In this Article
- लोहाची कमतरता म्हणजेच अॅनिमिया म्हणजे काय?
- लोहाच्या कमतरतेमुळे झालेल्या अॅनिमियाची कारणे
- लोहाच्या कमतरतेमुळे झालेल्या अॅनिमियाची लक्षणे
- अॅनिमियाचे निदान
- गरोदरपणातील अॅनिमियाचे संभाव्य धोके
- अॅनिमियावर उपचार
- अॅनिमिया कसा टाळावा?
- गरोदरपणात अॅनिमियाचा बाळावर परिणाम होतो का?
- गर्भवती महिलांमध्ये लोह सामग्री वाढवण्यासाठी शिफारस केलेले पदार्थ
गर्भारपण हा एक सुंदर आणि परिपूर्ण प्रवास आहे– हा प्रवास तुम्हाला अमर्याद आनंद देतो कारण तुम्ही तुमच्या बाळाचे ह्या जगात स्वागत करणार असता! परंतु, गरोदरपणात काही समस्या सुद्धा निर्माण होऊ शकतात. त्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्या गरोदरपणात तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्यांपैकी एक म्हणजे लोहाची कमतरता किंवा अॅनिमिया. अॅनिमिया व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेने देखील होऊ शकतो. ह्या समस्येवर उपचार करण्यापूर्वी ह्या लेखाद्वारे त्याविषयी माहिती घेऊयात.
लोहाची कमतरता म्हणजेच अॅनिमिया म्हणजे काय?
जेव्हा तुमच्या शरीरात आवश्यक प्रमाणात लाल रक्तपेशींची कमतरता असते तेव्हा अॅनिमिया होतो. ह्या पेशी तुमच्या संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी जबाबदार असतात. जेव्हा लोहाचे प्रमाण कमी होते, तेव्हा लाल रक्तपेशी तुमच्या शरीरातील ऊतींमध्ये ऑक्सिजन वाहून नेण्यास असमर्थ असतात.
गरोदरपणात अशक्तपणा जाणवणे सामान्य आहे. परंतु, जर अॅनिमिया गंभीर प्रमाणात असेल तर त्यामुळे तुमच्या बाळाला धोका निर्माण होऊ शकतो. जेव्हा तुम्हाला तुमच्या गरोदरपणात लोहाची कमतरता जाणवते, तेव्हा असे होते कारण रक्त तुमच्या संपूर्ण शरीरातील ऊतींमध्ये आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन वाहून नेऊ शकत नाही.
गरोदरपणात तुमच्या शरीरात बरेच बदल होतात कारण तुमचे हृदय गर्भाला पुरेसे पोषण देण्यासाठी थोडेसे कठोर परिश्रम करते. म्हणजेच, तुमच्या रक्ताचे प्रमाण ३०% ते ५०% वाढते. तर, जेव्हा रक्ताचे प्रमाण वाढते तेव्हा तुम्ही काय करावे? अशा वेळी फॉलिक ऍसिड आणि लोहाचा वापर वाढवण्याची शिफारस केली जाते.
लोहाच्या कमतरतेमुळे झालेल्या अॅनिमियाची कारणे
गरोदरपणात अॅनिमियाचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अॅनिमिया. गरोदरपणात जेव्हा तुमचे शरीर पुरेशा प्रमाणात हिमोग्लोबिन तयार करू शकत नाही तेव्हा असे होते. हिमोग्लोबिन हे प्रथिन आहे आणि ते लाल रक्तपेशींमध्ये असते. हे प्रथिन लाल रक्तपेशींना तुमच्या फुफ्फुसातून तुमच्या शरीराच्या इतर भागात ऑक्सिजन वाहून नेण्यास मदत करते.
लोहाच्या कमतरतेमुळे झालेल्या अॅनिमियाची लक्षणे
गरोदरपणात लोह–कमतरतेच्या अशक्तपणाची लक्षणे खाली दिली आहेत:
- हृदयाचे अनियमित ठोके
- थकवा
- छाती दुखणे
- डोकेदुखी
- धाप लागणे
- चक्कर येणे
- हात पाय थंड पडणे
- फिकट गुलाबी किंवा पिवळसर त्वचा
आता, यापैकी काही लक्षणे गरोदरपणात सामान्य आहेत. परंतु, तुम्ही अशक्तपणाच्या या लक्षणांची वाट बघू नका आणि तुमची हिमोग्लोबिन पातळी तपासण्यासाठी रक्त तपासणी करा. जर तुम्हाला आणखी काही त्रास होत असेल, थकवा जाणवत असेल तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी चर्चा केली पाहिजे. सुरक्षित गरोदरपणासाठी तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी माहिती त्यांना दिली पाहिजे.
अॅनिमियाचे निदान
तुमच्या डॉक्टरांनी रक्ताची संपूर्ण तपासणी केल्यानंतर निदान केले जाते, त्यास सीबीसी असेही म्हणतात. हा रिपोर्ट तुमचे रक्त बनवणाऱ्या विविध पेशींची संख्या दर्शवते. तुमचा डॉक्टर अॅनिमिया तपासण्यासाठी कोणत्या चाचण्या करतील त्याचा तपशील येथे आहेत:
१. रक्त चाचण्या
तुमच्या डॉक्टरांनी तुमच्या लाल रक्तपेशींची संख्या कमी आहे असे सांगितल्यास, तुमच्या अशक्तपणाचे निदान केले जाईल. गरोदरपणात तुमचे हिमोग्लोबिन कमी होईल. ही चाचणी नेहमी तुमच्या गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत घेतली जाते, सामान्यतः जेव्हा तुम्ही तुमच्या प्रसूतीपूर्व भेटीसाठी तुमच्या डॉक्टरांना भेट देता तेव्हा डॉक्टर तुम्हाला ही चाचणी करण्यास सांगतील. तुम्ही २८ आठवड्यांच्या गरोदर असताना हिमोग्लोबिन तपासणीसाठी तुमच्या रक्ताची चाचणी केली जाईल.
२. अॅनिमियासाठी चाचण्या
तुमच्या पहिल्या भेटीच्या वेळी घेतलेल्या रक्त चाचण्यांमध्ये सामान्यतः पुढील गोष्टींचा समावेश होतो:
- हिमोग्लोबिन चाचणी: ह्या चाचणीद्वारे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी मोजली जाते.
- हेमॅटोक्रिट चाचणी: रक्तातील लाल रक्तपेशींची टक्केवारी या चाचणीमध्ये तपासली जाते.
गरोदरपणातील अॅनिमियाचे संभाव्य धोके
गरोदरपणात, आपल्या शरीरात लक्षणीय बदल होत असतात. म्हणजेच तुम्हाला रक्तक्षय होऊ शकतो, विशेषत: तुमच्या लोहाची पातळी आवश्यक असलेल्या प्रमाणापेक्षा कमी असल्यास तुम्हाला रक्तक्षय होऊ शकतो. परंतु, काही लोकांना इतरांपेक्षा अशक्तपणाचा धोका जास्त असतो. तर, गरोदरपणात तुम्हाला अॅनिमिया होण्याची अधिक शक्यता असते. गरोदरपणात हिमोग्लोबिनचे सामान्य प्रमाण काय आहे हे तुम्हाला कसे कळेल?
तुमच्या गरोदरपणात लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा होऊ शकतो असे अनेक घटक आहेत. जर तुम्ही पाठोपाठ लगेच दुसऱ्यांदा गरोदर राहिलेला असाल किंवा तुम्ही एकापेक्षा जास्त मुलांसह गर्भवती असाल, तर तुम्हाला रक्तक्षय होण्याचा धोका जास्त असतो. जर तुम्हाला मॉर्निंग सिकनेसमुळे उलट्या होत असतील आणि वारंवारता नेहमीपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला रक्तक्षय होऊ शकतो. तुमच्या गरोदरपणात लोहाचे कमी सेवन हे देखील अशक्तपणाचे कारण आहे. जर तुम्हाला गर्भधारणेपूर्वी मासिक पाळीदरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असेल, तर तुम्हाला अॅनिमिया होण्याचा धोका जास्त असतो.
अॅनिमियावर उपचार
गर्भारपण हा एक महत्त्वाचा प्रवास आहे कारण तुम्ही एका जीवाला जन्म देणार आहात. काहीवेळा, तुमच्या गरोदरपणात तुम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागेल. लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अॅनिमिया हा त्यापैकीच एक आहे. ह्या स्थितीचा उपचार करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे चांगले आणि नियमित पोषण. पौष्टिक आहार घेतल्यास तुम्ही गरोदर असताना आणि गरोदर राहण्याचा प्रयत्न करत असतानाही तुम्हाला त्याची मदत होते. लोहाचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचे तुम्ही सेवन करावे. त्यामुळे तुमच्या शरीराला लोहाचा उत्तम पुरवठा होईल. तसेच त्यामुळे अॅनिमियाची शक्यता कमी होण्यास मदत होते. गडद हिरव्या पालेभाज्या, लाल मांस, शेंगदाणे, अंडी आणि फोर्टिफाइड तृणधान्ये यासारखे पदार्थ खाण्यास सांगितले जातात कारण त्यात भरपूर लोह असते.
लोहयुक्त आहार आहारासोबतच, तुमच्या शरीराला आवश्यक लोह मिळण्यासाठी तुम्ही डॉक्टरांना लोह आणि फॉलिक ऍसिडची जीवनसत्वे लिहून देण्यास सांगू शकता. गरोदरपणाच्या कालावधीत तुम्हाला दररोज किमान २७ मिग्रॅ लोह मिळणे आवश्यक आहे. तुमच्या गरोदरपणात अॅनिमियाचा उपचार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ह्या लोह सप्लिमेंट्सचे सेवन करणे हा आहे.
एक चांगली गोष्ट म्हणजे तुमच्या पहिल्या प्रसूतीपूर्व तपासणीसाठी जेव्हा तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेट देता तेव्हा तुम्हाला अॅनिमियाचा धोका आहे का हे तुमच्या डॉक्टरांना तुम्ही विचारू शकता. तुमच्या बाळाला जन्म दिल्यानंतर ४ ते ६ आठवड्यांनंतर तुम्ही स्वतःची चाचणी करून घेतली पाहिजे. डॉक्टरांनी तुमच्या स्थितीचे विश्लेषण केल्यानंतर, डॉक्टर तुम्हाला हेमेटोलॉजिस्टकडे पाठवू शकतील.
अॅनिमिया कसा टाळावा?
गरोदरपणात तुम्ही संतुलित आहार ठेवावा अशी शिफारस केली जाते, तरीही तुमचे डॉक्टर तुमच्या शरीरात लोहाचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून लोह पूरक औषधे लिहून देऊ शकतात. ही पूरक औषधे म्हणजे फेरस सल्फेट (325 मिग्रॅ) आहेत आणि दिवसातून एकदा त्यांचे सेवन केले पाहिजे. जेव्हा तुम्ही गरोदर नसता त्यापेक्षा गरोदरपणात लोहाची आवश्यकता जास्त असते आणि तुमच्या शरीरातील लोह कमी झाल्यामुळे गंभीर अशक्तपणाची चिन्हे दिसू शकतात.
गरोदरपणात अॅनिमियाचा बाळावर परिणाम होतो का?
संशोधनानुसार, तुमच्या गरोदरपणात लोहाची सौम्य कमतरता तुमच्या बाळावर परिणाम करत नाही. परंतु, जर तुम्ही लोहाच्या सौम्य कमतरतेमुळे येणाऱ्या अशक्तपणावर वेळेवर उपचार केले नाहीत तर तुमच्या गरोदरपणात ही स्थिती अत्यंत गंभीर होऊ शकते. ही स्थिती पहिल्या दोन त्रैमासिकांमध्ये अधिक बिघडू शकते. तुमच्या बाळाच्या विकासासाठी पहिल्या दोन तिमाह्या सर्वात महत्वाच्या आहेत. उपचार न केल्यास, तुमच्या बाळाचे जन्मतः वजन खूप कमी भरण्याचा धोका उद्भवू शकतो. लोहाच्या कमतरतेमुळे मृत बाळाचा जन्म आणि नवजात बाळाचा मृत्यू अशा समस्या देखील उद्भवू शकतात. बाळाच्या आरोग्यावर होणारा त्याचा परिणाम टाळण्यासाठी, तुम्ही नियमित तपासणी केली पाहिजे, चांगल्या प्रमाणात लोहाचे सेवन केले पाहिजे आणि निरोगी आहाराचे पालन केले पाहिजे.
गर्भवती महिलांमध्ये लोह सामग्री वाढवण्यासाठी शिफारस केलेले पदार्थ
निरोगी आणि आनंदी गर्भारपणासाठी पोषक आहार सर्वात महत्वाचा आहे. तुम्ही खात असलेले अन्न तुमच्या आरोग्यासाठी तसेच तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जंक फूड जसे की चिप्स, फॅटीयुक्त अन्न किंवा कोणत्याही प्रकारचे पॅकेज केलेले अन्न इत्यादींचे सेवन केल्यास गरोदरपणात समस्या उद्भवू शकतात. तुमचा आहार बदलून गर्भधारणेदरम्यान हिमोग्लोबिनची पातळी कशी सुधारायची हे पुढे दिलेले आहे.
लोहयुक्त पदार्थ
तुमच्या आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करणे हा निरोगी हिमोग्लोबिन पातळी राखण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. तुम्ही बाजारात गेल्यावर कुठले पदार्थ आणावेत ह्याची यादी पुढे दिलेली आहे:
१. पालक
पालक हा तुमच्या गरोदरपणात तुम्ही खाऊ शकणार्या लोहयुक्त पदार्थांपैकी एक आहे. तुम्हाला फक्त अर्धा कप शिजवलेला पालक खावा लागेल. यामध्ये सुमारे ३ मिग्रॅ लोह असते आणि त्यात बीटा–कॅरोटीन, फोलेट, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम सारखी इतर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हे सर्व घटक तुमच्या गर्भधारणेसाठी उत्तम असतात. तुमच्या आहारात पालकाचा समावेश केल्यास फोलेट–डेफिशियन्सी अॅनिमियाशी संबंधित समस्या दूर होतात.
२. आयर्न–फोर्टिफाइड तृणधान्ये
तुमच्या शरीराला लोह पुरवण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? आयर्न –फोर्टिफाइड धान्यांपासून बनविलेले तृणधान्ये निवडा. तृणधान्यांमधून तुम्हाला प्रत्येक साविंग्ज मधून सुमारे १.५ मिग्रॅ ते २० मिग्रॅ लोह मिळू शकते. दुसरीकडे, गरम तृणधान्ये आणि ओट्स मधून कमी लोह मिळते. ह्यामध्ये लोहाचे प्रमाण प्रति सर्व्हिंग ३.५ मिग्रॅ ते ८ मिग्रॅ पर्यंत असते. आयर्न –फोर्टिफाइड तृणधान्यांमधील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही तृणधान्ये फोलेट आणि कॅल्शियमनि समृद्ध असतात, आणि तुमच्या गर्भारपणासाठी देखील फायदेशीर असतात.
३. मांस
मांस हा लोहाचा आणखी एक चांगला स्रोत आहे. त्यामधून प्रत्येक सर्व्हिंगमधून सुमारे २.६ ते २ मिग्रॅ लोह मिळते. गरोदरपणात मांसाची शिफारस करण्याचे कारण म्हणजे मांसामधून लोह मिळते त्याला हेम–लोह असेही म्हणतात, शरीरात ते सहजपणे शोषले जाते. तुम्हाला चरबीयुक्त मांस खाण्याची गरज नाही कारण इतर मांसामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. पौष्टिक आणि चवदार जेवणासाठी तुम्ही भाज्यांसोबत झटपट मीट स्टिअर फ्राय बनवू शकता.
४. प्रून ज्यूस आणि सुकामेवा
गरोदरपणात आणखी एक उत्तम अन्नपदार्थ म्हणजे प्रून ज्यूस. १०० ग्रॅम प्रून ज्यूस मधून तुम्हाला सुमारे १.२ मिग्रॅ लोह मिळते. प्रून ज्यूस मध्ये लोहाव्यतिरिक्त तंतुमय पदार्थ सुद्धा जास्त प्रमाणात असतात आणि बद्धकोष्ठतेसाठी त्याची उत्कृष्ट मदत होते.
परंतु, जर तुम्हाला प्रून ज्यूस आवडत नसेल तर तुम्ही सुकामेव्याची निवड करू शकता. अर्धा कप वाळलेल्या जर्दाळूमध्ये ३.६ मिग्रॅ लोह, वाळलेल्या पीचमध्ये ४.८ मिग्रॅ लोह, प्रून्स मध्ये ३.८ मिग्रॅ लोह आणि मनुक्यामध्ये २.६ मिग्रॅ लोह असते. सुकामेव्या मध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात आणि ते गरोदरपणातील बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यास मदत करतात.
५. बटाटा
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, चांगला जुना बटाटा देखील गरोदरपणातील लोहाची कमतरता कमी करण्यास मदत करतो. बटाट्यामध्ये केवळ व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते असे नाही तर ते लोहाचे चांगले स्रोत देखील आहेत.
एका बटाट्यातून सुमारे २.७ मिग्रॅ लोह मिळते. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन बी ६ आणि तंतुमय पदार्थ देखील भरपूर असतात. सकस जेवणासाठी तुम्ही झटपट बटाट्याची सॅलड किंवा बटाट्याची भाजी बनवू शकता.
६. बीन्स
बीन्स देखील लोहाचा एक चांगला स्त्रोत आहे, मग ते लाल, काळे किंवा राजमा कुठल्याही प्रकारचे असोत. परंतु, पांढऱ्या सोयाबीनमध्ये लोहाचे प्रमाण सर्वाधिक असते. पांढऱ्या सोयाबीनच्या प्रति अर्धा–कप सर्व्हिंग मधून ३.८ मिग्रॅ लोह मिळते. या पांढर्या बीन्सचा वापर झटपट, चटपटीत करी किंवा सूप बनवण्यासाठी केला जाऊ शकतो
७. भोपळ्याच्या बिया
काहीतरी तोंडात टाकावेसे वाटतेय का? चिप्सच्या त्या पिशव्या बाजूला ठेवा आणि मूठभर भोपळ्याच्या बिया घ्या कारण त्यामधून तुम्हाला ४१ मिग्रॅ लोह मिळेल. ह्या भोपळ्याच्या बिया तुम्ही भाजून ठेवू शकता आणि प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला हव्या असतील तेव्हा तुम्ही त्या खाऊ शकता. या स्नॅकचा आनंद घेण्यासाठी भोपळ्याच्या बिया कुरकुरीत भाजून घेणे हा देखील एक चांगला मार्ग आहे
वरील सर्व पदार्थ लोह समृद्ध आहेत आणि गरोदरपणात तुम्हाला दररोज आवश्यक असलेले लोह मिळत आहे ना ह्याकडे लक्ष द्या. या पदार्थांचे सेवन केल्याने गरोदरपणात लोहाची कमतरता टाळण्यास मदत होईल.
गर्भारपण हा एक अविस्मरणीय प्रवास आहे. ह्या प्रवासाच्या आठवणींनी तुमच्या चेहऱ्यावर हास्य उमटेल. परंतु, कोणतीही गर्भधारणा विशिष्ट आव्हानांशिवाय होत नाही. रक्तक्षय हे असेच एक आव्हान आहे. त्यातील एक चांगला भाग म्हणजे कमतरता सहजपणे टाळता येऊ शकते. बाळासाठी प्रयत्न करीत असताना सुद्धा तुम्ही ह्या कमतरतेवर काम करू शकता आणि लोहाची पातळी उत्तम असल्याची खात्री करू शकता. जर तुम्ही आधीच गरोदर असाल, तर तुमच्या डॉक्टरांशी जोखमींविषयी चर्चा करा आणि तुमच्या शरीरातील लोहाचे प्रमाण योग्य राखण्यासाठी डॉक्टरांना उपाय विचारू शकता.
आणखी वाचा: