पालक होणे हे खूप आवाहनात्मक आहे. मुख्यत्वेकरून हे अशा पालकांना लागू आहे ज्यांना खरंच मुलांकडून शाळेचा अभ्यास करून घेणं कठीण असते. बऱ्याच मुलांना, लिहिणे आणि तत्सम क्रिया आवडत नाहीत. इथे आम्ही काही उत्साहवर्धक खेळ देत आहोत जेणेकरून मुलांना लिहिण्यास प्रोत्साहन मिळू शकेल, आणि त्याचवेळी त्याची मजा सुद्धा घेता येईल आणि मुलांना ते करताना थकवा अथवा कंटाळा येणार नाही.
मुलांना लिहिण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मजेदार खेळ आणि उपक्रम
खाली काही खेळांची आणि उपक्रमांची यादी दिली आहे, ज्यामुळे मुलांना प्रोत्साहन मिळेल, आणि मुले स्वतःहून खूप लिहितील आणि त्याचा आनंद घेतील.
१. टेलिफोन पिक्श्नरी
हा सर्वात मनोरंजक खेळ आहे. जर खूप खेळाडू असतील तर ह्या खेळात मजा येते.
साहित्य
- कोरा कागद
- प्रत्येक खेळाडूसाठी एक पेन्सिल
हा खेळ कसा खेळायचा?
- प्रत्येक खेळाडू एका पेपर वर एक वाक्य लिहितो आणि तो कागद पुढच्या खेळाडूकडे पास करतो.
- आता पुढचा खेळाडू आधीच्या खेळाडूने जे वाक्य लिहिले त्याचे चित्र काढतो. आणि तो कागद जिथे वाक्य आहे तिथे दुमडतो.
- पुन्हा कागद डावीकडे असलेल्या खेळाडूकडे पास केला जातो.
- आता तो खेळाडू चित्राचे वर्णन करणारे वाक्य लिहितो.
- अशाप्रकारे जो पर्यंत लिहिण्यास किंवा चित्र काढण्यास जागा राहणार नाही तोपर्यन्त कागद पुढे पास होतो.
- आता कागद उघडा आणि जे मूळ वाक्य आणि शेवटचे चित्र यांची तुलना करा. आणि जो बदल झाला त्याबद्दल मजा घेताना भरपूर हसा.
२. गोष्ट लिहिणे
हा एक गोष्ट लिहिण्याचा खेळ आहे, ह्यामध्ये गोष्ट लिहिताना बरेच चढ-उतार येतात त्यामुळे, गोष्ट लिहिणे मजेदार वाटते.
साहित्य
- कागद
- पेन्सिल
हा खेळ कसा खेळायचा?
- फळ्यावर गोष्टीचे पहिले वाक्य लिहा.
- मुलांना त्यापुढील वाक्ये सांगून गोष्ट तयार करण्यास सांगा.
- दोन मिनिटांनंतर त्यांना पेपर दुसऱ्या मुलाकडे देण्यास सांगा, व पुढील दोन मिनिटांसाठी गोष्ट तयार करण्यास सांगा.
- अशाप्रकारे गोष्ट पूर्ण होईपर्यंत कागद पास करण्यास सांगा.
- ह्या खेळातून तयार झालेल्या मनोरंजक गोष्टीचा आनंद घ्या.
३. गाळलेल्या जागा भरा
ह्या खेळामध्ये आपल्या मुलाला गोष्टीतील गाळलेल्या जागा भरण्यास सांगा.
साहित्य
- गाळलेल्या जागा असलेला गोष्टीचा कागद
- पेन्सिल
हा खेळ कसा खेळायचा?
- मुलांना अपूर्ण गोष्ट असलेला कागद द्या आणि गाळलेल्या जागा भरण्यास सांगा.
- त्यांना त्यांची कल्पनाशक्ती वापरून गाळलेल्या जागा भरण्यास सांगा.
- शेवटी तयार झालेली गोष्ट सगळ्यांनी वाचा.
४. वाढदिवसाच्या शुभेच्छा
स्वतःहून कुणासाठी काहीतरी लिहिण्याचा हा छान मार्ग आहे.
साहित्य
- कार्ड
- पेन्सिल
हे कसे करायचे?
जेव्हा आपल्या कुटुंबात वाढदिवस असतो, तेव्हा मुलांना त्यांच्यासाठी शुभेच्छा लिहिण्यास सांगा. अशाप्रकारे त्यांना कुटुंबातील सदस्यांविषयीचे प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळेल तसेच मुलांकडून लिहिणेही होईल.
५. स्वतःचे नाव कागदावर लिहून नंतर कापणे
ह्या ऍक्टिव्हिटी मुळे मुलांना कर्सिव्ह अक्षर काढण्यास मजा येईल.
साहित्य
- कागद
- पेन्सिल
- कात्री
- रंग
हा खेळ कसा खेळायचा?
- एक कोरा कागद घेऊन अर्ध्यावर दुमडा.
- मुलांना त्यांची नावे मोठ्या अक्षरात घडीवर लिहिण्यास सांगा.
- मुलांना नाव अनेक वेळा गिरवायला सांगा.
- पुन्हा तो कागद त्याच घडीवर दुमडा.
- जोपर्यंत खालच्या कागदावर अक्षरे उमटत नाहीत तोपर्यंत मुलांना आता पुन्हा ती अक्षरे गिरवायला सांगा.
- मुलांना त्यांची नावे कापायला सांगा, नावाभोवती थोडी जागा राहू द्या. आता तयार होणारी प्रतिमा एखाद्या किड्याप्रमाणे दिसू लागेल.
- मुलं नंतर हा ” किडा ” नंतर रंगवून आपल्या कपाटावर चिकटवू शकतात.
६. शब्दांचा खेळ
हा खेळ ६ वर्षांवरील मुलांसाठी तसेच ज्या मुलांना सहजतेने लिहिता येते त्यांच्यासाठी योग्य आहे.
साहित्य
- पेन्सिल
- पेपर
हा खेळ कसा खेळायचा?
- आपल्या मुलाला नवीन शब्द द्या आणि अर्थ सांगायला सांगा.
- आता त्यांना ह्या नवीन शब्द असलेलं एक वाक्य लिहायला सांगा.
- जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर ह्या नवीन शब्दाच्या आधारे एक गोष्ट लिहायला सांगा.
- त्यांना आता गोष्टीला पात्रासारखी चित्रे काढायला सांगा, ज्यामुळे त्यांचा लिखाणाचा ताण कमी होईल.
७. पुस्तकातील संवाद
मोठ्या मुलांसाठी हा खूप चांगला खेळ आहे. कारण त्यांना चांगल्या प्रकारे लिहिता आणि वाचता येते. हा खेळ खूप क्रिएटिव्ह आहे.
साहित्य
- संवाद न लिहिलेल्या कॉमिक मासिकाच्या स्ट्रिप्स
- पेन्सिल
हा खेळ कसा खेळायचा?
- मुलांना संवाद नसलेल्या कॉमिक्स स्ट्रिप्स द्या आणि त्यामध्ये संवाद लिहायला सांगा.
- खेळ जास्तीत जास्त मजेशीर झाला पाहिजे असे आव्हान त्यांना द्या.
- जर तुमचे मुले पुरेसे मोठे असेल तर तुम्ही त्यांना पेन किंवा क्रेयॉन्स देऊ शकता त्यामुळे स्ट्रिप्स रंगेबेरंगी आणि छान होतील.
८. कोण आहे बरे ओळखा?
५-८ वर्षाच्या मुलांसाठी हा खेळ चांगला आहे. ह्यामध्ये कार्ड वरील व्यक्ती ओळखावी लागते.
साहित्य
- कार्टून किंवा सिनेमातील कॅरॅक्टर असलेली कार्ड्स
- पेपर
- पेन्सिल
हा खेळ कसा खेळायचा?
मुलांना एक पत्रक दाखवा आणि त्यांना त्या पत्रकावरील एखाद्या पात्राचे सविस्तर वर्णन करण्यास सांगा.
पालक म्हणून मुलांना लिहिण्याची सवय लावणे खूप अवघड आहे. मजेदार खेळांच्या साहाय्याने लिहिणे कंटाळवाणे होणार नाही. मुलांना वेळ देणारे पालकांमुळे मुलांच्या शिकण्याच्या क्षमतेत नक्कीच वाढ होते कारण प्रत्येक गोष्ट शाळेत शिकवली जात नाही. मुलांकडे वैयक्तिकरित्या लक्ष दिल्याने मुलांना नक्कीच फायदा होईल.