गर्भधारणा होताना

स्त्री आणि पुरुषांसाठी गर्भनिरोधक पद्धती

तयारी नसताना लवकर गर्भधारणा होण्याची भीती ज्या जोडप्यानं असते अशा कोणत्याही जोडप्यांसाठी प्रभावी गर्भनिरोधक योजना असणे आवश्यक असते. जरी गर्भधारणा व्यवस्थापनाची तंत्रे उपलब्ध असली तरी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की प्रतिबंध हा नेहमीच एक चांगला पर्याय असतो. तुमच्याकडे जन्म नियंत्रण योजना असणे आवश्यक आहे ज्याचे तुम्ही अनुसरण करू शकता आणि त्यावर अवलंबून राहू शकता. परंतु पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी बरेच पर्याय उपलब्ध असताना तुमच्यासाठी नेमका कोणता योग्य पर्याय आहे? काही पद्धती तुमच्यासाठी अनुकूल नसतील तर इतर काही अगदी अचूक असतील. वेगवेगळ्या प्रकारच्या जन्मनियंत्रण उपायांचे वेगवेगळे फायदे तोटे असतात आणि त्यांचा प्रभावीपणा सुद्धा वेगवेगळा असतो. अशा अनेक स्वीकृत जन्म नियंत्रण पद्धती आहेत ज्यांचा वापर समाजात केला जातो आणि त्या नेहमीच सुरक्षित किंवा प्रभावी मानल्या जात नाही. येथे, आम्ही बहुतेक आरोग्य-तज्ञांकडून सुरक्षित मानल्या जाणार्‍या तसेच पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी उपलब्ध असलेल्या विविध जन्म नियंत्रण पर्यायांची चर्चा करणार आहोत.

जन्म नियंत्रण म्हणजे काय?

गर्भधारणा रोखण्यासाठी किंवा गर्भधारणेची शक्यता कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही तंत्राला किंवा पद्धतीला जन्म नियंत्रण म्हटले जाऊ शकते. जन्म नियंत्रण तंत्रात विविध प्रकार आहेत. यापैकी काही अधिक धार्मिक आहेत आणि गर्भधारणा रोखण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या वैध मानले जात नाहीत. कोणत्याही प्रकारचे जन्म नियंत्रण तंत्र वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जन्म नियंत्रणाचे काही प्रकार हायपोअलेर्जीक मानले जाऊ शकतात, या जन्म नियंत्रणाच्या प्रकारांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया आपल्या वैयक्तिक डॉक्टरांचा सल्ला घ्या. गर्भनिरोधक म्हणजे गर्भधारणेस प्रतिबंध करण्यासाठी वापरली जाणारी कोणतीही पद्धत, साधन किंवा औषध होय. असे बरेच लोक असतात जे वैद्यकीयदृष्ट्या विश्वासार्ह मानले जातात आणि त्यांच्याकडे प्रतिबंधाचे ठोस वैज्ञानिक पुरावे असतात आणि त्यांची जोखीम देखील कमी असते. तुम्ही जे निवडण्याची गरज आहे ते तुमच्या तब्येतीवर, तुमची मुले होण्याची इच्छा आणि लैंगिक आजारापासून तुम्हाला सुरक्षा हवी असेल तर त्यावर अवलंबून असते.

सर्वोत्कृष्ट जन्म नियंत्रण पद्धत कोणती आहे?

अशी एक पद्धत नाही जिला सर्वोत्तम गर्भनिरोधक मानले जाते. तुम्ही कुठली गर्भनिरोधक पद्धती निवडावी ह्यास कारणीभूत अनेक घटक आहेत..तुमच्या जोडीदाराची निवड आणि तब्येतीवर सुद्धा ते अवलंबून असते. जर तुम्ही जन्म नियंत्रणाचा एखादा प्रकार वापरुन आनंदी असाल तर तुमची प्राधान्ये आणि प्राधान्यक्रम बदलल्याने तुम्ही पद्धत बदलण्याची शक्यता आहे. गर्भनिरोधक निवडण्याच्या तुमच्या प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक खालीलप्रमाणे: एखादे विशिष्ट गर्भनिरोधक निवडण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी या सर्व बाबींबद्दल बोलणे आवश्यक आहे. जर तुम्ही निवडलेल्या पद्धतीमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल किंवा त्यामुळे अनैसर्गिक प्रतिक्रिया येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे ही नियमित एसटीडी तपासणी पूर्ण करण्याची संधी देखील आहे, ही तपासणी तुमच्या आणि सभोवतालच्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाची आहे. तुम्ही दर ३ महिन्यांनी लैंगिक आजाराची तपासणी केली पाहिजे.

पुरुष आणि स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण पर्यायांचे विविध प्रकार

जन्म नियंत्रण प्रामुख्याने दोन मुख्य विभागांमध्ये विभागले जाऊ शकते.

. गर्भनिरोध

गर्भनिरोधक ही संतती नियमनासाठी सर्वात लोकप्रिय पद्धतींपैकी एक मानली जाते ह्याचे कारण म्हणजे उपलब्धता आणि दुष्परिणामांची कमी जोखीम होय. गर्भनिरोधक पध्दती वापरल्यास स्त्रीबीजाचे शुक्राणूकडून फलन होत नाही.

. काँट्रॅगेशन

हे आपत्कालीन गर्भनिरोधक म्हणून चांगले ओळखले जाते. मॉर्निंग आफ्टर पिल फलित अंड्याचे गर्भाशयाच्या भित्तिकांवर रोपण रोखते

जन्मनियंत्रण पद्धतींचा तुलनात्मक तक्ता

खाली एक तक्ता आहे जो प्रभाव आणि जोखीम घटकांच्यासह जन्म नियंत्रण पद्धतींचे संकलन आहे
संतती नियमन पद्धती बाळाच्या जन्माची शक्यता प्रभावीपणा एसटीडी पासून संरक्षण
संयम काहीही नाही पूर्णपणे प्रभावी होय
जन्म नियंत्रण रोपण १०० पैकी १ पेक्षा कमी अगदी प्रभावी नाही
आययूडी १०० पैकी १ पेक्षा कमी अगदी प्रभावी नाही
गर्भनिरोधक पॅच १०० पैकी ९ प्रभावी नाही
गर्भ निरोधक गोळी १०० पैकी ९ प्रभावी नाही
योनि रिंग १०० पैकी ९ प्रभावी नाही
गर्भनिरोधक इंजेक्शन १०० पैकी ६ प्रभावी नाही
आपत्कालीन गर्भनिरोधक १०० पैकी ११ जणांपर्यंत (सूचनांनुसार घेतल्यास) प्रभावी नाही
पुरुष कंडोम १०० पैकी १८ मध्यम प्रभावी होय
डायफ्राम १०० पैकी १२ मध्यम प्रभावी नाही
महिला कंडोम १०० पैकी २१ कमी प्रभावी नाही
प्रजननाविषयी जागरूकता १०० पैकी २४ कमी प्रभावी नाही
शुक्राणूनाशक १०० पैकी २९ प्रभावी नाही
पुरुष जननेंद्रिय काढून घेणे १०० पैकी २७ कमी प्रभावी नाही
जन्म नियंत्रणाशिवाय लैंगिक संबंध १०० पैकी ८५ प्रभावी नाही नाही

पुरुषांसाठी जन्म नियंत्रण पर्याय

पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठीही जन्म नियंत्रणाचे पर्याय आहेत. तथापि, स्त्रियांसाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांपेक्षा पुरुषांसाठीचे पर्याय खूपच कमी आहेत. प्रतिबंध करण्यासाठी नेहमीच जन्म नियंत्रणाच्या असंख्य पद्धती एकत्र करण्याची शिफारस केली जाते; उदाहरणार्थ: तुमच्या जोडीदाराला कंडोम घालण्यास सांगा, तुम्ही गर्भनिरोधक गोळी घ्या आणि संभोग करताना पुल आउट मेथड वापरा. आज स्त्री आणि पुरुषांसाठी बाजारात सुरक्षित आणि विश्वासार्ह जन्म नियंत्रण पर्याय काय आहेत? पुरुष वापरू शकणार्‍या काही गर्भनिरोधक पद्धती येथे आहेत

. आउटकोर्स

आऊटरकोर्स ही एक सामान्य संज्ञा आहे जी अशा प्रकारच्या लैंगिक क्रियांना संदर्भित करते जिथे योनीमध्ये संभोग होत नाही. यामध्ये ओरल सेक्सचा समावेश आहे. योनीमध्ये प्रवेश नसल्यामुळे, गर्भधारणेची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते. फायदे तोटे

. कंडोम

कंडोम लॅटेक्स पासून बनविलेले असतात आणि ते पुरुषांच्या जननेंद्रियच्या वर घालतात. काँडोम्स पुरुषाचे जननेंद्रिय आणि योनीच्या त्वचेच्या दरम्यान एक अडथळा म्हणून कार्य करते आणि वीर्य योनीमध्ये प्रवेश करण्यापासून रोखते आणि त्यामध्ये वीर्य गोळा होते. फायदे तोटे

. जननेंद्रिय काढून घेणे

स्खलनाच्या आधी पुरुष जननेंद्रिय योनीच्या बाहेर खेचतो आणि ही संतती नियमनाची जुनी पद्दत आहे. फायदे तोटे

. पुरुष नसबंदी (वासेक्टॉमी)

पुरुष नसबंदी ही गर्भनिरोधक पद्धती आहे जी कायमस्वरूपी असते आणि जवळजवळ१००% प्रभावी असते. ह्यामध्ये शुक्राणूंना वाहून नेणाऱ्या पुरुषांच्या जननेंद्रियातील नलिका बंद किंवा अवरोधित केल्या जातात. शुक्राणू माणसाच्या शरीराच्या बाहेर जात नाही आणि त्याऐवजी शरीरात शोषले जातात. तुम्ही हे लक्षात ठेवलेच पाहिजे की ही पद्धती रिव्हर्सिबल आहे. फायदे तोटे एखाद्या विशिष्ट प्रकार च्या जन्म नियंत्रणाचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्या पद्धतीची जोखीम आणि फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्हाला चांगला पर्याय निवडता येईल.

महिलांसाठी जन्म नियंत्रण पर्याय

स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण पद्धतींचे बरेच पर्याय आहेत. हे पर्याय सर्व सुरक्षित आहेत आणि गर्भधारणेच्या कमी जोखमीसह तुम्ही सुरक्षितपणे संभोग करू शकता. तुम्हाला भविष्यात मुले हवी असतील तर यापैकी कोणतेही तंत्र स्त्रीबीज फलनाच्या प्रक्रियेस हानी पोहोचवू शकत नाही. लक्षात ठेवा, एसटीडी आणि गर्भधारणेची जोखीम आणखी कमी करण्यासाठी आपल्या जोडीदाराने कंडोमसारख्या जन्म नियंत्रण साधनाचा वापर केला पाहिजे. तुम्ही विचार करू शकता अशा काही महिला जन्म नियंत्रण पद्धती येथे आहेत.

. जन्म नियंत्रण गोळ्या

स्त्रियांसाठी जन्म नियंत्रणाचा हा सर्वात प्रभावी पर्याय मानला जातो. फार्मास्युटिकल कंपन्या शेकडो जन्म नियंत्रण गोळ्यांची निर्मिती करतात, प्रत्येकजण वेगळ्या हेतूसाठी दावा करतो, परंतु ह्या गोळ्यांचे दोन विस्तृत श्रेणींमध्ये वर्गीकरण करता येते. पहिला प्रकार कॉम्बिनेशन पिल म्हणून ओळखला जातो आणि त्यात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिन हार्मोन्स असतात. दुसर्‍यामध्ये केवळ प्रोजेस्टिन असते. कोणता पर्याय तुम्हाला योग्य आहे हे समजण्यासाठी तुम्ही तुमच्या स्त्रीरोगतज्ञांशी सल्लामसलत करू शकता. फायदे तोटे

. महिला कंडोम

लॅटेक्स पासून बनविलेले हे एक उलट्या थैली सारखे साधन आहे जे योनीमध्ये घातले जाते आणि शुक्राणुंना योनीमध्ये प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करते. हे वापर झाल्यानंतर टाकून देऊ शकता आणि संभोगापूर्वी आठ तास अधीपर्यंत ते परिधान केले जाऊ शकते. फायदे तोटे

. डायफ्राम

संभोगाच्या आधी हे गर्भाशयाच्या मुखाजवळ ठेवले जाते आणि गोल घुमटाच्या आकाराचे असते. गर्भनिरोधकांचा हा प्रकार शुक्राणूनाशकासह देखील वापरला जाऊ शकतो. फायदे तोटे

. योनी रिंग

योनी रिंग ही पातळ रिंग असते जी योनीच्या आत ठेवली जाते. ही रिंग नंतर गोळीप्रमाणेच हार्मोन्स सोडते. आपल्याला महिन्यातून एकदाच रिंग बदलावी लागेल. फायदे तोटे

.आययूडी

आययूडी म्हणजे इंट्रायूटरिन डिव्हाइस. हे टी-आकाराचे प्लास्टिकचे साधन आहे आणि दोन प्रकारांमध्ये येते. पहिला आय यू डी हार्मोन आधारित आहे जो गर्भधारणा रोखण्यासाठी प्रोजेस्टिन सोडतो तर दुसरा प्रकार तांबे ह्या धातूचा बनलेला असतो. दोन्ही प्रकारांमध्ये शुक्राणू स्त्रीबीजांपर्यंत पोहोचण्यापासून रोखले जातात. गर्भधारणेची शक्यता टाळते. फायदे तोटे

. महिला नसबंदी

हा कायमस्वरूपी गर्भनिरोधक उपाय आहे आणि ज्यांना आता मुले नकोत अशी खात्री आहे अशा स्त्रियांसाठी ही पद्धत सुचवली जाते. बीजवाहिन्या बांधल्या जातात आणि त्यामुळे अंडाशयातून सोडले गेलेले स्त्रीबीज रोखले जाते. फायदे तोटे

. जन्म नियंत्रण इंजेक्शन

हे एक इंजेक्शन आहे जे दर तीन महिन्यांनी दिले जाते. गर्भनिरोधक इंजेक्शन गर्भधारणेची शक्यता कमी करते आणि तुम्हाला वर्षातून फक्त चार वेळा इंजेक्शन घ्यावे लागते. फायदे तोटे

. जन्म नियंत्रण पॅच

हा एक पॅच आहे जो नियमित अंतराने आपल्या शरीरात हार्मोन्स सोडतो, ज्यामुळे गर्भधारणा होण्यास प्रतिबंध होतो. हा थेट त्वचेवर लावला जातो. तुम्हाला दर आठवड्याला एक पॅच आवश्यक असेल. फायदे तोटे तुम्ही पहातच आहात की पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही जन्म नियंत्रणासाठी बरेच पर्याय आहेत. जन्म नियंत्रणाची निवड करताना, प्रत्येक पर्यायातील सर्व साधक आणि बाधक मुद्धे लक्षात घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले. वरील सर्व पद्धती प्रत्येकासाठी आदर्श नाहीत. तुमच्या डॉक्टरांना तुमचा आणि तुमच्या जोडीदाराचा वैद्यकीय इतिहास माहिती असणे आवश्यक आहे. तुम्ही बाळाचा विचार करीत असाल तर डॉक्टरांना सांगावे. तुम्हास मूल होण्याची इच्छा आहे की नाही याबद्दल निश्चित उत्तर देणे कदाचित खूप लवकर वाटेल परंतु डॉक्टरांशी बोलल्यास तुमच्या डॉक्टरांना योग्य उपाय करण्यास त्यामुळे मदत होईल . एखाद्या विशिष्ट गर्भनिरोधक पद्धतीचा निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या दुष्परिणामांची चर्चा करा. स्वत: ला लैंगिक संबंध, गर्भनिरोधक साधने , एसटीडी आणि सुरक्षित लैंगिक पद्धतींबद्दल माहिती असणे देखील अत्यंत महत्वाचे आहे. या कारणास्तव, आपण या विषयावर संशोधन केले पाहिजे आणि या विषयांबद्दल आपल्या डॉक्टरांशी मुक्त आणि सखोल चर्चा देखील केली पाहिजे. तयार नसताना संभाव्य गर्भधारणा टाळणे नेहमीच फायदेशीर ठरते. गर्भधारणेचे नियोजन केल्यास तुम्हाला दोघांना तुमच्या मुलाची काळजी घेणे सोपे जाईल आणि त्यासाठी वेळ मिळेल. हे आणखी एक कारण आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराशी संवाद साधणे जरुरी आहे. तुमचा जोडीदार उपलब्ध असलेल्या गर्भनिरोधक पर्यायांचा वापर करीत असल्याची खात्री करा. आणखी वाचा: गर्भनिरोधक स्पंज – वापर, प्रभावीपणा, फायदे आणि बरंच काही
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved