प्रजासत्ताक दिन हा छोट्या मुलांसाठी खूप वेगळा असतो. हवेत छोटा तिरंगा ध्वज फडकताना आणि केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगांचे कपडे घालून त्यांना आनंद होतो. तुमच्या लहान मुलांसाठी प्रजासत्ताक दिन आणखी संस्मरणीय बनविण्याचे काही मार्ग आहेत. जेवण हा कोणत्याही उत्सवाचा एक महत्वाचा भाग असतो आणि तुम्ही खाली दिलेले काही जलद आणि स्वादिष्ट थीमयुक्त पदार्थ बनवू शकता.
रंगीबेरंगी आणि स्वादिष्ट तिरंगी रेसिपी
या प्रजासत्ताकदिनी या स्वादिष्ट तिरंगी रेसिपीद्वारे आपल्या कुटुंबासह प्रजासत्ताक दिन साजरा करा
१. तिरंगी सॅलाड
तुमच्या लहान मुलांनी फळे आणि भाज्या खाऊ घालण्याचा हा एक चतुर मार्ग आहे
फ्रुट सॅलाड
एका प्लेटमध्ये मोसंबीचे काप, केळीचे तुकडे आणि हिरवी द्राक्षे ठेवा. अशाप्रकारे तुमचे ट्रायकलर फ्रुट सॅलाड तयार होईल.
व्हेजिटेबल सॅलाड
केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगासाठी अनुक्रमे गाजरचे तुकडे, किसलेले मुळा आणि वाफवलेला फुलकोबी ठेवा.
२. तिरंगी पेये
संत्र्याचा रस
६ ते ७ मध्यम आकाराची संत्री घ्या, त्यांना सोलून मिक्सरमध्ये घाला. आपण ह्यामध्ये १ टेस्पून लिंबाचा रस घालू शकता. तुम्हाला घट्ट मिश्रण मिळेपर्यंत मिक्सर सुरु ठेवा. मिश्रण गाळा आणि थोडी साखर घाला. त्वरित सर्व्ह करा
लेमोनेड
लिंबू धुवून त्याचे तुकडे करा. या कापांमधील लगदा मिक्सरच्या भांड्यात घाला आणि लिंबाचा रस मिळेपर्यंत मॅश करा. लिंबाचा रस गाळून घ्या आणि लगदा बाहेर टाका. आवश्यकतेनुसार साखर आणि पाणी घालून थंडगार सर्व्ह करा.
किवी ज्यूस
किवी धुवून त्याचा गर काढून घ्या. मिक्सरला पाहिजे तसा हा लगदा, पाणी, साखर आणि मीठ घाला. एक मऊ गर होईपर्यंत मिक्सर वर फिरवा. एका ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घालून सर्व्ह करा.
तुमची तिरंगी पेये तयार आहेत!
3. तिरंगी सँडविच
प्रजासत्ताक दिनी संध्याकाळी स्नॅक म्हणून आपण तिरंगी सँडविच बनवू शकता
साहित्य:
- तपकिरी ब्रेड– ८ काप
- पांढरा ब्रेड– ४ काप
- किसलेले गाजर– १ कप
- किसलेले कॉटेज चीज– १ कप
- हिरवी चटणी ४ टेबल स्पून
- चवीनुसार मीठ
पद्धत:
- प्लेटमध्ये तपकिरी ब्रेडचा एक तुकडा ठेवा
- हिरवी चटणी, कॉटेज चीज चौकोनी तुकडे आणि मीठ घाला
- हिरव्या थराच्या वर पांढर्या ब्रेडचा तुकडा ठेवा
- नारिंगी थर बनविण्यासाठी किसलेल्या गाजर पसरवा
- तिरंगा सँडविच पूर्ण करण्यासाठी तपकिरी ब्रेडचा एक तुकडा ठेवा
- तीन भाग कापून सर्व्ह करावे
४. तिरंगी भात
ही डिश नारंगी, पांढरा आणि हिरवा भात यांचे मिश्रण आहे.
साहित्य:
- १ कप तांदूळ
केशरी भातासाठी:
- छोटा कांदा, चिरलेला– १
- टोमॅटो (प्युरी काढलेले) – २
- लाल तिखट– १ टीस्पून
- गरम मसाला पावडर– १/२ टीस्पून
- तेल –१ टेस्पून
- मोहरी – १/२ टीस्पून
पांढऱ्या भातासाठी:
- तेल – १ टेस्पून
- मोहरी – १/२ टीस्पून
- चणा डाळ – १ टेस्पून
- काळी डाळ (उडीद डाळ) – १ टेस्पून
- किसलेला नारळ – ३ टेस्पून
हिरव्या भातासाठी:
- कोथिंबीर – ४ काड्या
- हिरवी मिरची – १
- काजू – १ टेस्पून
- तेल – १ टेस्पून
- मोहरी – १/२ टीस्पून
- काळी डाळ (उडीद डाळ) – १ टेस्पून
पद्धत:
- प्रथम तांदूळ शिजवा आणि थंड होऊ द्या. शिजवलेला भात थंड झाला की त्याची संपूर्ण मात्रा अनुक्रमे केशरी, पांढर्या आणि हिरव्या भागासाठी तीन भागात विभागून घ्या.
केशरी भात:
- कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला. ती चांगली तडतडू द्या
- त्यामध्ये चिरलेला कांदा घाला आणि दोन मिनिटे शिजवा
- टोमॅटो प्युरी, तिखट, गरम मसाला पावडर आणि मीठ घाला
- मसाल्यापासून तेल वेगळे होईपर्यंत शिजवा
- १/३ शिजवलेला तांदूळ घ्या आणि तो कढई मध्ये घाला. भाताला हे मिश्रण लागेपर्यंत परतून घ्या
- एकदा सर्वकाही व्यवस्थित शिजल्यावर स्टोव्ह बंद करा आणि प्लेटमध्ये हस्तांतरित करा
पांढरा भात:
- तेल गरम करून त्यात मोहरी घालून ती तडतडू द्या
- त्यामध्ये चणा डाळ आणि उडीद डाळ घालून तांबूस होईस्तोवर तळावे
- किसलेले नारळ घालून १ मिनिट भाजून घ्या
- १/३ शिजवलेला तांदूळ घालून नीट मिक्स करून घ्या
- हा भात केशरी भागाच्या खाली प्लेटवर ठेवा
हिरवा भात:
- कोथिंबीर, काजू आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये घाला आणि थोडे पाणी घालून त्याची चांगली पेस्ट होईपर्यंत मिक्सर मध्ये बारीक करून घ्या
- एका कढईत तेल गरम करून मोहरीचे दाणे तडतडू द्या
- उडीद डाळ तळून घ्या आणि नंतर त्यामध्ये हिरवी पेस्ट घाला
- कच्चा वास जाईपर्यंत हे मिश्रण शिजवा
- मीठ आणि उरलेला शिजवलेला भात घाला. चांगले मिक्स करून स्टोव्हमधून काढा
- हिरव्या भाताला पांढर्या थराच्या खाली ठेवा आणि करी सोबत सर्व्ह करा
५. तिरंगी इडली
ह्या लहान, छोट्या आणि रंगीबेरंगी इडल्या खरोखरच खूप छान दिसतात.
साहित्य:
- आवश्यकतेनुसार इडली पीठ
केशरी पिठासाठी:
- टोमॅटो– १
- लाल मिरच्या – २
हिरव्या पिठासाठी:
- पुदीना पाने – १ कप
- हिरवी मिरची – १
- जिरे (जीरा) – १/४ टीस्पून
पद्धत:
- इडली पिठ घेऊन ते तीन समान भागामध्ये विभाजित करा. पांढऱ्या इडलीसाठी एक भाग बाजूला ठेवा
केशरी इडल्या:
- टोमॅटो चिरून घ्या
- कढई घ्या आणि टोमॅटो आणि लाल मिरच्या शिजवून घ्या जेणेकरून कच्चा वास निघून जाईल
- मिश्रण थंड होऊ द्या. आणि त्याची मऊ पेस्ट करा
- केशरी रंगाच्या इडलीसाठी पिठाच्या दुसऱ्या भागात हे मिश्रण मिसळा
हिरव्या इडल्या:
- पुदिन्याची पाने चिरून घ्या
- कढई घ्या आणि पुदिन्याची पाने आणि हिरवी मिरची दोन मिनिटे शिजवा
- हे मिश्रण थंड होऊ द्या आणि नंतर त्याची मऊ पेस्ट तयार करा
- हिरव्या रंगाच्या इडलीसाठी पिठाच्या तिसर्या भागात ही पेस्ट मिसळा
६. तिरंगी ढोकळा
नेहमीच्या पिवळ्या ढोकळ्याऐवजी ह्या प्रजासत्ताक दिनी हा तिरंगा ढोकळा करून पहा!
साहित्य:
- इडली पिठ – ३ कप
- पालक पुरी– १/४ कप
- हिरवी मिरची– १
- आले, लहान – १
- गन पावडर – १ टेस्पून
- काश्मिरी लाल तिखट – १/४ टीस्पून
- किसलेला नारळ – २ टेस्पून
- कोथिंबीर सजवण्यासाठी
पद्धत:
- पिठाचे तीन रंगांसाठी तीन भाग करा
- हिरव्या पिठासाठी पालक प्युरी आणि आले–हिरवी मिरची पेस्ट घाला
- पांढरे पीठ आहे तसे राहू द्या
- उर्वरित भागावर केशरी पिठ तयार करण्यासाठी गन पावडर आणि मिरची पूड घाला
- हिरवे पीठ तेल लावलेल्या भांड्यात घालून चांगले वाफवून घ्या
- एकदा ते पूर्ण झाल्यावर हिरव्या थरावर एक कप पांढरे पिठ घाला आणि वाफ काढा
- केशरी पिठासाठी सुद्धा असेच करा
- आता काढून घ्या आणि थंड होऊ द्या
- आपल्या मुलाला आवडणाऱ्या कोणत्याही आकारात तिरंगा ढोकळा कापून घ्या
- कोथिंबीर आणि नारळ घालून सजवा
- हिरव्या किंवा गोड चटणीबरोबर सर्व्ह करा
७. तिरंगी रसगुल्ला
तिरंगी रसगुल्ल्यासह दिवसाचा शेवट गोड करा.
साहित्य:
- दूध – ४ कप
- पांढरा व्हिनेगर – १ टेस्पून
- साखर – १/२ कप
- पाणी – ३कप
- व्हॅनिला किंवा गुलाब सार – काही थेंब
- हिरवे आणि केशरी फूड कलर– काही थेंब
पद्धत:
- एक जाड तळ असलेला पॅन घ्या आणि दूध घाला. जेव्हा ते उकळण्यास सुरुवात होते तेव्हा ज्योत कमी करा आणि व्हिनेगर घाला
- दुधाचे दही होऊन दुधाचा घट्ट भाग वेगळा होईपर्यंत चांगले ढवळा
- मलमल कापड किंवा गाळण्याने गाळून घ्या
- दुधाच्या घट्ट भागावर (चेन्ना) थंड पाणी घाला म्हणजे व्हिनेगरचा वास निघून जाईल
- आता त्यातून सगळे पाणी काढून टाका
- आता दुधाचा घट्ट भाग गुळगुळीत होईस्तोवर चांगला मळून घ्या. यास १० मिनिटे लागू शकतात
- आता ह्या मळलेल्या दुधाच्या घट्ट भागाचे तीन भाग करा आणि त्यामध्ये अनुक्रमे केशरी आणि हिरवा रंग घाला
- प्रत्येक भाग घ्या आणि लहान, समान आकाराचे गोळे बनवा
- एका जाड बुडाच्या कढईमध्ये साखर आणि पाणी गरम करून ते उकळण्यास सुरुवात झाल्यावर त्यात हे गोळे घाला
- कढई झाकून ठेवा आणि १०–१५ मिनिटे शिजवा
- ज्योत बंद करा आणि तिरंगा रसगुल्ला थंड होऊ द्या
- सर्व्ह करा
तर, २६ जानेवारी – प्रजासत्ताक दिनासाठी ह्या काही सोप्या आणि झटपट तिरंगा रेसिपी होत्या. तुम्ही तुमच्या छोट्या मुलाला ह्या डिशेश करताना छोटी छोटी कामे सांगू शकता. त्यांच्यासाठी हा एक मजेदार अनुभव बनवा आणि कुणास ठाऊक तुमच्या घरात दर प्रजासत्ताक दिनी असे पदार्थ करण्याची प्रथा पडून जाईल!