In this Article
गर्भावस्थेच्या १६व्या आठवड्यात तुमच्या शरीरात, आकार आणि कार्यक्षमता ह्या दोन्ही दृष्टीने फरक होतो. तुमच्या गर्भावस्थेचा अजून एक रोमांचक भाग म्हणजे तुमच्या पोटात बाळाच्या हालचालींचा अनुभव आता तुम्ही केव्हाही घेऊ शकता.
तुम्हाला अजूनही काही प्रमाणात पोट फुगल्यासारखे वाटेल त्यामुळे बाळ केव्हा हालचाल करत आहे हे पटकन कळणार नाही. आनंदाची गोष्ट म्हणजे बाळाच्या हालचालीचा एक विशिष्ट नमुना असतो तुम्ही त्यावर लक्ष ठेऊ शकता. अजून एक महत्वाची प्रगती म्हणजे तुमचे बाळ आता आवाज ओळखण्यास सुरुवात करू शकते, त्यामुळे तुम्ही तुमच्या पोटातील बाळाशी बोलण्यास सुरुवात करू शकता.
गर्भारपणाच्या १६व्या आठवड्यातील तुमचे बाळ
ह्या आठवड्यात बाळाचे जननेंद्रिय पूर्ण विकसित झालेले असेल, बाळाचे डोळे प्रकाशाला संवेदनशील असतील आणि वर म्हटल्याप्रमाणे बाळ आवाज ओळखू लागेल आणि हो तुमचे बाळ आता पोटात असताना जांभई सुद्धा देऊ शकेल!
स्नायू आणि पाठीचा कण्यामध्ये ताकद येईल, बाळ त्याचे डोके आणि मान मागच्या काही आठवड्यांपेक्षा जास्त ताठ करू शकेल. बाळाचा चेहरा आता आणखी परिपक्व दिसू लागेल आणि त्यामुळे बाळाच्या कपाळावरील आठ्या दिसतील तसेच बाळ एक डोळा हळूच उघडून बघू लागेल तथापि तुमच्या बाळाची त्वचा अजूनही पारदर्शक असेल.
बाळाचा आकार केवढा असतो?
हे कदाचित खूप रोमांचकारी आहे की तुमचे पोट हे आता ४-५ इंच लांबीच्या आणि १०० ग्रॅम्स वजनाच्या गर्भासाठी नवीन घर आहे. अजून एक खूप आनंददायी गोष्ट म्हणजे तुमच्या डॉक्टरांना तुमचे बाळ मुलगा आहे की मुलगी हे कळणार आहे , कारण बाळाचे जननेंद्रिय आता पूर्णपणे विकसित झालेले आहे. आपण असा म्हणूयात की बाळ आता अवाक्याडो च्या आकाराचे असून सगळे अवयय संपूर्णरीत्या कार्यरत आहेत. एक लक्षात असुद्या की १६ आठवड्याच्या गर्भाचा आकार वेगवेगळ्या वैद्यकीय घटकांवर अवलंबून असतो.
शरीरात होणारे बदल
१६वा आठवडा सुरु होताना, आपल्या बाळाचे शरीर आणि वजन आधीपासूनच बदलले आहे. त्यामुळे ह्या आठवड्याच्या अखेरीस आपल्याला काही बदलांना सामोरे जावे लागल्यास त्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, आपल्या शरीरावर आधीपेक्षा जास्त गोलाई येईल त्यामुळे तुम्हाला मोठ्या साईझचे कपडे घालावे लागतील.
तुमच्या पोटाचा उंचवटा आता थोडा दिसू लागेल, तसेच तुमच्या लक्षात आले असेल की तुमच्या मनःस्थितीतील होणारे बदल आता कमी झाले आहेत , तुमचा चेहरा तेजस्वी दिसू लागला आहे आणि मळमळ होणेसुद्धा कमी झाले आहे. ह्या टप्प्यावर, तुमच्या बाळाच्या आरोग्याबद्दलच्या काळजीनंतर तुमची सर्वात मोठी चिंता म्हणजे स्ट्रेच मार्क्स ही होय.
१६व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे
गर्भधारणेच्या नेहमीच्या लक्षणांची आतापर्यंत तुम्हाला सवय झाली असेल. त्यातील काही लक्षणे संपूर्ण गर्भावस्थेच्या कालावधीत तसेच राहतात, आणि काही नवीन लक्षणे दिसू लागतात.
- तुम्हाला बाळाच्या वाढत्या वजनामुळे पाठदुखी जाणवू लागेल.
- तुमच्या स्तनांच्या आकारात वाढ होईल आणि ते अधिसारखेच दुखरे आणि हळुवार राहतील.
- संप्रेरकांमधील बदलनमुळे तुमचे डोळे अतिशय संवेदनशील बनतील.
- तुम्हाला वरचेवर बद्धकोष्ठता जाणवेल.
- तुमच्या शरीरात वेगाने संप्रेरकांचे बदल घडत असल्यामुळे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी विसरत आहोत असा अनुभव येईल.
गर्भधारणेच्या १६व्या आठवड्यात पोटाचा आकार
काही वेळा तुम्हाला श्वास घेण्यास कठीण होऊ शकते. कारण तुमच्या बाळाची वाढ होते आहे तसेच वजन सुद्धा वाढते आहे. तुमच्या पोटात बाळाची हालचाल सुद्धा चांगली होत आहे. तुमचे पोट आता चांगलेच दिसू लागले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या बाळाच्या तुमच्या पोटात अनेक क्रियाकल्प सुरु असतात जसे की पाय मारणे किंवा नुसतंच पोटात फिरणे. तुम्हाला काळजीपूर्वक राहिले पाहिजे कारण गॅस होणे किंवा स्नायूंची थरथर ही गर्भारपणातील १६व्या आठवड्यातील सामान्य लक्षणे आहेत.
गर्भधारणेच्या १६व्या आठवड्यातील सोनोग्राफी
१६व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड हे खूप आश्चर्यानी भरलेलं असणार आहे आणि ह्या अल्ट्रासाऊंडच्या दरम्यान तुम्हाला अवयव परिपकव झालेले दिसणार आहेत. सर्वात प्रथम तुमच्या बाळाच्या स्वाद कालिका विकसित होत आहेत, त्याबरोबरच बघूया, केस, पापण्या ह्यांचा सुद्धा विकास होत आहे. तुमचे बाळ आता आवाज ओळखण्यास शिकले आहे ह्याचा अर्थ कानाची हाडे तसेच पडदा (tympanic membrane) ह्यांचा सुद्धा विकास होत आहे.
ह्या आठवड्यात सोनोग्राफी बरोबरच तुम्हाला लघवी तपासून पाहायला सांगितली जाईल, त्यामुळे मधुमेह आणि इतर रोगांचे निदान होण्यास मदत होईल. ह्याव्यतिरिक्त हृदयाचे ठोके, परिपक्व होणारे अवयव तसेच प्रकाशाविषयीची संवेदनशीलता हे महत्वाचे बदल सुद्धा नमूद करता येतील.
आहार कसा असावा?
गर्भारपणाच्या १६ व्या आठवड्यात बाळाच्या काळजीव्यतिरिक तुम्हाला कुठला आहार घेतला पाहिजे ह्याची सुद्धा काळजी वाटेल. तुमच्यापैकी बरेच जण बरेच जण एखाद्या अन्नपदार्थांविषयी तिटकारा किंवा लालसा तसेच वसांविषयीची संवेदनशीलता ह्यामधून बाहेर पडले असले तरी काही जणींना अजूनही त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. काय खावे याविषयीच्या सूचना खाली दिल्या आहेत. खाण्याच्या वेळा नियमित आहेत ह्याची खात्री करा त्यामुळे तुम्ही आणि तुमचे बाळ दोघेही उपाशी राहणार नाही.
- थोडंसं चॉकलेट खाणे तुमच्यासाठी चांगले आहे परंतु तुम्ही फळे किंवा दही खाणे चांगले आहे त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीराला आवश्यक पोषणमूल्ये मिळतात.
- ज्यांना थोडे खारे अन्नपदार्थ खावेसे वाटतील त्यांच्या साठी स्ट्रिंग चीझ खाणे सर्वात चांगले आहे आणि ते कॅल्शिअम आणि प्रथिनांनी समृद्ध असते.
- भरपूर भाज्यांचा तुमच्या आहारात समावेश करा जेणेकरून बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असलेली पोषणममूल्ये बाळाला मिळतील.
- योग्य व्हिटॅमिन्ससाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यामुळे अन्नपदार्थांमधून काही जीवनसत्वे मिळाली नाही तरी व्हिटॅमिन्स मधून ती मिळत असल्याची खात्री होते.
- मांस, लाल मांस, मासे, अंडी आणि डाळी ह्यांचा समावेश तुमच्या आहारात करण्यासाठी ते चांगले पर्याय आहेत.
- लोह, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शिअम यांचा सुद्धा आहारात समावेश केला आहे ह्याची खात्री करा.
काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स
आत्ता वेळ अली आहे की तुम्ही स्वतःची जास्त काळजी घेण्यास सुरुवात केली पाहिजे. आहार नीट घेतल्याने तुम्हाला वजनवाढी साठी फायदा होऊ शकतो, तुमच्या बाळाचे वजन तुम्ही पेलू शकाल ह्यासाठी हे महत्वाचे असते. तुम्ही खूप जास्त प्रमाणात कुठलेही काम करत नाही आहात ना ह्याची खात्री करा, कारण त्याचा तुमच्या बाळावर नकारत्मक परिणाम होण्याची शक्यता असते.
हे करा
- तुमची पाठदुखी आणि पायांचे पेटके कमी होण्यासाठी व्यायाम करा किंवा ठराविक वेळ चाला.
- लक्षात ठेवा की तुमच्याकडून दोन जणांसाठी म्हणून खूप आहार घेतला जात नाहीये. तुम्हाला फक्त तुमच्या स्वतःसाठी आणि तुमच्या बाळासाठी पोषणाची गरज आहे, त्यामुळे तुमच्या आहाराबाबत जागरूक रहा आणि गरजेपेक्षा जास्त खाऊ नका.
- खूप विश्रांती घ्या आणि पुरेशी झोप घ्या.
- सजलीत रहा, परंतु त्यासाठी शीतपेये पिऊ नका.
- सकारात्मक विचार करा. तुमची मनःस्थिती ठीक राहण्यासाठी उत्साही राहा.
हे करू नका
- कुठलीही वाईट सवय ताबडतोब सोडा कारण तुमच्या बाळाच्या तब्बेतीवर त्याचा परिणाम होतो.
- खूप जास्त कॅफेन घेऊ नका कारण त्याचा बाळाच्या तब्बेतीवर नकारात्मक परिणाम होतो.
- दूषित जागेत जाऊ नका.
- खूप जास्त व्यायाम करू नका त्यामुळे तुम्हाला खूप जास्त थकवा जाणवू शकेल.
- स्वतःला आणि परिणामी बाळाला उपाशी ठेऊ नका.
- अस्वच्छ राहू नका.
- दातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
- खूप जास्त ताण घेऊ नका
- कधीही आणि कुठलीही मदत लागली तर मागण्यास संकोच बाळगू नका.
कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?
तुम्ही गरोदरपणात स्टायलिश दिसायला हवे म्हणून तुम्हाला आरामदायक वाटतील असे स्टायलिश मॅटर्निटी कपडे खरेदी करा. चांगले शूज घेण्यासाठी पैसे खर्च करा, खास करून ते मऊ पॅडिंग असलेले असावेत ज्यामुळे तुमच्या पायांच्या स्नायूंना आराम मिळेल. स्ट्रेच मार्क्स साठी क्रीम किंवा तेल आणून ठेवा कारण तुमची त्वचा ताणली जाणार आहे. काही क्रीम्स आणि लोशन्स आणून ठेवा कारण तुमची त्वचा कोरडी पडणार आहे. तुम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी ठेवण्यासाठी एक बॅग खरेदी करा. तसेच डोळ्यांच्या स्नायूंना आराम मिळावा आणि थंडावा मिळावा म्हणून तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने डोळ्यांमध्ये घालण्यासाठी ड्रॉप्स आणून ठेवा. दातांची काळजी घेण्यासाठी लागणारी उत्पादने सुद्धा महत्वाची आहेत. आणि शेवटचे म्हणजे पालकत्वाविषयी चांगले पुस्तक आणायला विसरू नका.
गर्भारपणात काय अपेक्षित आहे ह्याविषयीची पूर्ण कल्पना असल्यास तुम्हाला गर्भारपणात येणाया आव्हानांना सहज सामोरे जात येईल.
मागील आठवडा: गर्भधारणा: १५वा आठवडा
पुढील आठवडा: गर्भधारणा: १७वा आठवडा