प्रसूती

लवकर प्रसूती प्रवृत्त करणारे १२ अन्नपदार्थ

बाळाची आतुरतेने वाट बघत असताना, गरोदरपणाचा शेवटचा टप्पा काही स्त्रियांसाठी खरोखर अस्वस्थ करणारा असू शकतो. जर तुमची प्रसूतीची तारीख उलटून गेली असली तरी सुद्धा तुमची नैसर्गिक प्रसूती व्हावी असे तुम्हाला वाटत असेल.  काही अन्नपदार्थ प्रसूतीस कारणीभूत ठरू शकतात ह्या सिद्धांताचे पुरेसे संशोधन झालेले नाही. तरीसुद्धा अनेक स्त्रियांच्या मते काही खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर तुमची प्रसूती लवकर होऊ शकते. म्हणून, जर तुम्ही प्रसूती लवकर आणण्यासाठी काही करून बघण्यास तयार असाल, तर येथे आमच्याकडे काही खाद्यपदार्थांची यादी आहे. हे पदार्थ प्रसूती प्रवृत्त करू शकतात असे सामान्यपणे म्हंटले जाते. चला तर मग हा लेख वाचूयात!

काही खाद्यपदार्थ खाल्ल्याने यशस्वीरित्या प्रसूती होऊ शकते का?

गरोदरपणाच्या विशेषतः शेवटच्या टप्प्यात गरोदरपणाचा सुंदर प्रवास थोडा अस्वस्थ करणारा होऊ शकतो.  विशेषत: जर तुम्ही तुमची प्रसूतीची देय तारीख ओलांडलेली असेल तर ही अस्वस्थता आणखी वाढू शकते. अश्या परिस्थितीत, स्त्रिया नैसर्गिकरित्या प्रसूतीसाठी सर्व संभाव्य मार्ग शोधतात आणि प्रयत्न करतात. असे मानले जाते की काही अन्नपदार्थांची अशा परिस्थितीत मदत होते आणि हे अन्नपदार्थ प्रसूतीस मदत करतात. पण ह्या अन्नपदार्थांमुळे यशस्वीरित्या प्रसूती होते का? बरं, प्रसूतीस मदत करणाऱ्या ह्या अन्नपदार्थांविषयी कोणतेही संशोधन किंवा पुरावे नाहीत. परंतु गरोदरपणाच्या शेवटी, यापैकी बहुतेक अन्नपदार्थांमुळे आई किंवा बाळाला धोका नसतो आणि प्रसूतीसाठी ह्या पदार्थांचे सेवन केले जाऊ शकते.

नैसर्गिकरित्या प्रसूती प्रवृत्त करण्यास मदत करणारे पदार्थ

प्रसूती प्रवृत्त करण्यासाठी तुम्ही खाऊ शकता अश्या काही अन्नपदार्थांची यादी इथे दिलेली आहे  आणि हे पदार्थ तुम्हाला तुमचे बाळ लवकर दिसण्यासाठी मदत करू शकतात.

1. अननस

ताज्या अननसामध्ये ब्रोमेलेन नावाचे एन्झाइम असते जे क्वचितच इतरत्र आढळते. ब्रोमेलेन गर्भाशयाला मऊ करण्यास स्नायूंना उत्तेजित करण्यास मदत करते आणि ते प्रसूती सुरू करण्यासाठी करण्यासाठी मदत करू शकते.

2. हिरवी पपई

कच्च्या हिरव्या पपईमध्ये पापिन हे एन्झाइम मुबलक प्रमाणात असते. पपईच्या पानांमध्ये लेटेक्स असते, आणि ते प्रोस्टॅग्लॅंडिन आणि ऑक्सिटोसिन म्हणून काम करते आणि गर्भाशयाचे आकुंचन सुरू करण्यास मदत करते. पपई जितकी जास्त पिकते तितके पापीन नष्ट होते, म्हणूनच पिकलेल्या पपईचे सेवन केल्याने प्रसूतीवर कोणताही परिणाम होत नाही.

3. मसालेदार पदार्थ

गरोदर स्त्रियांनी प्रसूतीसाठी मसालेदार अन्न खाणे हे अगदी सामान्य असले तरीसुद्धा बाळाला जन्म देणार्‍या स्त्रियांनी नैसर्गिक आणि वेदनारहित प्रसूतीसाठी मसालेदार पदार्थ खाणे टाळले पाहिजे. बाळाचा जन्म नैसर्गिकरित्या होतो तेव्हा, बाळ जन्म कालव्याच्या खाली सरकत असताना पडणाऱ्या दबावामुळे एंडोर्फिन हे संप्रेरक सोडले जाते. त्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. काही मसालेदार पदार्थ कॅप्सेसिन च्या निर्मितीस मदत करतात आणि ते प्रसूतीदरम्यान शरीराच्या विरोधात काम करू शकतात. हे कॅप्सेसिन प्रसूतीदरम्यान शरीरात निर्माण होणाऱ्या नैसर्गिक एंडॉर्फिनचा प्रतिकार करते.

4. ज्येष्ठमध (ब्लॅक लिकोरिस)

ज्येष्ठमध त्यामध्ये असलेले केमिकल ग्लायसिरिझिनमुळे प्रोस्टॅग्लॅंडिनचे उत्पादन उत्तेजित करू शकते. परंतु त्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने सौम्य अतिसार होऊ शकतो,  त्यामुळे आतड्यांचे थोड्या प्रमाणात आकुंचन होते आणि प्रसूती होते.

5. लसूण

लसूण आतड्यांना उत्तेजित करून पोट रिकामे राहण्यासाठी मदत करते. त्यामुळे प्रसूती सुरू होण्यास मदत होते. प्रसूती प्रवृत्त करण्यासाठी लसूण हा सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे.

6. रेडरास्पबेरी लीफ टी

रास्पबेरी चहा गर्भाशयाला मजबूत करतो असे मानले जाते. गर्भाशयातील स्नायूंमध्ये आकुंचन निर्माण होते असे मानले जाते. तुम्ही गरोदरपणाच्या बत्तीसव्या आठवड्यापासून दररोज रेड रास्पबेरी लीफ टी प्यायल्यास, तुमची वेळेवर प्रसूती होण्यास मदत होते.

7. एरंडेल तेल

एरंडेल तेल थेट झाडाच्या बियांमधून काढले जाते आणि त्यामुळे प्रसूती लवकर होण्यास मदत होते. स्त्रियांनी शतकानुशतके प्रसूती होण्यासाठी एरंडेल तेल वापरले आहे. एरंडेल तेलाचे सेवन सुरक्षित असले तरी, त्यामुळे क्वचित प्रसंगी उलट्या आणि जुलाब होऊ शकतात,आणि त्यामुळे प्रसूतीदरम्यान खूप अस्वस्थता येऊ शकते.

8. जिऱ्याचा चहा

पचनसंस्थेच्या समस्यांमध्ये जिऱ्याचे सेवन केल्यास मदत होते. त्यामुळे पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळतो आणि मासिक पाळी सुरू होण्यास मदत करते. ह्याचा उपयोग श्रम प्रवृत्त करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. जर तुम्हाला चव आवडत नसेल तर चव चांगली होण्यासाठी थोडी साखर किंवा मध घाला.

9. ब्लॅक कोहोश

या औषधी वनस्पतीचा वापर मासिक पाळी, रजोनिवृत्ती आणि इतरांशी संबंधित महिलांच्या आरोग्याच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी केला गेला कारण त्याचे परिणाम शरीराद्वारे नैसर्गिकरित्या तयार केलेल्या इस्ट्रोजेनसारखेच असतात. याचा उपयोग गर्भवती स्त्रीच्या प्रसूतीसाठी देखील केला जात असे. कोहोशचे निळा आणि पांढरा असे आणखी दोन प्रकार आहेत.  परंतु हे लक्षात ठेवा की ते ब्लॅक कोहोशसारखे नाहीत आणि त्याऐवजी ते वापरले जाऊ नये.

10. इव्हनिंग प्रिमरोज ऑइल

गर्भवती स्त्रियांसाठी इव्हनिंग प्राइमरोज ऑइलची बऱ्याचदा शिफारस केली जाते. शरीर तेलातील पदार्थाचे प्रोस्टाग्लॅंडिनमध्ये रूपांतर करते. त्यामुळे गर्भाशयाचे मुख मऊ होण्यास मदत होते. आणि परिणामी प्रसूती कळा सुरु होण्यास मदत होते.

11. बाल्सामिक व्हिनेगर

बाल्सॅमिक व्हिनेगरचा उगम इटलीमध्ये आहे. ताज्या कापणी केलेल्या पांढऱ्या द्राक्षाच्या रसापासून हे व्हिनेगर तयार केले जाते. हे बऱ्याचदा सॅलड ड्रेसिंग म्हणून वापरले जाते. काही स्त्रिया प्रसूतीसाठी बाल्सामिक व्हिनेगर घेतात कारण हे व्हिनेगर मळमळ, उलट्या किंवा जुलाब होऊ न देता एरंडेल तेलाचे कार्य करते.

12. तुळस आणि ओरेगॅनोव्हिनेगर

एग्प्लान्ट परमेसन डिशसाठी या औषधी वनस्पती मुख्य मसाला आहेत आणि प्रसूतीसाठी गर्भवती महिलांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

प्रसूती प्रवृत्त करणाऱ्या पाककृती

येथे काही खाद्यपदार्थांच्या पाककृती आहेत त्यामुळे तुम्हाला सहज प्रसूती होण्यासाठी मदत होऊ शकते.

1. एग्प्लान्ट परमेसन

लागणारे साहित्य: कृती:
 1. वांग्याचे पातळ काप करा आणि पेपर टॉवेलवर ठेवा.
 2. वांग्याच्या कापांना मीठ लावून बाजूला ठेवा. ओव्हन 375डिग्री फॅरनहाइट वर गरम करा.
 3. वांग्याचे काप पिठात आणि नंतर ब्रेडक्रंबमध्ये बुडवा.
 4. हे काप दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत तेलात परतून घ्या.
 5. वांग्याचे काप एका बेकिंग पॅनमध्ये ठेवा आणि त्यांना सॉस लावा, त्यानंतर परमेसन, रोमानो आणि रिकोटा चीजचे थर लावा.
 6. शेवटी, त्यावर मोझारेला चीज टाका आणि काप सोनेरी तपकिरी होईपर्यंत बेक करा.

2. प्रसूती प्रवृत्त करणारी कोशिंबीर

लागणारे साहित्य: कृती:
 1. रोमेन लेट्यूस, लाल कोबी आणि वॉटरक्रेसचे समान भाग घ्या, ते स्वच्छ धुवून त्याचे लहान तुकडे करा.
 2. एका मोठ्या भांड्यात ते घ्या आणि त्यात काही बाल्सामिक व्हिनेग्रेट ड्रेसिंग घाला.
 3. त्यात कुस्करलेले गोर्गोनझोला चीज घाला.

3. रेड बीन सूप

लागणारे साहित्य: कृती:
 1. एका भांड्यात रेड सोयाबीन रात्रभर भिजत ठेवा.
 2. पाणी काढून टाका, आणि तुम्हाला दिसेल की बीन्सचा आकार दुपटीने वाढला आहे.
 3. बीन्स कुकरमध्ये घालून मंद आचेवर चांगले शिजवून घ्या.
 4. साखर घालून सेवन करा.
4. हॉट विंग्ज लागणारे साहित्य: कृती:
 1. चिकन विंग्स सोडून सर्व साहित्य घालून क्रॉकपॉटमध्ये ठेवा.
 2. अधूनमधून ढवळत असताना दोन तास मंद आचेवर शिजवा.
 3. ओव्हन ४०० डिग्री फॅरनहाइट ला प्रीहीट करा.
 4. प्रीहिटेड ओव्हनमध्ये सुमारे 30मिनिटे चिकन विंग्ज घालून शिजवा. मऊ झाल्यावर पुन्हा 25 मिनिटे शिजवा.
 5. चिकन विंग्ज गरम सॉस क्रॉकपॉटमध्ये ठेवा आणि एक तास मंद आचेवर शिजवा.
 6. गरमागरम सर्व्ह करा.

प्रसूती प्रवृत्त करण्यासाठी अन्न सेवन करताना घ्यावयाची जबाबदारी

प्रसूती उत्तेजित करणारे पदार्थ खाण्याआधी, खालील काळजी घ्या  -

प्रसूती त्वरित होण्यासाठी इतर टिप्स

प्रसूतीस उत्तेजन देण्यास मदत करणारे अन्न खाणे पुरेसे नसते, त्यामुळे प्रसूतीस मदत करण्यासाठी इथे काही टिप्स दिलेल्या आहेत त्या वापरून पहा.

1. व्यायाम

व्यायामामुळे तुमचे शरीर सक्रिय आणि निरोगी राहते जेणेकरुन प्रसूतीमध्ये येणारा शारीरिक ताण सहन करता येईल. तुमच्या हृदयाला गती देणारा कोणताही व्यायाम चांगला असतो.

2. एक्यूपंक्चर

बाळाच्या जन्मात अत्यावश्यक भूमिका बजावणारे ऑक्सिटोसिन सोडण्यासाठी शरीराला उत्तेजित केले जाईल. ही पद्धत शरीराच्या विशिष्ट अवयवांवर नियंत्रण ठेवणाऱ्या भागांमध्ये अतिशय बारीक सुया टोचण्याचा एक प्राचीन चिनी मार्ग आहे.

3. एक्यूप्रेशर

अॅक्युपंक्चरमध्ये बारीक सुयांचा वापर करणे आवश्यक असताना, अॅक्युप्रेशरमध्ये शरीराच्या मेरिडियन प्रणालीच्या बाजूने चालणाऱ्या शरीराच्या भागांवर दबाव टाकला जातो. एक्यूप्रेशरसाठी कोणत्याही अपॉइंटमेंट घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

4. शारीरिक संबंध

लैंगिक क्रिया ऑक्सिटोसिन तयार करण्यासाठी मदत करू शकते. ऑक्सिटोसिन प्रसूती कळा सुरु होण्यासाठी आवश्यक असते. तुम्ही नऊ महिन्यांच्या गरोदर असतानाही लैंगिक संबंध ठेवणे सुरक्षित असले तरी, गर्भजल पिशवी फुटल्यानंतर लैंगिक संबंध ठेवणे सुरक्षित नाही कारण त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.

5. स्तनाग्रांना उत्तेजना

जेव्हा स्तनाग्र उत्तेजित होतात तेव्हा ते गर्भाशयाला आकुंचन देण्यास कारणीभूत ठरू शकतात, त्यामुळे  प्रसूती होण्यास मदत होते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. प्रसूतीसाठी प्रयत्न करताना कोणते पदार्थ टाळावेत?

प्रसूतीसाठी प्रयत्न करताना, तुम्ही जास्त चरबीयुक्त, स्निग्ध किंवा मसालेदार पदार्थ टाळले पाहिजेत, कारण हे पदार्थ पचायला जास्त कठीण असतात.

2. प्रसूतीस उत्तेजन देणारे काही गरम पदार्थ कोणते आहेत?

तुमची प्रसूतीची तारीख उलटून गेल्यावर प्रसूती सुरू होण्यासाठी तुम्हाला काहीही करून पाहण्याचा मोह होऊ शकतो. हॉट चिटो, जिंजर कुकीज, हॉट विंग्स आणि जलापेनो पेपर्स हे काही गरम पदार्थ प्रसूतीस उत्तेजना देऊ शकतात.

3. मसालेदार अन्नामुळे मुदतपूर्व प्रसूती होते का?

मसालेदार अन्न प्रसूती प्रवृत्त करण्यास मदत करू शकतात. या सिद्धांताला कोणताही पुरावा नाही. तरीही, हे पदार्थ तुमच्या आतड्यांना त्रास देऊ शकतात. त्यामुळे गर्भवती स्त्रियांना पेटके येऊ शकतात आणि गर्भाशयाचे आकुंचन होऊ शकते.

4. मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर प्रसूती होण्यास किती वेळ लागेल?

मसालेदार पदार्थ खाल्ल्याने प्रसूती होऊ शकते हे सिद्ध करणारा कोणताही वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध पुरावा नसला तरी फास्ट फूड खाल्ल्यानंतर प्रसूती होऊ शकते असे नाही. नेहमीच नैसर्गिक प्रसूती होऊ द्यावी असा सल्ला दिला जातो. त्यामुळे रुग्णालयात कमी काळ राहावे लागते आणि बरे होण्याची वेळ लवकर येते. परंतु जर तुम्हाला तुमची प्रसूती व्हावी असे वाटत असेल तर तुम्ही निवडलेल्या कोणत्याही पर्यायाविषयी तुमच्या डॉक्टरांशी बोला. आणखी वाचा: तुम्ही लक्ष ठेवण्याची गरज असलेली प्रसूतीची लक्षणे प्रसूती प्रेरित करण्यासाठी गरोदरपणात एरंडेल तेलाचा वापर करणे
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved