गर्भारपण

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – २२ वा आठवडा

२२ आठवड्यांच्या जुळ्या बाळांसह गरोदर राहिल्यानंतर तुमच्या जबाबदारीत वाढ होईल असे तुम्हाला वाटेल. संपूर्ण गरोदरपणाच्या कालावधीला सुवर्णकाळ बनवणारा तुमचा हा आनंदी काळ अजूनही सुरु आहे आणि तुम्ही त्याबद्दल निश्चित खात्री बाळगू शकता. तुमच्या बाळांच्या हालचाली जाणवत असताना कोणत्या बाळाने केव्हा पाय मारण्याचा प्रयत्न केला हे जाणून घेताना आणि बाळासोबत इतर बर्‍याच क्रियाकलापांनी तुम्ही तुमचा मूड चांगला ठेवू शकता. असे केल्यास तुमच्या बाळासोबत तुमचा चांगला बंध निर्माण होऊ शकतो. तुमच्या बाळाची वेगाने वाढ होत आहे आणि त्यांचे वजन पेलून हालचाल करणे तुम्हाला अवघड जाऊ शकते. जास्तीत जास्त वेळ आरामात घालविण्यासाठी हा चांगला काळ असू शकतो.

२२ व्या आठवड्यात बाळांची वाढ

तुमच्या बाळांचे वजन गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत वाढतच राहते आणि जेव्हा आईला योग्य पोषण दिले जाते तेव्हा स्वतःहून घडणाऱ्या शारीरिक कार्यांपैकी हे एक कार्य आहे. बाळांमध्ये, मागील आठवड्यात जगण्यावर आणि उर्जा मिळविण्याच्या मुख्य भागावर अधिक लक्ष केंद्रित केले गेले होते, तर ह्या आठवड्यामध्ये आजूबाजूचे वातावरण जाणण्याकडे लक्ष वळविणे सुरू होते. इंद्रियांच्या विकासास उत्तेजन मिळते, कारण डोळ्यांमुळे त्यांची शक्ती वाढू लागते आणि वेगवेगळ्या ध्वनी ओळखण्याची क्षमता देखील वाढू लागते. बाह्य जगाशी तुलना केल्यास गर्भाशयाला असलेले सर्व आच्छादन व संरक्षणामुळे गर्भाशयात शांत वाटते. तथापि, तुमच्या बाळांना शरीरातील वेगवेगळे आवज ऐकू येतात. हृदयाच्या ठोक्यांपासून रक्ताचे वाहणे, तुमचा आवाज आणि तुमच्या गुणगुणण्याचा आवाज तसेच काही बाह्य स्रोतांमुळे देखील तुमच्या शरीरात बरेच आवाज ऐकू येतात. जर आपण यापूर्वी आपल्या मुलांशी बोलत असाल तर नक्कीच ह्या आठवड्यात त्यांना तुमच्या आवाजाबद्दल आत्मीयता वाटू लागेल. जेव्हा तुम्ही बाळाजवळ जाता तेव्हा बाळ तुमचे बोट घट्ट पकडून ठेवते आणि तुम्हाला जाऊ देत नाही ह्या क्षणाबद्दल प्रत्येक पालक बोलत असतात. तुम्हाला त्या क्षणाचा आनंद एका पेक्षा जास्त बाळांकडून घेता येणार आहे आणि त्या क्षणाचा पाया या आठवड्यापासून सुरू होईल. मेंदू, स्नायूंची शक्ती आणि त्याची क्षमता तपासून घेण्यास सुरुवात करतो, त्यामुळे बाळाच्या हातात काहीही ठेवल्यावर बाळाची मूठ बंद होऊ शकते. बाळ अगदी नाळेला किंवा गर्भाशयाच्या पृष्ठभागाला सुद्धा पकडू शकते आणि हे सर्व नैसर्गिक आहे. बरीचशी बाळे अजूनही अशक्त दिसतात, कारण त्यांची त्वचा पातळ आणि अगदी अर्धपारदर्शक आहे. परंतु येत्या काही महिन्यांत, त्यांच्या शरीरावर चरबीचे प्रमाण वाढू लागते आणि त्वचा योग्य प्रकारे पसरते आणि त्यामुळे तुमच्या बाळाला गोंडस रूप येते.

बाळांचे आकार केवढा असतो?

२२ व्या आठवड्यात बाळांचा आकार नारळाएवढा होतो. ह्या आठवड्यात बऱ्याचशा बाळांची लांबी ९-११ इंच होते आणि त्यांचे वजन ४०० ग्रॅम पर्यंत पोहोचते. जुळी किंवा एकाधिक बाळे तुलनेने छोटी असतात परंतु डॉक्टरांच्या मतानुसार जोपर्यंत कुठली समस्या येत नाही तोपर्यंत काळजी करण्याचे काहीही कारण नसते.

सामान्य शारीरिक बदल

तुमच्या पोटात जुळी किंवा एकाधिक बाळे अगदी अद्भुतरित्या विकसित होत जातात. तेव्हा होणारे काही शारीरिक बदल खालीलप्रमाणे आपण मोठे झाल्यानंतर आपली नाभी काही वेगळी दिसेल याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल कारण ती बालपणातच अंतिम रूप धारण करते. तथापि, गर्भधारणेनंतर तुमचे गर्भाशय पोटाच्या खालच्या भागात सरकू लागते तसेच बाळांच्या विकासासाठी ते जागा करू लागते त्यामुळे पोटावर दाब पडून त्याचा आकार बदलू लागतो. तुम्ही इंटरनेट किंवा सोशल ग्रुपवर ह्याविषयी बघितले असेल किंवा ऐकले असेल की गरोदरपणात तुमची नाभी बाहेर येते. हे ऐकून तुम्हाला थोडे विचित्र वाटू शकते परंतु नंतर ते ठीक होते. तुमच्या पोटात होणाऱ्या बदलामुळे तुमची नाभी बाहेर येते. जर तुम्हाला हे बघून चिंता वाटत असेल तर तुम्ही काळजी करण्याचे अजिबात कारण नाही प्रसूतीनंतर ते सामान्य होईल.

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या २२ व्या आठवड्यातील लक्षणे

या काळात तुम्हाला आढळणारी बहुतेक लक्षणे ह्या सर्व काळात तुम्ही अनुभवत असलेल्या गोष्टींपेक्षा भिन्न नाहीत. काही कदाचित तीव्र असतील तर काही आधीपेक्षा सौम्य असतील.

जुळ्या बाळांसह गरोदरपण - २२ वा आठवडा - पोटाचा आकार

गरोदरपणात २२ आठवड्यांच्या जुळ्या बाळांच्या विकासामुळे तुमचे पोट ह्या टप्प्यावर नेहमीपेक्षा खूप मोठे होईल. ह्या कालावधीत तुम्हाला अस्वस्थता जाणवू शकते तसेच पाठदुखी सुद्धा वाढून सामान्यपणे चालणे कठीण होईल.

जुळ्या बाळांसह गरोदरपण - २२ वा आठवडा - अल्ट्रासाऊंड

गरोदरपणाच्या मध्यावर असतानां आता ह्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड केला जाईल. अल्ट्रासाऊंड दरम्यान काही मातांना बाळे पोटात फिरताना आनंद होईल तर काहींना बाळे शांतपणे झोपलेली दिसतील. परंतु काळजी करू नका कारण तुमची बाळे जास्त झोपायला लागतात आणि तुम्हाला त्यांच्या हृदयाचे ठोके जास्त मजबूत ऐकू येतील.

काय खावे?

जास्त प्रमाणात सेल्युलोज, कॅल्शियम तसेच भिन्न दुग्धजन्य पदार्थ असतात अशा खाद्यपदार्थावर लक्ष द्या. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी शक्य तितके जास्त प्रमाणात तंतुमय पदार्थ आणि फळांचा समावेश असावा. व्हिटॅमिन कॉम्प्लेक्स कॅप्सूलसह लोह पूरक आहार आपल्या आहारास समर्थन देण्याचा एक चांगला मार्ग आहे.

गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स

गरोदरपणाच्या २२व्या आठवड्यात स्वत: ची काळजी घेण्यासाठी तुम्हाला काही विशेष करावे लागत नाही

हे करा

काय टाळावे?

आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे

बाळाचा विकास आणि वाढ होत असताना, खालील गोष्टींची खरेदी करा. जेव्हा तुम्ही जुळ्या बाळांसह २२ आठवड्यांच्या गर्भवती असता तेव्हा गर्भाचा विकास विजेच्या वेगाने होत असतो. ही एक पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे हे जाणून घ्या आणि तुम्ही लवकरच योग्य प्रकारे आईसाठी आवश्यक असणारी कौशल्ये विकसित कराल.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved