Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसूतीनंतर घ्यायची काळजी प्रसूतीनंतरची केसगळती

प्रसूतीनंतरची केसगळती

प्रसूतीनंतरची केसगळती

गरोदरपणानंतर बऱ्याच स्त्रियांना केसगळती सारख्या त्रासदायक समस्येला सामोरे जावे लागते. प्रसूतीनंतर खूप प्रमाणात केस गळणे ही बऱ्याच मातांची तक्रार असते. परंतु प्रसूतीनंतर केस गळणे हे खूप सामान्य आहे आणि त्यास सामोरे जाण्यासाठी काही प्रभावी उपाय आहेत. हे उपाय होणाऱ्या आईने जाणून घेणे गरजेचे आहे.

व्हिडिओ: प्रसूतीनंतर केस गळणे कारणे आणि उपाय

प्रसूतीनंतरची केस गळती म्हणजे काय?

प्रसूतीनंतर केस गळणे तात्पुरते असते. ही समस्या प्रसूतीनंतर फक्त काही काळ राहते, त्यामुळे थोडी काळजी घेतल्यास, तुमचे लहान बाळ एक वर्षाचे होईपर्यंत तुमचे केस पुन्हा पूर्वीसारखेच होतील. त्यामुळे घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. फक्त आराम करा आणि आपल्या लहान बाळासोबत वेळ घालवून मातृत्वाचा आनंद घ्या.

गरोदरपणानंतर केस गळणे सामान्य आहे का?

गरोदरपणानंतर केस गळणे अगदी सामान्य आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. आपले सुमारे 85% केस सक्रियपणे वाढतात तर त्यातील 15% केस आहेत तसेच राहतात हे 15% केस धुताना किंवा विंचरताना गळतात. ह्या कालावधीस केस गळतीचा काळ किंवा शेडिंग पीरियडअसे म्हणतात आणि त्यामुळे नवीन केसांसाठी कूप तयार होतात.

गरोदरपणातील एस्ट्रोजेनच्या उच्च पातळीमुळे केसांच्या वाढीचा टप्पा लांबतो. इस्ट्रोजेन हे संप्रेरक रक्ताचा प्रवाह आणि परिसंचरण वाढवते, त्यामुळे मुळे मजबूत होतात. त्यामुळे केस गळणे कमी होते. ह्याचाच परिणाम म्हणून गरोदरपणात स्त्रियांचे केस दाट आणि मजबूत असतात.

तथापि, प्रसूतीनंतर गोष्टी बदलतात. शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी कमी होते आणि केसांचे कूप विश्रांतीच्या स्थितीत जातात आणि केस अचानक गळू लागतात. संप्रेरकांमध्ये अचानक बदल झाल्यामुळे, प्रसूतीनंतर केस गळतात, परंतु ही स्थिती कायमस्वरूपी नसते. गरोदरपणानंतर, मातांना ह्या समस्येचा कमी कालावधीसाठी सामना करावा लागतो. ही समस्या सहसा फक्त ६ ते ८ महिने टिकते. त्यामुळे हा तीव्र बदल तात्पुरता असतो.

गरोदरपणानंतर केस गळतीचे प्रमाण प्रत्येक स्त्रीमध्ये वेगळे असते हे लक्षात घेणे देखील महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, लांब केस असलेल्या स्त्रियांमध्ये ठळकपणे केस गळती झालेली दिसून येते. तुमचे केस गळणे दिवसेंदिवस वाढत आहे असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

बाळ झाल्यानंतर केस गळण्याची चिन्हे

गर्भवती नसतानाही, सर्वसाधारणपणे स्त्रियांचे दररोज सुमारे १०० केस गळतात. परंतु, प्रसूतीनंतर सुमारे ४ ते ५ महिन्यांनी, तुमच्या केसांच्या ब्रशमध्ये केसांची गुंतावळ किंवा बाथरूम मध्ये केस अडकलेले दिसू शकतात. प्रसूतीनंतरचे केस गळण्याचे हे पहिले आणि एकमेव लक्षण आहे. तुमच्या बाळाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दरम्यान ही केस गळती हळू हळू कमी होते.

केस गळणे कायम राहिल्यास उपचारासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सामान्य कारणे

गरोदरपणात केस कशामुळे गळतात हे आता गूढ राहिलेले नाही. गर्भारपणानंतर केस गळण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे इस्ट्रोजेनची पातळी कमी होणे हे होय. यामुळे अधिक केस विश्रांतीच्या स्थितीत जातात आणि प्रसूतीनंतर ४ महिन्यांपर्यंत हे केस गळत राहतात. हा टप्पा नवीन मातांमध्ये ६ ते ८ महिने इतका टिकतो आणि ते पूर्णपणे सामान्य आहे. परंतु हे केस गळणे सुरूच राहिल्यास, ते अशक्तपणामुळे किंवा प्रसूतीनंतरच्या थायरॉईडायटीसमुळे असू शकते गरोदरपणामुळे शरीरातील फेरीटिनची पातळी बदलू शकते आणि तुमची थायरॉईडची पातळी बदलू शकते. दोन्ही समस्यांवर उपचार केले जाऊ शकतात आणि त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उपचार

प्रसूतीनंतर केस गळणे ही संप्रेरकांमधील बदलांमुळे होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ही समस्या टाळता येत नाही त्यामुळे, प्रसूतीनंतर ज्यामुळे ही केस गळती थांबू शकेल असे केसगळतीचे कोणतेही उपचार नाहीत. येथे काही टिप्स दिलेल्या आहेत. ह्या टिप्स वापरल्यास प्रसूतीनंतरच्या केसगळतीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकेल.

  • प्रसुतिपूर्व व्हिटॅमिन सप्लिमेंट्स गरोदरपणानंतर होण्याऱ्या केस गळती वर नियंत्रण ठेवण्यास खरोखर मदत करू शकतात. जन्मपूर्व जीवनसत्त्वे घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या
  • गरोदरपणानंतर पौष्टिक अन्नपदार्थ खाणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे तुमचे केस देखील निरोगी राहतील
  • केस धुताना किंवा विंचरताना केस हळूवारपणा हाताळा. केसांचा व्हॉल्यूम वाढवणारा शॅम्पू वापरा आणि आवश्यक असेल तेव्हाच केस धुवा. तसेच, केस विचारण्यासाठी मोठ्या दातांचा कंगवा वापरा
  • आपल्या केसांवर थेट उष्णता वापरणे टाळा कारण त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते. ब्लो ड्रायर आणि गरम इस्त्री टाळणे चांगले
  • घट्ट केशरचना टाळा. घट्ट केस बांधल्यामुळे केस ओढले जातात आणि ते मुळापासून तुटतात
  • तणाव टाळा. शांत राहा आणि तुमच्या लहान बाळासोबत वेळ घालवा
  • वाढलेल्या व्हॉल्यूमसह लहान केशरचना करण्याचा प्रयत्न करा

घरगुती उपाय

केस गळणे कमी करण्यासाठी प्रसूतीनंतर केस गळतीसाठी आधी करून बघितलेल्या उपायांची यादी येथे आहे:

घरगुती उपाय

  • लोह, जस्त आणि जीवनसत्त्वे असलेले पदार्थ खा
  • अंड्याचा पांढरा भाग आणि ऑलिव्ह ऑइलने बनवलेला घरगुती हेअर पॅक लावणे हा प्रसूतीनंतरचे केस गळणे कमी करण्यासाठी एक चांगला उपाय आहे
  • मेथी दाणे रात्रभर भिजत ठेवा. गाळलेले पाणी डोक्याला लावा. एक किंवा दोन तास तसेच राहू द्या आणि नंतर धुवून टाका
  • तुमच्या आहारात दह्याचा समावेश करा आणि हेअर मास्क म्हणूनही वापरा त्यात थोडे खोबरेल तेल मिसळा आणि लावा
  • रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि केसांची वाढ वाढवण्यासाठी केस धुण्यापूर्वी केसांना कोमट तेलाने हलक्या हाताने मसाज करा
  • केस मजबूत करण्यासाठी आवळा रस प्या किंवा शुद्ध आवळा तेल लावा
  • नारळाचे दूध केसांना लावल्याने केसगळती कमी होण्यास मदत होते
  • तुमच्या आहारात ड्रायफ्रुट्स आणि फ्लेक्ससीड्सचा समावेश करा. त्यामध्ये ओमेगा ३ मध्ये भरपूर असतात आणि ते केस मजबूत करण्यास मदत करतात

वर सांगितलेले उपाय आणि घरगुती उपचार केल्यास तुम्हाला प्रसूतीनंतरच्या केसगळतीची चिंता राहणार नाही आणि तुम्ही बाळाच्या आगमनाचा आनंद घेऊ शकाल.

स्रोत: Healthline, Today’s Parent

आणखी वाचा:

प्रसूतीनंतर होणारी सांधेदुखी
प्रसूतीनंतर होणारा मूळव्याध

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article