प्रीस्कूलर (३-५ वर्षे)

मुलांसाठी सामान्यज्ञानावर आधारित सोपी प्रश्नोत्तरे

हल्ली मुले टेलिव्हिजन आणि संगणकासमोर खूप वेळ घालवतात, तरीही त्यांना जगात काय चालू आहे ह्याची माहिती नसते. टी.व्ही. वर मुले कार्टून बघतात, आणि हातात मोबाइल फोन असेल तर, किंवा ते संगणक वापरत असतील तर नवीन गेम शोधतात. आत्ता तुम्हाला ही गम्मत वाटत असेल, पण तुम्हाला हे लक्षात आले पाहिजे की असेच मुलांना इलेक्ट्रॉनिक वस्तुंना चिकटून राहू दिले तर तुम्ही तुमच्या मुलांना असामाजिक बनवत आहात आणि भविष्यात त्यांच्यासाठी हे हानिकारक आहे. आपल्या मुलाने घराबाहेर जाणे आवश्यक आहे. त्याला बाहेर जाऊ द्या आणि त्याच्या सोबत्यांबरोबर खेळू द्या कारण अशा पद्धतीने तो नवीन गोष्टींबद्दल जाणून घेईल आणि प्रत्येक गोष्टीवर स्वतःचे मत व्यक्त करेल. म्हणूनच आजच्या जगात, मुलांमध्ये सभोवतालविषयी जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. आपल्या मुलांना त्यांच्या सभोवतालविषयी जास्तीत जास्त जागरूक होण्यासाठी आणि स्वतःसाठी संधी तयार करण्यास मदत करण्यासाठी एक मार्ग आहे तो म्हणजे त्यांचे सामान्य ज्ञान वाढवणे. मुलांना शिकण्यासाठी मदत करण्यासाठी "प्रश्नोत्तरांचा खेळ" हा मजेदार असू शकतो. पण लक्षात असुद्या की ही सामान्य ज्ञानाची प्रश्नोत्तरे वयानुरुप असतील.

बालवाडी आणि पहिलीतल्या मुलांसाठी सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे : (वय-३ ते ६ वर्षे)

कोणत्याही मुलासाठी, त्याचे सामान्य ज्ञान सुधारणे ही मजेदार गोष्ट असावी, जी संयमाने केली जावी आणि त्यांच्या वयोगटासाठी योग्य असावी. शिशुवर्गातील आणि पहिलीतल्या मुलांसाठी, ज्यांची उत्तरे एक शब्दात देता येतील असे प्रश्न तयार करा.
येथे ३ ते ६ वर्षांच्या मुलांसाठी १० मूलभूत सामान्य ज्ञान प्रश्न आहेत. १. " ह" ह्या अक्षरापासून सुरु होणारा रंग कोणता ? उत्तर : हिरवा २. "५" ह्या अंकानंतर कुठला अंक येतो? उत्तर : ३. कुठल्या सणाला सांता आपल्या भेटीस येतो? उत्तर : नाताळ ४. तुमच्या एका हाताला किती बोटे आहेत? उत्तर : ५ बोटे ५. गायी पासून तुम्हाला असे काय मिळते जे तुम्ही पिता? उत्तर : दूध ६. तुम्ही केव्हा झोपी जाता? उत्तर : रात्री ७. शरीराच्या कुठल्या भागामुळे तुम्ही बघू शकता? उत्तर : डोळे ८. कुठला प्राणी " मू .." असा आवाज करतो? उत्तर : गाय ९. तुम्ही असा शब्द सांगू शकता का ज्याची सुरुवात "क" ह्या अक्षराने होते? उत्तर : कार १०. सफरचंद कुठल्या रंगाची असतात? उत्तर : लाल

दुसरी आणि तिसरीच्या वर्गातील मुलांसाठी सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे : (वय-४ ते ८ वर्षे)

दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्गातील मुले थोडं बोलू शकतात, त्यामुळे तुम्ही त्यांना असे प्रश्न विचारू शकता की ज्यांची उत्तरे एका वाक्यात देता येतील. येथे ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी काही मजेदार सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नोत्तरे आहेत. उत्तर देताना ते वाक्य वापरतील याची खात्री करा, यामुळे त्यांची बोलण्याची क्षमता सुधारेल.
१. " Statue of liberty" कुठल्या शहरात आहे? उत्तर : "Statue of liberty" न्यूयॉर्क ह्या शहरात आहे. २. आपल्या सौर मंडळातील पहिल्या तीन ग्रहांची नावे सांगा. उत्तर : आपल्या सौर मंडळात पहिले ३ ग्रह बुध, शुक्र आणि पृथ्वी आहेत. ३. ५ x ५ किती? उत्तर : ५ गुणिले ५ म्हणजे २५ ४. कुठ्ल्याही एका सरपटणाऱ्या प्राण्याचे नाव सांगा. उत्तर : सरडा हा एक सरपटणारा प्राणी आहे. ५. सेऊल ही कुठल्या देशाची राजधानी आहे. उत्तर : सेऊल ही साऊथ कोरिया ची राजधानी आहे. ६. आफ्रिका खंडातील ३ देशांची नावे सांगा उत्तर : सेनेगल, घाना आणि नायजेरिया हे तीन देश आफ्रिका खंडात आहेत. ७. गिझा पिरॅमिड कुठल्या देशात आहेत? उत्तर : गिझा पिरॅमिड इजिप्त मध्ये आहेत. ८. जगातील घनदाट जंगल कोणते आहे? उत्तर : अमेझॉन हे जगातील सर्वात घनदाट जंगल आहे. ९. जपानी लोक कुठली भाषा बोलतात? उत्तर : जपानी लोक जापनीज भाषा बोलतात. १०. अल्बर्ट आईन्स्टाईन कोण होते? उत्तर : अल्बर्ट आईन्स्टाईन हे एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते.

चौथी, पाचवी आणि सहावी च्या विद्यार्थ्यांसाठी सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे : (वय-९ ते १२ वर्षे)

९ आणि १२ वर्षाच्या मुलांसाठी खूप साधे सामान्य ज्ञान प्रश्न त्याचं त्यातील स्वारस्य घालव शकतात. त्यांचं स्वारस्य टिकवून ठेवण्यासाठी, क्विझला अधिक स्पर्धात्मक, मजेदार आणि आव्हानात्मक बनवा.
आपल्याला माहित आहे की या वयात आपल्या मुलांना आव्हान हवे आहे. येथे १५ असे प्रश्न आहेत जे आपण त्यांना विचारू शकता : १. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? उत्तर : जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. २. भारताकडे किती क्रिकेट विश्व कप आहेत? उत्तर : भारताकडे २ क्रिकेट विश्व कप आहेत. . ३ मूळ भाज्यांची नावे सांगा. उत्तर : बीट, गाजर आणि मुळा ह्या मूळ भाज्या आहेत. ४. कुठला रंग शांतीचे प्रतीक आहे? उत्तर: पांढरा रंग शांतीचे प्रतीक आहे. ५. रोमिओ ज्युलिएट कुणी लिहिले? उत्तर : विल्यम शेक्सपिअर ने रोमिओ ज्युलिएट लिहिले. ६. दार्जिलिंग क्षेत्रात कोणते पीक प्रसिद्ध आहे? उत्तर : दार्जिलिंग क्षेत्र चहा साठी प्रसिद्ध आहे. ७. कुठली बेटे भारत देशाचा भाग आहेत? उत्तर : अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे भारत देशाचा भाग आहेत. ८. जॉर्ज वॊशिंग्टन कोण होते? उत्तर : जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे पहिले अध्यक्ष होते. ९. मुक्तीच्या उद्घोषणासाठी अमेरिकेचा कोणता अध्यक्ष जबाबदार आहे? उत्तर : अब्राहम लिंकन मुक्ति मोहीमेसाठी जबाबदार आहे. १०. कुठला आफ्रिकन देश चॉकलेट साठी प्रसिद्ध आहे? उत्तर : घाना हा आफ्रिकन देश चॉकलेट साठी प्रसिद्ध आहे. ११. किंग आर्थरच्या तलवारीला काय म्हणतात? उत्तर : किंग आर्थरची तलवार एक्सालीबुर म्हणून ओळखली गेली. १२. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक कोण आहेत? उत्तर : बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्ट चे संस्थापक आहेत. १३. सोनी ह्या कंपनी चा स्रोत कुठला देश आहे? उत्तर : सोनी ही मूळची जपानी कंपनी आहे. १४. सूर्य कुठल्या दिशेला उगवतो? उत्तर : सूर्य पूर्व दिशेला उगवतो. १५. मार्गारेट थॅचर कोण होत्या? उत्तर : मार्गारेट थॅचर युनायटेड किंगडमचे माजी पंतप्रधान होत्या. ही आपल्या मुलांसाठी काही मनोरंजक आणि आव्हानात्मक प्रश्नोत्तरे होती. आपल्या मुलाचे सामान्य ज्ञान विकसित करणे महत्वाचे आहे. अर्थातच, ते सुरुवातीला काही चुका करतील आणि चुकीची उत्तरे देतील. पण ठीक आहे, आपली मुले उत्तर देण्याच्या मनस्थिती मध्ये नसल्यास, प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी त्यांना सक्ती करू नका आणि चुकीच्या उत्तरांसाठी त्यांना शिक्षा देऊ नका.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved