In this Article
- गर्भधारणा होण्यासाठी लैंगिक स्थितीचा सहभाग असतो का?
- गर्भधारणा होण्यासाठी उत्कटता (ऑरगॅझम) जरुरी आहे का?
- गर्भधारणेसाठी सर्वोत्तम लैंगिक स्थिती
- लवकर गर्भधारणेस मदत व्हावी म्हणून काही टिप्स
- संभोगानंतर पडून राहिल्याने तुमची गर्भधारणेची शक्यता वाढते का?
- गर्भधारणेसाठी योग्य वेळ कोणती?
- तुम्ही वैद्यकीय मदत केव्हा घेतली पाहिजे?
जर तुम्ही गर्भधारणेचा प्रयत्न करत असाल तर गर्भधारणेची प्रक्रिया जलद होण्यासाठी तुम्हाला सगळे प्रयत्न करावेसे वाटतात. काही लोकांचा असा विश्वास आहे की शारीरिक संबंधांच्या वेळेला विशिष्ट स्थिती मध्ये संभोग केल्यास गर्भधारणा लवकर होते. बाळ होण्यासाठी काही लैंगिक स्थिती तुम्हाला आम्ही सांगत आहोत त्या तुम्ही करून बघू शकता.
गर्भधारणा होण्यासाठी लैंगिक स्थितीचा सहभाग असतो का?
काही विशिष्ट लैंगिक स्थिती ह्या इतर स्थितींपेक्षा गर्भधारणा होण्यासाठी चांगल्या असतात ह्याला काहीच पुरावा नाही, परंतु पूर्वीपासून अशा बऱ्याच जुन्या समजुती आहेत https://oesterreichischeapotheke.com.
गर्भधारणा होण्यासाठी स्खलनानंतर पुरुषाचा शुक्रजंतू स्त्रीच्या गर्भाशयाच्या मुखाच्या जितका जवळ सोडला जाईल तितके चांगले. म्हणून ज्या जोडप्यांना गर्भधारणा होणे अपेक्षित आहे अशा जोडप्यांनी ज्या लैंगिक स्थिती मध्ये पुरुषाचे शुक्राणू गर्भाशयाच्या मुखाच्या जास्तीत जास्त जवळ सोडले जात नाहीत अशा लैंगिक स्थिती टाळायला हव्यात.
गर्भधारणा होण्यासाठी उत्कटता (ऑरगॅझम) जरुरी आहे का?
भावनोत्कटता म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांसाठी एक अतिव आनंदाची भावना आहे. काही जण त्याचे वर्णन झिणझिण्या आल्यासारखे वाटते असे करतात, तर काही जण त्याचे वर्णन सर्वोच्च भावना असे करतात. पुरुषांमध्ये ह्या उत्कटतेच्या क्षणी शक्रजंतूंचे स्खलन होते, तर स्त्रियांच्या योनिमार्गाच्या भित्तिका ओलसर होतात, योनिलिंग (क्लिटोरिस) फुगीर होते, ऊर्जा मुक्त होते आणि ताण तयार होतो.
भावनोत्कटतेशिवाय सुद्धा स्त्रीला गर्भधारणा राहू शकते, फक्त त्यासाठी शुक्रजंतूचा प्रवेश योनीमार्गात झाला पाहिजे एवढी एकच अट असते. उत्कटतेशिवाय सुद्धा पुरुष स्त्रीच्या योनीमार्गात स्खलन करू शकतो.
बऱ्याच स्त्रिया संभ्रमात पडतात की ऑरगॅझममुळे गर्भधारणा होणे सोपे जाते का? तर ह्याचे उत्तर नाही असे आहे. ऑरगॅझममुळे स्त्रीला आरामदायक वाटते आणि ती लैंगिक सुखाचा आनंद घेऊ शकते, ऑरगॅझममुळे गर्भाशयात होणाऱ्या हलक्या संकुचनामुळे शुक्रजंतूंचे योनीमार्गातून वहन सुलभ होण्यास मदत होते. परंतु ही आकुंचने ऑरगॅझम शिवाय सुद्धा होतात त्यामुळे स्त्रीला गर्भधारणेसाठी ऑरगॅझमची गरज असतेच असे नाही.
गर्भधारणेसाठी सर्वोत्तम लैंगिक स्थिती
गर्भधारणेसाठी काही विशिष्ठ लैंगिक स्थिती अस्तित्वात आहेत का ह्याविषयी अजूनही वाद आहे. परंतु शास्त्रीयदृष्टया ते सिद्ध झालेले नसल्याने तुम्ही फक्त गर्भधारणेसाठी वेगवेगळ्या लैंगिक स्थिती करून बघू शकता. खाली काही लैंगिक स्थिती दिल्या आहेत त्या तुम्ही करून बघू शकता:
१. मिशनरी स्थिती
मिशनरी स्थिती ही सर्वात प्रसिद्ध आणि गर्भधारणेसाठी सर्वसामान्यपणे वापरली जाणारी स्थिती आहे. असं म्हटले जाते की जगातील बरीच बाळे ह्या लैंगिक स्थितीमुळे जन्माला आली आहेत. ह्या स्थिती मध्ये स्त्री तिच्या पाठीवर झोपते आणि पुरुष वर असतो. शुक्रजंतूंना गर्भाशयाच्या मुखाजवळ सहज पोहोचता येते आणि तुमची गर्भधारणेची शक्यता वाढते.
२. ग्लोइंग ट्रायंगल स्थिती
ही लैंगिक स्थिती ही बरीचशी मिशनरी स्थिती सारखीच असते फक्त त्यात थोडा बदल असतो. जरी ह्या स्थितीत स्त्री खाली आणि पुरुष वर असे असले तरी, पुरुष त्याच्या दोन्ही हातापायांवर ओणवा होतो. स्त्रीचा श्रोणीचा थोडा वर उचलला जातो, आणि स्त्रीचे पाय तिच्या जोडीदाराभोवती गुंडाळले जातात. स्त्रीच्या श्रोणीचा भाग वर उचलला गेल्यामुळे, खोल प्रवेश होतो आणि गर्भधारणेची शक्यता वाढते.
३. डॉगी स्थिती
ह्या स्थितीमध्ये गर्भधारणेची शक्यता वाढते कारण ह्या स्थितीमध्ये खोल प्रवेश होतो. ह्या स्थिती मध्ये दोघांना दोन्ही हातावर ओणवे होण्याची गरज असते. पुरुषाच्या जननेंद्रियाचा योनीमार्गात मागून प्रवेश होतो. ह्या स्थितीमुळे गर्भाशयाचे मुख उघडते आणि ह्या स्थितीमुळे शुक्रजंतूला स्त्रीबीजाचे फलन करणे सोपे जाते.
४. मॅजिक माऊंटन स्थिती
ही स्थिती डॉगी स्थितीसारखीच असते. ह्या स्थितीमध्ये पुरुष स्त्रीच्या पाठीवर अशापद्धतीने ओणवा होतो की स्त्रीची पाठ पुरुषाच्या छातीला लागते. चांगल्या संतुलनासाठी आणि आधारासाठी स्त्री तिच्या शरीराच्या वरच्या भागासाठी उशीचा वापर करते. मॅजिक माऊंटन स्थितीमध्ये शुक्रजंतूंचा खोलवर प्रवेश होतो आणि शुक्रजंतूंचे वहन जलद होते. ऑरगॅझमसाठी ही स्थिती परिणामकारक असते.
५. अन्विल स्थिती
ही स्थिती मिशनरी स्थितीचाच प्रकार आहे. ह्या स्थितीत, स्त्रीला तिचे पाय तिच्या डोक्याच्या वर घ्यावे लागतात. ह्या स्थितीमध्ये गर्भधारणेची शक्यता चांगली असते कारण खोल प्रवेश होतो. वर केलेल्या पायांमुळे स्त्रीच्या जी स्पॉटला सुद्धा उत्तेजना मिळते.
६. प्लाऊ स्थिती
ह्या स्थितीमध्ये गर्भधारणेची खूप शक्यता तर असतेच परंतु ह्या स्थिती मुळे तुमच्या लैंगिक आयुष्यात झिंग येते. ह्या स्थितीमध्ये स्त्री छोट्याशा ढकलगाडी सारखी पालथी पडून शरीराचा भार शरीराच्या पुढच्या भागावर पेलते आणि तिचे हवेतील पाय तिचा साथीदार धरून मागून प्रवेश करतो. गुरुत्वाकर्षणामुळे शुक्रजंतूंचा गर्भाशयाच्या मुखातून खोलवर प्रवेश होतो.
७. स्पुनिंग स्थिती
ही खूपच रोमँटिक आणि परिणामकारक स्थिती आहे ज्यामध्ये स्त्री कुशीवर झोपते आणि पुरुष मागून प्रवेश करतो. ह्या स्थितीमध्ये स्त्रीच्या गर्भाशयाचे मुख ९० डिग्रीच्या कोनात असते आणि त्यामुळे शुक्रजंतूंना गर्भाशयाच्या मुखातून सहज प्रवेश करता येतो.
८. स्प्लिटिंग बांबू स्थिती
ही स्थिती खूप साहसी असून त्यामुळे दोघांनाही लैंगिक समाधान मिळते आणि गर्भधारणेची शक्यता सुद्धा वाढते. ह्या प्रसिद्ध कामसूत्र स्थितीमध्ये स्त्री तिचा एक पाय वर करून जोडीदाराच्या खांद्यावर टाकते. पुरुष आधारासाठी तिचा पाय वापरून स्त्रीच्या मांडीवर टेकतो.
९. बटरफ्लाय स्थिती
थोडंसं साहस आणि उत्साह वाढवण्यासाठी ही स्थिती करून बघा. बटरफ्लाय स्थितीमध्ये स्त्री टेबलवर पाठीवर झोपते आणि तिचा साथीदार प्रवेश करण्याआधी तिचे कुल्ले वर उचलून धरतो. बाळ होण्यासाठी ही सर्वोत्तम आणि परिणामकारक स्थिती आहे त्यामुळे शुक्रजंतू स्त्रीच्या योनीमार्गात जास्त वेळ राहतात.
१०. युनिअन ऑफ द वूल्फ
ह्या लैंगिक स्थितीसाठी स्त्रीला तिच्या जोडीदाराकडे पाठ करून उभे राहावे लागते. पुरुष तिच्या कमरेला धरतो, आणि मागून प्रवेश करतो. शुक्रजंतूंना गर्भाशयाच्या मुखापर्यंत पोहोचता यावे म्हणून स्त्री खाली वाकते. ह्या स्थितीमुळे गर्भधारणा लवकर होते.
११. स्फिंक्स स्थिती
ह्या लैंगिक स्थितीमध्ये स्त्री पोटावर झोपते. आणि एक पाय सरळ आणि एक वाकवला जातो. पुरुष मागून पाय फाकवून उभा राहतो आणि स्वतःचे वजन हातांवर पेलतो. गर्भधारणेसाठी ही स्थिती उत्तम आहे कारण ह्या स्थितीमध्ये नीट प्रवेश होतो.
१२. पेग स्थिती
ह्या स्थितीत पुरुष पाठीवर खाली झोपतो आणि स्त्री वर असते. ह्या स्थितीमुळे स्त्रीला ऑरगॅझम मिळतो तसेच गर्भधारणा होते. पेग स्थिती जेव्हा पुरुष जास्त वजनाचे असतात त्या स्त्रियांसाठी योग्य आहे.
१३. रिवर्स काऊगर्ल स्थिती
ही अजून एक स्थिती आहे जिच्यामध्ये स्त्री वरती असते. ही स्थिती ज्या जोडप्यांना बाळ हवे आहे अशा जोडप्यांसाठी उत्तम आहे. त्यामध्ये पुरुष जमिनीवर झोपतो आणि स्त्री त्याच्या पायाकडे तोंड करून त्याच्या अंगावर बसते. स्त्री प्रवेश किती खोलवर होऊ द्यायचा हे प्रतिबंधित करू शकते.
लवकर गर्भधारणेस मदत व्हावी म्हणून काही टिप्स
वरील लैंगिक स्थितंव्यतिरिक्त काही टिप्स आहेत ज्यामुळे तुम्हाला लवकर गर्भधारणा होण्यास मदत होईल.
- मद्यपानापासून दूर राहा कारण त्यामुळे ओव्यूलेशन, मासिक पाळी चक्र आणि हॉर्मोनवर परिणाम होतात आणि गर्भधारणा होणे अवघड होते.
- खूप चहा किंवा कॉफी प्यायल्यास प्रजननावर परिणाम होतो आणि गर्भधारणेत अडथळे येतात.
- धुम्रपानापासून दूर रहा, त्यामुळे वंध्यत्वाची शक्यता असते आणि जनुकीय व्यंग असलेली स्त्रीबीजे तयार होण्याची शक्यता असते.
- तुमचे शरीर आणि मन निरोगी ठेवा त्यामुळे गर्भधारणेची जास्त शक्यता असते.
- बीएमआय स्केलवर वजन जास्त किंवा कमी असेल तर तुमच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.
संभोगानंतर पडून राहिल्याने तुमची गर्भधारणेची शक्यता वाढते का?
शारीरिक संबंधांनंतर पडून राहिल्यानं वीर्य गर्भाशयाच्या मुखाच्या आसपास तसेच राहते. जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत असाल तर संभोगानंतर कुल्ले उंचावर ठेवून १० मिनिटे पडून रहा, त्यामुळे शुक्रजंतूंचे स्त्रीबीजाकडे वहन होण्यास मदत होईल. असे केल्याने तुम्हाला गर्भधारणा होईलच ह्याची गॅरंटी नाही परंतु प्रयत्न करायला काय हरकत आहे? पण तुमच्या डॉक्टरांनी शारीरिक संबंधांनंतर आरामात रहायला सांगितले असेल तर असे करू नका.
गर्भधारणेसाठी योग्य वेळ कोणती?
लगेच गर्भधारणा होणे सोपे नाही, त्यासाठी तुम्हाला योग्य वेळी शारीरिक संबंध ठेवले पाहिजेत. गर्भधारणेसाठी योग्य वेळ किंवा प्रजनन काळ हा महिन्यातील सहा दिवसांचा असतो. ह्या सहा दिवसांमध्ये ओव्यूलेशनचा दिवस आणि त्यापुढच्या ५ दिवसांचा समावेश होतो. ओव्यूलेशनच्या दिवशी सोडलेले अंडे फक्त २४ तासांसाठी जिवंत राहते, परंतु शुक्रजंतू योनीमार्गात जास्तीत जास्त ७ दिवस राहू शकतो. म्हणून, शुक्रजंतूंना स्त्रीबीजांची वाट पाहण्यास आणि फलनास ६ दिवसांचा कालावधी असतो.
मासिक पाळी किती दिवसांची आहे ह्याची पर्वा न करता, ओव्यूलेशन तुमच्या मासिक पाळी चक्राच्या १४ दिवस आधी होते.
ओव्यूलेशनच्या आधी एक किंवा दोन दिवस आधी जर तुमचे शारीरिक संबंध आले तर तुमची गर्भधारणेची जास्त शक्यता असते. ओव्यूलेशनच्या तारखेचा अचूक अंदाज लावणे सोपे नसले तरी, दर २-३ दिवसांनी प्रणयाचा आनंद घेणे चांगले.
तुम्ही वैद्यकीय मदत केव्हा घेतली पाहिजे?
जर तुम्ही वरील लैंगिक स्थितीचा योग्य वेळेला आनंद घेतला तर तुम्हाला लवकरच गोड़ बातमी मिळेल. त्यासाठी किती काळ वाट पाहावी लागेल हे तुमच्या वयावर अवलंबुन असेल. तुम्ही खालील परिस्थिती डॉक्टरकडे जा:
- तुमचे वय जर ३५ पेक्षा कमी असेल आणि गर्भधारणेसाठी १ वर्षांपेक्षा जास्त काळ प्रयत्न करत असाल.
- तुमचे वय हार ३५ पेक्षा जास्त असेल आणि तुम्ही ६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी गर्भारपणासाठी प्रयत्न करत असाल.
जर तुम्हाला खालीलपैकी कुठलीही लक्षणे दिसली तर तात्काळ वैद्यकीय मदत घ्या.
- अनियमित पाळी
- पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीज
- एंडोमेट्रोसिस
- गर्भपाताचा इतिहास असणे
- हर्निया सर्जरी किंवा अंडाशयाची समस्या (तुमच्या पुरुष लैंगिक जोडीदाराच्या)
बाळाची चाहूल लागण्याच्या मोठ्या आनंदाची वाट प्रत्येक जोडपं बघत असते. जरी कुठलीही खात्री नसली तरी गर्भधारणेची शक्यता वाढण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या लैंगिक स्थिती करून बघू शकता. कुटुंबाची सुरुवात करण्याआधी तुम्ही तुमच्या संपूर्ण आरोग्याची तपासणी करावी असा सल्ला आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ.