Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणाच्या ११ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन

गरोदरपणाच्या ११ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन

गरोदरपणाच्या ११ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन

गरोदरपणाच्या ११ व्या आठवड्यापर्यंत तुमच्या पोटातील भ्रूणाचे गर्भामध्ये रूपांतर होऊ लागते. तुमच्या बाळाचा चेहरा आणि जननेंद्रिय विकसित होत असतात. गरोदरपणाच्या ११ व्या आठवड्याच्या स्कॅन मध्ये तुमचे वाढणारे बाळ स्पष्ट दिसते. कोणत्याही विसंगती, सिंड्रोम किंवा विकृतीची शक्यता तपासून पाहण्यासाठी ११व्या आठवड्यांचा स्कॅन केला जातो.

११ आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनचा उद्देश

पहिल्या तिमाहीमधील गरोदरपणाचे स्कॅन नेहमीच विशेष असतो कारण ह्या स्कॅनमध्ये वाढणारे बाळ दिसते. ११व्या आठवड्यांच्या स्कॅन मध्ये पहिल्यांदाच तुमचे बाळ कसे दिसते हे तुम्हाला पाहता येईल. हा सर्वात प्रारंभिक टप्पा आहे आणि त्यामध्ये डॉक्टर बाळामध्ये काही विसंगती असल्यास त्या शोधू शकतात. ११ व्या आठवड्यातील स्कॅनचे उद्देश अनेक आहेत. ११व्या आठवड्यातील स्कॅन का चुकवू नये ह्याची कारणे खालीलप्रमाणे

  • ११ आठवड्यांच्या स्कॅन दरम्यान, डाऊन सिंड्रोम सारख्या गुणसूत्र विकृतींसाठी गर्भाची तपासणी केली जाते. निदान करण्यासाठी रक्त तपासणीच्या परिणामांसह स्कॅनच्या परिणामांचे मूल्यांकन केले जाते
  • प्लेसेंटाची स्थिती आणि आकार तपासला जातो
  • अम्नीओटिक द्रवपदार्थाचे प्रमाण मोजले जाते
  • गर्भाच्या मानेखालील ऊतींमधील अर्धपारदर्शक जागा म्हणून मोजली जाणारी न्यूकल ट्रान्सल्युसेन्सी (NT), ही चाचणी विकृती किंवा जोखीम असल्यास त्याविषयी जाणून घेण्यास वापरली जाते. कोणताही जन्मजात ह्रदयाचा आजार तर नाही ना ह्यासाठी न्यूकल ट्रान्सल्युसेन्सी चा वापर मार्गदर्शक तत्त्व म्हणून केला जातो
  • एकाधिक गर्भधारणा, जर असेल तर, या स्कॅन दरम्यान स्पष्टपणे दिसतात. जुळी मुले सहसा या टप्प्यावर दोन स्पष्टपणे स्वतंत्र गेस्टेशनल सॅक म्हणून दिसतात
  • गर्भधारणेचे सामान्य आरोग्य मूल्यांकन केले जाते
  • गर्भाच्या वाढीच्या आधारे बाळाचे गर्भावस्थेतील वय तपासले जाते

तुमच्या ११ आठवड्यांच्या स्कॅनची तयारी कशी करावी?

गर्भाशय ओटीपोटाच्या खालच्या भागात असल्याने, मूत्राशय पूर्ण भरलेले असल्यास स्कॅन दरम्यान गर्भ चांगला सुस्पष्ट दिसण्यास मदत होते. तुम्ही थोडे जास्त पाणी पिऊन स्वतःला स्कॅनसाठी तयार करू शकता. परंतु काही सोनोग्राफर अर्धवट भरलेले मूत्राशय पसंत करतात. सहजपणे पोट उघडे ठेवता येईल असे आरामदायी आणि सैल कपडे घातल्यास सोनोग्राफीची प्रक्रिया सुलभ होते.

गरोदरपणातील ११ व्या आठवड्यांच्या सोनोग्राफीला किती वेळ लागतो?

गर्भारपणाच्या ११ आठवडयांनी पहिल्या तिमाहीतील अल्ट्रासाऊंड करण्यासाठी साधारणपणे काही मिनिटे लागतात आणि ही एक सोपी प्रक्रिया आहे. अनुभवी सोनोग्राफर न्यूकल ट्रान्सलुसेन्सी अगदी सहजपणे मोजतात. ते इतर महत्त्वाच्या वाढीच्या मापदंडांची देखील तपासणी करतात जसे की बाळाच्या डोक्याचा घेर, गेस्टेशनल सॅकचा व्यास, नाळेची स्थिती आणि आकार इत्यादी. गर्भाच्या स्थितीमुळे स्कॅनसाठी वेळ लागू शकतो. कधीकधी बाळ एका बाजूला वळलेले असते त्यामुळे मानेखालच्या उतींचे मोजमाप करणे कठीण जाते. बाळाची योग्य स्थिती मिळेपर्यंत सोनोग्राफर स्कॅन पुन्हा करून घेण्याचा सल्ला देतात.

११ आठवड्यांचे अल्ट्रासाऊंड स्कॅन कसे केले जाते?

गरोदरपणाच्या ११ व्या आठवड्यात स्कॅन करताना ओटीपोटावर कूलिंग जेल लावले जाते आणि गर्भाचे स्पष्ट दृश्य मिळविण्यासाठी पोटावर फिरवले जाते. ट्रान्सड्यूसर उपकरण अल्ट्रासाऊंड लहरी तुमच्या गर्भाशयात पाठवते. सर्व अंतर्गत आणि बाह्य अवयवांचे चांगले दृश्य पाहण्यासाठी बाळाच्या प्रतिमा वरून आणि बाजूने घेतल्या जातात.

११ आठवड्यांचे अल्ट्रासाऊंड स्कॅन कसे केले जाते?

स्कॅनमध्ये काय पाहिले जाऊ शकते?

अनेक स्त्रिया ११ आठवड्याच्या अल्ट्रासाऊंडबद्दल चिंतित असतात. बाळामध्ये काही विकृती तर नाही ना हे तपासण्यासाठी हे स्कॅन महत्वाचे असते परंतु तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुमचे बाळ हालचाल करत असताना पाहण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल त्यामुळे तुम्ही तयार रहा.

११ आठवड्यांच्या बाळाचे हात पाय दिसत असल्याने ते अधिक मानवी दिसते. ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाचे डोके आणि हाडे चांगल्या प्रकारे विकसित होतात. डोके मोठे असते आणि शरीर तुलनेने लहान असते. तुम्ही तुमच्या बाळाला गर्भजलामध्ये उसळताना आणि लाथा मारताना पाहू शकता. ह्या आठवड्यात बाळाचे जननेंद्रिय तयार होऊ लागते परंतु स्कॅनमध्ये ते स्पष्टपणे दिसू शकत नाहीत. तुमचा सोनोग्राफर या टप्प्यावर बाळाच्या लिंगावर निष्कर्ष काढू शकत नाही. या अवस्थेतील गर्भ फक्त एक किंवा दोन इंच लांब असतो परंतु त्याचे अवयव वेगाने विकसित होत असतात.

स्कॅनमध्ये काही विकृती दिसल्यास काय करावे?

जर ११आठवड्याच्या गर्भाच्या अल्ट्रासाऊंडमध्ये गुणसूत्रातील विकृतींची शक्यता वाटत असेल, तर इतर चाचण्यांबद्दल तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलू शकता. स्कॅनमध्ये दिसत असलेली एनटी मूल्ये गर्भाच्या असामान्यतेसाठी पुरेशी नाहीत. ट्रायसोमी २१ (डाउन सिंड्रोम) आणि ट्रायसोमी १८ निश्चित करण्यासाठी आणि स्कॅनमधील निष्कर्षांची पुष्टी करण्यासाठी रक्त तपासणी केली जाते. गर्भाचा डीएनए तपासण्यासाठी डॉक्टर ऍम्नीऑसेन्टेसिस नावाची प्रक्रिया देखील सुचवू शकतात. त्यामध्ये गर्भपात होण्याचा थोडासा धोका असतो आणि बाळाचे आईवडील डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर त्याबाबतचा निर्णय घेऊ शकतात.

ह्या प्रक्रिया टाळण्यासाठी, तुम्ही १८२० व्या आठवड्यातील अनोमॉली स्कॅनची प्रतीक्षा करू शकता. हे स्कॅन असामान्य वाढीचे काही सौम्य संकेतक शोधू शकतात. ह्या सर्व संकेतांच्या आधारे, डॉक्टर किंवा अनुवांशिक सल्लागार तुम्हाला त्याचे निदान करण्यात मदत करतील आणि पुढील कारवाई बद्दल सल्ला देतील.

११ व्या आठवड्यातील स्कॅन गर्भातील कोणत्याही जन्मजात विसंगती ओळखण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. निदान करण्यासाठी फक्त स्कॅन पुरेसा नसला तरी पुढील चाचण्यांसाठी हा स्कॅन निश्चितपणे मार्गदर्शक म्हणून काम करतो.

मागील आठवडा:गरोदरपणाच्या १० व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन
पुढील आठवडा: गरोदरपणाच्या १२ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article