Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home तुमच्या मुलाला नुकसान पोहचवू शकतील असे सनस्क्रीन मधील १० सामान्य घटक

तुमच्या मुलाला नुकसान पोहचवू शकतील असे सनस्क्रीन मधील १० सामान्य घटक

तुमच्या मुलाला नुकसान पोहचवू शकतील असे सनस्क्रीन मधील १० सामान्य घटक

आपल्याला आपले पालक आणि ज्येष्ठ मंडळी कायम सांगत आली आहेत की, कोणतीही गोष्ट अति प्रमाणात चांगली नसते, अगदी सूर्यप्रकाश देखील जास्त प्रमाणात चांगला नसतो. घराबाहेर असताना, तुम्हाला तुमच्या छोट्या मुलाच्या कोमल त्वचेचे सूर्याच्या हानिकारक अतिनील (अल्ट्राव्हायोलेट) किरणांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. परंतु, तुम्ही वापरत असलेल्या सनस्क्रीनमध्ये संभाव्यत: विषारी रसायने नाहीत याची तपासणी करा ज्यामुळे त्वचेच्या अलेर्जीपासून ते अगदी कर्करोगापर्यंत अनेक विकार होऊ शकतात.

सनस्क्रीन चे ढोबळमानाने २ प्रकार असतात खनिज आणि रासायनिक. खनिज सनस्क्रीन सूर्याच्या हानिकारक किरणांना अवरोधित करून किंवा प्रतिबिंबित करून त्वचेचे संरक्षण करतात. दुसरीकडे, रासायनिक सनस्क्रीन त्वचेमध्ये शोषून घेतले जातात आणि अतिनील किरणांना शोषून घेतात ज्यामुळे सखोल थरांचे संरक्षण होते. तथापि, ब्रॅण्ड निवडताना सनस्क्रीनचे फायदे घेण्यासाठी खालील १० संशयास्पद घटक असलेले सनस्क्रीन टाळा आणि संभाव्य हानिकारक दुष्परिणाम टाळा.

सनस्क्रीनमधील धोकादायक घटक जे आपण टाळले पाहिजे

. ऑक्सीबेन्झोन

रासायनिक सनस्क्रीनमध्ये हा सामान्य घटक आपल्या शरीरात वेगाने जमा होतो. जेव्हा तुमच्या मुलाच्या त्वचेद्वारे ऑक्सीबेन्झोन शोषला जातो तेव्हा ऍलर्जिक प्रतिक्रिया निर्माण होऊन इसबचा त्रास होऊ शकतो. ऑक्सिबेन्झोनमुळे आपल्या मुलाची हार्मोन्स आणि अंतःस्रावी प्रणालीसुद्धा विस्कळीत होते असा तज्ञांना संशय आहे.

. ऑक्टिनोक्सेट

आणखी एक सामान्यतः आढळणारा म्हणजे रासायनिक ऑक्टिनोक्सेट. सनस्क्रीन मधील हा घटक मुक्त रॅडिकल्स तयार करतो ज्यामुळे त्वचेला आणि पेशींना दीर्घकालीन नुकसान होऊ शकते. ह्या घटकामुळे तुमच्या मुलाचे हार्मोनल संतुलन बिघडते असाही विश्वास आहे.

. सिनोकॅसेट

सनस्क्रीनमधील ह्या सक्रिय घटकामुळे त्वचेवर पुरळ उठतात आणि इतर गंभीर प्रतिक्रिया जसे की चेहरा / जीभ / घसा ह्यांना सूज येणे, तीव्र चक्कर येणे आणि श्वासोच्छवासाच्या समस्या उद्भवू शकतात.

. रेटिनिल पॅलमेट (व्हिटॅमिन ए पाल्मेट)

सनस्क्रीनमधील हा सक्रिय घटक सूर्याच्या अतिनील किरणांच्या संपर्कात आल्यावर त्याचे विघटन होते आणि विध्वंसक मुक्त विषारी रॅडिकल्स तयार होतात. यामुळे डीएनएचे नुकसान होते आणि त्वचेचे ट्यूमर आणि कर्करोग देखील होऊ शकतो.

. होमोसोलेट

हे अतिनीलशोषक विषारी सनस्क्रीन घटक आहेत जे आपल्या शरीरात जमा होतात आणि कालांतराने विषारी बनतात. जेव्हा दीर्घ कालावधीसाठी संपर्क येतो तेव्हा ते संप्रेरकांमध्ये व्यत्यय आणू शकतात

. पराबेन संरक्षक

सनस्क्रीनमध्ये हे सामान्य विषारी रसायनामुळे सौम्य आणि तीव्र दोन्ही दुष्परिणाम होऊ शकतात. जसे की ऍलर्जिक प्रतिक्रिया, संप्रेरकांमध्ये व्यत्यय, विकासात्मक आणि पुनरुत्पादक विषबाधा इत्यादी. सनस्क्रीनमधील काही हानिकारक घटक आहेत जे आपल्याला काटेकोरपणे टाळणे आवश्यक आहे.

. ऑक्टोक्रायलीन

हे रसायन सहजपणे शरीरात शोषून टिकवून ठेवले जाते. हे केमिकल जेव्हा अतिनील प्रकाशाच्या संपर्कात येते तेव्हा ते विशेषतः हानिकारक असते. हे ऑक्सिजन रॅडिकल तयार करते जे केवळ मानवी पेशींना नुकसान पोहोचवू शकत नाही आणि उत्परिवर्तन (mutation) होऊ शकते. तसे ते पर्यावरणासाठी देखील विषारी आहे

. नॅनोप्रार्टिकल्स (झिंक डाय ऑक्साईड / टायटॅनियम डायऑक्साइड)

स्प्रेच्या रूपात सनस्क्रीनद्वारे श्वास घेताना हे फुप्फुसांमध्ये गेल्यास धोकादायक असू शकते. तुमच्या मुलाच्या फुफ्फुसांना लहान कण साफ करण्यास अडचण येते, म्हणूनच ते फुफ्फुसातून रक्तप्रवाहात जाऊ शकते. त्वचेच्या किंवा फुफ्फुसाच्या ऊतींमध्ये प्रवेश करणार्‍या विद्रव्य नॅनो पार्टिकल्समुळे अवयवांचे खूप नुकसान होऊ शकते.

. मेथिलिसोथियाझोलिनोन (एमआय)

सनस्क्रीनमध्ये वापरला जाणारा सामान्य रासायनिक संरक्षक एक प्रभावी ऍलर्जिक घटक आहे आणि यामुळे मुलांमध्ये त्वचेची तीव्र ऍलर्जी होऊ शकते. नक्कीच, सनस्क्रीन मधील सर्वात चिंताजनक घटकांपैकी हा एक घटक आहे आणि तो टाळला पाहिजे.

१०. सुवास

काही सनस्क्रीनमध्ये वापरल्या जाणार्‍या सिंथेटिक सुगंधात हानिकारक रसायने असतात ज्यामुळे आपल्या मुलाची संप्रेरक प्रणाली विस्कळीत होऊ शकते. सनस्क्रीनमधील हे खराब घटक आहेत ज्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतात.

हे सगळं भितीदायक वाटते! एक जागरूक आई म्हणून, हर्बल सनस्क्रीन निवडण्याचा प्रयत्न करा ज्यात या हानिकारक रसायने नाहीत. तसेच, उन्हात असताना आपल्या मुलाने टोपी आणि संपूर्ण बाह्यांचे कपडे घातले असल्याचे सुनिश्चित करा. त्वचेचे संरक्षण आणि पोषण करणारे अँटीऑक्सिडंट्स असलेल्या उच्च आहाराची निवड करा.फळं आणि भाज्या ह्यांचा आहारात समावेश करा.

आणखी वाचा: बाळांना उष्णतेमुळे उठणारे पुरळ

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article