In this Article
- गर्भारपणाच्या ४१व्या आठवड्यातील तुमचे बाळ
- बाळाचा आकार केवढा असतो?
- शरीरात होणारे बदल
- ४१व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे
- प्रसूतीची लक्षणे कोणती आहेत?
- गर्भारपणाच्या ४१ व्या आठवड्यात प्रसूती प्रेरित करणे
- गर्भधारणेच्या ४१व्या आठवड्यात पोटाचा आकार
- गर्भधारणेच्या ४१व्या आठवड्यातील सोनोग्राफी
- आहार कसा असावा?
- काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स
- कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?
तुम्ही जेव्हा तुमच्या बाळाला बघाल, तेव्हा त्या भावनांचे वर्णन शब्दांमध्ये करता येणार नाही! जर तुमचा गर्भारपणाचा ४१वा आठवडा चालू असेल, तर तुमच्या बाळाला अजून थोडा वेळ तुमच्या पोटातच राहावेसे वाटत असण्याची शक्यता आहे! तथापि, जरी तुमची आणि तुमच्या बाळाची अजूनही भेट झालेली नसली तरी सुद्धा गर्भारपणाच्या शेवटच्या टप्प्यावर असताना त्याविषयी माहिती असल्यास तुम्हाला काळजीचे काहीही कारण नाही ह्याची खात्री पटते.
गर्भारपणाच्या ४१व्या आठवड्यातील तुमचे बाळ
तुमच्या आणि बाळाच्या भेटीचा क्षण अगदी जवळ आला आहे! तथापि जर तुमचा चिमुकला अजूनही तुमच्या पोटात असेल तर, सगळं काही ठीक आहे ना ह्याची खात्री करा. खाली दिलेल्या काही गोष्टी आहेत ज्यांची अपेक्षा तुम्ही प्रसूती नंतर करू शकता.
- जर तुम्ही नॉर्मल प्रसूतीचा पर्याय निवडला असेल तर बाळाचे डोके थोडे लांब आणि डोळे थोडे सुजलेले असू शकतात. कारण नॉर्मल प्रसूती होताना बाळाचे डोके जनन मार्गातून बाहेर येताना थोडे दाबले जाते.
- तुमचं नवजात बाळ ‘vernix caseosa’ ह्या आवरणाने आच्छादित असते. बाळाच्या पहिल्या अंघोळीनंतर ते धुतले जाते. सहसा, बाळाचे गाल गुबगुबीत होण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागतो.
- काही बाळांना जन्मतःच डोक्यावर खूप केस असतात. तर काही बाळांना डोक्यावर अजिबात केस नसतात. पण काळजीचे काही कारण नाही, बाळाच्या डोकयावर हळूहळू केस उगवतात. जर बाळाच्या डोक्यावर जन्मतःच खूप केस असतील तर ते गळून नवीन केस येतात. ह्या नवीन आलेल्या केसांचा रंग आणि पोत वेगळा असतो.
- बाळाच्या डोळ्यांचा रंग बदलतो. बाळाच्या वयाच्या ६-१२ महिन्यांच्या कालावधीत तो स्थिर होतो.
- नवजात बाळाची त्वचा खूप नाजूक असते त्यामुळे त्वचेखालच्या रक्तवाहिन्या सुद्धा दिसतात. बाळ जवळपास ९ महिन्यांपेक्षा जास्त काळ, बाळ आईच्या पोटात गर्भजलामध्येच असल्यामुळे बाळाची त्वचा सुरकुतलेली असते. जन्मानंतर बाळ बाहेरच्या जगात आहे त्यामुळे हवेशी संपर्क आल्यामुळे लवकरच बाळाच्या अंगावरील सुरकुत्या गायब होतील.
- तुमच्या बाळाच्या पायांची बोटे कबुतराच्या पायांच्या बोटांप्रमाणे आत वळलेली असू शकतात. ह्याचे कारण म्हणजे आईच्या पोटात आता हालचालीसाठी कमी जागा उरली आहे. जन्मानंतर ६ महिन्यांनी बाळाचे पाय व्यवस्थित होतात.
बाळाचा आकार केवढा असतो?
गर्भारपणाच्या ४१व्या आठवड्यात बाळ कलिंगडाइतके मोठे असते. बाळाची लांबी २०-४० इंच इतकी असते आणि वजन ३. ६८ किलोग्रॅमस इतके असते.
शरीरात होणारे बदल
गर्भारपणादरम्यान तुमच्या शरीरात बदल होतात. स्तन, पोट तसेच तुमच्या पचनसंस्थेमध्ये खूप बदल होतात. गर्भारपणाच्या ह्या शेवटच्या टप्प्यावर तुमचे शरीर प्रसूतीच्या प्रक्रियेसाठी तयार असते. ह्या कालावधीत तुमची प्रसूती होण्याची खूप जास्त शक्यता असते, काहीं जणींच्या बाबतीत हा कालावधी जास्त असतो. तुम्ही प्रसूतीकाळात आहात हे कसे ओळखाल?
- तुमची गर्भजल पिशवी फुटेल. तसेच गुलाबी किंवा लाल रंगाचा चिकट स्त्राव दिसेल.
- तुम्हाला प्रसूतीकळा सुरु होतील. ह्या कळा प्रत्येक आईसाठी वेगळ्या असतात आणि कुठल्याही दोन प्रसूती प्रक्रियांची तुलना होऊ शकत नाही.
४१व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे
- ओटीपोटाजवळील भागात अस्वस्थता जाणवणे: बाळ खाली ओटीपोटाकडे जेव्हा सरकू लागते तेव्हा गर्भाशय आणि मूत्राशयावर दाब पडतो, त्यामुळे अस्वस्थता जाणवते.
- मूळव्याध: ओटीपोटावर दाब पडल्यामुळे गुदद्वाराच्या रक्तवाहिन्यांना सूज येते आणि त्यामुळे मूळव्याध होतो.
- झोपण्यास त्रास होणे: चिंता आणि संप्रेरकांमधील बदलांमुळे नीट झोप लागत नाही तसेच तुमच्या पोटाचा घेर खूप जास्त वाढल्याने नीट आरामशीर झोपता येत नाही.
- वारंवार लघवीला जावेसे वाटणे: मूत्राशयावर दाब पडल्यामुळे सारखे बाथरूमला जावे लागते.
- प्रसव कळा: आता लवकरच बाळाचा जन्म होणार आहे त्यामुळे प्रसव कळा भरभर येऊ शकतात.
प्रसूतीची लक्षणे कोणती आहेत?
गर्भारपणाच्या ४१व्या आठवड्यात, प्रसूतीची लक्षणे तुम्हाला माहित असली पाहिजेत. प्रसूतीची काही लक्षणे खालीलप्रमाणे:
- गर्भजल पिशवी फुटणे, गर्भजल ओघळू लागते तेव्हा गर्भजल पिशवी फुटली आहे हे लक्षात येते.
- न थांबणाऱ्या, वेदनादायी कळा वारंवार येणे.
अशी लक्षणे आढळ्यास जवळच्या दवाखान्यात जाणे किंवा डॉक्टरांना फोन करणे अतिशय जरुरी आहे. तुम्हाला वरील लक्षणे जरी आढळली नाहीत तरीही काळजीचे कारण नाही कारण प्रसूतीची लक्षणे केव्हाही अचानक सुरु होऊ शकतात.
गर्भारपणाच्या ४१ व्या आठवड्यात प्रसूती प्रेरित करणे
गर्भारपणाचा कालावधी १ महिन्यांनी वाढणे म्हणजे शारीरिक आणि मानसिक ताणामध्ये वाढ होते. तसेच ह्या ताणात भर म्हणजे तुमचे मित्रमैत्रिणी आणि कुटंबातील सदस्य, प्रसूतीला का उशीर होतोय म्हणून खूप प्रश्न विचारतील. जेव्हा प्रसूती प्रेरित केली जाते तेव्हा काही स्त्रिया खूप वेदनादायी आणि तीव्र कळांमुळे त्रस्त होतील. काही जणींच्या मते, प्रसूतीगृहापेक्षा घरीच कळा सुरु होण्याची वाट बघणे ठीक असते. जरी प्रसूतीचा कालावधी वाढला तरी, त्यामुळे बाळाला खूप धोका असतो. प्रसूती प्रेरित करण्याचे खूप मार्ग आहेत, ते खालीलप्रमाणे:
- गर्भजल पिशवीचे आवरण बाजूला करणे: ही प्रक्रिया डॉक्टर्स करतात. जर तुम्ही हा पर्याय निवडलात तर तुमचे डॉक्टर्स गर्भजल पिशवीचे आवरण त्यांच्या बोटांनी बाजूला करतील. त्यामुळे प्रसूती प्रेरित करणारी संप्रेरके तयार होतात.
- कृत्रिमरीत्या आवरण फाडणे: (Artificial rupture of membranes): पातळ प्लास्टिकचा हुक वापरून डॉक्टर्स गर्भजल पिशवी फोडतात. जेव्हा आई दीर्घकाळ कळा सोसत असते परंतु प्रसूतीच्या प्रक्रियेत काहीही प्रगती होत नाही तेव्हा हा पर्याय निवडला जातो.
- औषधे: गर्भारपणाच्या ४१व्या आठवड्यात औषधे वापरून प्रसूती प्रवृत्त केली जाते. गर्भाशयाचे तोंड उघडण्यासाठी, prostaglandin ची गोळी आत रात्रभर ठेवली जाते. आणि प्रसूतीकळा सुरु होण्यासाठी, oxytocin आयव्ही द्वारे दिले जाते.
गर्भधारणेच्या ४१व्या आठवड्यात पोटाचा आकार
गर्भारपणाच्या ४१ आठवडे म्हणजे ९ महिने आणि एक आठवड्यांचा काळ. आता पोटाचा भर खूप जास्त वाढला असून त्यामुळे अस्वस्थता सुद्धा वाढली आहे. आजूबाजूला हालचाल करणे अवघड झाले आहे, परंतु डॉक्टर्स हालचाल करत राहण्याचा सल्ला देतात त्यामुळे नैसर्गिकरित्या प्रसूती सुरु होते.
तुमच्या बसण्याची, झोपण्याची स्थिती योग्य आहे ह्याची खात्री करा. बसताना आणि उठताना कशाचातरी आधार घ्या, कारण पोट खूप जड झाले आहे.
गर्भधारणेच्या ४१व्या आठवड्यातील सोनोग्राफी
बाळ आणि बाळाची स्थिती नॉर्मल आहे की नाही हे बघण्यासाठी सोनोग्राफी करून घेण्याचा सल्ला डॉक्टर्स देतात. सोनोग्राफी वरून प्रसूती प्रवृत्त करावी किंवा कसे ह्याचा डॉक्टरांना अंदाज येतो.
आहार कसा असावा?
नेहमी लागणाऱ्या पोषणमूल्यांव्यतिरिक्त बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या पोषणमूल्यांनी समृद्ध अन्नपदार्थांचा समावेश आहारात केला पाहिजे. असा आहार तुम्ही प्रसूती होईपर्यंत घेतला पाहिजे. वजन कमी होण्यासाठी आहार कमी करू नका. पोषणमूल्यांनी समृद्ध आहार घेत रहा. तसेच भरपूर द्रवपदार्थ घेणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे.
काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स
परिस्थिती सुकर व्हावी म्हणून खाली काही टिप्स देत आहोत.
हे करा
- बाळ तुमच्या पोटात असताना पोषक आहार घ्या, जेणेकरून बाळाची निरोगी वाढ होईल.
- कार्यमग्न रहा. त्यामुळे तुमचा ताण कमी होईल, तुम्हाला झोप नीट लागेल आणि तब्येत चांगली राहील.
हे करू नका
- आहार कमी करू नका, त्यामुळे रक्तातील साखर कमी होण्याची शक्यता असते.
- गरम पाण्याचा टब वापरणे टाळा, गरोदर असताना शरीराला तापमान नियंत्रित करता येत नाही.
कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?
गर्भारपणाच्या ४१ व्या आठवड्यात, खरेदी कराव्यात अशा गोष्टींची यादी खाली दिली आहे.
- बाळासाठी फॉर्मुला दूध
- बाळाच्या बाटल्या धुण्यासाठी साबण
- नॅपी
- बाळाला खुप वेळा शी होते आणि त्याचा वास खोलीत बराच वेळ तसाच राहतो. बाळाची आणि तुमची खोली प्रसन्न राहावी म्हणून रूम फ्रेशनर्स आणून ठेवा.
तुम्ही गर्भारपणाच्या ४० आठवड्यांऐवजी ४१ व्या आठवड्यात जेव्हा पदार्पण करता तेव्हा तुम्ही चिंताग्रस्त असणे खूप स्वाभाविक आहे. प्रसूतीची तारीख उलटून गेल्यावर हा ताण वाढतो. हे माहित करून घेणे खूप महत्वाचे आहे की ज्या स्त्रिया पहिल्यांदा आई होणार आहेत, त्यांच्यामध्ये असे होणे हे खूप सामान्यपणे आढळते.
ह्या कालावधीत काही लक्षात ठेवण्याजोग्या गोष्टी खालीलप्रमाणे
- तुमच्या डॉक्टरांशी बोलून प्रसूती प्रेरित करण्याची वेळ ठरवून घ्या.
- जितके शक्य होईल तितके आरामात रहा.
- मन कशाततरी सतत गुंतवून ठेवा म्हणजे काळजी करणे कमी होईल.
तुम्ही गर्भधारणे बाबतच्या सर्व गोष्टी माहित करून घेऊन स्वतःला शिक्षित करणे अतिशय महत्वाचे आहे, विशेषतः ४१ व्या आठवड्याविषयी (जर तुम्ही अजूनही गरोदर असाल तर) आणि प्रसूती नंतरच्या परिस्थितीला हाताळण्यासाठी तयार राहा.
मागील आठवडा: गर्भधारणा: ४०वा आठवडा
पुढील आठवडा: गर्भधारणा: ४२वा आठवडा