Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे गर्भधारणा: १७वा आठवडा

गर्भधारणा: १७वा आठवडा

गर्भधारणा: १७वा आठवडा

तुम्ही लवकरच आई होणार आहात हे गर्भारपणाच्या १७ व्या आठवड्यात सुनिश्चित होते. तुम्ही आता गर्भारपणाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये आहात. येणाऱ्या पुढच्या काही आठवड्यांमध्ये तुमच्या शरीरामध्ये आणि बाळामध्ये बदल होतील.

तुमचा मॉर्निंग सिकनेसचा त्रास आणि मळमळ आतापर्यंत कमी झालेली असणार आहे. तुम्हाला आता कमी थकल्यासारखे वाटणार आहे. तुमचे गर्भाशय आता विस्तारित झाले आहे आणि इथून पुढेही विस्तारित होणार आहे. तुम्हाला इथून पुढे कदाचित अपचनाचा त्रास होण्याची शक्यता आहे.

गर्भारपणाच्या १७व्या आठवड्यातील तुमचे बाळ

ह्या आठवड्यात तुमच्या जन्माला येणाऱ्या बाळाने गिळण्याची आणि चोखण्याचे कौशल्य आत्मसात केले आहे, ही खरंतर स्तनपानाची पूर्वतयारी आहे. तुमच्या बाळाच्या  शरीराने चरबी तयार करण्यास सुरुवात केली आहे, जन्माच्या वेळेपर्यंत ती  परिपक्व होते. तसेच बाळाच्या हृदयाचे ठोके आता विस्कळीत नाहीत आणि आता ते प्रत्येक मिनिटाला १५० इतके पडत आहेत. बाळाचा  मेंदू आता ते नियंत्रित करीत असतो.

गर्भारपणाच्या १७व्या आठवड्यातील तुमचे बाळ

 

१७ व्या आठवड्यातील अजून एक महत्वाचा विकास म्हणजे बाळाच्या बोटांचे ठसे विकसित होणे. तसेच १७व्या आठवड्याच्या शेवटी “Vernix” नावाच्या पांढऱ्या द्रव्याने बाळाची त्वचा आच्छादित केली जाते.

बाळाचा आकार केवढा असतो?

तुमच्या बाळाचा आकार हा आता बीटा एवढा असतो. गर्भारपणातील १७ व्या आठवड्यातील बाळाचे वजन साधारणपणे १५०-१७५ ग्रॅम्स इतके असते आणि लांबी ५-६ इंच इतकी असते किंबहुना तुमच्या बाळाची मागच्या आठवड्यापासून वेगाने वाढत आहे आणि पुढच्या काही आठवड्यांमध्ये सुद्धा बाळाची वेगाने वाढ होत राहणार आहे. आता तुमच्या बाळाचा आकार तुमच्या हातात मावेल एवढा झाला आहे.

तुम्हाला हे समजल्यावर आनंद होईल की मऊ कूर्चेच्या स्वरूपात (soft cartilage ) असलेला तुमच्या बाळाचा हाडांचा सांगाडा (skeleton) हळू हळू , मजबूत हाडांमध्ये विकसित होईल. तुमच्या बाळाच्या शरीरावर चरबी तयार होऊलागेल.

शरीरात होणारे बदल

गर्भारपणाच्या १७ व्या आठवड्यात बाळाच्या शरीरात होणाऱ्या बदलांबरोबरच तुमच्याही शरीरात बदल झालेले तुम्हाला आढळतील. तुम्हाला आता मॉर्निंग सिकनेस आणि मळमळ कमी झाल्यामुळे बरे वाटू लागेल. तसेच तुम्हाला शारीरिक थकवा कमी प्रमाणात जाणवेल.

सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या पोटात हालचाल जाणवू लागेल. पण ती अगदी थोड्या प्रमाणात असेल, अर्थातच येणाऱ्या काही प्रमाणात हे बदलणार आहे.

१७व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

जर तुम्हाला वाटत असेल की आधीच्या आठवड्यांपेक्षा गर्भारपणाच्या १७व्या आठवड्याचे काय वेगळेपण आहे, तर ते जाणून घेण्यासाठी खाली वाचा.

  • तुमचे शरीर बाळाला सामावून घेण्यासाठी अथक परिश्रम करत असते त्यामुळे तुम्हाला अपचन, जळजळ होऊ शकते आणि त्यामुळे अस्वस्थता जाणवू शकते.
  • बद्धकोष्ठता आणि गॅसेस होण्याचे प्रमाण सुद्धा गर्भारपणाच्या १७ व्या वाढेल.
  • संप्रेरकांमधील बदलांमुळे मनःस्थितीत बदल अपेक्षित आहेत.
  • संप्रेरकांच्या पातळीतील बदलांमुळे त्वचेवर रंगद्रव्ये दिसतात. हे १७ व्या आठवड्याच्या सुरुवातीस दिसून येते.
  • तुमच्या बाळाचे वजन वाढत असल्यामुळे तुम्हाला पायांमध्ये मज्जातंतूच्या वेदना जाणवू शकतील,

गर्भधारणेच्या १७व्या आठवड्यात पोटाचा आकार

तुमच्या पोटावरून आता तुम्ही गरोदर आहेत हे कळेल. सर्वात महत्वाचे म्हणजे काही स्ट्रेच मार्क्स, तसेच तुमच्या पोटाभोवती रक्तवाहिन्या दिसू लागतील.

गर्भधारणेच्या १७व्या आठवड्यात पोटाचा आकार

 

बाळाची वाढ होत असल्याने बऱ्याच स्त्रियांचे वजन वाढण्यास सुरुवात होते. मॉर्निंग सिकनेस कमी झाल्यामुळे पुन्हा भूक पूर्ववत होते आणि त्यामुळे सुद्धा वजनात वाढ झालेली दिसून येते.

गर्भधारणेच्या १७व्या आठवड्यातील सोनोग्राफी

गर्भधारणेच्या १७व्या आठवड्यातील सोनोग्राफी

 

तुमच्यापैकी बऱ्याच जणींना  डॉक्टर्स सोनोग्राफी करायला सांगणार नाहीत, कारण विशेष काही बदल घडलेला नसतो. काही विशेष प्रकरणांमध्ये तुम्हाला स्कॅन करायला सांगितला जाऊ शकतो, पण तुम्हाला खूप काळजी करण्याचे कारण नाही.

बाळाचे हृदयाचे ठोके व्यवस्थित पडत आहेत आणि बाळाच्या  चेहऱ्यावरची वैशिष्ट्ये जसे की नाक, डोळे ठळक दिसू लागतील. सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या बाळाची रोगप्रतिकारक प्रणाली व्यवस्थित कार्यरत आहे आणि बऱ्याच रोगांपासून बाळाचे रक्षण करत असते. तसेच तुमच्या बाळाला आता मोठे आवाज ऐकू येऊ लागतात आणि तीव्र प्रकाश जाणवू लागतो. मूत्रपिंडाजवळील ग्रंथींच्या स्वरूपात संप्रेरके कार्य करू लागतील. सर्वात चांगले म्हणजे तुमच्या बाळाला आता भावना समजू शकतात आणि ते आवाज सुद्धा ओळखू लागते.

आहार कसा असावा?

तुमचा आहार गर्भधारणपूर्व काळापेक्षा नक्कीच वाढला असेल. तुमचा आधीचा  आहार लक्षात घेऊन, गर्भधारणेच्या १७ व्या आठवड्यात त्या आहारासोबत आणखी काय घेतले पाहिजे ह्यासाठी खालील यादी वाचा. लक्षात ठेवा की गर्भारपणात उपाशी  राहणे हे योग्य नाही. तसेच दोंघांसाठी म्हणून खूप खाणे देखील टाळायला हवे. फक्त तुमच्या नेहमीच्या आहारापेक्षा थोड्या जास्त कॅलरीज वाढवा.

  • मासे, डाळी, बीन्स, टोफू, मांस ह्या स्वरूपात प्रथिने घ्या. तसेच कधी कधी तुमच्या आहारात थोडेसे लाल मांस सुद्धा घेण्याचा सल्ला दिला जातो.
  • भरपूर हिरव्या पालेभाज्या आणि फळे खा, त्यामुळे तुमचे ब्लड प्रेशर नियंत्रित राहते तसेच ऍनिमिया चा धोका  सुद्धा कमी होतो.
  • दूध, दही, चीझ तसेच इतर दुग्धजन्य पदार्थ घ्या त्यामुळे तुमच्या हाडांचे आरोग्य चांगले राहील.
  • बाळाला जन्मतःच काही व्यंग होऊ नये म्हणून फॉलीक ऍसिड घ्या.
  • फळांच्या स्वरूपात व्हिटॅमिन सी घ्या. त्यामुळे टिशू दुरुस्तीसाठी मदत होते.
  • निरोगी गर्भारपणासाठी तुमच्या आहारात जस्ताचा (zinc) समावेश करण्यास विसरू नका.
  • खूप भूक लागली असेल तेव्हा खाण्यासाठी सुकामेवा, तसेच कमी चरबी असलेला नाश्ता जवळ ठेवा.
  • तुमच्या आहाराची नीट विभागणी करा जेणेकरून तुम्ही उपाशी राहणार नाही.

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गर्भावस्थेच्या ह्या टप्प्यावर तुम्ही स्वतःला मजबूत आणि आनंदी ठेवले पाहिजे. कारण तुम्ही जो आहार घेणार आहेत त्यावरच बाळाचे पोषण होणार आहे तसेच तुमची मनःस्थिती कशी आहे त्याचा बाळावर परिणाम होणार आहे. त्यामुळे आरोग्यपूर्ण जीवनशैली निवडा, त्यामुळे तुमचे बाळंतपण यशस्वीरीत्या पार पडेल. खाली काही गोष्टी दिल्या आहेत त्यांची तुम्हाला स्वतःची काळजी घेण्यासाठी नक्कीच मदत होईल.

हे करा

हे करा

 

  • स्वतःला सुरक्षित ठेवा.
  • स्वच्छता राखा.
  • संपूर्ण वेळ सजलीत रहा.
  • जेवणाच्या वेळा ठरवा आणि योग्य प्रमाणात आहार घ्या.
  • डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे वेळेवर घ्या.
  • सकारात्मक रहा.
  • योग आणि ध्यानधारणा यांसाखे हलके व्यायाम करा.
  • झोपेच्या वेळा नियमित करा आणि दिवसभरात भरपूर आराम करा.
  • वैयक्तिक स्वछता पाळा.

हे करू नका

  • स्वतः उपाशी राहू नका, कारण त्यामुळे तुमचे बाळ सुद्धा उपाशी राहील.
  • अस्वच्छ ठिकाणी जाऊ नका.
  • जंक फूड टाळा.
  • मद्यपान आणि धूम्रपान टाळा.
  • जास्तीत जास्त ताणविरहित राहण्याचा प्रयत्न करा.
  • कुठला व्यायाम जास्त प्रमाणात करू नका.

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

गर्भारपणाच्या ह्या टप्प्यावर काय खरेदी करावी हा काही फार मोठा प्रश्न नाही. तुम्ही आरामदायक राहण्याला प्राधान्य द्या. चांगल्या कॉटन च्या मॅटर्निटी कपड्यांची खरेदी करा. तुम्हाला बसताना किंवा झोपताना आराम मिळेल अशा उशा आणण्यास विसरू नका. आरामदायक शूज आणून ठेवा आणि काही प्रेरणादायी पुस्तकांची खरेदी करा, त्यामुळे तुम्ही स्वतःला आनंदी ठेवण्यास मदत होईल. स्वयंपाकघरात तुम्हाला खाण्यासाठी पोषक नाश्ता आणून ठेवा, ज्यामुळे तुम्हाला कुठल्याही क्षणी खावेसे वाटले तर ते खाता येईल.

सतत होण्याऱ्या बदलांमुळे त्रस्त होऊ नका, तसेच पुढील बदलांसाठी तसेच सुरक्षित आणि यशस्वी गर्भधारणेसाठी सज्ज रहा.

मागील आठवडा: गर्भधारणा: १६वा आठवडा

पुढील आठवडा: गर्भधारणा: १८वा आठवडा

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article