अन्य

नवजात बाळाच्या झोपेविषयी मूलभूत गोष्टी (० ते ३ महिने)

नुकतेच जन्मलेले बाळ खूप झोपते. किंबहुना, जितका वेळ ते जागे असते त्यापेक्षा कितीतरी जास्त वेळ ते झोपलेलेच असते. जन्मानंतरचे पहिले काही आठवडे बाळ दिवसाला १८ तास झोपते. तथापि, बाळ एका वेळेला ३-४ तासांपेक्षा जास्त वेळ झोपत नाही मग तो दिवस असो वा रात्र. बाळाचे हे झोपेचे रुटीन त्यांच्या आई बाबांसाठी मात्र थकवा आणणारे असते. कारण बाळाला पाजावे लागते, नॅपी बदलावी लागते आणि बाळाला शांत करावे लागते.

नवजात बाळांचा झोपेचा नेहमीचा नमुना

नवजात बाळाच्या झोपेचा काही अंदाज लावता येत नाही. झोपेची वाट बघणाऱ्या पालकांसाठी बाळ गाढ झोपलेले असणे म्हणजे सुख. बाळ दिवसभर वेगवेगळ्या वेळांना झोपते, ते एकाच वेळी सलग खूप झोपले असे होत नाही. १ महिन्यांच्या बाळाचा झोपेचा नमुना हा ६ महिन्यांच्या बाळापेक्षा वेगळा असतो. पहिले काही आठवडे बाळाच्या झोपेच्या पॅटर्नची विभागणी म्हणजे ५०% ऍक्टिव्ह झोप आणि ५०% शांत झोप अशी करता येईल. ऍक्टिव्ह झोपेच्या कालावधीत बाळ मध्ये मध्ये सारखे उठते. बाळ तीन महिन्यांचे झाल्यावर बाळाची झोप 'हलकी झोप' आणि 'गाढ झोप' अशी विभागली जाऊ शकते. बाळ सहा महिन्यांचे झाल्यावर बाळ रात्रीचे कमी उठेल. आठ महिन्यांचे झाल्यावर बाळाला रात्री मध्ये जाग आली तर ते स्वतःचे स्वतः झोपेल.

बाळाला किती झोपेची गरज असते (-३ महिने)

जन्मानंतर पहिले काही आठवडे, बाळ दिवस असो की रात्र बराच वेळ झोपलेले असते. तथापि, बाळ भूक लागली असेल तर किंवा न्यापी ओली झाली असेल तर मध्ये उठते. बाळाला १६-१८ तासांच्या झोपेची गरज असते. हे तास अनेक छोट्या भागात म्हणजेच ३० मिनिटे ते ३ तासापर्यंत विभागले जातात. बाळ मोठे होऊ लागले की बाळाच्या झोपेचे तास कमी होतात. कालांतराने, बाळ रात्रभर झोपू लागते आणि एकदा किंवा दोनदा दूध पिण्यासाठी उठते. नवजात शिशुला दिवस आणि रात्र ह्यामधील फरक कळत नाही. तुम्ही दिवसभर बाळाशी खेळत राहिलात किंवा बोलत राहिलात तर बाळ दिवसाचे जागे राहील आणि रात्रीचे शांत राहील आणि झोपी जाईल. तुम्ही बाळाच्या झोपेची वेळ निश्चित करण्यासाठी मदत केली पाहिजे.

दिवसा

दिवसा, बाळ ३० मिनिटे ते तीन तासांची झोप दिवसातून ३-४ वेळा घेईल. जसजशी बाळाची वाढ होईल तसे बाळाची दिवसाची झोप कमी होते आणि दोन झोपांमधील वेळ सुद्धा वाढतो.

रात्री

रात्री, बाळ ९-१२ तास झोपते आणि दूध पिण्यासाठी मध्ये उठते. बाळ जसे मोठे होऊ लागते, तसे बाळाची मध्ये उठण्याची वारंवारिता कमी होते. बाळाच्या झोपेचे रुटीन बसण्यासाठी तुम्हाला मदत करावी लागेल. नवजात शिशु पेक्षा ३ महिन्यांचे बाळ तुम्हाला कमी वेळ जागवेल.

नवजात बाळाच्या झोपेचा विकास

नवीन कौशल्ये शिकण्याची उत्सुकता आणि नवीन माहिती घेण्याची वृत्ती ह्याचा बाळाच्या झोपेच्या पॅटर्नवर परिणाम होऊ शकतो. बाळाला दुरावण्याची चिंता होऊ लागते आणि तुम्ही आजूबाजूला नसल्यास बाळ दुःखी होते. तुम्ही बाळाला एकटे सोडून जाऊ नये म्हणून बाळ झोपण्याचे टाळते आणि जागे राहते.

थकलेल्या बाळाची लक्षणे कोणती?

बाळांना बोलता येत नाही, परंतु त्यांच्या वागण्यातून, हालचालींमधून त्यांना काय हवे ते बाळ सांगते, तुम्ही बाळाचे रडणे, वेगवेगळे आवाज काढणे किंवा एकदम शांत बसणे ह्या सगळ्याचे निरीक्षण करू शकता. झोप न मिळालेले बाळ चिडचिडे होते आणि त्यामुळे बाळाच्या आई बाबांना सुद्धा झोप मिळत नाही. खूप थकलेल्या बाळाला शांत करणे सुद्धा अवघड होते.

बाळाचे झोपेचे रुटीन तयार करा

आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच बाळासाठी तुम्ही झोपेचे चांगले रुटीन तयार करा. रात्री झोपताना अंगाईगीत, गोष्टी आणि बाळाची पापी घेण्याने आई आणि बाळामध्ये चांगला बांध तयार होतो.

नवजात ते ३ महिन्यांच्या बाळाच्या झोपेसाठी काही टिप्स

तुम्ही बाळाच्या झोपेच्या वेळेचे रुटीन निश्चित केल्यावर, आणखी काही टिप्स आहेत ज्यांची बाळाला शांत करण्यास मदत होईल. बाळाला स्वतःचे स्वतः झोपू द्या. बाळाच्या झोपेच्या वेळा ठरल्यास ते बाळाला आणि तुम्हाला रुटीन ठरवण्यास मदत करेल. बाळ मोठे होऊ लागते तसे बाळाचे वेळापत्रक बदलते. २ महिन्यांच्या बाळाचे झोपेचे वेळापत्रक हे नवजात बाळापेक्षा चांगले असते. आणखी वाचा: बाळाला रात्री कसे झोपवावे? एसआयडीएस (SIDS) आणि बाळाला झोपवताना घ्यावयाची काळजी
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved