गर्भधारणेचे आठवडे

गर्भधारणा: ५वा आठवडा

तुम्ही आई होणार आहात हे ह्या आठवड्यात अगदी निश्चित झालेले असते, कारण ५व्या आठवड्यात तुमच्या पाळीची तारीख ओलांडून एक आठवडा झालेला असतो आणि HCG ह्या संप्रेरकाची तुमच्या शरीरातील पातळी सुद्धा वाढलेली असते, ह्या आठवड्यात तुम्ही गरोदर चाचणी करण्यास उत्सुक असता. तसेच ह्या आठवड्यात गर्भारपणाची लक्षणेही तीव्र असतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्ही प्रेग्नन्सी क्लबच्या सदस्या झाला आहात. खूप खूप अभिनंदन !!

गर्भधारणेच्या ५व्या आठवड्यातील तुमचे बाळ

तुमच्या उदरात भ्रूणाची वाढ खूप झपाट्याने होत आहे. तुमचे बाळ आता छोट्या tadpole प्रमाणे दिसते. ५ व्या आठवड्यातल्या भ्रूणाला  तीन स्तर असतात - Ectoderm, Mesoderm आणि Endoderm. हे तीन स्तर पुढे वेगवेगळ्या अवयवांमध्ये विकसित होतात. सर्वात वरचा स्तर म्हणजे ectoderm मधून ह्या आठवड्यात न्यूरल ट्यूब विकसित होते. तुमच्या बाळाचा मेंदू, पाठीचा मणका, मज्जातंतू आता न्यूरल ट्यूब मधून विकसित होतात. mesoderm ह्या मधल्या स्तरापासून बाळाचे हृदय आणि रक्ताभिसरण संस्था विकसित होतात. किंबहुना ५ व्या आठवड्यात, तुमच्या बाळाचे हृदयाचे कप्पे दिसू लागतात, हृदयाची स्पंदने सुरु होतात आणि हृदयाचे रक्तपुरवठ्याचे कार्य सुरु होते. हे सगळं योक सॅक च्या मदतीने होते. तांबड्या पेशींद्वारे बाळाला पोषणमूल्यांचा पुरवठा योक सॅक द्वारे केला जातो.

बाळाचा आकार केवढा असतो?

गरोदरपणाच्या ५ व्या आठवड्यात, बाळाचा आकार सफरचंद किंवा मोसंबी च्या बी एवढा असतो. ह्या आठवड्यात भ्रूण tadpole सारखे दिसते, पण पुढच्या ८ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत तुम्ही निरोगी बाळाला जन्म देणार आहात.

शरीरात होणारे बदल

५ व्या आठवड्यात तुमच्या शरीराकडून तुम्ही गरोदर असल्याचे बरेच संकेत तुम्हाला मिळालेले असतात आणि आता गरोदर चाचणी करून तुम्ही गरोदर आहात हे निश्चित झाल्यावर ही गोड बातमी सगळ्यांना सांगण्याची वेळ असते. लघवीमध्ये HCG ह्या संप्रेरकाची पातळी खूप जास्त असते त्यामुळे जर तुम्ही गरोदर असाल तर ९९% ती चाचणी सकारात्मक असेल. तुमच्या मनः स्थितितले बदल हे तुम्हाला आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना जाणवणार आहेत. बाकीचे शारीरिक बदल हे प्रत्येक स्त्रीचे वेगवेगळे असतात. परंतु आपण सामान्यपणे आढळणाऱ्या काही लक्षणांची चर्चा इथे करणार आहोत.

५व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

ह्या आठवड्यापासून ते पहिली तिमाही संपेपर्यंत गरोदरपणाची लक्षणे स्पष्ट असतात. फक्त काही केसेस मध्ये ही लक्षणे ९ महिने राहतात आणि ते काही वेळा कठीण जाते. काही स्त्रियांना वरील पैकी कुठलेही लक्षण जाणवत नाही किंवा ही लक्षणे नुसती काही काळासाठी जाणवतात आणि लगेच नाहीशी होतात. पण हे संपूर्णतः सामान्य आहे, आणि गरोदरपणाचे कुठलेही लक्षण आढळले नाही तरी चिंता करण्याचे काहीही कारण नाही.

गर्भधारणेच्या ५व्या आठवड्यात पोटाचा आकार

गरोदरपणाच्या ५ व्या आठवड्यात तुम्ही काही वेगळे दिसणार नाही. तुम्हाला थोडे पोट फुगल्यासारखे वाटणार आहे आणि तुमचे वजन एखाद्या किलोने वाढल्यासारखे तुम्हाला वाटेल, परंतु ही वजनवाढ सुद्धा खूप कमी जणींमध्ये आढळते. बऱ्याच वेळा ५ व्या आठवड्यात काहीच वजनवाढ झालेली दिसत नाही, किंबहुना उलट्या आणि मळमळ ह्यामुळे बऱ्याच मातांचे वजन कमी होऊ शकते. परंतु काळजीचे काहीच कारण नाही कारण पुढच्या ८ महिन्यांमध्ये तुमचे खूप वजन वाढणार आहे.

गर्भधारणेच्या ५व्या आठवड्यातील सोनोग्राफी

गरोदरपणाच्या ५व्या आठवड्यात डॉक्टर तुम्हाला सोनोग्राफी करण्यास सांगणार नाहीत. फक्त ज्या स्त्रियांच्या गरोदरपणात गुंतागुंत असते त्यांना स्कॅन करून घेण्यास सांगितले जाते. आधी नमूद केल्याप्रमाणे ५व्या आठवड्यात बाळ छोट्या बेडकाप्रमाणे (tadpole) दिसते आणि आकार मोसंबीच्या बी एवढा असतो. तसेच तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके पडायला सुरुवात झालेली असते, परंतु सोनोग्राफीमध्ये ते दिसत नाही. सोनोग्राफी मध्ये तुम्हाला फक्त गर्भाशयाचे आवरण जाड झालेले दिसते.

आहार कसा असावा?

गरोदर स्त्रियांनी योग्य आहार घेतला पाहिजे हे आपण सगळे जाणताच. परंतु ५ व्या आठवड्याच्या सुरुवातीपासून ते पहिल्या तिमाहीच्या शेवटपर्यंत हे किती आणि कसे शक्य आहे हा मोठा प्रश्न असतो. अन्नपदार्थांचा तिटकारा वाटणे हे खूप साधे शब्द आहेत खरं तर, इतका अन्नाचा तिटकारा ह्या काळात जाणवतो. उदा: अंडी, चिकन किंवा इतर पोल्ट्री पदार्थ नुसते बघितले तरी वेड लागतं. खाली काही टिप्स आहेत ज्यामुळे ५ व्या आठवड्यात तुम्हाला प्रथिनांनी समृद्ध आहार कसा घ्यावा हे कळेल. तुम्हाला जे आवडते ते खा. थोडेसे जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स घेतले तरीही त्याने काही नुकसान होत नाही. शांत रहा, कारण तुम्ही जर पहिल्या तिमाही च्या शेवटपर्यंत अन्नपदार्थांचा आनंद घेत असाल तर तुम्ही भाग्यवान आहात.

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

झोप आणि आरामामुळे खूप फरक पडतो. त्यामुळे जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा डोळे मिटून झोप घ्या. ८ तासांची झोप तर खूपच आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या दैनंदिन वेळापत्रकातून ८ तास बाजूला काढून ठेवा. प्रोजेस्टेरॉनची वाढलेली पातळी, रक्तातील कमी झालेली साखर, कमी रक्तदाब ह्यामुळे तुम्हाला थकल्यासारखे वाटेल. तुमची मनःस्थिती चांगली राहण्यासाठी झोप आणि आराम हे दोनच मार्ग आहेत त्यामुळे कुठलाही संकोच न बाळगता जेव्हा झोपवासे वाटेल तेव्हा थोडी झोप घ्या.

हे करा

हे करू नका

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

तुमची ५व्या आठवड्यातील खरेदी साधी आणि सोपी आहे. तुमच्यासाठी गरदोरपणावर एक पुस्तक किंवा नोंदी ठेवण्यासाठी एक वही आणा. आरामदायक कॉटन ब्रा, तसेच लेगिन्स, पायजमा किंवा तुमच्या पोटाजवळ सैलसर रहातील असे कपडे खरेदी करा. तुम्हाला जीन्स मध्ये आरामदायक वाटणार नाही त्यामुळे जीन्स घालणे टाळा. मागील आठवडा: गर्भधारणा: ४था आठवडा पुढील आठवडा: गर्भधारणा: ६वा आठवडा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved