गर्भारपण

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – २३ वा आठवडा

अभिनंदन! तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या २३ व्या आठवड्यापर्यंत पोहोचला आहात आणि तुम्ही तुमच्या जुळ्या बाळांना गर्भात सुरक्षितपणे ठेवल्यामुळे तुमची बाळे खूप आनंदी असली पाहिजेत. गरोदरपणाचा 'हनिमून स्टेज' म्हणून ओळखला जाणारा कालावधी संपायला आता फक्त एक आठवडा बाकी आहे. परंतु काळजी करण्याचे काहीही कारण नाही कारण आता सगळे सुरळीत आणि चांगले होणार आहे. हा आठवडा विशेषकरून खूप महत्वाचा आहे, ह्या आठवड्यात तुमचे आणि तुमच्या बाळाचे वजन खूप वाढेल.

२३ व्या आठवड्यात बाळांची वाढ

मागील आठवड्यांमध्ये तुमच्या जुळ्या किंवा एकाधिक बाळांमध्ये वाढ आणि विकासाच्या अनुषंगाने लक्षणीय बदल झालेले तुम्हाला दिसतील. हा आठवडा तुलनेने शांत असेल. बाळांची वाढ आणि नैसर्गिक प्रगती वेगाने होत आहे ना ह्यावर लक्ष केंद्रित केले जाते. तुमच्या बाळांचे आच्छादन करणारी त्वचा ह्या काळात थोडी संकुचित होऊन त्वचेला सुरकुत्या पडतील. कारण त्वचा योग्य प्रमाणात ताणली जाईल इतका चरबीचा साठा अजून तयार झालेला नाही. अर्धपारदर्शक लाल त्वचेमुळे बाळे विचित्र दिसू शकतात. परंतु येत्या काही महिन्यात त्यात बदल होईल. जर तुम्ही तुमच्या लहान बाळाच्या हृदयाचा ठोका ऐकण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यासाठी अल्ट्रासाउंडची प्रतीक्षा तुम्हाला करावी लागेल. सहसा, २३ व्या आठवड्यात, आपल्या जुळ्या किंवा तिळ्या बाळांचे हृदय मजबूत होईल आणि ते अधिक तीव्रतेने रक्त पंप करेल. केवळ स्टेथोस्कोप वापरुन आपल्या हृदयाचे ठोके ऐकणे शक्य असते. आपले डॉक्टर त्यासाठी मार्गदर्शन करू शकतात. या काळात, तुमची जुळी किंवा तिळी बाळे बरीच वेगाने वाढतील. विकसित झालेल्या शेवटच्या अवयवांपैकी एक म्हणजे फुफ्फुस. तथापि, बाळे श्वास घेण्याचा प्रयत्न करतात कारण ते आतमध्ये असतानाच त्याचा सराव करतात आणि अशाच हालचाली करतात ज्या वास्तविक जगात आल्या की त्यांची नक्कल होईल. मेंदूचा विकास महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचला आणि डोळ्यांचे सामर्थ्य वाढत गेले तर तुमचे बाळ अधूनमधून आतमध्ये स्वप्न पाहू शकतात. हे त्यांच्या पापण्याखालील डोळ्यांच्या हालचालींद्वारे आणि शरीराच्या वेगवान हालचालींमध्ये देखील प्रकट होते.

बाळांचा आकार केवढा असतो?

आता तुमच्या बाळांच्या आकारात वाढ होईल. बाळाचा आकार नारळापासून परिपक्व आंब्याच्या आकारामध्ये बदलेल. आधीच्या आठवड्यापेक्षा बाळांमध्ये लक्षणीय वाढ होईल. बाळाची लांबी, योग्यरीत्या मोजल्यास ती २८ सेंटिमीटर्सच्या आसपास असते आणि वजन ५०० ग्रॅम्सच्या आसपास असते. जुळ्या किंवा तिळ्या बाळांचा आकार पुढच्या दोन आठवड्यांमध्ये अगदी लक्षणीयरीत्या वाढेल.

सामान्य शारीरिक बदल

बहुतेक स्त्रियांचा गरोदरपणाचा २३ वा आठवडा शांततेत जातो. शरीरात होणारे कोणतेही बदल हे मागील आठवड्यांतील उर्वरित भाग असतात, ते पुढे तसेच राहतात किंवा तीव्रतेने वाढतात.

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या २३ व्या आठवड्याची लक्षणे

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या २३ व्या आठवड्यातील लक्षणे स्पष्ट दिसतात. तुमच्या लक्षात येईल की मागील काही लक्षणे सुद्धा पुन्हा दिसू लागतील.

जुळ्या बाळांसह गरोदरपण - २३ वा आठवडा - बाळाचा आकार

तुम्ही २३ आठवड्यांच्या गर्भवती असताना तुमचे पोट जुळ्या बाळांसह गरोदर असल्याची वैशिष्ट्ये दर्शवण्यास सुरुवात करते. म्हणजेच एका बाळासह गरोदर असताना दिसत असलेल्या पोटाच्या आकाराच्या तुलनेत जुळ्या बाळांसह गरोदर असतानाचा आकार तुम्ही गरोदरपणात तुलनेने पुढे असल्याचे दर्शवते. परंतु प्रत्येक गरोदरपण वेगळे असते आणि जनुके, उंची आणि वजन ह्या घटकांचा परिणाम तुमच्या पोटाच्या आकारावर होतो.

जुळ्या बाळांसह गरोदरपण - २३ वा आठवडा - अल्ट्रासाऊंड

शरीरावर चरबीचा साठा आणि वजन वाढत असल्याची खात्री करण्यासाठी ह्या कालावधीत अल्ट्रासाऊंड केला जातो. तसेच, ह्या आठवड्यात स्तनाग्रे सुद्धा स्पष्ट दिसू लागतात. तुम्ही पोटावर हात ठेवल्यास किंवा बाळाशी बोलल्यास तुमचे बाळ तुम्हाला प्रतिसाद देण्याची शक्यता आहे.

काय खावे?

ह्या आठवड्यात विविधता ही मुख्य गोष्ट आहे, तुम्ही जो आहार घेत आहात त्यामध्ये प्रत्येक पौष्टिक घटक विपुल प्रमाणात आहेत याची खात्री करुन घ्या. लोह, कॅल्शियम, आणि असंख्य जीवनसत्त्वे नेहमीप्रमाणे सर्वोच्च क्रमांकावर आहेत. पिण्याचे पाणी आणि इतर द्रवपदार्थांवर सुद्धा लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स

ह्या आठवड्यात तुम्हाला थोडी अस्वस्थता येऊ शकते, परंतु काही सोप्या टिप्ससह तुम्ही ते हाताळू शकता.

हे करा

काय टाळावे?

आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?

आपल्याकडे आधीपासून बहुतेक वस्तू असू शकतात, म्हणून काही जलद खरेदी करू शकता. जुळ्या बाळांसह २३ आठवड्यांच्या गर्भवती असताना पोटात कोणत्याही प्रकारची हालचाल झाल्यास तात्काळ तुमचा तुमच्या बाळांशी बंध निर्माण होतो. ह्या सगळ्या सुंदर क्षणांचा आनंद घ्या. तुमची बाळे मोठी झाल्यावर तुम्ही ह्या सगळ्या आठवणी पुनःपुन्हा आठवू शकता.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved