बाळ

लहान बाळांना होणारा जंतांचा संसर्ग – कारणे, लक्षणे आणि उपचार

जंत हे एकप्रकारचे परजीवी असतात आणि ते आतड्यात राहतात . मुलाच्या आहारातून त्यांचे पोषण होते. एक प्रकारचा जंतांचा संसर्ग, ज्याला हेलमिंथ इन्फेक्शन देखील म्हणतात, मुलांमध्ये पोटदुखीचे एक कारण आहे. हे संक्रमण सामान्य असल्याने, जंतांच्या संसर्गाची विविध कारणे आणि लक्षणे तसेच उपचारांची माहिती ठेवणे चांगले.

जंतांच्या संक्रमणांचे प्रकार

असे अनेक प्रकारचे जंत आहेत ज्यांची पैदास मानवी शरीरात होते. बाळांना संसर्गित करणारे जंतांचे सर्वात सामान्य प्रकार खालीलप्रमाणे

. टेपवर्म

टेपवर्म, ज्याला फ्लॅटवर्म्स देखील म्हणतात, ह्यांना आकडे (हुक) असतात ज्याद्वारे ते आतड्यांशी जोडले जातात आणि अर्धवट पचलेल्या आहारावर प्रजनन करतात. टेपवर्मची लांबी काही इंचांपासून ४० फुटांपर्यंत असू शकते! सामान्यतः दूषित अन्नाद्वारे ते मुलांच्या पोटात जातात.

. राउंडवर्म्स

राउंडवर्म संसर्गाचे कारण अस्कारिस लुंब्रोकॉइड्स हे जंत असतात. ते पोकळ असतात आणि त्यांची लांबी ३५ सेमीइतकी वाढू शकते. राउंडवर्म्स खारट पाणी, माती आणि गोड्या पाण्यात राहतात आणि ते सामान्यत: पाळीव प्राण्यांद्वारे मानवामध्ये जातात.

. पिनवर्म्स /थ्रेडवर्म्स

पिनवर्म्स, ह्यांना थ्रेडवॉम्स देखील म्हणतात. हे लहान, पातळ आणि पांढरे किडे आहेत जे गुदाशयात असतात. जेव्हा एखादी व्यक्ती झोपते तेव्हा मादी अळी गुदद्वाराच्या भागात अंडी देते. यामुळे खाज सुटते, खाजवल्यामुळे अंडी मुलांच्या बोटावर येतात. ही अंडी कपडे, बेडशीट्स आणि टॉयलेटच्या आसनांवर टिकून राहतात आणि दूषित अन्न आणि पेयाद्वारे शरीरात जातात. पिनवर्म इन्फेक्शन होणे लहान मुले आणि बाळांमध्ये सर्वात सामान्य आहे.

. हुकवर्म

हुकवर्म सामान्यत: अस्वच्छतेमुळे उद्भवतात. हे लहान परजीवी जंत आहेत जे स्वतःस आतड्यांच्या भिंतींवर जोडतात. दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे एखाद्या मुलाला हूकवर्म इन्फेक्शन होऊ शकते.

आपल्या मुलाला जंत झाले आहेत की नाही हे कसे ओळखावे?

मुले क्वचितच संसर्ग होण्याची लक्षणे दर्शवतात. संसर्ग देखील कमीतकमी असू शकतो आणि म्हणूनच, याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. आम्ही शिफारस करतो की यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास आपण आपल्या बाळाची तपासणी करुन घ्या:

जंत संसर्गाची कारणे कोणती?

बाळांना आणि लहान मुलांना घराबाहेर रांगताना आणि खेळताना जंतांची लागण होण्याची शक्यता असते. बाळांमधील जंतांच्या विकासास मदत करणारी सर्वात सामान्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:

जंत संक्रमण निश्चित करण्यासाठी चाचण्या

डॉक्टर खालील चाचण्याद्वारे मुलांमध्ये जंत संसर्ग दर्शवू शकतात

. शौच तपासणी

जंत किंवा जंतांची अंडी आहेत का हे तपासण्यासाठी शौचाचा नमुना प्रयोगशाळेत पाठविला जातो.

. बोटांच्या नखांची तपासणी

किडे किंवा त्यांची नखात जंतांची अंडी अडकली आहेत का हे तपासण्यासाठी डॉक्टर नखांची तपासणी करतील.

. स्टिकी टेप चाचणी

ही चाचणी थ्रेड वर्म्स शोधण्यासाठी विशेषतः केली जाते. कृमीची अंडी गोळा करण्यासाठी टेपचा तुकडा बाळाच्या गुदद्वारापाशी ठेवला जातो.

. कॉटन बड स्वाब

बाळाच्या गुदद्वाराजवळ जंतांची अंडी आहेत किंवा नाही हे तपासण्यासाठी कॉटन बड वापरला जातो.

. अल्ट्रासाऊंड चाचणी

ही चाचणी केवळ गंभीर संसर्गाच्या बाबतीत केली जाते. येथे, डॉक्टर वर्म्सचे अचूक स्थान शोधण्यासाठी अल्ट्रासाऊंड वापरतात.

मुलांमध्ये जंत उपचार

अळी संक्रमण नष्ट करणे कठीण नाही. बालरोग तज्ञ सहसा अँटी- पॅरासाईट औषधे लिहून देतात. संसर्गाच्या तीव्रतेवर अवलंबून, डॉक्टर खालीलपैकी कोणतीही औषधे लिहून देऊ शकतात.

जंत संसर्गासाठी घरगुती उपचार

जर जंतांचा त्रास झाल्याचा संशय असेल तर आपण प्रथम वैद्यकीय मदत घ्यावी. त्यानंतर आपण पूरक उपचार म्हणून खाली घरगुती उपचार वापरू शकता. आहार देण्यापूर्वी सर्व साहित्य शुद्ध करा:

बाळाच्या वाढीवर होणारे जंतांचे परिणाम

जंत असे परजीवी असतात जे त्यांच्या यजमानाच्या शरीरावर पोषण करतात. ते मुलांच्या आरोग्यास पुढील प्रकारे नुकसान करतात:

आपल्या बाळाला जंत संसर्गापासून कसे प्रतिबंधित करावे

मुलांना जंत होण्यापासून रोखण्यासाठी चांगली स्वच्छता राखणे आवश्यक आहे. बाळे रांगायला आणि चालायला लागल्यावर जंत संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे, खालील उपायांचा सराव करणे महत्वाचे आहे: जंतांचा संसर्ग रोखण्यासाठी स्वच्छता राखणे खूप महत्वाचे आहे. काही बालरोगतज्ज्ञ संसर्ग टाळण्यासाठी आणि मुलाची इष्टतम वाढ सुनिश्चित करण्यासाठी दर महिन्यांनी एक जंतनाशक औषध देण्याची शिफारस करतात. आणखी वाचा: बाळांची कोरडी त्वचा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved