गर्भधारणेचे आठवडे

गर्भधारणा: २५वा आठवडा

तुमच्या गर्भारपणात तुमच्या शरीरात खूप बदल होत आहेत आणि तुम्हाला तुमच्या २५ आठवड्यांच्या बाळाची प्रगती कशी होत आहे ह्याची उत्सुकता लागली असेल. हो ना? तर आता ह्या भावना आणि त्यातील तथ्य समजून घेण्याची वेळ आली आहे.

गर्भारपणाच्या २५व्या आठवड्यातील तुमचे बाळ

तिसऱ्या तिमाहीपर्यंत पोहोचलो ही भावनाच किती सुंदर आहे! आणि तुमच्या बाळाची वाढलेली हालचाल ते सतत तुमच्यासोबत असल्याची जाणीव तुम्हाला करून देत आहे. तुमच्या बाळाने तुमची नाळ घट्ट धरून ठेवली आहे. २५ व्या आठवड्यात तुमच्या बाळाचे पहिले शौच तयार झाले आहे त्याला मेकोनियम असे म्हणतात, जे खूप घट्ट आणि गडद असते. बाळाच्या जन्मानंतर ते उत्सर्जित केले जाते. बाळाच्या केसांची वाढ होत आहे तसेच केसाचा पोत आणि रंगही आता उठून दिसत आहे.

बाळाचा आकार केवढा असतो?

जेव्हा तुम्ही २५ आठवड्यांचे गरोदर असता तेव्हा तुमच्या बाळाचा आकार १३. ५ इंच इतका असतो आणि बाळाचे वजन हे ७०० ग्रॅम्स च्या आसपास असते. बाळाच्या शरीरावरची जास्तीची चरबी झडल्यामुळे तुमचे बाळ आता आधीपेक्षा थोडे लांब आणि बारीक दिसत आहे. लाल भोपळा किंवा मोठे फ्लॉवर डोळ्यापुढे आणा म्हणजे तुम्हाला बाळाचा आकार लक्षात येईल.

सामान्यपणे शरीरात होणारे बदल

तुमच्या बाळाची वाढ झपाट्याने होत आहे आणि त्यामुळे ते तुमच्या शरीरातील मध्यभागातील बरीचशी जागा व्यापत आहे तथापि बाळाची जसजशी बाळाची वाढ होत असते तसे तुमचे वजन वाढते आणि त्यामुळे ते वजन पेलण्याची तुमची क्षमता वाढते. ह्या टप्प्यावर दर आठवड्याला एक पौंड (०.४५ किलो ) वजन वाढते. गर्भारपणादरम्यानचे शरीरातील दुसरे बदल म्हणजे तुमच्या शरीरावरील स्ट्रेच मार्क्स वाढतात तसेच स्तनाग्रांचा रंग गडद होणे, चेहऱ्यावर गडद चट्टे उमटणे असे बदल दिसून येतात. तसेच तुमच्या बेंबीपासून खाली केसांची लव दिसते.

२५व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

मागच्या आठवड्यापेक्षा ह्या आठवड्यात  तुमच्या ऊर्जेच्या पातळीत फारसा फरक पडणार नाही परंतु बाळाच्या वाढत्या आकारामुळे तुम्हाला थोडा थकवा जाणवेल. गर्भारपणाच्या २५ व्या आठवड्यात सामान्यपणे आढळणारी लक्षणे खालीलप्रमाणे:

. झोपेसंबंधित प्रश्न

चांगली झोप न लागण्यामागे खूप कारणे आहेत आणि त्यामध्ये तुमचा वाढत्या पोटाचा घेर, बाळंतपणाची भीती किंवा कदाचित तुमच्या संप्रेरके ह्या कारणांचा समावेश होतो. तुम्हाला चांगली झोप लागण्यासाठी, झोपण्याआधी कमी पाणी प्या त्यामुळे तुम्हाला कमी वेळा बाथरूमला जाण्यासाठी उठावे लागेल.

. बद्धकोष्ठता आणि मूळव्याध

ही एक सर्वसामान्य स्थिती आहे ज्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही पुरेसे पाणी पीत आहेत ना ह्याकडे लक्ष द्या. व्यायाम करा, आणि आपल्या आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश करा त्यामुळे तुमच्या पचनसंस्थेस त्याची मदत होईल आणि बद्धकोष्ठतेला आळा बसेल. दुसऱ्या तिमाहीदरम्यान haemorrhoids खूप सामान्यपणे आढळतात कारण तुमच्या बाळाच्या वाढीमुळे पचनसंस्थेवर दाब येतो.

. जळजळ

जसजशी बाळाची वाढ होते, तसे तुमच्या पचनसंस्थेवर दाब पडतो आणि त्यामुळे तुमच्या अन्ननलिकेत आम्लाची  पातळी वाढते आणि त्यामुळे छातीत आणि घशात जळजळ जाणवते. रात्रीच्या जेवणात मसालेदार पदार्थ टाळल्यास हा प्रश्न कमी होऊ शकतो आणि जळजळीपासून सुटका होऊ शकते.

गर्भधारणेच्या २५व्या आठवड्यात पोटाचा आकार

जर तुम्ही गर्भारपणाच्या २५व्या आठवड्यात असाल तर तुमच्या वजनात आतापर्यंत ७-८ किलो इतकी वाढ झाली असेल, आणि हा तुमच्यासाठी सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. जरी दुसऱ्या तिमाहीदरम्यान वजनात झपाट्याने वाढ होणे हे सामान्य असले तरीही लक्षात ठेवा की ही वाढ पाणी धरून ठेवण्यामुळे होते. जर तुमच्या वजनवाढीच्या प्रक्रियेत काही चढ उतार आल्यास तुमचे डॉक्टर तुमच्यासाठी आहार तक्ता करतील ज्यामुळे तुम्हाला वजन नियंत्रणासाठी त्याची मदत होईल आणि थोड्या काळात वजन खूप जास्त वाढण्याची शक्यता कमी होईल. २५ व्या आठवड्यात तुमच्या बाळाची हालचाल खूप लक्षणीय असते. जर तुमचे बाळ झोपलेले असेल तर तुम्हाला हालचाल जाणवणार नाही परंतु त्याविषयी काळजीचे काहीही कारण नाही. जर तुम्हाला बाळ ठीक असल्याची खात्री करून घ्यायची असेल तर गाणी ऐका  किंवा हलका मसाज घ्या आणि तुम्हाला काही कळण्याच्या बाळाचे पाय मारणे सुरु होईल.

गर्भधारणेच्या २५व्या आठवड्यातील सोनोग्राफी

जर तुमच्या गर्भारपणाच्या २५व्या आठवड्यात तुमच्या डॉक्टरांना तुम्हाला निरीक्षणाखाली ठेवायचे असेल तर तुम्हाला अल्ट्रासाऊंड करण्यास सांगितले जाऊ शकते. तुमच्या बाळाच्या डोक्यावर अजून केस वाढलेले तुम्हाला अल्ट्रासाऊंड दरम्यान कळेल. तुमच्या स्थितीनुसार तुम्हाला ग्लुकोजची चाचणी (जर टी तुम्ही आधीच्या आठवड्यात केली नसेल तर) करायला सांगितली जाऊ शकते. त्यामुळे तुमच्या शरीराची साखर पचवण्याची क्षमता लक्षात येईल. तुम्हाला गर्भारपणातील मधुमेह तर नाही ना हे कळेल.

आहार कसा असावा?

२५व्या आठवड्यात, तुमच्या आहारात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शिअम ह्यासारखी महत्वाची पोषणमूल्ये असली पाहिजेत, त्यामुळे बाळाचे दात आणि हाडे मजबूत होतील आणि स्नायू बळकट होतील तसेच मज्जासंस्था निरोगी असेल. व्हिटॅमिन डी मुळे शरीरात कॅल्शिअम शोषले जाते. तुमच्या गर्भारपणाच्या २५व्या आठवड्यात पनीर, दूध, हिरव्या पालेभाज्या, चवळी, राजमा, सोयाबीन्स इत्यादींचा समावेश तुमच्या अन्नामध्ये असला पाहिजे. अंडी, दूध आणि मासे हे सुद्धा व्हिटॅमिन डी चे चांगले स्त्रोत आहेत.

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

२५ व्या आठवड्यात काय करावे आणि काय करू नये ह्याविषयीची यादी इथे दिली आहे.

हे करा

हे करू नका

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

बाळाचे आणि तुमचे कपडे खरेदी करण्याबरोबरच तुम्ही तुमच्या सोयीच्या हॉस्पिटलची निवड करून तिथे नोंदणी केली आहे ना ह्याची खात्री करा. तुमचा वैद्यकीय आणि आयुष्याचा विमा तपासून पाहण्याची वेळ आली आहे त्यामुळे तुमच्या विमा सल्लागाराचे तपशील जवळ ठेवा. बाळाच्या जन्माच्या वेळेची योजना सुद्धा तयार करून ठेवा त्यामुळे तुमची भीती कमी होण्यास मदत होईल, तसेच बाळंपणाच्या वेळी तसेच आधी आणि नंतर कुठली काळजी घेतली पाहिजे ह्याची यादी करून ठेवा.
आता तुम्ही ६ महिन्यांच्या गरोदर आहात आणि तुम्हाला तुम्ही अनुभवी आहात असे वाटू लागेल, परंतु अजून बाळाच्या जन्मासाठी खूप कालावधी आहे. शेवटचा टप्पा निर्णायक ठरू शकतो, त्यामुळे स्वतःला निरोगी ठेवल्यास आणि आरामात राहिल्यास तुमचा बाळंतपणाचा कालावधी तुमच्यासाठी आणि तुमच्या पतीसाठी आनंदात जाईल. आता तुमच्याकडे सगळी महत्वाची माहिती आहे आणि त्याचा तुम्ही त्याचा योग्य वापर कराल. तुमच्या बाळाला खूप प्रेमाने, काळजीपूर्वक व आनंदात घरी आणा. मागील आठवडा: गर्भधारणा: २४वा आठवडा पुढील आठवडा: गर्भधारणा: २६वा आठवडा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved