In this Article
नवजात बाळाला स्तनपान देताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यापैकी एक आव्हान म्हणजे आईच्या दुधाचा अपुरा पुरवठा हे होय. स्वतःच्या बाळांना स्तनपान देण्यासाठी, कित्येक मातांचे शरीर पुरेसे दूध तयार करत नाही. तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाची भूक भागवण्याचे किंवा त्याऐवजी स्तनपान वाढवण्याचे इतर मार्ग शोधत असाल ना?. स्तनपान हे केवळ नवजात बाळासाठीच नाही, तर आईसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. म्हणूनच, आम्ही तुम्हाला स्तनपान सुधारण्यासाठी विविध नैसर्गिक मार्ग वापरण्याची शिफारस करतो. तुम्हाला ह्याबद्दल तपशीलवार माहिती हवी असल्यास तुमच्यासाठी हा लेख खूप उपयोगी आहे. येथे, आपण विविध आयुर्वेदिक उपायांबद्दल चर्चा करणार आहोत. ह्याचा वापर आईच्या दुधाचा पुरवठा वाढवण्यासाठी होऊ शकतो.
स्तनपान करणा –या मातांमध्ये दूध पुरवठा कमी असण्याची सामान्य कारणे कोणती?
स्तनदा मातांमध्ये आईच्या दुधाचे उत्पादन कमी असण्याची विविध कारणे असू शकतात. स्तनपानावर परिणाम करणारी काही सामान्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- जर तुम्ही स्तनाची शस्त्रक्रिया केली असेल किंवा तुम्ही औषधे घेत असाल तर दुधाच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण होतो
- जर तुम्ही तुमच्या बाळाला नियमितपणे स्तनपान देत नसाल
- जर तुम्ही तुमच्या बाळाला उशिरा स्तनपान सुरू केले
- तुम्ही मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, हायपोथायरॉईडीझम इत्यादी वैद्यकीय परिस्थितींनी ग्रस्त असल्यास
- जर तुमच्या बाळाचा जन्म अकाली झाला असेल तर
- तणाव, चिंता आणि प्रसूतीनंतरची उदासीनता आईच्या दुधाच्या उत्पादनास अडथळा आणते
या सर्व कारणांमुळे कधीकधी बाळासाठी पुरेसे दूध तयार होण्यास अडथळा येऊ शकतो. तथापि, स्तनपान वाढवण्याचे नैसर्गिक/आयुर्वेदिक मार्ग आहेत.
अंगावरच्या दुधाचा पुरवठा वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय
हे आयुर्वेदिक/नैसर्गिक उपाय आईच्या दुधाचे उत्पादन सुधारण्याचा प्रयत्न करण्यासाठी सुरक्षित आहेत:
१. बडीशेप
स्तनपान देणाऱ्या मातांमध्ये दुधाचा पुरवठा वाढवण्यासाठी बडीशेप उत्तमरीत्या मदत करते. त्यामध्ये एस्ट्रोजेन सारखे फायटोएस्ट्रोजेन्स असतात. हे एक संप्रेरक आहे आणि ते अधिक दूध तयार करण्यास मदत करते.
कसे वापरावे?
तुम्ही बडीशेप गरम पाण्यात टाकून उकळून घेऊन त्याचा चहा करू शकता. तसेच गोडीसाठी मध घालू शकता (पर्यायी). तुम्ही हा चहा दिवसातून दोन वेळा घेऊ शकता. जर तुम्ही चहाबद्दल फारसे उत्साही नसाल, तर तुम्ही दिवसातून काही वेळा चमचाभर भाजलेली बडीशेप चघळू शकता.
२. टोरबागुनची पाने
स्तनपानासाठी ही एक उत्तम औषधी वनस्पती आहे. टोरबागुनची पाने बटाक पद्धतीच्या पाककृतीमध्ये वापरण्यासाठी लोकप्रिय आहे , परंतु स्तनपान करणा –या मातांमध्ये स्तनपान सुधारण्यासाठी ही पाने अनेक वर्षांपासून वापरात आहेत.
कसे वापरावे?
तुम्ही ही पाने कोणत्याही स्वरूपात वापरू शकता. तुम्ही अर्धा चमचा ही पाने घेऊ शकता आणि ती एक कप उकळत्या पाण्यात घालून चहा बनवू शकता त्यानंतर हे पाणी तुमच्या सूपमध्ये किंवा तुमच्या नेहमीच्या भाजीपाल्याच्या तयारीमध्ये घालू शकता आणि त्याचे नियमितपणे सेवन करू शकता.
३. मेथीचे दाणे
दूध उत्पादन वाढवण्यासाठी स्तनदा मातांसाठी मेथीचे दाणे ही एक उत्तम औषधी वनस्पती आहे. यामध्ये डायसजेनिन आणि फायटोएस्ट्रोजन देखील असतात. या बियांमध्ये गॅलेक्टॅगॉग जास्त प्रमाणात असते. त्यामुळे आईच्या दुधाचा पुरवठा वाढवण्याची इच्छा असलेल्या मातांसाठी ते उत्तम बनते.
कसे वापरावे
१ चमचा मेथीचे दाणे घेऊन ते पाण्यात उकळून घ्या. बिया गाळून घ्या. चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यामध्ये एक चमचा मध आणि एक चिमूटभर हळद घालू शकता. हा चहा दिवसातून किमान दोन ते तीन वेळा प्यावा. सॅलड किंवा भाज्यांमध्येही मेथीचे अंकुर मिसळा.
४. मिल्क थीस्ल
ही औषधी वनस्पती शरीरातून विष काढून टाकण्यासाठी उत्तम आहे आणि यकृतासाठी उत्तम टॉनिक म्हणून काम करते. याशिवाय, या फुलांच्या वनस्पतीमध्ये इस्ट्रोजेन आहे आणि ते स्तनपान सुधारण्यास मदत करते.
कसे वापरावे
ही औषधी वनस्पती तुम्ही कॅप्सूल स्वरूपात घेऊ शकता (दिवसातून २ ते ३ कॅप्सूल) घेऊ शकता किंवा एक कप उकळत्या पाण्यात १/२ चमचा मिल्क थिसल घालून २० मिनिटे तसेच राहू द्या.
५. शतावरी
या आयुर्वेदिक औषधी वनस्पतीचा उपयोग महिलांमध्ये दुग्धपान समस्या दूर करण्यासाठी केला जात आहे. या औषधी वनस्पतीमध्ये गॅलेक्टॅगॉग असते . गॅलेक्टॅगॉग हे प्रोलॅक्टिन आणि कॉर्टिकोइड्सचे उत्पादन वाढवण्यास मदत करतात, त्यामुळे आईच्या दुधाचे उत्पादन वाढण्यास मदत होते. तसेच स्तनपानाची गुणवत्ता देखील सुधारते.
कसे वापरावे?
तुम्ही ही औषधी वनस्पती पाण्यात मिसळून घेऊ शकता किंवा आईच्या दुधाचा पुरवठा वाढवण्यासाठी तुम्ही शतावरी हर्बल सप्लीमेंट देखील खरेदी करू शकता.
६. दालचिनी
दालचिनी ही एक सुगंधी औषधी वनस्पती आहे. दालचिनी अनेक पाककृतींची चव वाढवते. परंतु, बऱ्याच काळापासून, स्तनपान करणा –या अनेक माता तसेच अपुऱ्या दुधाच्या पुरवठ्यामुळे त्रस्त असलेल्या स्त्रिया त्यांच्या दुधाचा पुरवठा वाढवण्यासाठी ह्या औषधी वनस्पतीचा वापर करत आहेत. ह्यामुळे आईच्या दुधाची चव सुद्धा वाढते असे म्हणतात.
कसे वापरावे?
स्तनपान करणारी माता दालचिनी पावडरमध्ये चिमूटभर दालचिनी पावडर, अर्धा चमचा मध किंवा दुधात मिसळून दालचिनीचे सेवन करू शकते. तुमच्या दुधाच्या पुरवठ्यातील फरक पाहण्यासाठी तुम्ही एक किंवा दोन महिने दालचिनी घेऊ शकता.
७. जिरे
जिरे भारतीय स्वयंपाकात मोठ्या प्रमाणावर वापरले जातात, आणि हे सुवासिक बियाणे स्तनदा मातांमध्ये दुधाचा पुरवठा वाढवण्यासाठी एक प्रभावी उपाय मानला जातो. जिऱ्यामध्ये लोह देखील भरलेले असते आणि ते स्तनदा मातांना अत्यंत आवश्यक ऊर्जा मिळण्यासाठी उपयुक्त ठरते.
कसे वापरावे?
तुम्ही एक चमचा जिरे थोड्या साखरेमध्ये मिसळू शकता आणि रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात घेऊ शकता. डाळ, भाज्या, सॅलड किंवा भाजलेल्या भाज्या तुम्ही जिरेपूड घालून खाऊ शकता.
८. लसूण
आईच्या दुधाचा स्त्राव वाढवण्यासाठी ही प्रभावी आयुर्वेदिक औषधी वनस्पती फायदेशीर आहे. स्तनपान करणारी आई नियमितपणे त्याचे सेवन करते. आईच्या दुधाची चव वाढते असेही म्हटले जाते.
कसे वापरावे?
लसूण आपल्या दैनंदिन स्वयंपाकात कोणत्याही स्वरूपात वापरला जाऊ शकतो किंवा आपण दररोज लसणाच्या २–३ कच्च्या पाकळ्या देखील खाऊ शकता.
९. गोटस रुई
ही औषधी वनस्पती मेथी सारख्याच वनस्पती गटाशी संबंधित आहे. ही वनस्पती दुग्ध ग्रंथी तयार करण्यास मदत करते आणि आईच्या दुधाच्या उत्पादनास मदत करते. तथापि, या औषधी वनस्पतीचे वाळलेले स्वरूप जास्त चांगले आणि फायदेशीर आहे कारण हिरव्या औषधी वनस्पती विषारी आहेत आणि आपल्या आरोग्यावर हानिकारक परिणाम करू शकतात.
कसे वापरावे?
ही औषधी वनस्पती कॅप्सूलच्या स्वरूपात वापरली जाऊ शकते.
१०. आले
विविध खाद्यपदार्थ आणि शीतपेयांची चव वाढवण्यासाठी आल्याचा वापर केला जातो. आल्याचा वापर आरोग्यासाठी देखील केला जातो. आल्यामुळे आईच्या अंगावरील दुधाचा पुरवठा वाढतो. आल्यामध्ये गॅलेक्टॅगॉग गुणधर्म आहेत. स्तनदा मातांमध्ये दुधाचे उत्पादन वाढवण्यास त्यामुळे मदत होऊ शकते.
कसे वापरावे?
तुम्ही तुमच्या नेहमीच्या चहामध्ये किंवा तुमच्या जेवणाच्या तयारीमध्ये मसाल्यासाठी ताजे आले वापरू शकता. किंवा फक्त सुकलेल्या आल्याची पूड अन्न किंवा चहा मध्ये घालू शकता.
११. चक्रफुल
या औषधी वनस्पतीमध्ये इस्ट्रोजेनिक गुणधर्म आहेत; त्यात एनेथोल असते आणि ते एक फायटोएस्ट्रोजेन आहे. ते दुधाच्या बंद नलिका उघडण्यास मदत करते आणि आईच्या दुधाचा पुरवठा वाढवण्यास त्यामुळे मदत होते.
कसे वापरावे?
गरम पाण्यात ते टाकून तुम्ही चहा बनवू शकता. चवीसाठी साखर किंवा मध घाला. तुम्ही एका दिवसात दोन ते तीन कप चहा सुरक्षितपणे घेऊ शकता.
उपलब्ध आयुर्वेदिक/नैसर्गिक औषधींपैकी तुम्ही काही निवडून लगेच त्यांचे सेवन करू शकता. तथापि, हे तितके सोपे नाही कारण तुम्ही तुमच्या बाळासाठी जे निरोगी आहे त्याचा वापर करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, समान घटक वापरल्यानंतर तुमचे शरीर पूर्वी प्रमाणे प्रतिक्रिया देऊ शकत नाही. पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींपासून तुम्हाला जास्तीत जास्त आरोग्यविषयक लाभ मिळतील याची खात्री करण्यासाठी हे खबरदारीचे उपाय करा.
अंगावरील दुधाचा पुरवठा वाढवण्यासाठी, औषधी वनस्पती वापरण्याआधी घ्यायची खबरदारी
औषधी वनस्पती वापरण्यास अत्यंत सुरक्षित असल्या तरी, काही स्त्रियांना त्यापैकी काहींची ऍलर्जी असू शकते. म्हणूनच, अंगावरील दूध कमी येण्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोणत्याही औषधी वनस्पती वापरण्यापूर्वी सावधगिरी बाळगली पाहिजे. इथे तुम्ही कुठली काळजी घेतली पाहिजे ह्याविषयक टिप्स दिलेल्या आहेत.
- आपल्या नियमित आहारात कोणतीही औषधी वनस्पती समाविष्ट करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या स्तनपान सल्लागाराचा सल्ला घेऊन खात्री करा
- तुम्ही केवळ नामांकित ब्रँडकडून हर्बल सप्लीमेंट्स खरेदी करता आहात ना ह्याची खात्री करा
- कधीकधी औषधी वनस्पतींमुळे विषबाधा होऊ शकते. त्या घेण्यापूर्वी आपले स्तनपान सल्लागार किंवा डॉक्टरांशी बोला
- जर तुम्ही गर्भवती असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय औषधी वनस्पती घेतल्यास गुंतागुंत होऊ शकते
- तुम्हाला ऍलर्जी असलेल्या वनौषधी टाळा
आणखी वाचा:
स्तनपान आणि कावीळ – कारणे, उपचार आणि प्रतिबंध
अंगावरील दुधाचा पुरवठा वाढवण्यासाठी ३१ सर्वोत्तम पदार्थ