अन्य

बाळाच्या नाळेतील रक्ताची संचयपेढी

गेल्या काही दशकांमध्ये स्टेम सेल संशोधन झपाट्याने विकसित झाले आहे आणि कोर्ड ब्लड बँकिंग हा एक नवीन पर्याय आहे जो नव्याने झालेले पालक आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी एक अतिरिक्त खात्रीशीर पर्याय म्हणून निवडू शकतात. तथापि, कोणतीही वचनबद्धता करण्यापूर्वी पालकांना चांगल्या प्रकारे माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे. पालकांवर विपणन जाहिराती व सेवा ह्यांचा मारा केला जातो ज्या तुमच्या पालकत्वाच्या मूलभूत भावनांशी जोडलेल्या असतात. आपण आपल्या बाळासाठी कॉर्ड ब्लड बँकिंगचा विचार करीत असल्यास, योग्य निवड करण्यासाठी आपण सत्य जाणून घ्या. येथे काही कॉर्ड ब्लड बँकिंग विषयी तथ्ये आहेत आणि काही वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

नाळेतील रक्त म्हणजे काय?

बाळाच्या जन्मानंतर, प्लॅसेंटा आणि नाळेमध्ये रक्ताचे काही अंश असतात. त्याला नाळेतील रक्त किंवा कॉर्ड ब्लड असे म्हणतात. हे रक्त बाळाच्या जन्मानंतर लगेच गोळा केले जाऊ शकते.

हे नाळेतील रक्त बाळाचे असते की आईचे?

नाळेतील रक्तामध्ये बाळाचे स्टेम सेल्स असतात आणि ते काही शारीरिक समस्या असतील तर त्यावर उपचारांसाठी त्याचा उपयोग होतो. परंतु अगदी ठामपणे सांगता येऊ शकते की नाळेतील रक्त हे बाळाचेच असते.

स्टेम सेल्स म्हणजे काय?

स्टेम सेल्सला सेंद्रीय पेशींचे बिल्डिंग ब्लॉक असे म्हटले जाऊ शकते. ते अविभाजित जैविक पेशी आहेत ज्यात एका विशिष्ट सेलमध्ये वाढण्याची क्षमता आहे. अधिक स्टेम सेल्स तयार करण्यासाठी स्टेम सेल्स मायटोसिस (एक नैसर्गिक पेशी विभागणी प्रक्रिया) द्वारे देखील त्या विभागू शकतात. दोन प्रकारचे स्टेम सेल्स आहेत- भ्रुण स्टेम सेल आणि प्रौढ स्टेम सेल्स हेमॅटोपोइटीक, न्यूरल आणि मेन्स्चिमॅलसारखे अनेक प्रकारचे प्रौढ स्टेम सेल्स आहेत. नावे सूचित करतात त्याप्रमाणे, हेमेटोपोएटिक स्टेम पेशी अधिक रक्त पेशी तयार करण्यात मदत करतात, मज्जातंतूच्या स्टेम सेल्स मध्ये मज्जासंस्थेची ब्लूप्रिंट असते आणि मेसेनकायमल स्टेम सेल्स हाडे, कूर्चा, स्नायू आणि चरबीच्या पेशी बनू शकतात

स्टेम सेल्स चा उपयोग

स्टेम सेल्स मुळे पेशींचे झालेले नुकसान भरून काढता येते आणि त्यामुळे पेशींचे नूतनीकरण होते. त्यामुळे विविध वैद्यकीय उपचारांमध्ये त्याचे विशेष महत्व आहे, खालील ठिकाणी स्टेम सेल्सचा उपयोग होतो

नाळेमधून स्टेम सेल्स का घ्यावेत ?

नाळेपासून किंवा अस्थिमज्जापासून स्टेम सेल्स दोन प्रकारे मिळू शकतात. नाळेतून स्टेम सेल्स मिळवण्याची प्रक्रिया अवघड नाही परंतु अतिशय जलद आणि सोपी आहे. कॉर्ड ब्लड सेल्स हे बाहेरील पेशींसोबत अधिक अनुकूल असतात आणि रक्तदात्यास एक परिपूर्ण जोडी प्रदान करतात. प्राप्तकर्त्याद्वारे पेशी नाकारल्या जातील किंवा मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता देखील असते. जीव्हीएचडी (ग्राफ्ट व्हर्सेस होस्ट डिसीज) होण्याची शक्यता असते. जीव्हीएचडी ही एक धोकादायक स्थिती आहे जिथे नवीन पेशी रुग्णाच्या पेशीविरूद्ध लढतात. इतर पेशींपेक्षा कोर्ड ब्लड सेल्स जास्त अनुकूल असल्याने या धोकादायक स्थितीची शक्यता फारच कमी आहे

स्टेम सेल जतन करणे

जर योग्यरित्या संग्रहित केले असेल तर,नाळेतील रक्त अनिश्चित काळासाठी ठेवले जाऊ शकते. ते संग्रहित करण्यासाठी अत्याधुनिक क्रायोजेनिक पद्धती (लिक्विड नायट्रोजनमध्ये गोठवणे ) वापरल्या जातात. कॉर्ड ब्लड बँकिंग निवडण्यापूर्वी, तंत्रज्ञान आणि मार्केटबद्दल आपल्याकडे संपूर्ण माहिती आहे याची खात्री करा

नाळेतील रक्ताविषयी खोट्या समजुती

ह्या विषयी पालकांनी दंतकथांना तोंड देऊन त्या फेटाळून लावणे महत्वाचे आहे नाळेतील रक्ताची प्रक्रिया ही खूप मोठी गैरसमजूत आहे. पहिल्यांदा कॉर्ड ब्लड ट्रान्सप्लांट हे १९८८ मध्ये झाले आणि कॉर्ड ब्लड बँकिंग हे जगात ८० प्रकारच्या रोगांवर उपचारांसाठी जगभर वापरले जाते आणि ही पद्धत आणखी विस्तारत आहे आणि त्यावर अजून संशोधन सुरु आहे. नाळेतील रक्त गोळा करण्याची प्रक्रिया बाळासाठी आणि आईसाठी अगदी जलद आणि सोपी आहे. त्याचा बाळाच्या जन्माच्या प्रक्रियेवर काहीही परिणाम होत नाही. बाळ जन्मल्यानंतर ही प्रक्रिया केली जाते. नाळ कापल्यावर ही प्रक्रिया केली जाते. नॉर्मल प्रसूती झाल्यास नाळेतील रक्त काढून फेकून दिले जाते त्यामुळे ते गोळा केल्याने बाळाच्या रक्तपुरवठ्यावर कुठलाही परिणाम होत नाही. स्टेम सेल संशोधनावर चुकीचा आरोप केला जातो की तो एक अत्यंत वादग्रस्त विषय आहे. प्रत्यक्षात, कॉर्ड ब्लड बँकिंग ही सर्वात मूलभूत प्रक्रिया आहे आणि वारंवार उल्लेख केल्या जाणार्‍या विवादांपासून दूर आहे. वादाला आमंत्रण देणारे स्टेम सेल संशोधनाचे क्षेत्र म्हणजे भ्रुण स्टेम पेशींशी संबंधित असतात आणि नाळेतील रक्तातून आणिअस्थिमज्जेपासून तयार केलेल्या प्रौढ स्टेम पेशी वादग्रस्त नसतात. पुनरुत्पादक क्लोनिंग ही आणखी एक सीमा शाखा आहे जी नियमित स्टेम सेल तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. कॉर्ड रक्तपेढी प्रक्रियेशी त्याचा संबंध नाही.

कॉर्ड ब्लड बँकिंग म्हणजे काय?

कॉर्ड ब्लड बँकिंग म्हणजे भविष्यातील गरजांसाठी नाळेतील रक्त साठवून ठेवणे होय. हे रक्त अतिथंड तापमानाला अनिश्चित कालावधीसाठी ठेवले जाते. जेव्हा गरज असते तेव्हा ते पाठवले जाते.

कॉर्ड ब्लड बँकेचे प्रकार

दोन प्रकारच्या कॉर्ड ब्लड बॅंक्स असतात त्या म्हणजे खाजगी आणि सार्वजनिक बॅंक्स

नाळेतील रक्त कसे गोळा केले जाते आणि त्यावर काय प्रक्रिया केली जाते?

बाळाच्या जन्मानंतर नाळेतील रक्त गोळा केले जाते आणि ही प्रक्रिया वेदनाविरहित असते. त्यानंतर, काही दिवसांसाठी पेशी सक्रिय असतात. ह्या कालावधीत, हे रक्त कॉर्ड ब्लड बँकेत नेले जाते आणि अनिश्चित कालावधीसाठी फ्रीझ करून साठवले जाते. नाळेतील रक्त गोळा करण्यासाठी एक विशेष प्रकारची किट वापरली जाते.

नवजात बाळाच्या नाळेतील रक्त का साठवले पाहिजे?

स्टेम सेल्स जतन करून ठेवल्यास, मोठेपणी जर काही आजार झाल्यास उपचारांसाठी एक आणखी पर्याय उपलब्ध होतो. नवजात बाळाच्या नाळेचे रक्त जपून ठेवल्यास एक आयुष्य वाचू शकते आणि आणि कॉर्ड ब्लड बँकिंग सुरु होण्यामागे हे सबळ कारण असू शकते (सार्वजनिक किंवा खाजगी)

कॉर्ड ब्लड बँकिंगचे फायदे आणि तोटे

गेल्या दशकात ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी खूप वादावादी झाली आहे आणि तो म्हणजे - स्टेम सेल बँकिंग फायद्याचे आहे का? सततच्या संशोधनानंतर असे लक्षात आले आहे की वाढत्या आजारांवर उपचारांसाठी दात्यांसाठी व इतरांसाठी हा सुरक्षित पर्याय आहे.

फायदे

कॉर्ड ब्लड बँकिंगचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इतर स्रोतांपेक्षा हा स्रोत जास्त सुसंगत आहे. पुढील वैद्यकीय परिस्थितीत हा पर्याय खूप मौल्यवान आहे. सार्वजनिक कॉर्ड ब्लड बँकेतून सुसंगत स्टेम सेल्स मिळवणे म्हणजे खूप अवघड आणि वेळखाऊ प्रक्रिया होऊ शकते. प्रत्यारोपणासाठी नाळेतील पेशी (ज्या अस्थिमज्जेतील पेशीइतक्या परिपक्व नसतात) ही अगदी योग्य निवड असते आणि स्वीकारणाऱ्याच्या प्रणालीमध्ये त्या नाकारल्या जात नाहीत. ज्या कुटुंबांमध्ये रक्ताशी संबंधित आजार असतात किंवा अशा इतर समस्या असतात ज्या स्टेम सेल प्रत्यारोपणाद्वारे बऱ्या होऊ शकतात, अशा कुटुंबांमध्ये ते विशेष उपयोगी होते. ही उपचारपद्धती अगदी सोपी आणि वेदनारहित असते.

तोटे

कॉर्ड ब्लड बँकिंग खर्चिक आहे. ते स्वस्त तर नाहीच परंतु ह्यामध्ये सतत पैसे द्यावे लागतात, नाळेमधील रक्त गोळा करण्यापासून त्यास सुरुवात होते तसेच दरवर्षी वार्षिक फी भरावी लागते. जर तुमच्या कुटुंबास आजाराचा धोका नसेल तर घेतलेल्या विम्याची रक्कम सुद्धा भरावी लागेल ज्याची काही गरज नसेल. त्यामुळे कुटुंबाच्या वैद्यकीय इतिहासाचा अभ्यास करणे महत्वाचे आहे तसेच स्टेम सेल्स उपचारपद्धतीमुळे जे आजार बरे होतात ते होण्याची त्या कुटुंबात किती शक्यता आहे हे सुद्धा तपासून पहिले पाहिजे. काही जनुकीय आजार नाळेतील रक्तातील पेशींद्वारे बरे करता येत नाहीत कारण स्टेम सेल्समध्ये त्याच त्रुटी आढळतात. असे खूप सिद्धांत आहेत ज्यामध्ये स्वतःपेक्षा बाहेरील दात्याच्या पेशींचा फायदा होतो.

कॉर्ड ब्लडमुळे बरे होणारे आजार

नाळेतील रक्तातील स्टेम सेल्समुळे बरेच आजार बरे होण्यास मदत होते. अस्थिमज्जेतून किंवा नवजात बाळाच्या नाळेतून काढलेले हेमॅटोपोएटिक स्टेम सेल्स हे हेमॅटोपोएसीस ह्या प्रक्रियेद्वारे नवीन रक्तपेशींची निर्मिती करतात. ह्या पेशी तांबड्या आणि पांढऱ्या रक्तपेशी तसेच प्लेटलेट तयार करतात. एचएससीटी किंवा हेमॅटोपोएटिक स्टेम सेल ट्रान्सप्लान्टेशन ही प्रक्रिया बऱ्याच आजारांवर उपचारांसाठी वापरली जाते. इथे काही आजार दिले आहेत जे स्टेम सेल्स मुळे बरे होतात. रक्तातील स्टेम सेल्स वापरून ट्युमर, कॅन्सर, प्रतिकार प्रणालीशी संबंधित विकार, पचनाशी संबंधित विकार, सिकल सेल ऍनिमिया आणि बोन मॅरो डिसीज ह्या सर्व रोगांवर उपचार करता येतो. यूएस फूड आणि ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन (एफडीए) ने ८० रोगांवर नाळेतील रक्तातील पेशींद्वारे उपचार करता येतील ह्यास मान्यता दिली आहे. स्टेम सेल उपचार हे हाडांचा ठिसूळपणा, लँगरहान्स सेल्स हिस्टीओसायटोसीस आणि हीमोफायगोसायटीक लिम्फोहिस्टीओसायटोसीस ह्या रोगांवर उपचारासाठी प्रमाणित करण्यात आले आहे. पुढील रोगांवर स्टेम सेल पद्धतीने उपचार करता येतील किंवा नाही हे प्रायोगिक तत्वावर आहे आणि ते म्हणजे सेरेब्रल पाल्सी, वेगवेगळे हृदयविकार, पार्किन्सन्स डिसीज, मधुमेह, अल्झायमर्स डिसीज आणि पाठीच्या मणक्याचे विकार. स्टेम सेल्स हे भाजल्याच्या जखमांवर सुद्धा वापरतात त्यामुळे नुकसान झालेली त्वचा भरून निघण्यास मदत होते.

नाळेच्या रक्ताचे वेगवेगळे उपयोग

नाळेतील रक्ताचा सर्वात महत्वाचा उपयोग म्हणजे नाळेच्या रक्ताचे प्रत्यारोपण. नाळेच्या रक्ताचे प्रत्यारोपण करताना, निरोगी स्टेम सेल्स हे रक्तप्रवाहात मिसळले जातील आणि त्यामुळे नुकसान झालेले ऊतक भरून निघण्यास मदत होईल. प्रत्यारोपण यशस्वी झाल्यावर रुग्णास नवीन प्रतिकार प्रणाली मिळते. स्टेम सेल ट्रान्सप्लान्टचा यशाचा दर नाळेच्या रक्तातील स्टेम सेल्स घेतल्यास जास्त असतो.

नाळेतील रक्ताच्या बँकिंगसाठी किती खर्च येतो?

भारतात वेगवेगळ्या दराने नाळेतील रक्त साठवून ठेवणाऱ्या खूप प्रदाते आहेत. प्रायव्हेट स्टेम सेल बँकिंगची किंमत सुमारे दोन दशकांच्या स्टोरेजसह रुपये ५०,००० ते रुपये ७०,००० इ पर्यंत आहे. आपल्याला उत्कृष्ट सेवा आणि दर मिळावेत यासाठी कॉर्ड रक्तपेढी आणि संबंधित प्रदात्यांचे पुनरावलोकन करून घेणे चांगले.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

. नाळेमध्ये सरासरी किती रक्त आणि स्टेम सेल्स असतात?

सरासरी, तुम्ही नाळेमधून ६० मिली रक्त गोळा करू शकता. बाळ निरोगी आणि पूर्ण दिवसांचे असेल तर त्या रक्तामध्ये एक दशलक्षापेक्षा जास्त स्टेम सेल्स असतात.

. नाळ उशिरा कापणे - हे नक्की काय आहे? नाळेतील रक्त गोळा करणे त्यानंतर शक्य आहे का?

जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा काहीवेळा नाळ कापून बांधून ठेवण्याआधी वाट पाहावी लागते. हा काळ ३० सेकंद ते एक मिनिट इतका असतो. अशावेळी बाळाला अशा पद्धतीने धरावे की बाळाला काही प्रमाणात स्टेम सेल्सनी समृद्ध रक्त मिळेल. नाळ उशिरा कापल्यानंतर नाळेतील रक्त गोळा करता येते. तुम्ही खाजगी बँकिंगची निवड केलीत तर हे शक्य आहे. खाजगी बँकिंग मध्ये गोळा केलेल्या रक्ताचे प्रमाण किती असावे ह्याबाबत तीव्र मर्यादा नाहीत. उशिरा नाळ कापून अगदी कमी प्रमाणात जरी रक्त गोळा झाले तर चालते. परंतु त्याचे काही तोटे सुद्धा आहे. जर मोठ्या भावंडांसाठी सुद्धा गरज असेल तर तुम्हाला पुरेसे स्टेम सेल्स मिळत नाहीत.

. हे नाळेतील रक्त नीट राहून साठवणूक सुविधे पर्यंत पोहोचण्यासाठी वाहतुकीसाठी किती वेळ असतो?

जगभरात, कॉर्ड ब्लड बँकिंग कंपन्यांनी ४८ तासांचा वेळ दिला आहे ह्यामध्ये संपूर्ण कॉर्ड ब्लड प्रक्रिया म्हणजेच बाळाच्या जन्मापासून ते प्रयोगशाळेतील प्रक्रियेपर्यंत सगळ्याचा समावेश होतो.

. नाळेतील रक्तासाठी प्रयोगशाळेतील कुठल्या प्रक्रिया असतात?

नेहमीच्या रक्त गोळा करण्याच्या पद्धतीनुसार, नाळेच्या रक्तातील तीन घटक गोळा केले जातात. आरबीसी किंवा रक्ताच्या लाल पेशी ह्या सर्वात वजनदार असतात. सर्वात हलके प्लास्मा पेशी असतात आणि मध्ये पांढऱ्या पेशींचा थर असतो. सध्यातरी स्टेम सेल्स वेगळे करून ते साठवून ठेवण्याची पद्धत नाही.

. संबंधित दात्याकडून रक्तदान ही चांगली उपचारपद्धती आहे का?

जेव्हा नाळेतील रक्ताच्या प्रत्यारोपणाचा प्रश्न येतो तेव्हा, संबंधित दाता असणे चांगले. जेव्हा दाता नातेवाईक असतो GvHD किंवा ग्राफ्ट व्हर्सेस होस्ट डिसीजची शक्यता कमी असते, त्यामुळे त्या प्रक्रियेनंतर सुद्धा आयुष्याची गुणवत्ता चांगली राहते.

. काही आजारांवर नाळेच्या रक्तातील उपचारपद्धती हा एकमेव मार्ग आहे का?

नाही. जरी तुम्ही कॉर्ड ब्लड बँकिंग चा पर्याय निवडला नाही तरी इतर पद्धती वापरू शकता. स्टेम सेल प्रत्यारोपण हे कुटुंबातील सदस्याने किंवा बँकेने दान केलेल्या अस्थिमज्जेद्वारे सुद्धा होऊ शकते. सार्वजनिक कॉर्ड ब्लड बँककाही प्रकरणांमध्ये संबंधित नसलेल्या दात्याकडून प्रत्यारोपणाचा पर्याय खुला ठेवतात. इतर कुठल्याही वैद्यकीय प्रक्रियेसारखेच, कॉर्ड ब्लड प्रत्यारोपण उपचारपद्धतीमुळे रुग्ण बरा होईलच ह्याची खात्री नसते कारण उपचारपद्धतीमध्ये धोका नेहमीच असतो.

. मी अंतिम निर्णय कसा घेऊ?

कॉर्ड ब्लड बँकिंगसाठी पैसे खर्च करणे आपल्या मुलासाठी निश्चितच एक मजबूत विमा असू शकते. तथापि, कोर्ड ब्लड बँकिंग साठी कोणालाही भाग पाडले पाहिजे असे वाटत नाही. आपल्या निर्णयासाठी आपल्या आर्थिक बाजूसोबतच एखाद्या वैज्ञानिक विश्लेषणावर आधारित रहा. हे लक्षात ठेवा की कॉर्ड ब्लड बँकिंग वास्तविक आहे. जर आपल्या कौटुंबिक इतिहासामध्ये काही विशिष्ट आजारांच्या घटना घडल्यास आणि आपण खाजगी कॉर्ड ब्लड बँकिंग निवडण्याच्या आर्थिक स्थितीत असाल तर, हा एक अत्यंत चांगला निर्णय असू शकेल कॉर्ड ब्लड बँकिंग - एक अतिरिक्त पर्याय जेव्हा एखाद्या लहान मुलाची काळजी घेण्याची वेळ येते तेव्हा कोणतेही पालक पैशाचा विचार करत नाहीत. मुलाचा किंवा ती प्रौढ झाल्यावर त्याचे संरक्षण करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कोणत्याही विमाचे नेहमी स्वागत आहे. काही इतर स्थापित वैद्यकीय शाखांच्या तुलनेत कॉर्ड ब्लड बँकिंग ही नवीन शाखा आहे. काही दशकांत, बर्‍याच मोठ्या कंपन्यांनी कॉर्ड बँकिंग सोल्यूशन्स ऑफर केल्या आहेत. नाळेतील रक्त प्रत्यारोपण होण्याची शक्यता बरीच कमी आहे, परंतु अशी परिस्थिती उद्भवल्यास, संग्रहित स्टेम पेशी एक जीवनवाहक असू शकतात. नाळेतील रक्तपेढीचा विचार करणार्‍या जोडप्यांसाठी कौटुंबिक रोगाचा इतिहास आणि वित्तीय कारण हे मुख्य घटक आहेत. तुम्ही ह्या प्रक्रियेचे सर्व घटक नीट अभ्यासा तसेच तुम्ही कॉर्ड ब्लड बँकिंगचा निर्णय घेण्याआधी ज्या लोकांनी हा पर्याय स्वीकरला आहे त्यांच्याशी बोलून बघा आणखी वाचा: नवजात बाळाची काळजी घेताना सांगितल्या जाणाऱ्या १५ दंतकथा आणि त्यामागील सत्यता नवजात बाळाला योग्यरित्या कसे घ्यावे? (छायाचित्रांसहित)
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved