Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसूतीनंतर घ्यायची काळजी प्रसूतीनंतर वजन कसे कमी कराल?

प्रसूतीनंतर वजन कसे कमी कराल?

प्रसूतीनंतर वजन कसे कमी कराल?

बाळाचा जन्म झाल्यानंतर, बाळाच्या दिनचर्येनुसार तुमची नवीन दिनचर्या सुरु होते. त्यानंतर कदाचित तुम्ही पुन्हा पूर्ववत होण्याचा विचार करू लागता. बऱ्याचशा स्त्रिया गरोदरपणात वाढलेले वजन अगदी सहजपणे कमी करतात, परंतु काही नव्यानेच आई झालेल्या स्त्रियांसाठी ते खूप कठीण असते. जर तुम्ही वजन कमी करून पूर्ववत होण्यास उत्सुक असाल तर आमच्याकडे काही टिप्स आहेत. ह्या टिप्स नक्कीच तुम्हाला वजन कमी करण्यात मदत करतील.

व्हिडिओ: गरोदरपणानंतर वजन कमी करण्यासाठी १० प्रभावी टिप्स

वजन कमी करण्यासाठी मूलभूत गोष्टी माहित असल्याशिवाय वजन कमी करणे सोपे काम नाही. नवजात बाळाची काळजी घेत असताना तसेच आपल्या जीवनात झालेल्या अनेक बदलांचे व्यवस्थापन करीत असताना, आपल्याला पुन्हा आकारबद्ध होण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. वजन कमी करून पूर्ववत झाल्यानंतर तुमचा आत्मविश्वास वाढण्यास सुद्धा त्यामुळे मदत होईल.

गरोदरपणानंतर वजन कमी करण्यास केव्हा सुरुवात करावी?

तुम्ही नुकताच बाळाला जन्म दिला आहे. तुमचे आरोग्य आणि ऊर्जा परत मिळवण्यासाठी तुम्हाला नक्कीच वेळ लागेल. तुमचे डॉक्टर तुमच्या प्रसूतीनंतर लगेच कठोर डाएट किंवा व्यायाम करण्यास सांगणार नाहीत. परंतु, प्रसूतीनंतरच्या सुरुवातीच्या काळात काही हलके व्यायाम केल्याने तसेच पौष्टिक खाण्याने तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फायदा होऊ शकतो. तुमच्या प्रसूतीनंतरच्या डॉक्टरांच्या पहिल्या भेटीदरम्यान वजन कमी करण्याबद्दल बोला. तुमच्या प्रसूतीच्या सहा ते आठ आठवड्यांनंतर ही भेट होईल. आहारतज्ञ नक्कीच तुम्हाला योग्य आहार योजनेसाठी मदत करू शकतात आणि तुम्हाला निरोगी मार्गाने वजन कमी करण्यासाठी मार्गदर्शन करू शकतात.

बाळ झाल्यानंतर जास्तीचे वजन कमी करण्याचे महत्त्व

गेल्या काही महिन्यांत तुम्ही वाढलेले सर्व अतिरिक्त वजन कमी करणे हे एक काम वाटू शकते, तरीही तुमचे आरोग्य पुन्हा पूर्ववत होण्याच्या दिशेने हे एक आवश्यक पाऊल आहे. जास्तीचे वजन आणि लठ्ठपणा हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे तसेच त्यामुळे तुम्हाला आयुष्याचा आनंद पुरेसा घेता येत नाही. बाळाकडे दिवसा खूप लक्ष देण्याची गरज असते आणि अनेकदा रात्रीचे सुद्धा जागरण होईल. तुम्ही तुमचे आरोग्य आणि फिटनेस ह्यास प्राधान्य दिल्यास अनेक बदलांना सामोरे जाऊ शकाल. कारण आई झाल्यानंतर तुमच्या आयुष्यात असंख्य बदल घडतील.

बाळ झाल्यानंतर जास्तीचे वजन कमी करण्याचे महत्त्व

जास्त वजनामुळे तुम्हाला उच्च रक्तदाब, मधुमेह आणि सांधेदुखी यांसारख्या अनेक आरोग्यविषयक समसयांचा धोका असू शकतो. जर तुम्ही पुन्हा आई बनण्याचा विचार करत असाल, तर वजन कमी करणे अत्यावश्यक आहे. कारण पुढील गरोदरपणात आणि बाळाला जन्म देताना तुमचे वजन जास्त असल्यास, हे जास्त वजन तुमच्या बाळासाठी आणि तुमच्यासाठी जोखीम वाढवू शकते. लठ्ठ स्त्रियांसाठी प्रसूतिकाळ जास्त असतो आणि प्रसूती सुद्धा त्यांच्यासाठी कठीण असते. इमर्जन्सी सीसेक्शन होण्याचा धोका देखील असतो. गरोदरपणातील मधुमेह आणि प्रीक्लेम्पसिया हे काही इतर धोके आहेत. जास्त वजन असलेल्या आईला ह्या समस्यांना सामोरे जावे लागते. जसजशी तुमच्या बाळाची वाढ होईल, तसतसे तुम्हाला त्याच्या मागे किती धावपळ करावी लागेल याची कल्पना करा. तुमची फिटनेस पातळी कायम राहिली तरच हे शक्य होईल.

गरोदरपणानंतर वजन कमी करण्यासाठी सोप्या आणि प्रभावी टिप्स

प्रसूतीनंतर वजन कमी होणे ही बहुतांश महिलांसाठी एक मोठी समस्या आहे. थोडेसे समर्पण आणि भरपूर इच्छाशक्तीच्या सहाय्याने हे सहज साध्य करता येते. प्रसूतीनंतर वजन कमी करण्यासाठी खूप खर्च करावा लागतो असे नाही कारण प्रसूतीनंतर वजन कमी करण्यासाठी बरेच सोपे आणि व्यावहारिक घरगुती उपाय देखील आहेत. वजन कमी करून पूर्ववत होण्यासाठी इथे काही टिप्स दिलेल्या आहेत.

. हालचाल वाढवा

गरोदरपण आणि बाळाचा जन्म ह्यामुळे तुम्ही थकलेल्या असाल. तुमची झोप सुद्धा नीट झालेली नसेल. व्यायाम सुद्धा पुरेसा नीट झालेला नसेल. हे ठीक आहे कारण जर सी सेक्शन झालेले असेल तर बहुतेक स्त्रिया प्रसूतीनंतर सहा किंवा अगदी आठ आठवड्यांपर्यंत व्यायाम करू शकत नाहीत. यानंतर छोटी पावले टाकत थोडे चालत जा. असे केल्याने तुम्हाला थकवा येणार नाही किंवा रक्तस्त्राव सुद्धा होणार नाही. जोपर्यंत तुम्हाला नियमित व्यायाम करू शकू असा आत्मविश्वास वाटत नाही तोपर्यंत हळूहळू अंतर वाढवा. बाळाला स्ट्रॉलर मध्ये ठेवून दिवसातून एकदा ३० मिनिटे फिरवण्याच्या नित्यक्रमाचा समावेश तुम्ही तुमच्या दिनक्रमात करू शकता.

. स्तनपान

तुम्ही तुमच्या आवडत्या खुर्चीवर आरामात बसूनही तुमच्या बाळाला स्तनपान केल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. स्तनपान करणाऱ्या माता दिवसाला ६०० ते ८०० कॅलरीज बर्न करू शकतात कारण बाळाला स्तनपान देण्यासाठी शरीराला आता अतिरिक्त कॅलरीजची आवश्यकता असते.

स्तनपान

तथापि, जेव्हा बाळ आईचे दूध घेणे सोडते आणि हळू हळू अर्धघन आणि घन पदार्थांचे सेवन करू लागते तेव्हा तुमचे वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे वजन वाढू नये म्हणून व्यायामाची दिनचर्या आधीच ठरवून घ्या.

. वजन प्रशिक्षण

या शब्दाचा उल्लेख केल्यावर, बहुतेक लोक व्यायामशाळेचे सदस्यत्व घेतात किंवा घरगुती वापरासाठी महागडी उपकरणे खरेदी करतात. तथापि, तुम्ही तुमच्या बाळाचा समावेश वजन प्रशिक्षण सत्रात केल्यास त्याची गरज उरणार नाही. तुमच्या बाळाला तुमच्या छातीजवळ धरा आणि लंजेस करण्यास सुरुवात करा. तुम्ही बाळाला तुमच्या पाठीवर झोपू शकता आणि बाळाला छातीपासून शक्य तितक्या दूर उचलू शकता. तुमच्या बाळाला तुमच्या व्यायाम सत्राचा आनंद घेताना पहा. असे केल्यास तुम्ही आनंददायी पद्धतीने वजन कमी करू शकता.

. तुमची चरबी आणि कॅलरी सेवन यावर लक्ष ठेवा

बहुतेक तज्ञ प्रसूतीनंतर लगेच डाएट करण्याची शिफारस करत नाहीत कारण शरीर आता दुरुस्तीच्या स्थितीत असते. तरीही, चिप्स, कोला आणि अशाच इतर गोष्टींऐवजी तुम्ही तुमच्या आहारात भरपूर ताजी फळे, हिरव्या भाज्या, मांस, संपूर्ण धान्य आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करू शकता. संपूर्ण धान्यापासून दूर राहण्यास सांगणाऱ्या फॅशनेबल आहारांना बळी पडू नका.

तुमची चरबी आणि कॅलरी सेवन यावर लक्ष ठेवा

जर तुम्ही जास्त प्रमाणात खाण्याची शक्यता असेल तर थोड्या थोड्या अंतराने थोडे थोडे खाण्यास सुरुवात करा. असे केल्याने तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाणही स्थिर राहील. दिवसभर थोडे थोडे खाल्ल्याने कॅलरीज विभागल्या जातील, कॅलरी चरबीच्या रूपात साठवून ठेवल्या जाणार नाहीत आणि त्यांचे चयापचय चांगल्या प्रकारे होईल.

. भरपूर झोप घ्या

बाळाच्या आगमनाने तुमची झोपेची पद्धत मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. त्यामुळे रात्रीचे जागरण आणि सकाळची झोप ह्यासाठी सज्ज व्हा. अश्या रुटीन मुळे तुमचे चयापचय खराब होऊ शकते आणि वजन कमी होत नाही. जेव्हाही तुमचे बाळ झोपते तेव्हा तुम्ही झोपून घ्या कारण यामुळे झोपेची कमतरता राहणार नाही आणि तुमची झोप पूर्ण करण्यात मदत होईल. झोपेच्या कमतरतेमुळे जास्त प्रमाणात खाणे होऊ शकते म्हणून जेव्हाही संधी मिळेल तेव्हा झोप घ्या. असे केल्याने तुमची उर्जा पातळी उच्च असेल आणि तुम्ही बाळाला वाढवण्याच्या आव्हानासाठी तयार व्हाल. प्रसूतीनंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये व्यायामापेक्षा झोपेला प्राधान्य द्या कारण झोप कमी झाल्यास मन आणि शरीर थकून जाईल, परिणामी व्यायामाची सक्ती करावी लागेल.

. पौष्टिक खा

तुमच्या शरीरातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळे तुमचे शरीर तुम्हाला जो पदार्थ सर्वात आधी दिसेल तो खाण्यास प्रवृत्त करेल. परंतु साखरेवर आधारित पदार्थ टाळण्याची शिफारस केली जाते. त्यामुळे तुमची साखरेची पातळी लक्षणीयरीत्या वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. जर तुम्हाला चविष्ट स्नॅक्सचा मोह होत असेल, तर फ्लेवर्ड योगर्ट्स किंवा कमीचरबीयुक्त दूध घ्या. दूध आणि दह्यामधील कॅल्शियम शरीरातील चरबी साठवण्यास मदत करणाऱ्या हॉर्मोनला अवरोधित करण्यास मदत करते. त्यामुळे वजन कमी करण्यास सुद्धा मदत होते . भरपूर तंतुमय पदार्थ खाणे देखील चांगले असते कारण त्यामुळे केवळ तुमचे पोट भरत नाही तर पचनास देखील मदत होते.

पौष्टिक खा

तुमच्या बाळाच्या जन्मानंतर मनुका, अंजीर आणि संपूर्ण गव्हाची बिस्किटे तुमच्या खरेदी यादीत असणे जरुरीचे आहे. प्रसूतीनंतर वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना मासे, चिकन, मांस आणि बीन्स सारखे सुपरफूड खाणे देखील आवश्यक आहे.

. हायड्रेटेड रहा

तुम्ही दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे कारण त्यामुळे तुमच्या शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर निघून जातील. तुम्ही सजलीत झाल्याने तुमचे चयापचय लक्षणीयरीत्या सुधारते आणि त्यामुळे, वजन कमी करण्यात मदत होते. पाण्याव्यतिरिक्त, तुमच्या दैनंदिन आहारात मिल्कशेक, ताजा रस, स्मूदी आणि सूप यांसारख्या द्रवपदार्थांचा समावेश केल्याने देखील तुमच्या वजन कमी करण्याच्या ध्येयाला मदत होईल. किती पाणी प्यायचे हे जाणून घेण्यासाठी, तुमच्या लघवीचा रंग तपासा. जर तो स्पष्ट असेल आणि तुम्ही दिवसातून ४५ वेळा बाथरूमला जात असाल, तर तुम्ही ठीक आहात.

. डान्स अवे युअर ब्लूज

स्वतःचा आनंद घेत वजन कमी करणे ह्यासारखा दुसरा चांगला मार्ग नाही. संगीत चालू करा, तुमच्या पतीला (किंवा तुमच्या बाळाला) सोबत घ्या आणि डान्स करण्यास सुरुवात करा.

डान्स अवे युअर ब्लूज

फक्त आनंद घ्या आणि थोडा वेळ घाम गाळा आणि तुमचे वजन खरोखर मजेदार मार्गाने कमी होताना पहा.

. तणावाची पातळी किमान ठेवा

पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा सुद्धा आई होणे, एक कठीण काम आहे आणि ते आव्हानात्मक आहे. परिस्थितीमुळे तुम्हाला दडपल्यासारखे वाटू शकते आणि त्यामुळे तणाव निर्माण होतो. वजन वाढणे आणि ताणतणाव वाढणे हे सहसा एकमेकांशी संलग्न असते आणि म्हणूनच तणावाची पातळी शक्य तितकी कमी ठेवण्याचा सल्ला दिला जातो. तणावपूर्ण परिस्थितींपासून दूर राहा. तणाव कमी करण्यास मदत करण्यासाठी संगीत किंवा ध्यान यासारख्या तंत्रांचा वापर करा. स्वतःसाठी थोडा वेळ ठेवा, दिवस कितीही व्यस्त असला तरी, तुमचे आवडते पुस्तक वाचा किंवा फिरायला जा. असे केल्याने तुमचा ताण कमी होऊन वजन कमी करण्यास मदत होईल.

१०. जेवण करण्यापूर्वी पाणी प्या

जेवण करण्यापूर्वी ग्लासभर पाणी प्या. जर तुमचा आवडता पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्हाला पोट फुगल्यासारखे वाटत असेल तर, आधी पाणी प्यायल्याने तुमचे पोट भरेल आणि तुम्ही जास्त खाणार नाही.

जेवण करण्यापूर्वी पाणी प्या

तुम्ही मर्यादित प्रमाणात खाल आणि आधी पाणी प्यायल्यामुळे तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त खाणार नाही. पाणी कोणतीही हानी करत नाही आणि खरं तर, तुम्हाला स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यास पाणी मदत करेल.

११. लवकर जेवण करा

विशेषतः रात्रीचे जेवण लवकर केल्याने तुमचे वजन लवकर कमी होण्यास मदत होते. तुमची जेवणाची वेळ ७ किंवा ७ ३० पर्यंत ठेवा कारण त्यामुळे झोपण्यापूर्वी पचनक्रिया होऊ शकते. तसेच वजन कमी होण्यास मदत होते आणि तुमची चयापचय क्रियाही वाढते. जर तुम्हाला तुमच्या बाळामुळे उशिरापर्यंत जागे राहावे लागत असेल, तर एक कप कोमट दूध प्या कारण त्यामुळे तुम्हाला बरे वाटेल आणि तुमची भूक सुद्धा भागेल.

१२. जमेल तेव्हा चाला

तुमच्या गरोदरपणात तुम्ही वाढलेले वजन कमी करण्याचा हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.

जमेल तेव्हा चाला

सुपरमार्केट, जिम, पार्क किंवा सिनेमाला चालत जा. कार घेऊन जाणे टाळा. तुमच्या लहान बाळाला झोपवताना तुमच्या घराच्या आत आणि आजूबाजूला फिरल्याने तुम्ही विचार करता त्यापेक्षा जास्त कॅलरी खर्च होतील.

१३. कॅफिन आणि अल्कोहोलपासून दूर रहा

झोपेचा सामना करण्यासाठी किंवा थकवा दूर करण्यासाठी तुम्ही कॉफी घेत असाल तर ते ताबडतोब थांबवा कारण त्यामुळे तुमचे वजन कमी होणार नाही तसेच त्यामुळे तुमच्या आरोग्यावरही परिणाम होईल . तुम्हाला खरोखर वजन कमी करायचे असेल तर पार्टीत असताना किंवा घरी आराम करत असताना अल्कोहोलचे सेवन मर्यादित करा. जर तुम्हाला स्वतःला ताजेतवाने करण्यासाठी पेय हवे असेल तर ग्रीन टी किंवा लिंबाचे सरबत घ्या.

१४. बाहेरचे खाऊ नका

वजन कमी करण्याच्या या प्रवासात असताना ताजे आणि पौष्टिक असे घरी शिजवलेले अन्न खा.

बाहेरचे खाऊ नका

हॉटेल मधील खाण्याचा मोह होऊ शकतो. परंतु तुम्ही झोकून दिल्यास, तुमचे वजन कमी करण्याचे मिशन नक्कीच यशस्वी होईल. अधूनमधून हॉटेलमधील खाणे ठीक आहे परंतु प्रसूतीनंतर वजन कमी करण्यासाठी घरचेच अन्न खा.

१५. फोकस गमावू नका

आपल्याला विचलित करणारी अनेक साधने आपल्या आजूबाजूस असू शकतात. वजन कमी करण्याच्या आपल्या कार्यावर टिकून राहणे सोपे नाही, परंतु आपण स्वत: ला प्रेरित ठेवले तर हे शक्य आहे. तुमचे गरोदरपणापूर्वीचे कपडे जिथे तुम्हाला दिसतील तिथे ठेवा आणि आवश्यक ते करून स्वतःला त्यात फिट होण्यास प्रवृत्त करा.

तुमचे शरीर कधी पूर्ववत होईल?

प्रसूतीनंतर तुम्ही सामान्य स्थितीत परत येण्यासाठी कोणताही निश्चित कालावधी नसतो. तुमचे ध्येय गाठण्यासाठी स्वत:ला सहा ते नऊ महिन्यांची वेळ द्या. परंतु लक्षात ठेवा की तुमचे बाळ तुमच्या पोटात वाढले आहे आणि तुमचे शरीर पूर्वीसारखे दिसणार नाही. वास्तववादी आणि साध्य करण्यायोग्य उद्दिष्टे बनवा. जर वेळेची पूर्तता झाली नाही तर स्वतःवर खूप कठोर होऊ नका. उद्दीष्टे रीसेट करा आणि इच्छित लक्ष्य गाठण्यासाठी पुन्हा कार्य करा.

नऊ महिने बाळाला पोटात वाढवणे, त्याला जन्म देणे आणि त्याचे निरोगी मूल म्हणून पालनपोषण करणे ह्या सर्व गोष्टी सोप्या नाहीत. तसेच अतिरिक्त वजन कमी करणे देखील सोपे नाही. स्पष्ट लक्ष, समर्पण आणि भरपूर प्रेरणा घेऊन, तुम्ही वजन कमी करू शकता आणि ते टिकवून ठेवू शकता, म्हणून वजन कमी करा!

आणखी वाचा:

सिझेरिअन प्रसूतीनंतर वजन कसे कमी करावे?
गरोदरपणानंतर वजन कमी करण्यासाठी आहार योजना

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article