गर्भधारणा होताना

लैंगिक संबंधांनंतरचे गर्भारपण – ह्या आपत्कालीन गर्भनिरोधक पद्धती वापरून पहा

नको असलेली गर्भधारणा राहिल्यास त्या परिस्थितीतून जाणे खूप कठीण असते आणि अशा वेळी त्यातून सुटकेचा निःश्वास टाकण्यासाठी सर्वात चांगला मार्ग म्हणजे आपत्कालीन गर्भनिरोधक होय. योग्य वेळेत घेतल्यास गर्भधारणेच्या जोखमीपासून बचाव होण्यास मदत होते आणि अनेक जोडप्यांसाठी खरोखरच ते एक वैद्यकीय वरदान आहे.

आपत्कालीन गर्भनिरोधक म्हणजे काय?

नावाप्रमाणेच आपत्कालीन गर्भनिरोधकाचा वापर जेव्हा असुरक्षित संभोग केलेला असतो किंवा गर्भनिरोधकाच्या इतर पद्धती प्रभावीपणे कार्य करत नसल्यास केला जातो. असुरक्षित संभोगानंतर लवकरात लवकर त्यांचा वापर केला पाहिजे. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की आपत्कालीन परिस्थितीत आवश्यकतेनुसारच हे वापरावे आणि नियमित गर्भनिरोधकास ते पर्याय होऊ नये.

आपत्कालीन गर्भनिरोधक सुरक्षित आहे?

होय आपत्कालीन गर्भनिरोधक बहुतेक स्त्रियांसाठी सुरक्षित मानले जाते. आपत्कालीन गर्भनिरोधक वापरल्यानंतर गंभीर घटना झाल्याची कोणतीही नोंद नाही. तथापि, आपण इतर कोणतीही औषधे घेत असल्यास, आपत्कालीन गर्भनिरोधक (ईसीपी) वापरणे सुरक्षित आहे किंवा नाही ह्याविषयी आपल्या डॉक्टरकडे चौकशी करणे महत्वाचे आहे.

आपत्कालीन गर्भनिरोधक कोण वापरू शकेल?

कोणतीही मुलगी हिचे वय प्रजनन योग्य झालेले असेल आणि असुरक्षित संभोग करत असल्यास ती आपत्कालीन गर्भनिरोधक वापरू शकते. कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन गर्भनिरोधकाच्या वापरासाठी वयोमर्यादा नाही परंतु जर काही वैद्यकीय समस्या असतील तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

आपत्कालीन गर्भनिरोधक पद्धती

आपत्कालीन गर्भनिरोधकाच्या प्रामुख्याने दोन पद्धती आहेत

. पॅरागार्ड आययूडी किंवा कॉपर आययूडी

हे इंट्रायूटरिन डिव्हाइस आहे जे आपल्या गर्भाशयात घातले जाते. असुरक्षित संभोगानंतर ५ दिवसांपर्यंत याचा वापर केला जाऊ शकतो. आययूडी हा एक दीर्घकालीन गर्भनिरोधक पर्याय आहे जो सुमारे १० ते १२ वर्षे कार्य करू शकतो

. गर्भनिरोधक गोळ्या

या आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या दोन प्रकारच्या असतात
सध्या ह्या गोळ्यांचा फक्त एला नावाचा एकच ब्रॅण्ड आहे. अशा गोळ्यांना देखील डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता असते आणि असुरक्षित संभोगानंतर ५ दिवस किंवा १२० तासांच्या आत ही गोळी घेतली जावी. या गोळ्या असुरक्षित संभोगानंतर लगेच घेतल्या जातात. त्यांची प्रभावीता गोळी किती लवकर घेता यावर अवलंबून असते. तथापि, असुरक्षित संभोगाच्या किमान ७२ तास किंवा ३ दिवसांच्या आत गोळ्या घेतल्या पाहिजेत. प्लॅन बी वन-स्टेप, टेक ऍक्शन, आफ्टर पील, आय-पिल इत्यादी, हे काही गर्भनिरोधक गोळ्यांचे ब्रँड आहेत ज्यात लेव्होनॉर्जेस्ट्रल आहे

आपत्कालीन गर्भनिरोधक कसे कार्य करते?

आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या सामान्यत: ओव्हुलेशन प्रक्रियेला उशीर करतात. याचा अर्थ असा की ते अंडाशयाद्वारे स्त्रीबीज सोडण्यापासून रोखून गर्भधारणा रोखली जाते. लेव्होनोर्जेस्ट्रेल गोळ्या ओव्ह्यूलेशनला उशीर करतात परंतु जेव्हा अंड्याचे फलन आणि रोपण आधीच झालेले असते तेथे गर्भधारणा रोखली जात नाही. अलिप्रिस्टल एसीटेट असलेल्या गोळ्या ओव्यूलेशनला विलंब करतात परंतु गर्भाशयामध्ये फलित अंडे रोपण करण्यास देखील प्रतिबंध करतात, यामुळे गर्भधारणा टळते. म्हणूनच,ह्या गोळ्या गर्भधारणा रोखण्याचे काम ५ दिवसांपर्यंत करतात, आणि हा काळ म्हणजे अंड्याचे फलन व रोपण होण्यासाठी लागणारा कालावधी होय. तांबे आययूडी शुक्राणूंना अंड्यापर्यंत पोहोचणे कठिण करते, आणि गर्भधारणा रोखली जाते

कोणत्या परिस्थितींमध्ये आपत्कालीन गर्भनिरोधक वापरावे?

पुढीलपैकी कोणत्याही कारणास्तव नको असलेल्या गर्भधारणेची शक्यता वाटत असल्यास आपत्कालीन गर्भनिरोधक आदर्श आहे

कोणत्या प्रकारचे आपत्कालीन गर्भनिरोधक आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे?

तुमच्यासाठी सर्वात योग्य प्रकारचे आपत्कालीन गर्भनिरोधक खाली दिलेल्या काही घटकांवर अवलंबून असते आपत्कालीन गर्भनिरोधक पद्धतींपैकी सर्वात प्रभावी पद्धती वापरणे चांगले आहे. आययूडी आणि एला सहज उपलब्ध नाहीत. आययूडी डॉक्टर किंवा नर्सद्वारे घालावी लागते आणि एला एक लिहून दिले जाणारे औषध आहे आणि ते औषधांच्या दुकानातून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय खरेदी केली जाऊ शकत नाही. प्लॅन बी किंवा इतर लिव्होनॉर्जेस्ट्रल गोळ्याना प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता नसते. असुरक्षित संभोगानंतर ७२ तासांच्या आत घेतल्यास ते सुमारे ८८% ते ९५% प्रभावी असू शकतात, परंतु ते एला किंवा आययूडीइतके प्रभावी नाहीत. तथापि, हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की आपण जन्म नियंत्रण गोळ्या, रिंग, पॅच किंवा जन्म नियंत्रण इंजेक्शन घेत असाल तर एला तितकी प्रभावी ठरणार नाही. अशा परिस्थितीत, लेव्होनॉर्जेस्ट्रल गोळ्या अधिक चांगले कार्य करतात. तसेच, प्लॅन बी आणि एलासारख्या गोळ्या एकत्र घेऊ नका कारण ते परिणाम रद्द करू शकतात. आपत्कालीन गर्भनिरोधकाचा उत्कृष्ट परिणाम मिळण्यासाठी त्याचा लवकरात लवकर वापर करा.

मी आपत्कालीन गर्भनिरोधक गोळी कशी घ्यावी?

आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या असुरक्षित संभोगानंतर लगेच तोंडाद्वारे घेतल्या जातात. लेव्होनोर्जेस्ट्रल गोळ्या असुरक्षित संभोगाच्या ७२ तासांच्या आत घ्याव्यात आणि एलासारख्या युलिप्रिस्टल एसीटेट गोळ्या असुरक्षित संभोगानंतर १२० तासांच्या आत घेता येतील. गोळी घेतल्यानंतर दोन किंवा तीन तासांत तुम्हाला उलट्या झाल्यास, तुम्ही आणखी एक डोस घेण्याबद्दल आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता

आपत्कालीन गर्भनिरोधकाची प्रभावीपणा

प्लॅन बी, असुरक्षित संभोगानंतर ७२ तासांच्या आत घेतल्यास ८५% नको असलेली गर्भधारणा रोखू शकते. तथापि, या गोळ्या जास्त वजन असलेल्या स्त्रियांमध्ये कमी प्रभावी ठरतात आणि १६५ पौंड किंवा ७५ किलोपेक्षा जास्त महिलांमध्ये नीट कार्य करत नाहीत एलाची गर्भधारणा रोखण्याची प्रभावीता १२० तासांपर्यंत टिकू शकते आणि ५व्या दिवशी सुद्धा पहिल्या दिवसाइतकेच प्रभावीपणे काम करते. तसेच, गोळी घेतल्यानंतर तुम्ही असुरक्षित संभोग केल्यानंतर ह्या गोळ्या गर्भधारणा रोखणार नाहीत. गर्भधारणा टाळण्यासाठी आपल्याला आणखी एक डोस घ्यावा लागेल. परंतु, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की आपत्कालीन गर्भनिरोधकांचा वापर नियमित गर्भनिरोधक पद्धत म्हणून करू नये. इतर काही प्रभावी नियमित गर्भनिरोधक आहेत जे बहुतेक स्त्रियांसाठी काम करतात. असुरक्षित संभोग केल्यानंतर ५ दिवसांच्या आत ह्या गोळ्यांचा वापर केल्यास नको असलेली गर्भधारणा रोखण्यात आययूडीचा यशाचा दर ९९% इतका असतो. हे दीर्घकालीन संरक्षण देखील देतात. तथापि, सर्व महिला आययूडी घेण्यास पात्र नाहीत. हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की असे कोणतेही आपत्कालीन गर्भनिरोधक नाही जे १००% संरक्षण देते. म्हणूनच, सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे चांगले.

आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर कोणी करू नये?

आपत्कालीन गर्भनिरोधक सामान्यत: बर्‍याच महिलांसाठी सुरक्षित असतात. कुठल्या परिस्थतीत ते वापरू नयेत ह्याची काही उदाहरणे खाली दिली आहेत.

आपण असे केव्हा म्हणू शकतो की आपत्कालीन गर्भनिरोधक अयशस्वी झाले आहे?

वेळेवर आणि योग्य मार्गाने घेतल्यास आपत्कालीन गर्भनिरोधकाचा यशाचा दर चांगला असतो. तथापि, तुमची मासिक पाळी चुकल्यास आणि गर्भधारणा चाचणी सकारात्मक आल्यास आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्याना अपयश आल्याची शक्यता असते. ज्या घटनांमध्ये ते अयशस्वी होऊ शकतात त्या खालील रकान्यात दिल्या आहेत
ईसीपी पद्धत अयशस्वीतेचा दर अयशस्वी होण्याची संभाव्य कारणे
प्लॅन बी (लेव्होनोर्जेस्ट्रेल गोळ्या) ११% (२ तासात घेतल्यास अपयशाचे प्रमाण सुमारे ५% असते - जर ७२ तासांनी गोळी घेतली तर - आपण आधीच ओव्हुलेटेड असल्यास - तुमचे वजन जास्त असल्यास (७५ किलोपेक्षा जास्त) - गोळी घेण्याच्या दोन ते तीन तासांत आपल्याला उलट्या झाल्यास
एला .% (२०१० च्या अभ्यासानुसार) - जर तुम्ही गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल किंवा पॅच किंवा रिंग वापरत असाल तर - जर तुम्ही एला घेतल्यानंतर ५ दिवसांच्या आत हार्मोनल गर्भनिरोधक सुरू केले तर - गोळी घेतल्यावर दोन ते तीन तासांत आपल्याला उलट्या झाल्यास
तांबे आययूडी % असुरक्षित संभोगानंतर ५ दिवसांनंतर घातल्यास किंवा शुक्राणूने आधीच अंड्याचे फलन केलेले असल्यास

आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्यांचा प्रभाव कमी करणारी औषधे

काही औषधे आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी ओळखली जातात आणि त्यामध्ये काही हर्बल औषधांचा समावेश आहे. सेंट जॉन वॉर्ट ही एक औषधी वनस्पती आहे जी ह्या गोळ्यांची प्रभावीता कमी करू शकते. रायफॅम्पिन, बार्बिट्यूरेट्स, ग्रिझोफुलविन सारख्या अँटीबायोटिक्स,ही अँटीफंगल औषधे आहेत आणि तसेच एचआयव्ही वरील औषधे देखील ह्या गोळ्यांच्या कार्यक्षमतेत व्यत्यय आणू शकतात. फिट साठी दिलेली औषधे सुद्धा बऱ्याच वेळा ह्या गोळ्यांची परिणामाकता कमी करतात.

आपत्कालीन गर्भनिरोधक औषधांचे दुष्परिणाम

सामान्य दुष्परिणामांमध्ये आपत्कालीन गर्भनिरोधकांचा समावेश आहे:

आपण डॉक्टरांना कधी फोन करावा?

गोळी घेतल्यानंतर, जर मासिक पाळी चुकली आणि आपण गर्भवती असल्याचा संशय आला असेल तर आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. तसेच, जर तुमच्या ओटीपोटात तीव्र पेटके येत असतील किंवा एका आठवड्यापेक्षा जास्त काळ आपल्याला अनियमित रक्तस्त्राव होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर आपण आययूडी वापरले असेल आणि तुम्हाला काही अस्वस्थता जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोणत्याही लैंगिक रोगाचा संसर्ग झाल्यास, डॉक्टरकडे जाणे आणि वेळेवर उपचार घेणे चांगले

सामान्य प्रश्न

. आपत्कालीन गर्भनिरोधकासाठी कॉपर आयुडी प्रभावी आहे?

होय कॉपर आययूडी ही सर्वात प्रभावी आपत्कालीन गर्भनिरोधक पद्धती आहे आणि असुरक्षित संभोगानंतर ५ दिवसांच्या आत वापरली पाहिजे म्हणजे यशाचा दर ९९% असतो.

. आपत्कालीन गर्भनिरोधक एसटीडीपासून संरक्षण प्रदान करते?

नाही. आपत्कालीन गर्भनिरोधक एसटीडीपासून संरक्षण देत नाही. लैंगिक रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी, योग्य खबरदारी घ्यावी आणि प्रत्येक वेळी संभोग करण्यापूर्वी कंडोम वापरावा. अशा प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता तपासण्यासाठी दोघांची एसटीडी ची तपासणी होणे चांगले.

. मला आपत्कालीन गर्भनिरोधक कोठे मिळू शकेल?

प्लॅन बी बहुतेक औषधांच्या दुकानात काउंटरवर सहज उपलब्ध असतात आणि त्याशिवाय ते प्रिस्क्रिप्शनशिवाय खरेदी करता येते. एला एक लिहून दिले जाणारे औषध आहे आणि तुमच्याकडे डॉक्टरांनी लिहून दिलेले एखादे प्रिस्क्रिप्शन असेल तरच आपल्याला ते दिले जाते. अनुभवी डॉक्टर म्हणून आययूडी मिळविण्यासाठी आपण स्त्रीरोग तज्ञाशी संपर्क साधू शकता किंवा नर्स कडून गर्भाशयात आययूडी घेऊ शकता.

. त्याची किंमत किती आहे?

प्लॅन बीची किंमत जवळपास to ४० ते ५० डॉलर इतकी असते. इतर आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या सुमारे १५ ते ४५ रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. एलाची किंमत औषध दुकानात सुमारे ५० रुपये आहे. तथापि, आपण ऑनलाइन ऑर्डर केल्यास किंमत अधिक असू शकते. आययूडीची किंमत वेगवेगळी असू शकते आणि ही किंमत सुमारे १००० रुपयांपर्यंत पर्यंत जाऊ शकते. तथापि, जर विमा संरक्षण असेल तर आपल्याला त्यासाठी कमी किंमत आकारली जाईल

.माझ्या पुढच्या मासिक पाळीवर आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्यांचा काही परिणाम होईल का?

बर्‍याच स्त्रियांना असे आढळले आहे की आपत्कालीन गर्भनिरोधक गोळी घेतल्याने त्यांच्या मासिक पाळीवर परिणाम होतो. नेहमीच्या वेळेपेक्षा मासिक पाळी लवकर किंवा उशिरा येऊ शकते. तथापि, बहुतेक स्त्रियांना मासिक पाळी त्यांच्या नेहमीच्या तारखेला येते. मासिकपाळीदरम्यान रक्तस्त्राव आणि होणाऱ्या वेदनांमध्ये बदल होऊ शकतो. रक्तस्त्राव नेहमीपेक्षा जास्त किंवा कमी असू शकतो किंवा आधीपेक्षा तीव्र पेटके येऊ शकतात

. गोळी घेतल्यानंतर मला उलट्या झाल्या तर काय होईल?

गोळी घेतल्यानंतर दोन किंवा तीन तासांत उलट्या झाल्यास तुम्हाला गोळीचा दुसरा डोस घ्यावा लागू शकतो. जर तुम्हाला दुसऱ्यांदा उलट्या झाल्यास डोस पुन्हा घेण्याची आवश्यकता नाही. तथापि, उलट्या झाल्यानंतर आपण दुसरा डोस घेण्याबद्दल आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधणे चांगले.

. आपत्कालीन गर्भनिरोधकाचा उपयोग भविष्यात गर्भवती होण्याच्या शक्यतेवर परिणाम करतो?

नाही. आपत्कालीन गर्भनिरोधक वापरल्याने भविष्यात आपल्या गरोदरपणाच्या शक्यतांवर कोणताही परिणाम होणार नाही.

. मी स्तनपान करत असल्यास आपत्कालीन गर्भनिरोधक वापरू शकते का ?

आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या आणि आययूडी स्तनपान करत असतानाही वापरण्यास सुरक्षित आहेत. तथापि, एला ह्या गर्भनिरोधक गोळीसोबत सावधानतेचा सूचना असते की स्तनपान देणाऱ्या स्त्रीने ते टाळणे आवश्यक आहे कारण त्याच्या परिणामांचा पुरेसा अभ्यास केला गेलेला नाही.

. मला त्यांची आवश्यकता होण्यापूर्वी मी आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या घेऊ शकते का ?

होय आपण कधीही औषधांच्या दुकानातून ह्या गोळ्या खरेदी करू शकता आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी ठेवू शकता. प्रसंग उद्भवल्यास भविष्यात वापरासाठी ह्या गोळ्या लिहून देण्यासाठी तुम्ही डॉक्टरकडे संपर्क साधू शकता.

१०. मॉर्निंग आफ्टर पील तुम्ही किती वेळा वापरू शकता?

मर्यादा नसली तरीही महिन्यात दोन ते तीन वेळा ह्या गोळ्यांचा वापर मर्यादित ठेवणे चांगले. जर तुम्ही गोळी बऱ्याच वेळा घेत असल्याचे लक्षात आले तर नियमित गर्भनिरोधक किंवा गर्भनिरोधक गोळ्याच्या वैकल्पिक पद्धतीबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले. ह्या गोळ्या फक्त आपत्कालीन स्थितीत घेतल्या जाव्यात. आपत्कालीन गर्भनिरोधकांचा वापर बर्‍याच वर्षांमध्ये लक्षणीय प्रमाणात वाढला आहे, हे समजून घेणे महत्वाचे आहे की आपत्कालीन गर्भनिरोधक पद्धती केवळ आपत्कालीन परिस्थितीतच चांगल्या प्रकारे कार्य करतात, त्यास नियमित गर्भनिरोधक बनवू नये. आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर जबाबदारीने वापर करण्याची काळजी घ्यावी आणि खूप जास्त प्रमाणात वापरण्याचे टाळावे. आणखी वाचा: पाळीच्या आधी, नंतर आणि पाळीदरम्यान गर्भधारणेची शक्यता
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved