गर्भारपण

गरोदरपणातील खांदेदुखी

गरोदरपणाचा काळ हा तणावपूर्ण आणि रोमांचक असा दोन्ही प्रकारचा असू शकतो. गर्भधारणेमुळे स्त्रीमध्ये अनेक शारीरिक बदल होतात. शेवटी, तुमच्या आत एक संपूर्ण नवीन जीव वाढत आहे! परंतु, गरोदरपणात काही अप्रिय अनुभव आणि समस्या देखील येतात. असेच एक लक्षण म्हणजे गरोदरपणात खांदा दुखणे. खांदेदुखी ही 40% गर्भवती महिलांना भेडसावणारी समस्या आहे. तुम्ही निराश होण्यापूर्वी, लक्षात ठेवा की तुमचे शरीर आत वाढणाऱ्या एका जीवाला आधार देत आहे आणि त्याची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. हे का घडते आणि त्यापासून कसे मुक्त व्हावे तसेच खांदेदुखी कशी प्रतिबंधित करावी ह्याविषयीची सर्व माहिती ह्या लेखामध्ये दिलेली आहे.

गरोदरपणात खांदा दुखणे सामान्य का आहे?

शरीरातील इतर सांध्यांसह खांद्याच्या सांध्यामध्ये गरोदरपणात अनेक बदल होतात. गर्भवती स्त्रीच्या  शरीरात रिलॅक्सिन नावाचे हार्मोन तयार होते. हे हॉर्मोन शरीरातील सर्व अस्थिबंधनांना सैल करते. झोपल्यावर, उभे राहिल्यावर आणि चालण्याच्या स्थितीत बदल झाल्यास, अस्थिबंधन सैल होऊ शकते आणि गर्भवती स्त्रियांचे खांदे दुखू शकतात. गर्भवती स्त्रिया ह्या जखम होणे किंवा पडणे इत्यादींप्रती देखील अधिक संवेदनाक्षम असतात. त्यामुळे खांद्यामध्ये होणाऱ्या सौम्य वेदनांमुळे तीव्र अस्वस्थता निर्माण होऊ शकते. त्यामुळे गरोदरपणात खांद्याच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आणखी वाचा: गरोदरपणातील पोटदुखी

गरोदरपणात खांदेदुखीची लक्षणे

काहीवेळा, गरोदरपणात खांदे दुखणे हे झोपण्याच्या स्थितीत होणारा बदल, संप्रेरकांमधील बदल तसेच स्नायूंच्या कडकपणामुळे होते. गरोदरपणात खांदेदुखीची इतर लक्षणे आहेत:

गर्भवती महिलांमध्ये खांदा दुखण्याची कारणे

खांदेदुखी हे कुठल्या तरी आरोग्य समस्येचे लक्षण असू शकते

1. पहिल्यातिमाहीतील वेदना

2. दुसऱ्या तिमाहीतील वेदना

3. तिसऱ्या तिमाहीतील वेदना

आणखी वाचा:  गरोदर असताना छातीत दुखणे – कारणे आणि उपचार

खांदेदुखीवर उपचार

गरोदरपणात काही वेदनाशामक औषधे हानिकारक असू शकतात आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नयेत. त्यामुळे, खांदेदुखीसाठी पेनकिलर वापरण्याऐवजी, तुम्ही काही सोप्या वेदना कमी करणारे उपाय अवलंबू शकता.

खांदेदुखी कशी टाळाल?

बाळाला सामावून घेण्यासाठी तुमचे शरीर बदलत आहे. त्यामुळे गर्भवती स्त्रीच्या जीवनशैलीत निरोगी बदल घडायला हवेत. ज्या क्षणी तुम्ही निरोगी पर्यायांची निवड कराल, त्या क्षणी तुम्ही खांदेदुखी टाळू शकता. गरोदरपणात खांदेदुखी टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे निरोगी राहणे. खांदेदुखी टाळण्यासाठी येथे काही टिप्स आहेत:

तुम्ही गरोदर असताना खांद्याच्या वेदना कमी करण्यासाठी इतर टिप्स

मी डॉक्टरांना कधी फोन करावा?

खांदेदुखी अनेक दिवस चालू राहिल्यास तसेच जास्त ताप, गुदाशयावर दाब, खांद्याचे सांधे स्थिर राहणे, आणि त्वचेला सूज येणे अशी लक्षणे आढळ्यास गर्भवती महिलेने डॉक्टरांना फोन करण्यास अजिबात संकोच करू नये.

सतत विचारले जाणारे प्रश्न

गरोदरपणातील खांदेदुखीवर वारंवार विचारले जाणारे प्रश्न खालीलप्रमाणे

1. माझ्या शोल्डर ब्लेडमध्ये वेदना का आहेत?

ह्यास इंग्रजीमध्ये 'शोल्डर ब्लेड पेन' असे म्हणतात. पोश्चर नीट नसल्यास म्हणजेच जेव्हा पाठीचा वरचा भाग आणि खांदे पुढे वाकतात तेव्हा ही समस्या उद्भवते.  शोल्डर ब्लेड एकमेकांपासून वेगळे झाल्यामुळे वेदना होतात. वाहन चालवणे, जास्त वेळ कामावर बसणे किंवा पोहणे इत्यादी क्रिया केल्यास ही परिस्थिती आणखी वाढवू शकते.

2. मला माझ्या खांद्याच्या टोकाला वेदना होत आहेत. कृपया मदत करा!

काही गरोदर महिलांना खांद्याच्या टोकाला, जिथे हात सुरू होतात तिथे वेदना होतात. हे दुर्मिळ आहे आणि एक्टोपिक गर्भधारणेच्या लक्षणांपैकी एक आहे.

3. डावा हात आणि खांदा दुखण्यासाठी मी काय करावे?

मज्जातंतू दाबले गेल्यामुळे किंवा सांधेदुखीमुळे डाव्या हातामध्ये किंवा खांद्यामध्ये वेदना होऊ शकतात. हे हृदयविकाराचे लक्षण देखील असू शकते. तुम्ही ताबडतोब तुमच्या डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.

4. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात खांदा दुखतो का?

होय, गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात खांदे दुखणे शक्य आहे. परंतु, एक्टोपिक गर्भारपणामध्ये खांदा दुखणे सामान्य आहे. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले. गर्भारपण वेदनांसह येते, ज्यापैकी बहुतेक वेदना टाळता येत नाहीत. पुरेशी विश्रांती, हलका व्यायाम आणि पौष्टिक खाण्याच्या सवयी बाळगल्यास, अस्वस्थता कमी करण्यासाठी खूप मदत होते. लक्षात ठेवा की कोणतीही वेदना किंवा लक्षणे तुमच्या दैनंदिन कामात व्यत्यय आणू लागल्यास डॉक्टरांना दाखवणे आवश्यक आहे. आणखी वाचा: गरोदरपणातील पाठदुखी – प्रकार, कारणे आणि उपचार गरोदरपणातील मानेचे दुखणे- कारणे, घरगुती उपाय आणि प्रतिबंध
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved