Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसूतीनंतर घ्यायची काळजी सी-सेक्शन प्रसूतीनंतर पोटाचा घेर कमी करण्यासाठी व्यायाम आणि टिप्स

सी-सेक्शन प्रसूतीनंतर पोटाचा घेर कमी करण्यासाठी व्यायाम आणि टिप्स

सी-सेक्शन प्रसूतीनंतर पोटाचा घेर कमी करण्यासाठी व्यायाम आणि टिप्स

मातृत्व हा प्रत्येक स्त्रीसाठी एक सुंदर आणि परिपूर्ण करणारा असा टप्पा असतो. तरी सुद्धा प्रसूतीनंतर शरीर पूर्ववत करण्यासाठी बऱ्याच स्त्रिया प्रयत्न करत असतात. परंतु, सी-सेक्शन नंतर, आपल्या शरीराला बरे होण्यासाठी वेळ लागतो. झटपट वजन कमी करणे हानिकारक आहे आणि त्यामुळे शरीरात अनावश्यक गुंतागुंत निर्माण होऊ शकते. या लेखात, आम्ही तुम्हाला सी-सेक्शन प्रसूतीनंतर पोट कमी करण्याचे काही प्रभावी आणि सुरक्षित मार्ग सांगू.

व्हिडिओ: सी-सेक्शन प्रसूतीनंतर पोटावरील चरबी कशी कमी करावी (सोपे व्यायाम आणि टिप्स)

व्यायाम सुरु करण्यापूर्वी किती वेळ वाट पाहावी आणि का?

कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टर 6-8 आठवडे वाट पाहण्याचा सल्ला देतात. आपले शरीर पूर्णपणे बरे होण्याची वाट न पाहिल्यास घातक परिणाम होऊ शकतात जसे की:

  • प्रसवोत्तर रक्तस्त्राव
  • स्नायू आणि सांध्यांना दुखापत
  • सर्जिकल टाके उघडणे

म्हणून, पुन्हा व्यायाम सुरु करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सी-सेक्शन प्रसूतीनंतर पोटावरील चरबी कमी करण्यासाठी टिप्स

तुम्हाला तुमच्या पोटावरील चरबी कमी करणे कठीण वाटू शकते परंतु खालील टिप्स वापरून तुम्हाला ते सहज साध्य करता येईल.

1. मसाज करा

प्रसूतीनंतर दोन आठवड्यांनंतर तुम्ही सुरक्षितपणे मसाज घेऊ शकता. या मसाजमुळे पोटाची चरबी कमी होते आणि लिम्फ नोड्समधून द्रव कमी होण्यास मदत होते, त्यामुळे पोटाचा घेर कमी होतो. परंतु, सुरुवातीच्या दिवसांमध्ये ओटीपोटाच्या भागाला मसाज करणे टाळा आणि फक्त पाठ, हात आणि पाय यावर लक्ष केंद्रित करा. प्रसूतीनंतर चार आठवड्यांनंतर, जेव्हा जखम भरून येण्यास सुरुवात होते तेव्हा तेव्हा हळू हळू पोटाकडील भागाची मालिश केली जाऊ शकते.

2. हालचाल करा

सी-सेक्शन प्रसूतीनंतर तुमच्या पोटाकडील भागाचे स्नायू कापले जातात, परिणामी तुमच्या पोटावर चरबीचा फुगवटा तयार होतो. त्यामुळे तुमच्या पोटाच्या स्नायूंवर आणि ओटीपोटाकडील भागावर ताण येतो. म्हणून, आपण जड व्यायाम करण्यास सुरुवात करण्यापूर्वी 6-8 आठवडे वाट बघणे महत्वाचे आहे. चालणे हा कमी प्रभावाचा व्यायाम आहे आणि त्यामुळे सुरक्षितपणे कॅलरी जाळल्या जातात. आठवड्यातून किमान तीनदा तुमच्या बाळासोबत चालायला जा.

3. पौष्टिक खा

सर्व नव्याने आई झालेल्या स्त्रियांना स्तनपान करताना भरपूर ऊर्जा लागते. तुमच्या आहारात कर्बोदकांचा समावेश करा. तसेच खाद्यपदार्थांमध्ये चरबी कमी असल्याची खात्री करा. पुरेशी जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत ना ते पहा. तूप, तळलेले पदार्थ, लोणी आणि वातयुक्त पेये यासारखी सॅच्युरेटेड फॅट्स असलेली मिठाई आणि पदार्थ खाणे टाळा. जास्त प्रमाणात फळे, भाज्या आणि प्रथिने खा. फूड लॉग ठेवा आणि तुम्ही एका दिवसात खाल्लेले पदार्थ आणि त्यातील कॅलरी मोजा. असे केल्याने तुम्हाला खाण्याचे प्रमाण ठरवण्यास मदत होईल.

4. तुमचे पोट बांधा

जखम बरी झाल्यानंतर पोट बांधा. बँडेज सारखे दिसणाऱ्या मऊ कापडाने पोट बांधले जाते. पोट बांधल्याने ते आत ढकलले जाते असे मानले जाते.

5. स्तनपान

पोटाची चरबी कमी करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. सी-सेक्शन नंतर पहिले 6 महिने तुमच्या बाळाला स्तनपान द्या. केवळ स्तनपान केल्याने दिवसाला सुमारे 500 अतिरिक्त कॅलरीज बर्न होत नाहीत तर ऑक्सिटोसिन हार्मोन देखील तयार होते. ह्या संप्रेरकांमुळे गर्भाशयाचे आकुंचन होते आणि गर्भाशय पूर्ववत होण्यास मदत होते.

6. भरपूर पाणी आणि द्रव प्या

प्रसूतीनंतर भरपूर पाणी प्या. पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील द्रव संतुलन राखण्यास मदत होईल तसेच तुमच्या कंबरेभोवतीची अतिरिक्त चरबी देखील कमी होईल. लिंबू पाणी प्यायल्याने विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी हा एक चांगला घरगुती उपाय आहे. सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध घालून प्या.

7. पुरेशी झोप घ्या

पोटाचा घेर कमी करण्यासाठी पुरेशी म्हणजेच किमान ५ तासांची झोप आवश्यक आहे. हे अवघड आहे पण आम्ही तुम्हाला एक युक्ती सांगत आहोत – तुमचे बाळ झोपल्यावर तुम्ही सुद्धा झोपा! असे केल्याने तुमचे भावनिक आरोग्यही सुधारेल.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी योग

पोटाची चरबी कमी करण्यासाठी योग

पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही सी-सेक्शन नंतर योगाभ्यास करू शकता. योगामुळे पोटाचे स्नायू टोन होतात तसेच हे स्नायू मजबूत होण्यास मदत होते. नव्याने आई झालेल्या स्त्रियांना तणाव आणि बदलांना सामोरे जाण्यास मदत होते. परंतु,  प्रसूतीनंतर 6-8 आठवड्यांनंतरच योग सुरू करावा. याबद्दल तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

योगासने करताना प्रमाणित योग प्रशिक्षकाची मदत घ्या. श्वासोच्छवासाच्या साध्या व्यायामाने सुरुवात करा. काही योगासनांमध्ये तुम्ही तुमच्या पोटाची चरबी कमी करण्याचा प्रयत्न करू शकता:

  • भुजंगासन: हे आसन केल्यास तुमच्या पोटाचे स्नायू मजबूत होण्यास मदत होईल.
  • प्राणायाम: प्राणायाम केल्यास तुमचे पोटाचे स्नायू आत जाण्यास मदत होईल.
  • सूर्यनमस्कार: एकदा सामान्य आसने शिकल्यानंतर, तुम्ही सूर्यनमस्कार करण्यास सुरुवात करू शकता.

सिझेरियन प्रसूतीनंतर पोट कमी करण्यासाठी व्यायाम

सी-सेक्शन नंतर पोटाची चरबी कमी करण्यासाठी अनेक व्यायाम आहेत. तुम्ही बरे झाल्यावर आणि तुमच्या डॉक्टरांनी परवानगी दिल्यावर तुम्ही दररोज व्यायाम करू  शकता. तंज्ञांचे मार्गदर्शन घेऊन  तुम्ही सौम्य व्यायामाने सुरुवात करू शकता.  नंतर हळूहळू जटिल व्यायामाकडे वळू शकता. सी-सेक्शनच्या जखमेवर दाब पडू नये असे कपडे घाला. आपण करून बघू शकता असे काही व्यायाम प्रकार खाली दिलेले आहेत.

1. पेल्विक टिल्ट्स

तुमचे पोटाचे स्नायू संकुचित करा आणि नितंब पुढे वाकवा. तुम्ही हे बसून, उभे असताना किंवा जमिनीवर झोपून करू शकता.

2. प्लँक्स

तुमचे शरीर पुश-अप स्थितीत धरून ठेवा. तुमचा  सर्व भार हात, कोपर आणि पायांच्या बोटावर असू द्या. किमान 30 सेकंद धरून ठेवा आणि तीनदा पुनरावृत्ती करा.

3. केगेल्स

तुमचे ओटीपोटाकडील स्नायू 5 सेकंद घट्ट धरून ठेवा आणि नंतर सोडा. लक्षात ठेवा हा व्यायाम करताना श्वास रोखू नका. 10-सेकंदांच्या ब्रेकसह सलग 4-5 वेळा प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्या ओटीपोटाकडील स्नायू मजबूत होतात.

4. ब्रिजेस

जमिनीवर पाठीवर झोपा. गुडघे वाकवून आणि पाय जमिनीवर सपाट ठेवा. आपले तळवे खालच्या दिशेने ठेवून हात पसरवा. तुमच्या पोटाचे स्नायू आवळून घ्या आणि हळूहळू तुमचे नितंब जमिनीवरून उचला, त्यानंतर तुमचे पोट आणि पाठीचा मध्यभाग सुद्धा उचला. आपले खांदे जमिनीवर ठेवा. दहा सेकंद धरून ठेवा आणि हळूवारपणे आपले शरीर जमिनीवर टेकवा. आपले नितंबाकडील आणि पोटाचे स्नायू टोन  करण्यासाठी हा व्यायाम सुमारे 4-6 वेळा पुन्हा करा.

5. लोअर ऍबडॉमिनल स्लाइड

हा व्यायाम प्रकार सी-सेक्शन झालेल्या ओटीपोटाच्या खालच्या स्नायूंना लक्ष्य करतो. आपले पाय जमिनीवर सपाट ठेवून, गुडघे वाकवा. हात बाजूला ठेवून सरळ झोपा. तुमचे तळवे खालच्या दिशेला असू द्या. तुमचे पोट आतमध्ये घ्या आणि तुमचा उजवा पाय हळू हळू सरकवण्यासाठी पोटाच्या स्नायू आकुंचित करा. पाय हळूहळू  सुरुवातीच्या स्थितीत परत आणा. उजव्या आणि डाव्या पायाने हे 3-5 वेळा करा.

6. फॉरवर्ड बेंड्स

सरळ उभे राहा आणि तुमचे डोके गुडघ्याशी समतल ठेवून हळू हळू खाली वाकवा. दहा सेकंद ह्याच स्थितीमध्ये रहा आणि पुन्हा पूर्ववत व्हा. तुमची पाठ बळकट करण्यासाठी आणि कॅलरी जाळण्यासाठी असे 4-5 वेळा करा.

सी-सेक्शन नंतर पोट सपाट होण्यासाठी पोटाचा पट्टा

सी-सेक्शन नंतर पोटाची चरबी कमी करण्यासाठी, तुम्ही पोटाला पट्टा लावू शकता. असे केल्याने तुमच्या शरीराला आधार मिळतो आणि प्रसूतीनंतर पोट पूर्ववत होण्यास मदत होते. परंतु आईचे वजन जास्त असल्यास, सी-सेक्शनच्या प्रसूतीतून बरे होत असताना उभे राहणे किंवा बसणे यासारख्या हालचाली खूप वेदनादायक असू शकतात. पोटाच्या पट्ट्यामुळे पोटाला आधार मिळेल आणि वेदना कमी होतील.

लक्षात ठेवा की सी-सेक्शन ही एक गुंतागुंतीची प्रसूती आहे. प्रसूतीनंतर जखमेवर कोणताही प्रकारचा दबाव आल्याने उपचार प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो. म्हणून, पोटाचा पट्टा वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुम्हाला तुमच्या ओटीपोटात वेदना होत असल्यास कधीही व्यायाम करू नका किंवा व्यायाम सुरू ठेवू नका. जर तुम्ही सी-सेक्शन प्रसूतीनंतर काम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, जेणेकरून तुमच्या आरोग्यास हानी पोहोचणार नाही. तुमचे शरीर पूर्ववत होण्यासाठी वरील टिप्स आणि व्यायामांचे अनुसरण करा.

आणखी वाचा:

 प्रसूतीनंतर होणारा मूळव्याध
प्रसूतीनंतर पोटाचा घेर कमी करण्यासाठी पट्टा वापरल्याने मदत होते का?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article