गर्भधारणेचे आठवडे

गर्भधारणा: २०वा आठवडा

तुम्ही तुमच्या गर्भावस्थेच्या मध्यापर्यंत आला आहात. ह्या आठवड्यात तुम्हाला लक्षात येईल की तुमचं बाळ आता पोटात हालचाल करू लागले आहे  आणि पाय सुद्धा मारू लागले आहे. तथापि तुमच्या गर्भाशयात पुरेशी जागा आहे जिथे तुमचे बाळ मस्त विहार करू शकते आणि तुम्ही ते अनमोल क्षण अनुभवू शकता. इथे काही सूचना आहेत तसेच गर्भावस्थेच्या २०व्या आठवड्यात तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा तुम्हाला इथे मिळतील.

गर्भारपणाच्या २०व्या आठवड्यातील तुमचे बाळ

आता तुमचे वजन ४ किलोंनी वाढलेले असेल आणि इथून पुढच्या येणाऱ्या आठवड्यांमध्ये तुमचे वजन दर दोन आठवडयांनी १ किलोने वाढणार आहे. जर तुमचा गर्भ मुलीचा असेल, तर तिचे गर्भाशय आतापर्यंत पूर्णपणे विकसित झालेले असेल, आणि तिच्या गर्भाशयात लाखो स्त्रीबीजे तयार होत आहेत. जर तुमचा गर्भ मुलाचा असेल तर त्याचे अंडकोश ओटीपोटातून खाली विकसित होण्यास सुरुवात होईल आणि ही प्रक्रिया २ आठवड्यात पूर्ण होईल. तुमच्या बाळाने जास्त प्रमाणात गिळण्यास सुरुवात केली आहे आणि त्यामुळे तुमच्या बाळाची पचनसंस्था परिपक्व होईल. याच वेळी बाळ मल तयार करते, बाळाचे मल म्हणजे एक काळा चिकट पदार्थ असतो आणि बाळ ते आतड्यामध्ये साठवून ठेवते. बाळाचे दुधाचे दात आता तयार असतात आणि कायमचे दात तयार होण्यास सुरुवात होते. बाळ गर्भजलात बराच काळ असल्याने ते वर्निक्स नावाच्या तेलकट पदार्थाने आच्छादित असते, त्यामुळे बाळाच्या त्वचेचे संरक्षण होते.

बाळाचा आकार केवढा असतो?

गर्भारपणाच्या २०व्या आठवड्यात तुमच्या बाळाचा आकार हा १६-१७ सेंमी इतका असतो आणि वजन साधारणपणे ३०० ग्रॅम्स असते. आतापर्यंत बाळाचा आकार डोक्यापासून कुल्ल्यांपर्यंत मोजला जात होता, कारण बाळाचे पाय छातीशी मुडपलेले असतात. परंतु २०व्या आठवड्यात बाळाचा आकार डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत मोजणे सोपे जाते.

शरीरात होणारे बदल

गर्भारपणाच्या २०व्या आठवड्यात नेहमीपेक्षा तुमच्या शरीरात जास्त बदल झालेले तुम्हाला आढळतील.

२०व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

फक्त सोबत घेऊन येणारे आव्हानात्मक प्रश्न सोडले तर गर्भावस्थेच्या ह्या टप्प्यावर पोहचणे म्हणजे एक मोठी गोष्ट आहे. आता तुमच्या शरीरात होणाऱ्या बदलांसोबतच काही नवीन लक्षणांची अनुभूती तुम्हाला येईल. संप्रेरकांच्या बदलांमुळे अगदी कमी प्रमाणात डोकेदुखी होऊ शकते, परंतु जर तुम्हाला प्रचंड डोकेदुखी, पोटदुखी, मळमळ होत असेल किंवा धूसर दिसत असेल तर ताबडतोब आपल्या डॉक्टरांना फोन करा कारण ते प्रीक्लॅम्पसिया किंवा उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते.

गर्भधारणेच्या २०व्या आठवड्यात पोटाचा आकार

२० व्या आठवड्यात तुमचे गर्भाशय तुमच्या बेंबीला समांतर असते आणि गर्भाशयाचा व्यास १८-२४ सेंमी इतका असतो. गर्भाशय बाहेरचे दिशेने प्रत्येक आठवड्यात १-२ सेंमी वाढते. ह्यामुळे तुमच्या सांध्यांवर आणि अस्थिबंधनांवर दाब येतो त्यामुळे तुमचे डॉक्टर तुम्हाला "रेलॅक्सिन " हे संप्रेरक लिहून देऊ शकतात त्यामुळे ताण कमी होतो. जर तुम्हाला ओटीपोटाच्या भागात किंवा जांघ्यांमध्ये वेदना जाणवल्या तर तात्काळ तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा, कारण ते मोठ्या प्रश्नाचे लक्षण असू शकते.

गर्भधारणेच्या २०व्या आठवड्यातील सोनोग्राफी

गर्भावस्थेच्या मध्यावर सोनोग्राफी करण्याची ही योग्य वेळ आहे. ह्या स्कॅन मध्ये तुम्हाला हृदय, मेंदू, फुप्फुसे आणि मूत्रपिंडे ह्यांचे अविश्वसनीय असे तपशील मिळतील. तुम्हाला बोटे, अंगठे, नखे, केस, डोळे आणि नाक ह्यांचे तपशील मिळतील. ह्या स्कॅन मध्ये गर्भ मुलीचा आहे की मुलाचा हे सुद्धा कळते अर्थात भारतामध्ये हे जाणून घेणे कायद्याच्या विरुद्ध आहे. ह्या सोनोग्राफी मध्ये नाळेची स्थिती लक्षात येते, तसेच नाळ गर्भाशयाच्या मुखाशी अडथळा तर करत नाही ना हे लक्षात येते आणि जरी तसे असेल तर काळजीचे कारण नाही कारण बाळाची  वाढ होताना नाळ पुन्हा आत खेचली जाते.

आहार कसा असावा?

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

गर्भारपणाच्या २०व्या आठवड्यात काही गोष्टी कराव्यात आणि काही टाळाव्यात, त्या खालीलप्रमाणे

हे करा

हे करू नका

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल

आता तुम्ही बेबी कॅरियर ची खरेदी करू शकता, त्यामध्ये तुम्ही तुमच्या छोट्या बाळाला घेऊन फिरू शकता. तुमच्या बदलणाऱ्या शरीरासाठी स्टायलिश मॅटर्निटी कपड्यांची खरेदी करा. तुमच्या बाळाची कशी काळजी घ्यावी हे शिकवणाऱ्या क्लास मध्ये नाव नोंदवा कारण चांगल्या क्लास मोठी प्रतीक्षा यादी असते. योग्य काळजी घ्या आणि तयारी करून ठेवा म्हणजे, गर्भारपणाचा हा काळ बाळाच्या जन्माचा आनंद घेण्याबद्दल जास्त आणि त्याबरोबर येणाऱ्या वेदनांबद्दल कमी असतो, असे आपण म्हणू शकतो. मागील आठवडा: गर्भधारणा: १९वा आठवडा पुढील आठवडा: गर्भधारणा: २१वा आठवडा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved