गर्भधारणेचे आठवडे

गर्भधारणा: ३रा आठवडा

तुमच्या बाळाचा विकास वेगाने होत असताना तुम्हाला त्याविषयी माहिती असणे जरुरीचे आहे. गर्भारपणाच्या तिसऱ्या आठवड्यातील बाळाचा विकास आणि ह्या आठवड्यातील गर्भारपणातील महत्वाचे टप्पे ह्याविषयी जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

गर्भारपणाच्या ३ ऱ्या आठवड्यातील तुमचे बाळ

तुमच्या गर्भारपणाच्या तिसऱ्या आठवड्यात गर्भाचा विकास होण्यास सुरुवात झालेली असते. ह्या आठवड्यात तुमचं बाळ म्हणजे एक शेकडो पेशींचा छोटासा चेंडू असतो आणि ह्या पेशींच्या संख्येत वेगाने वाढ होत असते. गर्भारपणाच्या तिसऱ्या आठवड्यात ह्या चेंडूचा काही भाग (Blastocyte) नाळेमध्ये विकसित होतो आणि गर्भधारणा संप्रेरक, HCG च्या निर्मितीस सुरुवात होते. हे संप्रेरक स्त्रीबीजांची निर्मिती थांबवते आणि इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन च्या निर्मितीचा आदेश देते. ह्या संप्रेरकांमुळे गर्भाशयाचे अस्तर बाहेर टाकले जात नाही. आता तो पेशींचा छोटासा चेंडू (Blastocyte) गर्भाशयाच्या भिंतीवर सुरक्षित असतो. तसेच गर्भाशयाच्या भिंतीवरील रक्तवाहिन्यांद्वारे ह्या पेशींच्या चेंडूला ऑक्सिजन आणि पोषणमूल्यांचा पुरवठा होत असतो.

बाळाचा आकार केवढा असतो?

हा आठवडा अतिशय महत्वाचा असतो कारण ह्या आठवड्यात फलित बीज स्वतःचे अगदी सुरक्षितरित्या गर्भाशयाच्या अस्तरावर रोपण करते आणि गर्भाशयाच्या अस्तरावरील रक्तवाहिन्यांकडून मिळणाऱ्या ऑक्सिजन आणि पोषणमूल्यांवर विकसित होऊ लागते. गर्भाच्या विकासाचा हा टप्पा जरी मजेदार असला तरी ३ आठवड्याच्या ह्या गर्भाचा आकार खूपच सूक्ष्म असतो. तांत्रिकदृष्टया त्याची लांबी ०.० इंच लांब आणि वजन ०.० ग्रॅम्स असते.

शरीरात होणारे बदल

गर्भधारणेपासून गरोदरपणाच्या अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत आईच्या शरीरात तीव्र बदल होत असतात. गर्भारपणाच्या पहिल्या काही आठवड्यांमध्ये स्त्रीच्या शरीरातील आणि वागणुकीतील बदल हे सारखेच असतात. किंबहुना ह्या लक्षणांवरून किंवा बदलांवरून गर्भारपणाचा प्रत्येक आठवडा स्पष्ट होत जातो. गर्भधारणेपासूनच्या तिसऱ्या आठवड्यात सामान्यतः आढळणारी लक्षणे म्हणजे शरीराच्या पायाभूत तापमानातील वाढ, थकवा, भूक मंदावणे तसेच हळुवार व दुखरे स्तन ही आहेत.

३ऱ्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

ही लक्षणे प्रत्येक स्त्रीची वेगवेगळी असू शकतात, परंतु इथे काही सामान्यपणे आढळणारी लक्षणे देत आहोत ज्यामुळे गरोदरपणाच्या चाचणी आधी एक आठवडा तुम्ही गरोदर आहात हे माहित होण्यास मदत होते.

गर्भधारणेच्या ३ऱ्या आठवड्यात पोटाचा आकार

गरोदरपणाच्या तिसऱ्या आठवड्यात तुम्ही शरीरातील काही सूक्ष्म बदलांमुळे उत्साहित व्हाल. परंतु ह्या आठवड्यात पोटाच्या आकारात काही बदल होत नाही. तुम्हाला पोट फुगल्यासारखे वाटू शकेल परंतु ते आतल्या वाढणाऱ्या बाळामुळे नसेल. तुम्ही गरोदर आहात हे दिसण्यासाठी अजून काही आठवड्यांचा कालावधी आहे. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना तुम्ही आई होणार आहात हे सांगण्याची मानसिक तयारी होत नाही तोपर्यन्त हे गुपित तुम्ही तुमच्या मनात ठेवू शकता.

गर्भधारणेच्या ३ऱ्या आठवड्यातील सोनोग्राफ़ी

गर्भारपणाच्या तिसऱ्या आठवड्यात तुमचे बाळ म्हणजे अगदी सूक्ष्म फलित बीज असते आणि त्यास मारुला (marula) असे म्हणतात. अगदी मिठाच्या दाण्याएवढे ते छोटेसे असते. त्यामुळे सोनोगग्राफीद्वारे ते शोधणे अवघड असते. चौथ्या आठवड्यापासून तुम्हाला गर्भाशयाचे अस्तर जाड होताना दिसते. ह्याचाच अर्थं मारुला (marula) योग्यस्थानी पोहोचल्याचे सुनिश्चित होते आणि गर्भाशयात ते ९ महिन्यांसाठी सुरक्षित असल्याची खात्री होते.

आहार कसा असावा?

तुम्ही दोन जीवांसाठी आहार घेण्यास सुरुवात करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या मते गर्भारपणाच्या पहिल्या तिमाहीत आईचे वजन फक्त १ किंवा २ किलोंनी वाढले पाहिजे. त्यामुळं अतिखाणे टाळा. नेहमीप्रमाणेच निरोगी आणि चौरस आहार घ्या आणि तुम्हाला लिहून दिलेली व्हिटॅमिन्स सुद्धा घ्या. गरोदरपणातील तिसऱ्या आठवड्यातील आहाराविषयी महत्वाच्या टिप्स इथे दिल्या आहेत.

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

गर्भारपणाच्या तिसऱ्या आठवड्यातील पहिला आणि सर्वात महत्वाचा सल्ला म्हणजे तुमच्या आवडत्या आणि विश्वासू डॉक्टरांची भेट घेणे. तुमच्या गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत डॉक्टर महत्वाची भूमिका बजावणार आहेत त्यामुळे तुम्ही जितक्या लवकर त्यांच्याशी संपर्क साधाल तितके ते तुमच्यासाठी आणि बाळासाठी चांगले ठरणार आहे. जर तुम्हाला तुमच्या फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने बरे वाटणार असेल तर तसे करा. इथे गरोदरपणाच्या तिसऱ्या आठवड्यात कुठल्या गोष्टी कराव्यात आणि करू नयेत अशा काही टिप्स दिल्या आहेत ज्या तुम्ही तिसऱ्या आठवड्यात लक्षात ठेऊ शकता.

हे करा

हे करू नका

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

तुमची तिसऱ्या आठवड्यासाठीची खरेदी खूप सोपी आहे. गर्भारपणाविषयी जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर ते आणून ठेवा. घरी करता येणारी गरोदर चाचणी आणा. दुखऱ्या आणि हळुवार स्तनांसाठी कॉटन च्या ब्रा विकत आणा. आत्तासाठी आणि गर्भारपणाच्या पुढील काही आठवड्यांसाठी इतक्या गोष्टी पुरेशा आहेत. मागील आठवडा: गर्भधारणा: २रा आठवडा पुढील आठवडा: गर्भधारणा: ४था आठवडा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved