बाळ

बाळाने डोळे चोळण्याची कारणे आणि प्रतिबंध

तुम्ही तुमच्या लहान बाळाला हॉस्पिटलमधून घरी आणल्यानंतर, बाळाच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे तुमचे लक्ष जाईल. बाळ काय करत आहे, कुठला आवाज काढतोय आणि आपल्या मोठ्या डोळ्यांनी आजूबाजूला बघत आहे का? ह्या सगळ्या गोष्टींकडे तुमचे लक्ष जाईल. लहान बाळाचे डोळे चोळणे ही कदाचित तुम्हाला दिसणारी सर्वात गोड घटना आहे. त्या गोल टपोऱ्या डोळ्यांना चोळणाऱ्या बाळाच्या लहान मुठी बघून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. सहसा, जेव्हा बाळाला थकवा येतो किंवा झोप येते तेव्हा बाळ डोळे चोळते. परंतु काही वेळा, तुमच्या बाळाला धूळ, संसर्ग किंवा अगदी ऍलर्जीमुळे देखील वेदना जाणवू शकतात आणि त्यामुळे सुद्धा बाळ डोळे चोळते. या लेखात, आपण बाळाचे डोळे चोळण्याची कारणे आणि प्रतिबंध यावर चर्चा करू.

व्हिडिओ: बाळाचे डोळे चोळणे - कारणे आणि प्रतिबंध

https://youtu.be/KlPbfenfGPo तुमचे बाळ जर डोळे चोळत असेल तर तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे. बाळाने त्याचे डोळे खूप जोरात चोळू नये म्हणून तुम्ही लक्ष ठेवले पाहिजे. लहान बाळे डोळे का चोळतात ह्याची काही कारणे पाहूया.

लहान मुले डोळे का चोळतात?

लहान मुले अनेक कारणांमुळे डोळे चोळू शकतात. झोपताना बाळाने डोळे चोळणे ही एक सामान्य घटना आहे. परंतु, प्रत्येक गोष्टीवर उपाय आहे! लहान बाळे डोळे का चोळतात याची काही कारणे येथे दिलेली आहेत -

1. बाळाला झोप येत असेल

काहीवेळा, बाळ डोळे चोळत असताना जांभई देते. म्हणजेच बाळ थकलेले असते आणि त्याला झोप आलेली असू शकते. जेव्हा तुम्ही थकलेले असता तेव्हा तुमचे डोळे थकलेले असतात. म्हणूनच लहान बाळे त्यांचे डोळे चोळतात. डोळे चोळताना मसाज करताना डोळ्यांच्या स्नायूंभोवती आणि पापण्यांमधील काही ताण आणि वेदना कमी करण्याचा प्रयत्न बाळ करत असते. ह्यामुळे बाळाला खूप झोप आली आहे हे समजते.

2. बाळाचे डोळे कोरडे असतील

बाळाचे डोळे खूप कोरडे झाल्यावर देखील बाळ डोळे चोळू शकते. डोळ्याचा पातळ पडदा डोळ्याच्या आतील भागाला झाकून टाकतो आणि बराच वेळ हवेच्या संपर्कात राहिल्यास बाष्पीभवन होते. असे झाल्यास  डोळ्यांच्या कोरडेपणामुळे बाळ अस्वस्थ होऊन डोळे चोळू लागते. डोळे चोळल्यामुळे बाळाच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि डोळ्यांमधील ओलावा पूर्ववत होतो.

3. बाळ उत्सुक असू शकेल

तुमच्या लक्षात येईल की जेव्हा तुम्ही तुमचे डोळे चोळून बंद करता तेव्हा तुम्हाला तुमच्या पापणीच्या आतील बाजूस दिवे आणि नमुने दिसतात. तुमच्या लहान बाळाने नुकतेच डोळे चोळण्याचे कौशल्य आत्मसात केलेले आहे आणि तो या नवीन कौशल्याचा प्रयोग करत आहे. डोळे चोळताना दिसणारे नमुने पाहून  तुमच्या बाळाला मजा येऊ शकते आणि ते अनुभवण्यासाठी तुमचे बाळ पुन्हा पुन्हा प्रयत्न करू शकते.

4. बाळाच्या डोळ्यात काहीतरी खुपत असेल

तुमचे बाळ सतत डोळे चोळत असेल जर बाळाला डोळ्यात काहीतरी खुपत असेल. बाळाच्या डोळ्यात धूळ गेलेली असू शकते किंवा चिकट श्लेष्मा असू शकतो. बाळाचे डोळे मिचकावणे किंवा अश्रू येणे ही देखील ह्याची चिन्हे असू शकतात. तुमच्या बाळाच्या डोळ्यात जळजळ होत असल्यास, डोळे आणि चेहरा पुसण्यासाठी मऊ ओल्या कापडाचा वापर करा जेणेकरून दुसरे काहीही आत जाणार नाही. त्यानंतर, तुमच्या बाळाचे डोळे स्वच्छ करण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा (डोळ्यांसाठी कधीही कोमट पाणी वापरू नका). हे करत असताना बाळाचे डोके धरून बाळाच्या मानेला आधार द्या. जर तुम्हाला तुमच्या बाळाच्या डोळ्याच्या कोपऱ्यात काहीतरी अडकलेले दिसले तर ते बाहेर काढण्यासाठी कोमट, ओल्या कापडाने किंवा कापसाने पुसून पहा. त्यानंतरही डोळ्यातून पाणी येत असेल किंवा डोळे लुकलुकत असतील तर बाहेरच्या काही वस्तू डोळ्यात गेल्या आहेत असा त्याचा अर्थ होऊ शकतो. अश्या वेळी डॉक्टरांकडे जाणे चांगले.

5. डोळे दुखणे किंवा खाज सुटणे

बाळाचे डोळे चोळण्याचे आणखी एक कारण म्हणजे बाळाला डोळ्याची ऍलर्जी किंवा संसर्ग झालेला असू शकतो, ह्यामुळे वेदना होऊन खाज सुटू शकते. तुमच्या बाळाला डोळ्यांचा संसर्ग झाल्यास, डोळ्याला सूज येणे किंवा डोळे लालसर होणे, स्त्राव होणे, ताप येणे किंवा बाळ सतत रडणे यांचा समावेश असू शकतो. अशा परिस्थितीत, डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले आहे जेणेकरुन तुमच्या बाळाच्या डोळ्यातील संसर्ग किंवा ऍलर्जीचे अचूक निदान होऊ शकेल आणि त्यावर उपचार सुद्धा करता येऊ शकतील.

नवजात बाळे कोणत्या वयात डोळे चोळू लागतात?

लहान मुलं साधारणतः महिन्याची झाल्यावर डोळे चोळायला लागतात! बाळाला थकवा आल्यास, किंवा डोळ्यांना खाज सुटत असल्यास बाळ डोळे चोळते.

लहान मुलांना डोळे चोळण्यापासून तुम्ही कसे रोखू शकता?

तुमच्या बाळाला वारंवार डोळे चोळण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही काही उपाय करणे आवश्यक आहे, कारण यामुळे तुमच्या लहान बाळाच्या डोळ्यांना दुखापत होऊ शकते किंवा ओरखडे येऊ शकतात. असे होऊ नये म्हणून खाली काही उपाय दिलेले आहेत.

डोळे जोराने चोळण्याचे धोके

झोपेत असताना हलकेच डोळे चोळल्यामुळे कोणताही धोका उद्भवत नाही. जोराने डोळे चोळण्याने काही प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो. वारंवार किंवा जोराने डोळे चोळण्याचे काही धोके खालीलप्रमाणे: -

1. संसर्गाचा धोका वाढतो

लहान मुले नैसर्गिकरित्या जिज्ञासू असतात आणि बाळे सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीला स्पर्श करत राहतात. लहान बाळांना मिठी मारताना बाळाला संसर्ग होण्याची शक्यता असते. डोळे चोळल्याने हे जंतू तुमच्या बाळाच्या डोळ्यात जाण्याचा आणि संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

2. बाळाची दृष्टी खराब होते

सतत डोळे चोळल्याने कॉर्नियल टिश्यू पातळ होतात, दीर्घकाळ दृष्टी खराब होते. त्यामुळे लगेच संसर्ग होत नसला तरी, तुमच्या बाळाला पुढील आयुष्यात प्रोग्रेसिव्ह मायोपिया होण्याची शक्यता वाढते.

3. दुखापत होऊ शकते

डोळ्यात काहीतरी अडकल्यामुळे बाळ चिडचिड करत असेल तर बाळ डोळे चोळू शकते. यामुळे कॉर्नियाला ओरखडा होण्याचा धोका वाढतो  आणि ते वेदनादायक असू शकते आणि बरे होण्यास जास्त वेळ लागतो.

डॉक्टरांना कधी भेटायचे?

दातदुखी किंवा थकवा याशिवाय इतर कारणांमुळे तुमचे बाळ डोळे चोळत असल्याचे तुमच्या लक्षात आल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटावे. डोळ्यांना सूज येणे किंवा लालसरपणा ह्यासारखी इतर लक्षणे जर तुम्हाला दिसली तर तुम्ही तुमच्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्यावा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. डोळे चोळल्याने बाळांच्या डोळ्यात अश्रू येऊ शकतातका?

डोळे चोळल्याने बाळाचे डोळे लाल होऊन जळजळ होऊ शकते. परंतु, त्यामुळे अश्रू येण्याची शक्यता नसते.

2. डोळे चोळल्याने बाळाच्या डोळ्यांना कायमचे नुकसान होऊ शकते का?

बाळाने डोळे चोळणे ही एक अतिशय नैसर्गिक घटना आहे आणि बहुतेक वेळा त्यामध्ये काळजी करण्यासारखे नसते. तुमच्या बाळाला डोळे चोळण्याची सवय लागल्याचे लक्षात आल्यास काळजी करू नका किंवा घाबरू नका. जर डोळे चोळल्यामुळे बाळाला त्रास होतो आहे असे तुमच्या लक्षात आले आणि लालसरपणा किंवा सूज दिसली तर, वर सांगितल्याप्रमाणे बाळाचे डोळे धुण्याचा प्रयत्न करा. जर असे करून सुद्धा लालसरपणा कमी झाला नाही आणि सूज कायम राहिली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. लालसरपणा किंवा सूज नसतानाही डोळे चोळणे जास्त प्रमाणात सुरू राहिल्यास, डॉक्टरांकडे जाणे केव्हाही चांगले असते. शेवटी, जेव्हा तुमच्या बाळाच्या आरोग्याचा प्रश्न असेल तेव्हा कोणतीही तडजोड करू नये. आणखी वाचा: बाळाच्या डोळ्याच्या संसर्गासाठी सर्वोत्तम घरगुती उपचार बाळाच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळे – कारणे आणि उपाय
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved