अन्न आणि पोषण

मुलांनी दूध प्यावे म्हणून काही सोपे आणि परिणामकारक मार्ग

मुलांना योग्य खाण्यापिण्याच्या सवयी लावताना बऱ्याच पालकांना, मुले दूध पीत नाहीत ही समस्या असते.आपल्या मुलाला दुधाची आवड नसल्यास हे आवश्यक आहे की, आपल्या मुलास योग्यरित्या दूध पिण्यास मदत करण्यासाठी असे काही मार्ग आहेत.

बरीच मुले दूध पिण्याचा कंटाळा का करतात?

बऱ्याच पालकांना हे कळत नाही की आपले मूल दुधाचा तिरस्कार का करू लागले आहे? जेव्हा की ह्याच त्यांच्या मुलाला, बाळ असताना स्तनपान खूप तीव्रतेने आवडत असे, किंबहुना स्तनपान सोडवून फॉर्मुला आधारित किंवा गायीच्या दुधाची सवय करण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागले असतील हो ना? तोच बाळ मोठा झाला की दुधाचा द्वेष का करू लागतो? हा प्रश्न अनेक पालकांना पडणे साहजिक आहे. हे प्रामुख्याने स्वादांच्या मोठ्या फरकाच्या कारणाने आहे. बाळ नेहमी आईच्या दुधाची तुलना गाईच्या किंवा फॉर्मूलाधारित दुधाशी करते. आईच्या दुधाला एक विशिष्ट चव, रंग आणि वास असतो तो इतर वरच्या दुधामध्ये नसतो.

मुलांनी दूध पिणे का महत्वाचे आहे?

दूध पिण्याचे महत्व प्रत्येक हॉस्पिटल मध्ये सांगितले जाते तसेच प्रत्येक पालकांच्या दृष्टीनेसुद्धा त्यांच्या लहान मुलाच्या वाढीसाठी ते एक महत्वाचे कार्य आहे. ह्यास अपवाद फक्त लॅक्टोस इंटॉलरन्ट मुले आहेत.

तुमच्या मुलांना दूध पिण्याची सवय कशी लावाल?

तुमच्या मुलांना दूध पिण्यास प्रोत्साहित करण्यासाठी काही तंत्र आणि युक्त्या आहेत, ज्या तुम्ही वापरू शकता आणि ज्यामुळे मुलांना पुन्हा दूध आवडायला लागेल.

तुमच्या मुलासाठी दूध चविष्ट कसे कराल?

वेगवेगळ्या फ्लेवर चे दूध मुलांना करून दिल्यास त्यांना त्याची ओळख होऊन मुले पुन्हा नव्याने दूध पिऊ लागतात. तुम्ही अशा मार्गांचा अवंलब करू शकता आणि तुमच्याही मुलाचे दूध चविष्ट करा.

१. तापमान

तुम्ही नेहमी आपल्या मुलास गरम दूध देत असाल तर, छान थंड मिल्कशेक देऊन पहा.

२. दुधासोबत बिस्किटेही द्या

आपल्या मुलाच्या दुधाच्या कपासोबत त्याला आवडणारी बिस्किटेसुद्धा ठेवा. ती त्यांना दुधात बुडवून खायला सांगा.

३. स्मूदीस

तुमच्या मुलाचे आवडीचे फळ दुधात घालून मिक्सर मध्ये फिरवून आपल्या मुलाला द्या, ही आवडती स्मूदी आपलं मूल पट्कन पिऊन टाकेल.

४. कॉर्नफ्लेक्स

वेगवेगळ्या प्रकारचे कॉर्नफ्लेक्स दुध आणि साखर घालून मुलांना दिल्यास हा न्याहारी साठी चांगला पर्याय ठरू शकतो तसेच जरूरीपुरते दूधही त्याच्या पोटात जाईल.

५. मिल्क लॉलिपॉप्स

मिल्कशेक्स तयार करून वेगवेगळ्या आकाराच्या साच्यामध्ये घालून फ्रिज मध्ये ठेवा. तुमच्या मुलांना स्नॅक च्या वेळेला हे लॉलिपॉप्स देऊन आश्चर्यचकित करा. आपल्या मुलाला दूध पिण्याची सवय कशी लागेल हे अनेक पालकांसाठी एक प्रकारचे आव्हानच आहे. काही युक्त्या वापरून तसेच त्यांच्यासोबत काही क्रियाकल्पांमध्ये भाग घेऊन तुम्ही त्यांना दुधाचा आनंद घेण्यास मदत करू शकता.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved