गर्भधारणेचे आठवडे

गर्भधारणा: ११वा आठवडा

आतापर्यंत तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या शरीरात अनेक बदल झालेले आहेत. तुमच्या बाळाचा विकास भ्रूणावस्थेतून गर्भामध्ये झाला आहे, आणि माणसाच्या शरीरात सुरु असणारी सगळी कार्ये आता बाळाच्या शरीरात सुरळीत सुरु झालेली आहेत. तुमच्याही शरीरात अनेक बदल झाले आहेत, उदा: गोलाकार आणि दुखरे स्तन, किंबहुना संपूर्ण शरीराची गोलाकार संरचना झाली असून  एका नवीन जीवाला सामावून घेण्यासाठी गर्भाशय सुद्धा तयार झाले आहे. आता गर्भारपणाच्या पुढच्या म्हणजेच ११ व्या आठवड्यात तुमच्या गर्भारपणात नवीन रोमांचक शक्यता काय आहेत हे पाहूया.

गर्भधारणेच्या ११व्या आठवड्यातील तुमचे बाळ

गर्भारपणाच्या ९व्या आणि १०व्या आठवड्याइतकाच ११वा आठवडा महत्वाचा आहे, कारण बाळ आता कार्यात्मक मनुष्याप्रमाणे दिसते. बाळाच्या चेहऱ्याची हाडे तयार झालेली असतात. परंतु त्वचा पारदर्शक असते. तुमच्या बाळानेथोडी वळवळ करण्यास सुरुवात केलेली असते पण इतक्यात तुमच्या ते लक्षात येणार नाही. तुम्हाला आता बाळाच्या हातापायाची २० बोटे मोजता येतील आणि तसेच बाळाचे हात आणि पाय विकसित झालेले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे बाळ गिळण्याची क्रिया शिकलेले आहे आणि ते गर्भाशयातील द्रवाने वेढले गेले आहे. केसांची मुळे, जीभ आणि नाक सुद्धा दिसू लागले आहेत.

बाळाचा आकार केवढा असतो?

बाळ आता लिंबू किंवा अंजिराइतकं मोठं दिसत आहे. गर्भारपणाच्या ११ व्या आठवड्यात बाळाचा आकार १-२ इंच असतो. ११व्या आठवड्यात बाळाचे वजन ७-८ ग्रॅम्स असते. सर्वात मजेदार म्हणजे बाळाचे डोके तयार होते, आणि डोके आणि बाळाचे शरीर ह्याचे गुणोत्तर १:१ असते.

शरीरात होणारे बदल

गर्भारपण आयुष्य बदलते, शरीरांमधील बदलांमुळे तुमचे शरीर पूर्वीसारखे होणार नाही. शरीरातील हे बदल टाळता न येण्यासारखे असतात, गर्भारपणाच्या ११ व्या आठवड्यात तुमच्या शरीरात काय बदल होतात ते पाहुयात: जरी हे सांगणे कठीण असले तरी १०व्या आठवड्यापेक्षा आता तुमचे पोट जास्त गोलाकार दिसेल.ज्या स्त्रियांना गोलाई आवडते त्यांना त्यांच्या गर्भारपणातील ह्या शारीरिक बदलांमुळे आनंद होईल.काही भाग्यवान स्त्रिया गर्भारपणात तेजस्वी दिसू लागतील आणि काहींना संप्रेरकांमधील बदलांमुळे रॅश किंवा फोड येतील. तुमचे वजन आता नक्कीच वाढलेले असेल.

११व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

जरी तुमचे पोट दिसत असेल किंवा नसेल, जरी तुमच्या शरीरात काही बदल होत असतील किंवा नसतील, गर्भारपणाच्या ११ व्या आठवड्यात तुम्हाला खालील लक्षणे अनुभवण्यास मिळतील. वर दिलेल्या ह्या नवीन बदलांबरोबरच, काही जुनी आणि गेल्या काही आठवड्यात दिसणारी गर्भारपणाची लक्षणे सुद्धा दिसणार आहेत,

गर्भधारणेच्या ११व्या आठवड्यात पोटाचा आकार

बऱ्याच स्त्रियांना गॅस झाल्यामुळे पोट फुगले आहे किंवा जड झाले आहे असे वाटेल, परंतु तुमचे पोट आतापर्यंत थोडे दिसू लागले असेल. ज्या स्त्रिया पहिल्यांदा आई होणार आहेत त्यांचे पोट कदाचित दिसणार नाही ज्या स्त्रियांची ही पहिली वेळ नाही, त्यांच्या पोटावरून गरोदर आहेत हे कळेल.अर्थात, हे विरुद्धही असू शकते  वजन जास्त असलेल्या स्त्रियांमध्ये काहीही फरक दिसणार नाही. बारीक स्त्रियांमध्ये थोडे पोट दिसेल, विशेषकरून जर तुमचे वजन वाढले असेल तर.

गर्भधारणेच्या ११व्या आठवड्यातील सोनोग्राफी

११ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड वरून तुम्हाला बाळाची पोटात छान वाढ होत आहे हे कळेल. बाळाची हालचाल सुंदर आणि सहज असेल. तुमच्या बाळाची आधीची पारदर्शक त्वचा आता अपारदर्शक होणार आहे. परंतु ११ व्या आठवड्यात त्वचा पारदर्शकच राहणार आहे.

आहार कसा असावा?

गर्भारपणाच्या ११ व्या आठवड्यात काय खावे हा मोठा घटक विचारात घेण्याजोगा आहे. तुम्ही ह्या काळात काय खाल्ले पाहिजे हे माहित करून घेण्यासाठी पुढे वाचा  

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

गर्भधारणा आव्हानात्मक आणि अगदी स्पष्ट पण असू शकते. तरीसुद्धा, स्वतःला आणि आपल्या बाळाला सुरक्षित आणि निरोगी ठेवणे ह्या बाबींचा विचार केला पाहिजे.

हे करा

हे करू नका

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

तुम्ही गरोदर आहात ह्याचा अर्थ तुम्ही स्टयलिश राहायचं नाही असं नाही, चांगल्या ताणल्या जाऊ शकतील अशा ब्रा आणा. तुम्ही स्तनपान करताना वापरतात त्या नर्सिंग ब्रा सुद्धा आणून ठेऊ शकता, म्हणजे जेव्हा लागतील तेव्हा पटकन वापरता येतील. पालकत्वावर पुस्तके घेऊन या म्हणजे तुमच्याकडे त्याबद्दलच्या माहितीचा स्रोत असेल. मॅटर्निटी कपडे आणि पँट्स आणून ठेवा, शक्यतोवर कॉटन मधल्या असाव्यात. तुमच्या डॉक्टरांनी लिहून दिलेली व्हिटॅमिन्स आणि पूरक औषधे आणून ठेवा. आरामदायी बूट घ्या त्यामुळे पायाचे पेटके आणि सूज कमी होईल. दातांची काळजी घ्या आणि त्यासाठी लागणारी उत्पादने आणून ठेवा, त्यामुळे दाताचे प्रश्न उद्भवणार नाहीत. जेव्हा तुमचे पोट दिसत नाही तेव्हा तुमच्या शरीरात खूप बदल होत असतात कारण तुमच्या शरीरात संप्रेरके तयार होत असतात. आरोग्यपूर्ण आहार आणि सैल सुती कपडे वापरल्याने तुम्हाला खूप आरामदायक वाटणार आहे. मागील आठवडा: गर्भधारणा: १०वा आठवडा पुढील आठवडा: गर्भधारणा: १२वा आठवडा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved