गर्भारपण

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १५ वा आठवडा

जुळ्या बाळांसह १५ आठवड्यांच्या गरोदर असलेल्या माता आयुष्यातील एका वेगळ्या टप्प्यावर असतात. एकीकडे, पोटातील बाळांसह सुरक्षितपणे इथपर्यंतचा टप्पा यशस्वीरितीने पार पाडल्याबद्दल तुम्हाला आनंद होत असेल आणि पुढचे काही महिने बाळांसोबत घालवण्याची तुम्ही वाट पहात असाल तर दुसरीकडे तुम्ही बाळांच्या वाढीवर आणि विकासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे अनावश्यकपणे ताणतणाव निर्माण होऊ शकतात. गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यात मळमळ आणि थकवा कमी होतो, ज्याच्यावर मात करणे आधी कठीण होते. म्हणून ह्या काळाचा चांगला उपयोग करून घ्या कारण गरोदरपणाचा अंतिम टप्पा थोडा कठीण वाटू शकतो.

१५ व्या आठवड्यात बाळांची वाढ

मागील आठवड्याप्रमाणेच, ह्या आठवड्यात सुद्धा तुमच्या बाळांची वाढ आणि प्रगती वेगाने सुरू होते आणि वजन व लांबीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. जेव्हा कान आणि डोळे विकसित होतात तेव्हा ते अनुक्रमे बाळाच्या मानेच्या दोन्ही बाजूस आणि चेहऱ्याच्या दोन्ही बाजूस असतात. १५ व्या आठवड्यात, कानांचा विकास अंतिम टप्प्यात येतो आणि ते मानेच्या दोन्ही बाजूंकडून डोक्याच्या दोन्ही बाजूला स्थित होतात. डोळे सुद्धा चेहऱ्यावर योग्य ठिकाणी येतात आणि बाळ जन्मल्यावर कसे दिसू शकते ह्याविषयी तुम्हाला थोडी कल्पना येऊ शकते. स्वतःला  तंदुरुस्त ठेवण्यासाठी फक्त तुम्ही एकट्याच व्यायाम करत नाही आहात तर तुमच्या लहान बाळाची सुद्धा तुमच्या गर्भात त्याविषयीची योजना सुरु आहे. बाळाच्या जवळ्जवळ सर्व अवयवांना क्रियाकलाप मिळण्यास सुरुवात झालेली आहे आणि मेंदू त्यांची चाचणी अनेक मार्गानी करतो. गरोदरपणाच्या १५व्या आठवड्यात बाळांबद्दल लक्षात घेण्याजोगी एक मनोरंजक बाब म्हणजे त्यांच्या डोळ्यांना आता त्यांच्या आजूबाजूला असलेला प्रकाश समजू लागतो. निश्चितच, त्यांचे डोळे पापण्यांनी पूर्णपणे झाकून ठेवले आहेत आणि गर्भाशयात कुठलाही प्रकाश नसतो, परंतु प्रकाश आहे समजण्याची क्षमता बाळांमध्ये विकसित होते . बाळाची श्वासोच्छवासाची आणि नाकाद्वारे गर्भजल आत घेण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. हा द्रव आतमध्ये पोहोचतो आणि श्वासाद्वारे हवा आत घेण्यासाठी फुप्फुसांचा विकास करण्यास मदत करतो.

१५ व्या आठवड्यात बाळांचा आकार

जुळी आणि एकाधिक बाळे नेहमीच गर्भाशयात वाढणाऱ्या एका बाळापेक्षा आकाराने लहान असतात. गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यात बाळाचे वजन हे ४०-५० ग्रॅम्सच्या आसपास असते आणि बाळाची लांबीही ९ -१० सेमी च्या आसपास असते. एकाधिक बाळे असतील तर ही मापे कमी असतील परंतु त्यांचा आकार एकूणात ताज्या संत्र्याइतका मोठा असेल.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यातील सामान्य शारीरिक बदल

इतर गर्भवती महिलांच्या तुलनेत आपण गर्भवती दिसत नाही असे आपल्याला वाटत असल्यास काळजी करू नका. गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यापर्यंत, पुष्कळ लोकांच्या लक्षात येईल इतपत तुमचे पोट स्पष्ट दिसू लागेल.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यातील लक्षणे

आपल्या गर्भात जुळी किंवा एकाधिक बाळे बाळगणे आपल्या शरीरासाठी सोपे काम नाही. जरी तुम्ही १५ व्या आठवड्यातील लक्षणे हाताळण्यासाठी चांगल्या स्थितीत असलात तरी काही लक्षणे खूप तीव्र असतील.

व्हॅनिशिंग ट्वीन सिंड्रोम

हे नाव जितके भीतीदायक आहे तितकीच ही स्थिती आहे. एकाधिक बाळांसह गरोदर असलेल्या २० टक्के स्त्रियांमध्ये ती आढळते. जुळ्या किंवा तिळ्या बाळांच्या बाबतीत असे होऊ शकते. ह्या सिंड्रोम मध्ये गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात एकाधिक बाळे असल्याचे निदर्शनास येते आणि १५ आठवडे पूर्ण होण्याच्या आसपास एक बाळ अदृश्य होते आणि अल्ट्रासाऊंड मध्ये दिसेनासे होते. त्यामुळे बाळामध्ये किंवा गर्भवती स्त्रीमध्ये गुंतागुंत निर्माण होते. गरोदरपणाचा कालावधी पूर्ण केला जातो परंतु पालकांना ह्यामुळे थोडी निराशा येऊ शकते.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण - १५ वा आठवडा - पोटाचा आकार

पोटाचा आकार स्त्रियांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे बदलतो. जुळ्या मुलांच्या तुलनेत तिळे असलेल्या गर्भवती मतांचे पोट लहान असू शकते. तथापि, आपल्या लहान बाळांच्या आरोग्याची तुलना करण्याचे हे एक साधन असू नये. बहुतेकवेळा पोटाचा आकार गोल वाढतो परंतु कंबरेकडील भाग तितकासा वाढत नाही. १५ व्या आठवड्यानंतर पोटाची वेगाने वाढ होते आणि बदल अगदी स्पष्टपणे दिसून येतात. पोटावरील  गडद रेषा देखील अधिक स्पष्ट होऊ  लागते.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण - १५ वा आठवडा - अल्ट्रासाऊंड

तुमच्यामध्ये किंवा बाळामध्ये गरोदरपणाच्या पुढच्या कालावधीत काही वैद्यकीय समस्या तर उद्भवणार नाहीत ना हे जाणून घेण्यासाठी गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड केले जाते. जनुकीय समस्या असतील तर त्याचे निदान ह्या कालावधीत होते परंतु त्याही पेक्षा आनांदाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या पोटातील बाळांची हालचाल ह्या अल्ट्रासाऊंड दरम्यान पाहू शकणार आहात.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यातील आहार

१५ व्या आठवड्यातही पौष्टिकतेला महत्त्व असते. फळे, दुग्धजन्य पदार्थ, तृणधान्ये, अंडी आणि समृद्ध हिरव्या पालेभाज्यांना न चुकता आहारात समाविष्ट करावे लागेल. व्हिटॅमिन ई समृद्ध असलेल्या उत्पादनांची निवड करा कारण नाळेला आवश्यक असणारी शक्ती देण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. योग्य प्रमाणात ते मिळविण्यासाठी काजू आणि बियाणे किंवा पूरक आहाराचा वापर केला जाऊ शकतो.

गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स

स्वतःची चांगली काळजी घेणे खूप क्लिष्ट नसते. येथे काही टिप्स दिल्या आहेत त्या स्वत: ला सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेशा असू शकतात.

हे करा

काय टाळावे?

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यात आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?

तुम्हाला लागणारे मॅटर्निटी गाऊन्स खरेदी करणे ही उत्कृष्ट शॉपिंग थेरपी असू शकते. सेंद्रिय फळे खरेदी करण्यासाठी सुपरमार्केटची सहल आपल्या आरोग्यास देखील मदत करेल. जेव्हा तुम्ही जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती असाल तेव्हा काळजी घेणे आवश्यक आहे.  त्यासाठी फक्त शांत मन आणि आपले शरीर आपल्याला ज्या प्रवासाने घेऊन जात आहे त्यावर विश्वास असणे आवश्यक आहे. ह्या प्रवासात तुम्ही एकट्या नसून तुमची बाळे सुद्धा तुमच्या सोबत आहेत हे लक्षात ठेवा. मागील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण - १४ वा आठवडा पुढील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण - १६ वा आठवडा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved