे अगदीच स्वाभाविक आहे. काही मातांना लगेच प्रेम भावना वाटू शकते. पण तुम्हाला तसे न वाटल्यास काही हरकत नाही. काही कालावधीनंतर तुम्हाला बाळाविषयीचे प्रेम वाढेल आणि बाळासोबत बंध जुळतील.
१५. बाळांच्या डोळ्यांना दिसत नाही.
तथ्य: जन्मानंतर बाळाची दृष्टी अस्पष्ट असू शकते. पण बाळ नक्कीच डोळ्यांनी बघू शकते. जसजसे बाळाची वाढ होते, तसेतसे बाळाची दृष्टी सुधारते. त्यामुळे ह्या दंतकथेवर विश्वास ठेऊ नका.
बाळाला वाढवताना ह्या काही नेहमी आढळणाऱ्या दंतकथा आहेत. आम्ही त्यांची सत्यता आणि स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने तुमचे समाधान होईल अशी आशा आहे. आता तुम्हाला प्रत्येक गोष्टीमागचे कारण माहित आहे, त्यामुळे कारणाशिवाय कुठल्याही दंतकथेवर विश्वास ठेऊ नका.