In this Article
- प्रसूती पश्चात सूज (पोस्टपार्टम ओडेमा) म्हणजे काय?
- प्रसूती पश्चात सूज/ओडेमाची कारणे
- प्रसूतीनंतर शरीरावर सूज येण्याची लक्षणे
- सूज आपोपाप जाते का?
- प्रसूतीनंतर शरीरावर सूज येण्यावर उपचार काय आहे?
- गरोदरपणानंतरची सूज कमी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
- बाळाच्या जन्मानंतर शरीरावर येणारी सूज कशी हाताळाल?
- प्रसवोत्तर सूज (पोस्टपर्टम एडेमा) ह्या स्थिती विषयी तुम्ही कधी काळजी करावी?
- प्रसूतीनंतर शरीरावर येणारी सूज कशी टाळावी?
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न
गरोदरपणात स्त्रियांच्या शरीरात अनेक बदल होतात. तुम्ही कदाचित गरोदरपणाचा कालावधी पूर्ण होण्याची वाट पहात असाल, जेणेकरून तुम्ही तुमच्या सामान्य जीवनशैलीत परत येऊ शकता. बर्याच जणांना असे वाटते की एकदा हा टप्पा संपला की, प्रत्येक गोष्ट प्रसुतीपूर्व काळात जशी होती तशी होईल. परंतु ते खरे नाही – तुम्हाला बाळंतपणानंतरही समस्या येऊ शकतात, त्यापैकी एक समस्या म्हणजे प्रसूतीनंतर शरीरावर सूज येणे (ओडेमा) ही आहे.
प्रसूती पश्चात सूज (पोस्टपार्टम ओडेमा) म्हणजे काय?
प्रसूती पश्चात शरीरावर येणारी सूज ही एक अशी स्थिती आहे ज्यातून प्रसूतीनंतर अनेक स्त्रिया जातात. या स्थितीमुळे चेहरा, घोट्यावर आणि पोटावर सूज येऊ शकते. ही सूज हात आणि पायांमध्ये देखील पसरू शकते. सूज कधीकधी वेदनादायक असू शकते, त्यामुळे शरीरावर सूज येण्याची समस्या नको वाटते.
प्रसूती पश्चात सूज/ओडेमाची कारणे
गर्भवती स्त्रियांमध्ये प्रसूती पश्चात सूज येण्याची काही कारणे आहेत:
१. हार्मोन्स
प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक गरोदरपणात मोठ्या प्रमाणात तयार होते. त्यामुळे शरीरात सोडियम आणि पाणी टिकून राहते. आणि म्हणून शरीरावर सूज येते.
२. आय. व्ही. द्रव
निर्जलीकरण टाळण्यासाठी प्रसूती दरम्यान आय. व्ही. द्रव वापरले जातात. परंतु, त्यामुळे जळजळ देखील होऊ शकते – सिझेरियन प्रसूतीनंतर असे होण्याची शक्यता असते.
३. हायपोप्रोटीनेमिया आणि ऍनिमिया
हायपोप्रोटीनेमिया ह्या स्थितीमध्ये शरीरातील प्रथिनांची पातळी सामान्य पातळीपेक्षा कमी असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात लाल रक्तपेशींची कमतरता असते तेव्हा त्याला ऍनिमिया असे म्हणतात. प्रसूतीनंतर आईला यापैकी कोणतेही किंवा दोन्ही आजार झाल्यास, तिला प्रसूतीनंतर शरीरावर सूज येण्याचा त्रास होऊ शकतो.
४. उच्च रक्तदाब
तीव्र उच्च रक्तदाब आणि गर्भधारणा-प्रेरित उच्च रक्तदाब तसेच हायपोथायरॉईड, मूत्रपिंडाचे विकार यासारख्या वैद्यकीय परिस्थिती प्रसूतीनंतर सूज येण्याची कारणे असू शकतात.
प्रसूतीनंतर शरीरावर सूज येण्याची लक्षणे
प्रसूतीपश्चात सूज येण्याची (पोस्टपर्टम एडीमा) काही लक्षणे आहेत:
- हात पाय सुजणे
- वजन वाढणे
- घोट्याना सूज येणे
- फुगलेली त्वचा
सूज आपोपाप जाते का?
गरोदरपणानंतर, जर तुमचे हात, पाय आणि शरीराच्या इतर भागांमध्ये सूज दिसली तर घाबरू नका कारण ती आपोआप जाईल. ही सूज जाण्यास जास्तीत जास्त काही आठवडे लागू शकतात. बाळाच्या जन्मानंतर शरीरात द्रवपदार्थ राहिल्यामुळे बहुतेक स्त्रियांच्या शरीराला सूज येते.
प्रसूतीनंतर शरीरावर सूज येण्यावर उपचार काय आहे?
प्रसूतीनंतर शरीरावर सूज येणे सामान्य आहे आणि त्यासाठी सामान्यतः कोणत्याही विशेष उपचारांची आवश्यकता नसते. काही सोपे उपचार आहेत ते तुम्ही घरी करून पाहू शकता. ह्या उपचारांमुळे सूज आणि वेदना कमी होऊ शकतात. परंतु, जर परिस्थिती आणखी बिघडली, तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल कारण ते इतर आरोग्याच्या गुंतागुंतीचे लक्षण असू शकते.
गरोदरपणानंतरची सूज कमी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
प्रसूतीनंतर सुजलेल्या पायांसाठी काही घरगुती उपाय खाली दिलेले आहेत
१. मसाज
स्वतःला सुखदायक मसाज द्या कारण यामुळे रक्त प्रवाह सुधारतो आणि शेवटी वेदना कमी होतात.
२. व्यायाम
व्यायाम करणे हा तुमचा गर्भधारणेपूर्वी आकार परत मिळवण्याचा आणि सूज कमी करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
३. भरपूर पाणी प्या
पाणी शरीरातील अतिरिक्त द्रव बाहेर काढण्यास मदत करते, त्यामुळे सूज कमी होते. बर्याच लोकांना असे वाटते की जर तुम्ही पाणी प्याल तर शरीरात जास्त द्रवपदार्थ साठतील. परंतु, ते चुकीचे आहे.
४. फळे खा
फळांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, म्हणून भरपूर फळे खाल्ल्याने चयापचय वाढण्यास आणि उपचारांना गती मिळण्यास मदत होईल.
५. प्रथिनेयुक्त पदार्थ खा
शरीरात प्रथिने कमी असणे हे सूज येण्याचे एक कारण आहे, आणि म्हणून तुमच्या आहारात उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ समाविष्ट करणे फायदेशीर आहे.
६. प्रक्रिया केलेले आणि फास्ट फूड्स दूर ठेवा
प्रक्रिया केलेले आणि फास्ट फूड टाळा कारण त्यात सोडियमचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे शरीरात द्रवपदार्थ टिकून राहतात
७. तुमचे पाय आणि हात ताणा
रक्त परिसंचरण सुधारण्यासाठी आपले हात आणि पाय नियमितपणे ताणा. यामुळे अखेरीस शरीरातील सूज कमी होईल.
८. स्थिर स्थितीत राहणे टाळा
जेव्हा रक्ताभिसरणाचा प्रश्न येतो तेव्हा शरीराच्या हालचालींना खूप महत्त्व असते. योग्य प्रकारे आणि योग्य वेळेसाठी बसणे आणि उभे राहिल्याने सूज कमी होण्यास आणि रक्तप्रवाह चांगला होण्यास मदत होते.
९. चांगले विश्रांती घ्या
जेव्हा तुमचे शरीर सुजलेले असेल आणि तुम्हाला वेदना होत असतील तेव्हा स्वतः व्यायाम करणे टाळा. समस्या खूप वाढल्या तर आराम करा.
१०. आपले पाय भिजत ठेवा
सी सॉल्ट किंवा बाथ सॉल्ट घातलेल्या कोमट पाण्यात पाय भिजवल्याने वेदना कमी होण्यास आणि सूज कमी होण्यास मदत होते.
११. सकाळी योगासने करा
योग हा अजून एक तणाव आणि वेदना कमी करणारा उपाय आहे. त्यामुळे रक्ताभिसरण चांगले होण्यास मदत होते आणि शरीरावरील सूज कमी होते.
१२. हर्बल टी
कॉफी आणि इतर कॅफिनयुक्त उत्पादने निर्जलीकरण वाढवू शकतात, त्यामुळे शरीर अधिक द्रवपदार्थ टिकवून ठेवण्यास प्रवृत्त होते. त्यामुळे प्रसूतीनंतर येणाऱ्या सुजेपासून सुटका होण्यास वेळ लागेल. त्याऐवजी, हर्बल टी घ्या. उदा: डॅनडेलिअन टी वापरून सूज दूर करा आणि शरीरात द्रवपदार्थ टिकून राहण्यास प्रतिबंध करा.
१३. रिफ्लेक्सोलॉजी
दुखत असलेल्या स्नायूंना शांत करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. रिफ्लेक्सोलॉजीमुळे बरे वाटण्यास मदत होते. पाय दुखणे आणि सूज येण्याची समस्या कमी होण्यास सुद्धा खूप मदत होते.
१४. कोबीची पाने
सुजलेल्या भागावर कोबीची पाने ठेवल्याने वेदना आणि अस्वस्थता कमी होण्यास मदत होते कारण ही पाने शरीरातून अतिरिक्त द्रव बाहेर काढतात.
१५. घट्ट कपडे टाळा
सूज आल्याने वेदना होत असताना, सैल आणि आरामदायी कपडे घालून तुमच्या शरीराला मोकळा श्वास घेऊ द्या.
१६. जड व्यायाम टाळा
प्रसूतीनंतर व्यायाम केल्याने नक्कीच मोठा आराम मिळतो, परंतु जड व्यायामामुळे अनवधानाने शरीर दुखू शकते त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते.
१७. मोजे घाला
तुम्ही घातलेल्या कपड्यांमुळे खूप फरक पडतो. घट्ट लवचिक नसलेले परंतु आधार देणारे मोजे घातल्यास प्रसवोत्तर सूज दूर होण्यास मदत होते.
१८. रिलॅक्सींग बाथ
सुखदायक तेलांसह कोमट पाण्याने आंघोळ करणे उपयुक्त आहे. वापरण्यास सुरक्षित असलेल्या तेलांबद्दल तुमच्या डॉक्टरांना विचारा. तुम्हाला ऍलर्जी असलेली तेले टाळा.
१९. मीठाचे सेवन कमी करा
मीठ हे काही वेगळे नसून सोडियम आहे. जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्याने शरीरात पाणी टिकून राहून सूज येऊ शकते. केक, चिप्स आणि सॉफ्ट ड्रिंक्स सारखे प्रक्रिया केलेले पदार्थ खरेदी करण्यापूर्वी त्यामध्ये मीठ किती प्रमाणात आहे हे माहिती करून घेण्यासाठी घटकांचे लेबल तपासा.
२०. पोटॅशियम समृध्द अन्न खा
शरीरातील सोडियम आणि पोटॅशियमचे प्रमाण नेहमी संतुलित असावे. केळी, एवोकॅडो, पालक, दही आणि पीनट बटर यासारख्या पोटॅशियमयुक्त पदार्थांचे अधिक सेवन केल्याने रक्तातील सोडियमची पातळी कमी होते.
बाळाच्या जन्मानंतर शरीरावर येणारी सूज कशी हाताळाल?
सी-सेक्शन प्रसूतीनंतर, पायांना सूज येण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत, वेदना कमी करण्यासाठी तुम्ही बर्फाचे कंप्रेसर वापरू शकता किंवा कोमट पाण्याने अंघोळ करू शकता. तुमचे टाके पूर्णपणे बरे झाले नसतील तर बाथ लोशन टाळा.
प्रसवोत्तर सूज (पोस्टपर्टम एडेमा) ह्या स्थिती विषयी तुम्ही कधी काळजी करावी?
प्रसवोत्तर सूज हा काही आजार नाही. म्हणून तुम्ही काळजी करू नये. सहसा, ही सूज एका आठवड्याच्या कालावधीत कमी होते. फार क्वचितच ही स्थिती काही आठवडे टिकते. परंतु, खालील परिस्थितीमध्ये, तुम्हाला वैद्यकीय मदत घेण्याची आवश्यकता असू शकते:
१. जर ही सूज अनेक आठवडे टिकली तर
जर ही सूज अनेक आठवडे टिकत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले. वेदना कमी करण्यासाठी तुम्ही विविध पद्धती वापरून पाहू शकता.
२. असह्य वेदना
वेदना त्रासदायक असू शकतात आणि तुम्हाला काही प्रकारच्या वेदना कमी करण्याच्या औषधांची आवश्यकता असू शकते. परंतु तुमच्या कमकुवत अवस्थेत, डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कुठल्याही गोळ्या घेणे चांगले नाही.
३. श्वासोच्छवासाच्या समस्या
श्वासोच्छवासाची समस्या हे पुढे निर्माण होणाऱ्या हृदयाच्या समस्यांचे लक्षण असू शकते. जर असे असेल तर आपल्याला त्वरित वैद्यकीय मदतीची आवश्यकता असेल.
प्रसूतीनंतर शरीरावर येणारी सूज कशी टाळावी?
प्रसूतीनंतर शरीरावर येणारी सूज नैसर्गिक आहे. प्रसूतीनंतर येणारी सूज टाळण्यासाठी काही मार्ग आहेत. जरी हे उपयुक्त असले तरी ते सर्व स्त्रियांसाठी उपयोगी नाहीत. काही प्रतिबंधात्मक उपाय खाली दिलेले आहेत:
- भरपूर पाणी प्या
- आरामदायक शूज घाला
- जास्त वेळ स्थिर स्थितीत उभे राहणे टाळा
- कॅफिन पिणे टाळा
- प्रसूतीनंतर सौम्य व्यायाम करा
- प्रसूतीनंतरची विश्रांती टाळू नका
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
१. माझे पाय गर्भधारणेपूर्वी होते तसे होतील का?
तुमचे पाय गभधारणेपूर्वी होते तसे पुन्हा होणार नाहीत याची तुम्हाला भीती वाटत असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रसूतीनंतर सूज येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्याचे कारण म्हणजे शरीरातील जास्त द्रवपदार्थ होय. कालांतराने, तुमचे पाय त्यांच्या नैसर्गिक स्वरूपात परत येतील.
गरोदरपणाचा काळ आणि प्रसूतीनंतरचा प्रवास आव्हानात्मक असतो. तुम्ही आधीच बर्याच गोष्टींमधून जात असताना, सूज आणि वेदना परिस्थिती अधिक कठीण बनवू शकतात. परंतु, ही एक सामान्य स्थिती आहे. बऱ्याच स्त्रियांना प्रसूतीनंतर शरीरावर सूज येते. म्हणून, शांत रहा. वर सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही वेदनांचे नियमन करू शकता किंवा त्या टाळू शकता.
आणखी वाचा: