गर्भधारणेचे आठवडे

गर्भधारणा: २७वा आठवडा

गर्भारपणाचा २७ वा आठवडा म्हणजे दुसऱ्या तिमाहीचा शेवट. आता बाळाचे डोके लेट्युस इतके मोठे झाले आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे तुमची अकाली प्रसूती जरी झाली तरी बाळाच्या जगण्याची शक्यता ८५% इतकी जास्त असते आणि त्यासाठी बाळाच्या जन्मानंतर वैद्यकीय मदतीची गरज भासते.

गर्भारपणाच्या २७व्या आठवड्यातील तुमचे बाळ

गर्भारपणाच्या २७ व्या आठवड्यात बाळाचा खाली दिल्याप्रमाणे विकास होतो: ह्या टप्प्यावर बाळाची प्रत्येक हालचाल काही सेकंदांसाठी असेल आणि तुम्हाला त्याचा आनंद घेऊन ताणविरहित राहता येईल.

बाळाचा आकार केवढा असतो?

२७ व्या आठवड्यात बाळाचा आकार ३६ सेंमी इतका असतो आणि बाळाचे वजन ८७५ ग्रॅम्स इतके असते. बाळाला रात्र आणि दिवस ह्यातला फरक कळू शकेल आणि बाळाचा मेंदू विकासाच्या अंतिम टप्पात असेल. ह्या कालावधीत तुम्हाला लक्षात येईल की बाळाच्या झोपण्याच्या वेळा नियमीत झाल्या असून हे खूप सामान्य आहे की तुमच्या आणि बाळाच्या झोपेच्या वेळा एकच असतील.

सामान्यपणे आढळणारे शारीरिक बदल

गर्भारपणाच्या तिसऱ्या तिमाहीत शारीरिक बदल प्रसूती आणि बाळाच्या जन्माच्या दृष्टीने होतात.

२७व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

२७ व्या आठवड्यात, तुमच्या बाळाची हालचाल जाणवण्याइतपत ते मोठे झालेले आहे. गर्भारपणात सामान्यपणे आढळणारी लक्षणे खालीलप्रमाणे:

गर्भधारणेच्या २७व्या आठवड्यात पोटाचा आकार

ह्या कालावधीत ६-१२ किलो वजन वाढणे ठीक आहे, परंतु जर तुमचे वजन अचानक खूप वाढले असेल तर थोडे लक्ष दिले पाहिजे. तुम्हाला हे माहित असायला हवे की दिवसाला ३००-५०० इतक्या कॅलरीजची गरज असते. आता बाळाची बऱ्यापैकी वाढ झाल्यामुळे गर्भारपणाच्या २७व्या आठवड्यात तुम्ही बाळाचे पाय मारणे आणि उचक्या देणे अनुभवू शकता.

गर्भधारणेच्या २७व्या आठवड्यातील सोनोग्राफी

जर तुमच्या गर्भारपणात काही गुंतागुंत नसेल तर तुम्हाला २७व्या आठवड्यात सोनोग्राफी करण्याची गरज नाही. तुमच्या बाळाने आता श्वास घेण्यास केली आहे आणि बाळाचा मेंदू सुद्धा आता कार्यरत आहे.

आहार कसा असावा?

तुम्ही पोषक आहार घेणे सुरु ठेवले पाहिजे आणि बाळाला योग्य पोषण मिळते आहे ना ह्याची खात्री करून घेतली पाहिजे. २७व्या आठड्यात तुमच्यासाठी कुठले अन्नपदार्थ चांगले आहेत ते इथे दिले आहेत.

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

इथे काही टिप्स दिल्या आहेत ज्यांच्या मदतीने तुम्हाला ह्या काळात स्वतःची काळजी घेण्यास मदत होईल.

हे करा

हे करू नका

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

तुम्ही तुमच्या गर्भारपणाच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत त्यामुळे तुम्ही तुम्हाला लागणाऱ्या गोष्टींची खरेदी केली पाहिजे.
जरी आता हे महत्वाचे नसले तरी बाळाच्या जन्मानंतर जन्मनियंत्रणाचा सुद्धा विचार तुम्ही करून ठेवला पाहिजे. हा निर्णय सुद्धा तुम्ही बाळाच्या जन्मधी घेऊन ठेवला पाहिजे.

निष्कर्ष

२७ वा आठवडा हा तुमच्यासाठी आणि बाळासाठी महत्वाचा आहे कारण ही गर्भारपणाच्या शेवटच्या टप्प्याची तयारी आहे. तुमच्यासाठी तसेच आजीआजोबांसाठी बाळाच्या आगमनाची जवळ येणारी तारीख हा खूप आनंद घेऊन येणारा आणि रोमांचकारी अनुभव असतो. हा बाळाच्या जन्माचा आनंद तुम्ही लुटा आणि त्यामार्गावरील अस्वस्थता हाताळण्यासाठी तयारीत राहा. मागील आठवडा: गर्भधारणा: २६वा आठवडा पुढील आठवडा:गर्भधारणा: २८वा आठवडा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved