प्रीस्कूलर (३-५ वर्षे)

मुलांना योग्य प्रकारे ‘ नाही ‘ कसे म्हणावे

मुलांना चांगल्या पद्धतीने वाढवणे ही खरं तर खूप आव्हानात्मक गोष्टं आहे. असे बऱ्याचदा आढळून आले आहे की मुलांची निरीक्षणशक्ती खूप जास्त असते. त्यामुळे हे सर्वात महत्वाचं आहे की, आपण मुलांसाठी नियम करण्याआधी आणि त्यांना ते पाळायला सांगण्याआधी सर्वप्रथम आपण अचूक वागायला हवे. प्रत्येक पिढीनुसार पालकत्वात बदल होत आहेत.

केव्हा आणि कशासाठी आपण मुलांना नाही म्हटले पाहिजे?

मुलं बरेचदा हट्टीपणा करतात. काही पालक अगदी निक्षून नाही म्हणतात. काही पालक वाद टाळण्यासाठी त्यांचे हट्ट पुरवून रिकामे होतात. तर काही पालक, मुलांचा हट्ट न पुरवता आल्यामुळे नाराज होतात. परंतु मुलांना नकार देता येणे, ही गोष्ट दुर्लक्षित करून चालणार नाही, कारण मुलांना त्यांच्या पुढील आयुष्यात येणारे नकार पचवता आले पाहिजेत. आपण काही घटनांकडे पाहुयात जेव्हा मुलांना नकार देणं जरुरी असतं आणि हे ही लक्षात घेऊयात की ते आपण का करायला हवे.

१. स्वतःला किंवा इतरांना त्रास देणाऱ्या क्रिया

मुलांची वेगवेगळे प्रयोग करण्याची प्रवृत्ती असते, त्याचवेळी त्यांच्या क्रियांचे काय परिणाम होणार आहेत ह्याची मात्र त्यांना अजिबात कल्पना नसते. म्हणून पालक म्हणून तुमची जबाबदारी आहे की आपल्या मुलांना स्वतःला किंवा दुसऱ्यांना हानी पोचवण्यापासून रोखणे.

२. तोडफोड

जेव्हा मुले तोडफोड करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना त्याचक्षणी ' नाही ' म्हणून थांबवावे. तसेच त्यांचे लक्ष दुसऱ्या सुरक्षित कार्याकडे वळवावे. त्यामुळे त्यांना त्यांच्या क्रियांबद्दल अंतर्मुख होऊन विचार करण्यास मदत होते.

३. मुलांना स्वतः करता येणाऱ्या गोष्टींसाठी 'नाही' म्हणा

काही वेळेला तुम्ही मुलांसाठी काही गोष्टी करू शकता. पण जी कामं मुले स्वतः करू शकत असतील तर ती त्यांना करु द्या. त्यांना सक्षम बनण्यास प्रोत्साहित करा.

४. गरज नसताना त्यांना काही गोष्टी हव्या असतील तर ठामपणे नकार द्या

लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टी मुलांना आवडतात. जर तुम्ही ठामपणे नाही म्हणून सांगितले तर मुले निराशा पचवू शकतील. तसेच त्यांना हे पण शिकवा की ते मागतील त्या सर्व गोष्टी लगेच मिळणार नाहीत. अशी सवय लावल्यास मुले बिघडणार नाहीत.

५. आपण योजलेल्या गोष्टींमध्ये बदल झाल्यास 'नाही' म्हटले पाहिजे

असे बरेच वेळा होऊ शकते की परिस्थितीमुळे, आपण योजलेल्या गोष्टींमध्ये बदल करावे लागतात. तुम्ही मुलांना शांतपणे सांगा की आपल्याला हवे तसे प्रत्येक वेळेला होईलच असे नाही. तसेच त्यांना हे सुद्धा समजून सांगा की योजनेमध्ये बदल झाल्यास तो सुद्धा स्वीकारता आला पाहिजे.

६. आपल्या मुलांना त्यांच्या उपक्रमांना प्राधान्यक्रम देण्यास शिकवा

आपल्या मुलाला गरज पडल्यास दुसऱ्याला प्राधान्य देण्याचे समजणे हे अतिशय महत्वाचे आहे. मोठेपणी ही मुले जास्त उदार होण्याची शक्यता जास्त असते.

७. ज्याची तुम्हाला नंतर चीड येऊ शकते अशा गोष्टीना पूर्णविराम द्या

मुलांनी केलेल्या काही गोष्टी आपल्याला आवडत नाहीत अशा वेळी मुलांपर्यंत शांतपणे ही नावड पोहोचवा. त्यामुळे मुलांना परिस्थिती लक्षात येऊन तडजोड करण्यास मुले तयार होतील.

८. तुमच्या नैतिक मूल्यांमध्ये न बसणाऱ्या गोष्टींना नकार द्या

आपण मुलांना वाढवताना नैतिक मूल्ये शिकवतो. आपल्या मूल्यांच्या पलीकडे जर मुले काही करू पाहत असतील तर स्पष्ट नकार द्या.

९. अन्नाची नासाडी

जर मुलांचे पोट भरलेले असेल तर मुले फक्त अन्नाशी खेळत बसतात. तेव्हा मुलांना 'नाही' असे सांगितल्यास त्यांना समोर वाढलेल्या अन्नाची किंमत कळण्यास मदत होईल.

१०. पाळीव प्राणी व वृक्षांना इजा करणे

मुलांना उगाचच पाळीव प्राण्यांची शेपटी ओढण्याची सवय असते. अगदी गोड बोलून सांगितल्याने मुलांना दुसऱ्या प्राणिमात्रांविषयी सहानुभूती किंवा प्रेम वाटत नाही. अशा वेळी त्यांना स्पष्ट 'नाही' असे सांगितले पाहिजे.

मुलांच्या चांगल्यासाठी मुलांना नकार कसा द्यावा?

हे आपण समजणे जरुरी आहे की मुलांना ' नाही ' म्हणून आपण त्यांना फक्त मर्यादा घालून देत आहोत. आणि त्यांचे कुठलेही क्रियाकल्प किंवा त्यांच्या प्रतिक्रियांवर दबाव आणत नाही. खाली काही तंत्रांची यादी दिली आहे, जेणे करून आपण आपल्या मुलाच्या भावना न दुखावता त्यास ' नाही ' म्हणू शकता.

१. मुलांसमोर दुसरा पर्याय ठेवा

जर तुम्ही मुलांसमोर दुसरा पर्याय ठेवला आणि त्यांची ऊर्जा दुसऱ्या कार्याकडे वळवली तर मुलं नकार सहज स्वीकारतात.

२. ' नाही' म्हणताना त्यांना काय बरोबर आणि काय चूक आहे, हे सुद्धा शिकवा

मुलांच्या चुका दाखवताना, त्यांना बरोबर काय आहे हे सुद्धा शिकवा.

३. योग्यप्रकारे खेळण्यास त्यांना मार्गदर्शन करा

मुलं काही वेळा मित्र मैत्रिणींशी खेळताना कधी कधी त्यांच्या अवगुणांचं प्रदर्शन करतात. उदा: भांडण किंवा इर्षा. तुम्ही सुद्धा खेळात भाग घेऊन मुलांना योग्य प्रकारे कसे खेळावे ह्याचे मार्गदर्शन करा तसेच त्यांच्या चुकीच्या वर्तणुकीचे समर्थन करू नका.

४. मारामारी

मुलांना राग आल्यावर एकमेकांशी मारामारी करतात. सुरुवातीला त्यांना ते चुकीचे आहे हे कळत नाही. तुम्ही त्यांना 'नाही' म्हणू शकता आणि स्वतः कसे व्यक्त व्हावे हे शिकवू शकता.

५. फोन घेणे

मुले बऱ्याचदा फोन कडे आकर्षित होतात. अशावेळी त्यांना खेळण्यासाठी फोन ऐवजी दुसरे खेळणे द्या, तसेच त्यांना खेळण्यासाठी फोन मिळणार नाही हे ही सांगा. आनंदी मूल सगळीकडे आनंद पसरवते. मुलांना 'नाही' म्हणण्याआधी त्यांना पर्याय दिल्याने मदत होते. सकारात्मक पालकत्वामुळे मुलांवर दूरगामी चांगले परिणाम होतात.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved