गर्भारपण

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १३ वा आठवडा

जुळ्या बाळांसह गरोदरपणाचा बराचसा कालावधी सुरक्षितपणे घालवल्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि हो, तुम्ही आता गरोदरपणाच्या १३ व्या आठवड्यात पोहोचला आहात! जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह १३ आठवडे गर्भवती राहणे सोपे नाही. जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती असलेल्या प्रत्येक आईला आता गरोदरपणाचा सर्वात अवघड कालावधी संपला आहे ह्याचा अभिमान वाटला पाहिजे. ह्या आठवड्यात अधिकृतपणे पहिली तिमाही संपते आणि गरोदरपणाच्या उत्कृष्ट प्रवासास आता सुरुवात होते. ह्या क्षणाचा आनंद घेण्यासाठी आपल्या प्रियजनांसोबत तुम्ही एक छोटी पार्टी देखील करू शकता. ह्या कालावधीत तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत कोणतेही मोठे बदल करण्याची आवश्यकता नाही, गेल्या तीन महिन्यांपासून करत असलेल्या सर्व चांगल्या गोष्टीं करणे तुम्ही तसेच सुरू ठेवा. होय, येत्या काही महिन्यांत होणारे शारीरिक बदल खूपच महत्त्वपूर्ण ठरतील आणि त्या बदलांसाठी तुम्ही स्वतःला तयार करण्याची ही वेळ आहे. तुम्ही ते करू शकता का ह्याचा विचार करीत आहात? हा लेख तुम्हाला नक्कीच मदत करेल.

१३ व्या आठवड्यात जुळ्या किंवा एकाधिक बाळांची वाढ

तुमच्या जुळ्या बाळांचा ह्या कालावधीत वेगाने विकास होत आहे. जुळ्या बाळांसह आणि विशेषत: बहुसंख्य बाळांसह गर्भवती असलेल्या स्त्रियांना आपल्या बाळांच्या वाढीबद्दल खूप चिंता वाटते कारण ही बाळे इतर बाळांइतकी मोठी नसतात. परंतु काळजी करण्याची आवश्यकता नाही, कारण ते पूर्णपणे सामान्य आहे. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यांचा विकास समान मार्गावर आहे. ह्या कालावधीत बाळाच्या डोक्याच्या वाढीमध्ये लक्षणीय घट होईल. सुरुवातीच्या टप्प्यात, डोके वेगाने वाढत असताना, शरीराच्या तुलनेत ते मोठे दिसते. म्हणून, आता शरीराच्या वाढीवर लक्ष केंद्रित होते. ह्याचा अर्थ डोक्याची वाढ होणे थांबते असा मुळीच नाही, डोक्याची वाढ होतच राहतो परंतु वाढीचा वेग मंदावतो आणि तसे होणे सामान्य आहे. ह्या कालावधीत बाळे हालचालीची चिन्हे दर्शवतील. गर्भाशयात किती जागा आहे हे समजण्यासाठी बाळे गर्भाशयाच्या भिंतींवर हात दाबतील. या कृतीमुळे त्यांच्या बोटांच्या टोकांवर फिंगरप्रिंट तयार होतात. समान जुळे किंवा तिळे असले तरी कधीही त्यांच्या बोटांचे ठसे समान असू शकत नाहीत. ह्या सर्व हालचालींमुळे बाळे स्वतःचा चेहरा तसेच त्यांच्या भावंडांनाही स्पर्श करू शकतात. ह्या आठवड्याभरात, त्यांचे स्वरयंत्र सुद्धा विकसित होण्यास सुरुवात होते.

बाळांचा आकार केवढा असतो?

आधी सांगितल्याप्रमाणे, आपल्या जुळ्या किंवा एकाधिक बाळांच्या डोक्याचा आकार सामान्यतः मोठा असेल परंतु डोक्याची वाढ मंदावली जाईल कारण आता शरीराची वाढ होण्यास सुरुवात होईल. ह्या कालावधीत त्यांचे वजन देखील वाढण्यास सुरुवात होईल.. त्यांचे वजन देखील आता मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरवात होईल, बाळांचे वजन १५ ते २० ग्रॅम्सच्या दरम्यान असते आणि एकाधिक बाळे असल्यास वजन आणखी कमी असते. बाळांची लांबी सुद्धा ७ सेंटिमीटरच्या आसपास असते कारण त्यांच्या आकारात वाढ होण्यास सुरुवात होते.

सामान्य शारीरिक बदल

आपली बाळं वाढत असताना, तुम्हाला ह्या आठवड्याभरात पोटाच्या आकारात एक महत्त्वपूर्ण बदल दिसेल. याशिवाय, गरोदरपणाच्या १३व्या आठवड्यात तुमचे शरीर इतर अनेक बदलांमधून जाईल. त्यापैकी काही येथे दिलेले आहेत:

जुळ्या बाळांसह गरोदपरपणाच्या १३ व्या आठवड्याची लक्षणे

तुम्ही १३व्या आठवड्यांत जुळ्या गर्भधारणेची चिन्हे आणि लक्षणे शोधू शकता परंतु स्त्रीरोगतज्ज्ञांनी याची पुष्टी करणे आवश्यक आहे आहे. तथापि, जुळ्या बाळांसह गरोदरपणाची काही लक्षणे येथे आहेत.

जुळ्या बाळांसह गरोदरपण - १३ वा आठवडा - पोटाचा आकार

तुमच्या बाळांची वेगाने वाढ होत असल्याने गर्भाशयाचा आकार लवकर वाढेल आणि त्यामुळे पोटाचा आकार सुद्धा वाढेल. तुमची उदार पोकळी भरून निघेल आणि नाभीच्या खालील पोटाचा भाग टणक होईल तसेच शरीराच्या इतर भागात सुद्धा चरबी जमा होईल.

जुळ्या बाळांसह गरोदरपण - १३ वा आठवडा - अल्ट्रासाऊंड

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये आपल्या गर्भातील बाळांची संख्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांची वाढ व्यवस्थित होत आहे ना हे निश्चित करण्यासाठी अल्ट्रासाऊंड स्कॅन केला जातो. तथापि, ह्या कालावधीत केलेल्या अल्ट्रासाऊंड स्कॅनमुळे अधिक माहिती मिळते. काही डॉक्टर तुम्हाला ह्या आठवड्यात अंदाजे प्रसूतीची तारीख देतील तर काही डॉक्टर्स आणखी काही वेळ प्रतीक्षा करतील. ह्या काळात केलेल्या अल्ट्रासाऊंड स्कॅन मुळे बाळांमध्ये काही व्यंग तर नाही ना हे समजते तसेच बाळाच्या हृदयाचे ठोके सुद्धा तपासले जातात. तसेच त्यांच्या जनुकीय संरचनेची सुद्धा तपासणी होते.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदर असतानाचा आहार

ह्या कालावधीत तुमच्या आहारामध्ये प्रथिने, चरबी आणि कर्बोदकांनी समृद्ध असलेले पदार्थ असले पाहिजेत कारण हे पोषक पदार्थ बाळाच्या वाढीस मदत करतात. तसेच, शक्य तितक्या ताज्या आणि नैसर्गिक उत्पादनांची निवड करा आणि घरी केलेले अन्नपदार्थ खा. तुम्ही तुमच्या शरीरात जंतू किंवा हानिकारक पदार्थांना प्रवेश करण्यापासून रोखू इच्छित असल्यास सेंद्रीय भाजीपाला वापरा. हिरव्या पालेभाज्या, बीटरुट, सुका मेवा, टोमॅटोचा रस, कुस्करलेली फळं, हे सर्व आपल्या गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत खाणे चांगले आहे

गरोदरपणातील काळजी विषयक टिप्स

जेव्हा तुम्ही गरोदरपणाच्या १३ व्या आठवड्यात पोहोचता तेव्हा तुम्हाला खूप आनंद होईल. पहिल्या त्रैमासिकातील कठीण क्षण जातील आणि तुम्हाला बऱ्यापैकी बरे वाटेल परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही निष्काळजी राहिले तरी चालेल. तुम्ही स्वत: ची काळजी घेणे आवश्यक आहे.

हे कर

काय टाळाल?

आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?

तुमच्या गरोदरपणाच्या १३ व्या आठवड्यात तुम्हाला खूप काही खरेदी करण्याची आवश्यकता नाही, परंतु तुम्ही आरामदायक ब्रा आणि कपडे विकत घेऊ शकता, खासकरून जर तुमच्या शरीराचा आकार बदलला असेल तर खरेदी करण्याची गरज आहे. तसेच, अजूनही तुम्हाला मॉर्निग सिकनेसचा त्रास होत असेल तर निरोगी आणि सुगंधित ग्रीन टीचे अर्क मिळवा. कधीकधी तुम्हाला कॉम्प्रेशन सॉक्स घालण्याची आवश्यकता वाटू शकते, म्हणून अशा सॉक्समध्ये गुंतवणूक करा जेणेकरून घोट्याची सूज आणि वेदना कमी होईल. गरोदरपणाच्या १३ व्या आठवड्यात तुमची गरोदरपणाची दुसरी तिमाही अधिकृतपणे सुरु होते. एका बाळासह गर्भवती असलेल्या स्त्रियांपेक्षा जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती असलेल्या स्त्रियांना हा काळ जास्त कठीण वाटू शकतो. तुम्ही तुम्हाला शक्य आहे तेवढे सगळे सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा आणि ह्या गरोदरपणाच्या प्रवासाचा आनंद घ्या. मागील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण - १२ वा आठवडा पुढील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण - १४ वा आठवडा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved