गर्भारपण

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १७ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती राहणे स्त्रीसाठी चिंताजनक असू शकते आणि जर तुम्ही गरोदरपणाच्या १७ आठवड्यांच्या टप्प्यावर पोहोचलात तर ते आश्चर्यचकित करणारे आणि विस्मयजनक क्षण आहेत नाही का? तुमच्या पोटातली बाळे आता पूर्वीपेक्षा मोठी झाली असतील. तुम्हाला आता गरोदरपणाच्या दिनचर्येची सवय झालेली असेल आणि तुमच्या बाळांना तुम्ही वाढवू शकाल असा आत्मविश्वास तुम्हाला येईल. तुम्ही गरोदरपणाच्या १७ व्या आठवड्यात पोहोचल्यावर वैद्यकीय चाचण्या आणि तपासण्या करणे सुरु राहील त्यामुळे तुमच्या बाळांची प्रगती आणि तुमच्या तब्येतीवर लक्ष ठेवता येते.

१७ व्या आठवड्यात बाळांची वाढ

तुमची बाळे त्यांच्या वाढीच्या निम्म्या टप्प्यावर पोहोचली आहेत आणि म्हणूनच यापुढे त्यांची वाढ कमी होईल असे समजू नका. उलटपक्षी त्यांची प्रगती वाढेल आणि लहान बाळे अधिक चांगला आकार घेऊ लागतील. १७ व्या आठवड्यापर्यंत होणाऱ्या बहुतेक विकासामध्ये प्रामुख्याने बाळांच्या अवयवांचे कार्य समाविष्ट होते आणि लहान भ्रुण माणसाच्या रूपात कार्यरत असलेल्या गर्भामध्ये रूपांतरित होते. पुढे, जी मुख्य वाढ होते ती चरबीच्या स्वरूपात साठवण्यात येते. त्यांचे शरीराचे तापमान राखण्यासाठी आणि आवश्यक असलेली सर्व ऊर्जा मिळण्यासाठी ऊतकांवर चरबीचे थर साठू लागतील. हे चरबीचे थर आयुष्यात तुमच्या जुळ्या किंवा तिळ्या बाळांना गोंडस आणि मऊ बनवतील. चरबीचे थर आणि आपल्या बाळांमध्ये होणारी अथक वाढ ह्यामुळे त्यांच्या हृदयाची गती पूर्वीपेक्षा वाढते. त्यांच्या हृदयाचे ठोके दर मिनिटास सुमारे १५० इतके जास्त पडतात जे आपल्यापेक्षा किंवा इतर कोणत्याही प्रौढ व्यक्तीपेक्षा दुप्पट आहेत. मॉनिटर्सद्वारे किंवा स्कॅन दरम्यान हे सहज ऐकू येते. मागील काही आठवड्यांपर्यंत काही बाळे गर्भजल पिशवीत असतात आणि त्यांच्या हालचाली प्रतिबंधित असतात. साधारणपणे १७ व्या आठवड्यात हे चित्र बदलते आणि बाळ त्यांचे तळवे गर्भाशयाच्या भित्तिकांवर टेकवून त्यावर दाब देऊ लागते त्यामुळे बाळांच्या बोटावर फिंगरप्रिंट तयार होतात.

गरोदरपणाच्या १७ व्या आठवड्यात बाळाचा आकार

मागील आठवड्याच्या तुलनेत, बहुतेक बाळे ह्या आठवड्यात साधारणत: १२ सेंटीमीटर लांब असतात, परंतु जुळी आणि तिळी बाळे तुलनेने लहान असू शकतात. याव्यतिरिक्त, त्यांचे वजन देखील सुमारे ६०-१०० ग्रॅम्सच्या आसपास असते त्यामुळे तुम्हाला त्यांची उपस्थिती जाणवू लागते. ह्या आठवड्यात बाळांच्या आकाराची तुलना तुम्ही डाळिंबांशी करू शकता कारण बाळे खरोखर आता तेवढी मोठी असतील.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १७ व्या आठवड्यातील सामान्य शारीरिक बदल

एखाद्या महिलेच्या शरीरात होणारे बहुतेक बदल हे बहुदा आंतरिक असतात कारण त्यापैकी काही बदल अजूनही आपल्या गरोदरपणात कुठल्याही वेळी अस्वस्थता आणू शकतात.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदपरणाच्या १७ व्या आठवड्यातील लक्षणे

गरोदरपणाच्या १७ व्या आठवड्यात जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती स्त्रियांना ह्या आठवड्यात थोडी अस्वस्थता जाणवू शकते. काही लक्षणे पुन्हा जाणवू शकतात आणि त्यामुळे निराशा येऊ शकते.

जुळ्या आणि एकाधिक बाळांसह गरोदरपण - १७ वा आठवडा - पोटाचा आकार

तुम्ही तुमच्या गरोदरपणाचा अर्धा टप्पा पार केल्यानंतर तुमच्या पोटाच्या आकारात लक्षणीय बदल होईल आणि तो बाहेरून सुद्धा दिसू लागेल. आधी अगदी थोडेसे दिसणाऱ्या पोटाचा उंचावटा आता चांगलाच दिसू लागेल. आरशात अगदी पुसटसे तुम्ही स्वतःला पाहिलेत तरी तुमच्यात मातृत्वाची भावना निर्माण होईल. आणि तुम्ही तुमच्या जुळ्या किंवा तिळ्या बाळांची ह्या जगात येण्यासाठी वाट बघाल. तुमच्या जवळ कुणी आले तर ते तुम्हाला वाढलेल्या पोटाच्या आकाराची जाणीव करून देतील. तुम्ही तुमच्या जवळच्या मैत्रिणीला मिठी मारा आणि तुम्हाला तुमच्यातले अंतर त्वरित लक्षात येईल. तुमचे पोट टणक असेल आणि तुम्हाला आतील बाळांच्या हालचाली त्वरित जाणवतील.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाचा १७ वा आठवडा - अल्ट्रासाऊंड

मागील आठवड्यात केलेल्या बहुतेक जनुकीय आणि गर्भजल चाचण्यांसह, गरोदरपणाच्या १७ व्या आठवड्यात बहुतेक अल्ट्रासाऊंडमध्ये आणखी चाचण्या नसतात. मागील चाचण्यांद्वारे कोणतेही निर्णायक निकाल न मिळाल्यासच अतिरिक्त कॉर्डोसेन्टेसिस चाचणी किंवा नाभीसंबंधी रक्ताचा नमुना चाचणी घेण्यात येईल. तुमच्या बाळाच्या शरीरावरचे चरबीचे थर वाढल्यामुळे अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये तुम्हाला जुळे आणि तिळे सहज शोधणे सोपे जाईल. बारकाईने निरीक्षण केल्यास, तुम्ही तुमच्या लहान बाळांच्या सांगाड्याची संरचना पाहू शकता. ही हाडे अद्यापही लवचिक आणि मऊ आहेत आणि येणाऱ्या आठवड्यात ती कठीण आणि घट्ट होऊ लागतात.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १७व्या आठवड्यातील आहार

ह्या आठवड्यात, तुमचे कॅल्शियमचे सेवन इष्टतम असावे. इतर पौष्टिक घटकांची मात्रा चांगल्या प्रमाणात असणे आवश्यक असले तरी कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थांमध्ये तडजोड केली जाऊ नये. योग्य प्रकारे शिजवलेले मासे आणि व्हिटॅमिन ई समृध्द इतर पदार्थ हे देखील चांगले पर्याय आहेत.

गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स

गरोदरपणाच्या १७ व्या आठवड्यात स्वत: ला शांत आणि आनंदी ठेवण्यासाठी काही टिप्स आवश्यक आहेत.

हे करा

काय टाळाल?

१७ व्या आठवड्यात तुम्हाला काय खरेदी करण्याची गरज आहे?

प्रसूतीची प्रक्रिया समजण्यास मदत करणारी काही पुस्तके विकत घेतल्यास भीती कमी होण्यास मदत होते. मॉर्निग सिकनेसचा त्रास कमी होण्यासाठी सकाळी उठल्यावर सुवासासाठी चांगला साबण किंवा सुवासिक मेणबत्त्या खरेदी करा. गरोदरपणाच्या १७ व्या आठवड्यात बाळासोबत बंध निर्माण केल्यास पालकत्वाची भावना जागृत होण्यास मदत होते. जेव्हा तुम्ही पोटावर हात ठेवता तेव्हा आयुष्यभर तुम्ही तुमच्या बाळांसाठी आहात हे त्यांना समजू द्या. ह्या भावनांचा आनंद घ्या. तुमचा हा गर्भारपणाचा काळ आनंदात जावो! मागील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण - १६ वा आठवडा पुढील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण - १८ वा आठवडा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved