बाळ

बाळांसाठी वेदनारहित लसीकरण

तुम्ही पालक झाल्यावर, तुमच्या बाळाला लसीकरण करून घेण्याचा तुम्ही विचार करत असता.लसीकरण प्रक्रियेदरम्यान बाळाला वेदना होतात आणि बाळ खूप रडते. त्यासाठी तुम्ही वेगळा पर्याय शोधू शकता. तुम्ही तुमच्या बाळासाठी वेदनारहित लसीकरणाचा विचार करू शकता. वेदनारहित लसीकरण प्रक्रियेत वापरण्यात येणारी लस ही एसेल्युलर लस असते. त्यामध्ये कमी प्रतिजन असतात आणि सिरिंजद्वारे शरीरात सोडली  जातात. वेदनारहित लसीकरण केल्याने बाळाला त्रास होत नाही, आणि त्यामुळे अश्या लशी  पालकांमध्ये लोकप्रिय झाल्या आहेत. परंतु तुम्ही तुमच्या मुलाला वेदनारहित लस देण्यापूर्वी या लशी कशासाठी आहेत आणि त्या प्रभावी आहेत की नाही हे समजून घेणे आवश्यक आहे.

 व्हिडिओ: बाळांसाठी वेदनारहित लसीकरण चांगले आहे का?

https://youtu.be/2V_t6ILMYAQ

वेदनारहित लसीकरण म्हणजे काय?

लहान मुलांसाठी वेदनारहित लसीकरण हा रोगप्रतिकारकशास्त्राच्या क्षेत्रातील अलीकडचा शोध आहे.वेदनारहित लस डीएपीटी (डिप्थीरिया, ऍसेल्युलर पेर्टुसिस आणि टिटॅनस.) नावाची एकत्रित लस दिली जाते. ही लस टोचल्यावर वेदना होत नाहीत आणि सूज कमी येते किंवा अजिबात येत नाही. डीएपीटी लस, वेदनारहित असते. ही लस नियमित वेदनादायक लसींइतकीच प्रभावी असते.

वेदनारहित लशी खरोखर प्रभावी आहेत का?

वेदनारहित किंवा वेदनादायक - अलीकडील अभ्यासांनुसार दोन्ही प्रकारच्या लशी तितक्याच प्रभावी आहेत.वेदनारहित लस देखील डीपीटी आणि त्याचे गंभीर प्रकार रोखू शकते. ही वेदना रहित लस तुम्ही बाळाला देऊ शकता! परंतु, कोणतीही लस 100 टक्के प्रभावी नसते हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. लसीकरण झालेल्या मुलाची रोगप्रतिकारक शक्ती वाढली असली तरी, हा रोग त्याच्यामार्फत लसीकरण न केलेल्या किंवा कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या इतर मुलांपर्यंत पोहोचू शकतो. त्याचप्रमाणे, मुलाची प्रतिकारशक्ती कमी असल्यास त्याला संसर्ग होऊ शकतो.

वेदनारहित लस सुरक्षित आहेत का?

वेदनारहित लसीकरण लहान मुलांसाठी सुरक्षित आहे का? तर होय, वेदनारहित लशी सुरक्षित आहेत ही लस दिल्यावर बाळाला वेदना होत नाही तसेच सूज आणि ताप येत नाही.

वेदनारहित लसीकरणाचे फायदे

वेदनारहित लसीकरणाशी जोडलेले काही फायदे येथे आहेत:

बाळांमध्ये आढळणारे वेदनारहित लशींचे दुष्परिणाम

साधारणपणे, बाळांमध्ये वेदनारहित लशींचे कोणतेही दुष्परिणाम आढळत नाहीत. वेदनारहित लसीकरण वेदनामुक्त नसते.लस दिल्यानंतर बाळांना समान प्रमाणात वेदना होतात. परंतु लसीकरणानंतर, वेदना कमी होते आणि ताप येण्याची शक्यता देखील कमी असते. या लसीकरणाचा एकमात्र तोटा म्हणजे ही लस महाग असते. वेदनारहित लसींची किंमत वेदनादायक लसींच्या किंमतीपेक्षा दुप्पट आहे.

वेदनारहित विरुद्ध वेदनादायक लसीकरण

वेदनारहित लसींच्या काही मर्यादा काय आहेत?

2009 आणि 2010 मध्ये पेर्ट्युसिसच्या उद्रेकादरम्यान,ज्या किशोरवयीन मुलांमध्ये डीटीएपी लस बाल्यावस्थेमध्ये दिली गेली होती त्यांना संपूर्ण पेशी लस देण्यात आलेल्या लोकांपेक्षा पेर्ट्युसिस होण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळे त्यांच्या वापराला काही मर्यादा आहेत

वेदनारहित किंवा वेदनादायक लस - कोणती चांगली आहे?

वेदनारहित लशी वेदनादायक लशी इतक्याच प्रभावी आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या बाळासाठी कुठलीही लस निवडू शकता.पण लक्षात ठेवा की वेदनारहित लशी  महाग आहेत.

लशींच्या निवडीवर आधारित लसीकरण वेळापत्रक

इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या मते, वेदनादायक लस खालीलप्रमाणे दिली पाहिजे:
  1. प्राथमिकलसीकरण: ह्या लशी  सहा आठवडे, दहा आठवडे आणि चौदा आठवडे वयाच्या बाळांना दिल्या पाहिजेत.
  2. बूस्टरशॉट्स :लहान मूल दीड वर्षाचे झाल्यावर आणि पाच वर्षांचे झाल्यावर त्याला बूस्टर शॉट्स दिले पाहिजेत.
इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या मते, एखाद्याने वेदनारहित लस खालीलप्रमाणे दिली पाहिजे:
  1. प्राथमिकलसीकरण: आयएपी शिफारस करते की प्राथमिक लसीकरणासाठी वेदनारहित लस केवळ विशेष परिस्थितीत दिली जावी. काही विशेष परिस्थितींमध्ये वेदनादायक लसीच्या मागील डोसवर एलर्जीची प्रतिक्रिया येऊ शकते किंवा जेव्हा मुलाला न्यूरोलॉजिकल समस्या येतात तेव्हा वेदनारहित लस दिली जाऊ शकते.
  2. बूस्टरशॉट्स: दीड वर्षे आणि पाच वर्षे वयाच्या मुलांना दिला जाऊ शकतो
टीप: आयएपी च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, वेदनारहित आणि वेदनादायक लसींचे वेळापत्रक समान आहे

बाळांना वेदनारहित लसीकरणाची किंमत

वेदनारहित लसीकरण पारंपारिक लसीकरणापेक्षा जास्त महाग असू  शकते. तुमच्या मुलाचे बालरोगतज्ञ तुम्हाला लसीकरण वेळापत्रक, उपलब्ध लसीची निवड आणि किंमत यासंबंधी तपशील देऊ शकतात. लसीकरणाची किंमत देशानुसार भिन्न असू शकते हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे आणि काही व्यक्ती सरकारी नियमांनुसार विनामूल्य लसीकरणासाठी पात्र असू शकतात. यूएसमध्ये अनेक परवानाकृत बालरोग DTaP लसी उपलब्ध आहेत: डॅप्टसेल, इन्फनरिक्स,किनिरिक्स,पेडिएरिक्स,पेनटॅसेल आणि क्वाड्रासेल इत्यादी. तुम्ही सीडीसी द्वारे समर्थित लसीकरण कार्यक्रम निवडल्यास, (जसे की राज्य आरोग्य विभाग) या लसींची किंमत $18 ते $62 पर्यंत असू शकते. खाजगी क्षेत्रातील लसीकरणाची किंमत $31 आणि $100 च्या दरम्यान असू शकते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. वेदनारहितलसीकरणानंतरबाळांना झोप आणि ताप येतो का?

नाही. प्रत्येक बाळ लसीकरणानंतर  वेगवेगळी प्रतिक्रिया देऊ शकते. काही बाळांना लसीकरणानंतर ताप येत नाही.असे असले तरी,अनेक पालक त्यांच्या नवजात बालकांना ताप आला नाही तर काळजी करतात कारण ताप आल्याने लस कार्यरत होत आहे असा त्यांचा समज असतो. या परिस्थितीत, तुम्हाला हे लक्षात ठेवावे की ताप येणे हे तुमच्या मुलाची लस प्रभावी असल्याचे लक्षण नाही.

2. लसीकरणाच्यादुष्परिणामांपासूनबाळांना बरे होण्यासाठी किती वेळ लागतो?

लसीचे सौम्य दुष्परिणाम अनेकदा दोन ते तीन दिवसांत आपोआप नाहीसे होतात.

3. लहानमुलांच्यालसीकरणास विलंब करणे योग्य आहे का?

मुलांना शक्य तितक्या लवकर संसर्ग होण्यापासून रोखण्यासाठी,शिफारस केलेल्या वेळापत्रकानुसार त्यांना लसीकरण करण्याचा सल्ला दिला जातो. लसीकरणास उशीर केल्याने लहान मुलांना दीर्घकाळापर्यंत आजार होण्याची शक्यता असते. आणि त्याचे जीवघेणे परिणाम होऊ शकतात. एक पालक म्हणून, तुम्ही तुमच्या मुलाला वेदनादायक लसीकरणानंतरच्या परिणामांपासून वाचवू इच्छित असाल,परंतु वेदनारहित लसीपेक्षा वेदनादायक लशींचे फायदे खूप जास्त आहेत. तुमच्या मुलाला बूस्टर शॉट्ससाठी वेदनारहित लस देणे योग्य आहे, परंतु त्यांच्या प्रतिकारशक्तीसाठी वेदनादायक लस देण्यात याव्यात. आणखी वाचा: लसीकरणानंतर बाळाला होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी काही टिप्स
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved