Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना गर्भधारणेसाठी प्रयत्न करताना पीसीओएस असताना गर्भधारणा होण्यासाठी १२ परिणामकारक टिप्स

पीसीओएस असताना गर्भधारणा होण्यासाठी १२ परिणामकारक टिप्स

पीसीओएस असताना गर्भधारणा होण्यासाठी १२ परिणामकारक टिप्स

पीसीओएस किंवा पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम ही एक अत्यंत सामान्य वैद्यकीय समस्या आहे. ह्या समस्येमुळे स्त्रीची प्रोजेस्टेरॉन पातळी वाढलेली असते आणि त्यामुळे स्त्रीला गर्भवती होण्यास अडथळा निर्माण होतो. संप्रेरकांच्या असंतुलनामुळे अंडाशयात सिस्ट तयार झाल्यामुळे असे होते. त्यामुळे स्त्रियांना गर्भधारणा होणे कठीण होते. परंतु, जीवनशैलीतील काही बदल, सकारात्मक दृष्टीकोन आणि थोडासा प्रयत्न, इत्यादींमुळे पीसीओएस असलेल्या स्त्रिया गर्भवती होणे शक्य आहे. ह्या लेखात, आम्ही पीसीओएस असलेल्या स्त्रिया गर्भवती होण्यासाठी काही उपाय सांगितलेले आहेत.

पीसीओएसची समस्या असताना गर्भवती कसे व्हावे?

पीसीओएसची समस्या असताना गर्भवती कसे व्हावे?

पीसीओएस असलेल्या स्त्रियांना गर्भधारणा होण्यास मदत करणार्‍या टिप्स खाली सूचीबद्ध केल्या आहेत.

. जीवनशैलीत बदल करा

तुमच्या शरीरातील इन्सुलिनचा प्रतिकार कमी करण्यासाठी, निरोगी खाणे, चांगली झोप (दररोज ७८ तास) आणि नियमित व्यायाम करणे महत्वाचे आहे. मद्यपान, मादक पदार्थांचे सेवन आणि धूम्रपान टाळले पाहिजे. व्हिटॅमिन सप्लिमेंट्सचे सेवन (तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर) केल्यास तुमच्या हार्मोन्स आणि इन्सुलिनची पातळी संतुलित ठेवण्यास मदत होऊ शकते. तसेच त्याची गर्भधारणेला देखील मदत होऊ शकते.

. ताण घेऊ नका

लोकांना त्यांच्या जीवनातील विविध समस्यांमुळे तणावाचा अनुभव येणे स्वाभाविक आहे. परंतु, असे केल्याने केवळ हार्मोनल असंतुलन वाढू शकते. म्हणून, आपल्या जीवनातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. लांब चालायला जा, रोज योग आणि प्राणायाम करा, ध्यान करा. जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आनंदी रहा.

. सक्रिय व्हा

बैठ्या जीवनशैलीमुळे तुमचे वजन वाढू शकते. त्यामुळे इन्सुलिनच्या प्रतिकाराशी लढण्यासाठी सक्रिय राहणे फार महत्वाचे आहे. एखादा खेळ खेळणे, पोहायला किंवा फिरायला जाणे तसेच इतर कोणालातरी घरातली कामे करायला सांगण्याऐवजी स्वतः केल्यास तुम्हाला शारीरिकदृष्ट्या सक्रिय होण्यास आणि गर्भधारणा होण्यास मदत होऊ शकते. पीसीओएस असताना गर्भधारणा होण्यासाठी अनेक योगासने करणे हा उत्तम व्यायाम आहे.

. डॉक्टरांचा सल्ला घ्या

पीसीओएसवर उपचार करण्यासाठी आणि गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधा. ओव्हुलेशन होण्यास अडथळा आणणारे संप्रेरकांमधील असंतुलन बरे करण्यासाठी डॉक्टर औषधे लिहून देऊ शकतात.

. क्रोमियम आणि मॅग्नेशियम पातळी

शरीरात क्रोमियम आणि मॅग्नेशियमची पातळी कमी झाल्यामुळे वंध्यत्व येऊ शकते. म्हणून, या दोन आवश्यक खनिजांनी समृद्ध असलेले अन्न खाणे किंवा पूरक आहार घेतल्याने तुम्हाला गर्भधारणा होण्यास मदत होऊ शकते.

. इन्सुलिन प्रतिरोधक अन्न टाळा

शीतपेये, पांढरा ब्रेड, भात, बटाटा, परिष्कृत कार्बोहायड्रेट इत्यादीसारख्या इन्सुलिन प्रतिरोधक अन्नामुळे शरीराचे वजन आणि रक्तातील साखरेची पातळी वाढते. तुम्हाला जर पीसीओएसची समस्या असेल आणि तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत असाल तर हे टाळणे चांगले.

. स्टार्च नसलेल्या भाज्या, फळे आणि प्रथिने समृद्ध आहार

पीसीओएस उपचारामध्ये औषधोपचार, ऍक्युपंक्चर आणि शस्त्रक्रिया इत्यादींचा समावेश होतो, परंतु पीसीओएस नैसर्गिकरित्या बरा कसा करावा आणि गर्भधारणा होण्यासाठी काय करावे? उत्तर सोपे आहे. हिरव्या पालेभाज्या आणि पिष्टमय पदार्थ नसलेल्या भाज्या, फळे आणि नट्स घातलेले समृध्द पौष्टिक जेवण खा. हे अन्नपदार्थ तुमच्या शरीरातील इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी करण्यास मदत करतात आणि संप्रेरकांचे नीट व्यवस्थापन करून गर्भारपणाचा मार्ग मोकळा करतात.

. व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करणे

गर्भधारणा होण्यास मदत करण्यासाठी व्हिटॅमिन डी योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे. व्हिटॅमिन डी हे अंड्यांची परिपक्वता आणि विकासामध्ये थेट सहभागी असल्याचे आढळले आहे. त्यामुळे, ज्या स्त्रियांना बाळ हवे आहे त्यांनी त्यांच्या शरीरातील व्हिटॅमिन डीची पातळी वाढवायला हवी. व्हिटॅमिन डी समृद्ध अन्न घेऊन किंवा व्हिटॅमिन डी सप्लिमेंट घेऊन ही पातळी वाढवता येते. दररोज अर्धा तास सूर्यप्रकाशात बसून सुद्धा ही पातळी वाढवता येऊ शकते.

. इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ)

तुम्हाला पीसीओएस असल्यास गर्भधारणेसाठी आयव्हीएक हा एक उत्तम मार्ग आहे. तथापि, ही एक महाग आणि वेळ घेणारी प्रक्रिया आहे. या कारणांमुळे, प्रत्येकजण ह्या पद्धतीचा उपयोग करून घेऊ शकत नाही, परंतु पीसीओएस असलेल्या अनेक स्त्रियांनी आयव्हीएफचा पर्याय निवडल्यानंतर त्या गर्भवती होऊन निरोगी बाळांना जन्म देण्यात त्या यशस्वी झालेल्या आहेत.

१०. इलेक्ट्रोअक्युपंक्चर

इलेक्ट्रोऍक्युपंक्चर हा औषधोपचारांव्यतिरिक्त पीसीओएस वर उपचार करण्यासाठी सर्वोत्तम पर्यायांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. गोथेनबर्ग विद्यापीठाने केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की इलेक्ट्रोअॅक्युपंक्चर पीसीओएस ची काही लक्षणे कमी करण्यास मदत करते. अ‍ॅक्युपंक्चर सुया गुडघ्यांच्या मागच्या बाजूला आणि ओटीपोटाच्या स्नायूंसारख्या बिंदूंवर टोचल्या जातात, हे बिंदू अंडाशयाशी संबंधित असतात. त्यानंतर, हे बिंदू कमीफ्रिक्वेंसी इलेक्ट्रिकल चार्जने उत्तेजित केले जातात. यामुळे मासिक पाळी अधिक नियमित होते आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते.

११. तुमच्या आहारात ओमेगा3 चा समावेश करा

तुमच्या आहारातील ओमेगा 3 हे लेप्टिन प्रतिरोध आणि इन्सुलिन प्रतिरोध ह्यासारख्या अनेक वैद्यकीय समस्यांवर उपचार करण्यात मदत करते. ही कारणे स्त्रियांना पीसीओएस होण्याची प्रमुख कारणे आहेत. पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये कोर्टिसोलची पातळी कमी करण्यासाठी देखील हा एक चांगला उपचार आहे.

१२. सूज कमी करणे

पीसीओएसचे प्रमुख म्हणजे सूज आहे आणि त्याचा बराच काळ उपचार केला जात नाही. अधिवृक्क ग्रंथी आणि अंडाशयाला सूज आल्यामुळे टेस्टोस्टेरॉनच्या पातळीत वाढ होते. त्यामुळे सामान्य मासिक पाळी आणि ओव्हुलेशन थांबते, तर मेंदूला सूज आल्यामुळे लेप्टिनचा प्रतिकार होतो आणि स्नायूपेशींच्या प्रतिकारामुळे इन्सुलिन प्रतिरोध होतो. म्हणून, पीसीओएस बरा करण्यासाठी, त्यावर उपचार करणे आवश्यक आहे. सूज कमी करण्यासाठी, स्त्रियांनी त्यांच्या आहारातील सर्व प्रकारचे सूज निर्माण करणारे पदार्थ टाळले पाहिजेत. ह्या पदार्थांमध्ये सर्व प्रकारचे धान्य, सर्व प्रकारची साखर, औद्योगिक बियाणे तेल जसे की कॅनोला, सोया, सूर्यफूल आणि व्हेजिटेबल तेल तसेच प्रक्रिया केलेले सोया आणि दुग्धजन्य पदार्थ इत्यादींचा समावेश होतो.

पीसीओएस मुळे स्त्रीला गर्भधारणा होणे कठीण होते, परंतु ते अशक्य नाही. तुम्हाला फक्त योग्य उपचार, योग्य दृष्टीकोन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संयमाची गरज आहे. पीसीओएस वर उपचार करण्यासाठी वैद्यकीय मार्गदर्शन घ्या आणि तुम्हाला गर्भधारणा हवी असेल तर निरोगी जीवनशैली निवडण्याचा आम्ही तुम्हाला सल्ला देतो.

आणखी वाचा:

पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम (पीसीओएस) – आढावा
हायपोथायरॉयडीझम असताना मी गर्भवती होऊ शकते का?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article