गर्भारपण

गरोदरपणाच्या ६ व्या आठवड्यात सुद्धा पोटातील बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू न येणे – नेहमी विचारले जाणारे प्रश्न

गर्भधारणा होणे हा तुमच्या आयुष्यातील एक अतिशय रोमांचक काळ असतो. पण ह्या काळात तुमची चिंता सुद्धा  वाढलेली असते. तुम्हाला स्वतःसाठी आणि तुमच्या वाढत्या बाळासाठी सगळे काही सर्वोत्तम हवे असते. गरोदरपणाच्या काळातील प्रत्येक पहिला अनुभव तुमच्या कायम लक्षात  राहात असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला अल्ट्रासाऊंड दरम्यान पहिल्यांदा पहाल आणि जेव्हा तुम्हाला त्याच्या हृदयाचे ठोके ऐकू येतील तेव्हा तुमच्या ते कायम लक्षात राहतील. बाळाच्या हृदयाचे ठोके हे बाळाची वाढ, आरोग्य आणि विकासाचे सूचक आहेत. साधारणपणे, गरोदरपणाच्या सहाव्या आठवड्यानंतर बाळाचे हृदय धडधडायला लागते. जर,6 आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंड दरम्यान, तुम्हाला बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू आले नाहीत, तर काळजी वाटणे अगदी स्वाभाविक आहे. परंतु, तुम्ही घाबरू नका. हृदयाचे ठोके तुम्हाला का ऐकू येत नाहीत याची अनेक कारणे असू शकतात आणि  त्याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

गर्भाच्या हृदयाचा सामान्य ठोका म्हणजे काय?

गर्भाच्या हृदयाची सामान्य गती 120 ते 160 bpm (बीट्स प्रति मिनिट) पर्यंत असते. जेव्हा हृदयाचे ठोके पहिल्यांदा ऐकू येतात तेव्हा हृदयाच्या गतीचा हा वेग आढळतो. त्यानंतर 10 व्या आठवड्यात हृदय गती 170 bpm पर्यंत वाढू शकते आणि गरोदरपणाचा कालावधी संपेपर्यंत हा दर 130 bpm पर्यंत खाली घसरतो. बाळामधील मायोकार्डियम तिसऱ्या आठवड्याच्या आसपास आकुंचन पावू लागते, तेव्हा हृदयाचे ठोके ऐकू येण्यास सुरुवात होऊ लागते. खालील तक्त्यामध्ये गर्भावस्थेच्या वेगवेगळ्या आठवड्यातील हृदयाच्या ठोक्यांचा दर दिलेला आहे.
आठवडा हृदय गती
5 ते 6 110
9 ते 10 170
14 150
20 140
जन्म झाल्यानंतर 130

गरोदरपणाचे ६ आठवडे पूर्ण झाल्यावर बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू येतात का?

काही वेळा, गर्भाच्या हृदयाचे ठोके ऐकू येण्यासाठी 6 आठवडे हा कालावधी खूप लवकर आहे. परंतु, योनि अल्ट्रासाऊंड केल्यास 6 आठवड्यांत गर्भाच्या हृदयाचे ठोके शोधण्यासाठी मदत होऊ शकते.

6 आठवड्यांत हृदयाचे ठोके ऐकू न येणे - हे सामान्य आहे का?

6 आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये हृदयाचे ठोके ऐकू न येणे खूप सामान्य आहे. काही प्रकरणांमध्ये, गरोदरपणाचे 7 आठवडे उलटून सुद्धा बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू येत नाहीत. 6 आठवड्यांत बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू न येणे हे खूप सामान्य आहे आणि त्यासाठी काळजी करण्याचे कारण नाही. तुमचे गर्भधारणेचे वय देखील चुकीचे असू शकते. अनियमित ओव्हुलेशन पॅटर्नमुळे किंवा तुमच्या शेवटच्या मासिक पाळीच्या चुकीच्या अंदाजामुळे, तुम्ही खरोखर 6 आठवडे गर्भवती नसण्याची शक्यता असते. हृदयाचे ठोके ऐकू न येण्याचे हेही कारण असू शकते. हृदयाचे ठोके ऐकू न येण्याचे कारण आईचे स्वतःचे शरीर असू शकते. मोठ्या ओटीपोटामुळे गर्भाच्या हृदयाचे ठोके ऐकू येणे कठीण होऊ शकते. या व्यतिरिक्त, अल्ट्रासाऊंडचा प्रकार देखील महत्त्वाचा आहे. पोटाचा अल्ट्रासाऊंड कमी संवेदनशील असतो आणि त्यामुळे हृदयाचे ठोके ओळखण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. दुसरीकडे,विशेषत: गरोदरपणाच्या  सुरुवातीच्या काळात हृदयाचे ठोके ऐकू येण्यासाठी ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंड अधिक अचूक आहे,  कारण ते तुमच्या योनीमध्ये घातले जाते आणि गर्भाशयात अधिक चांगले प्रवेश करते.

जर तुम्हाला अल्ट्रासाऊंड दरम्यान हृदयाचे ठोके ऐकू आले नाहीत तर गर्भपात होण्याची शक्यता आहे का?

गर्भाच्या हृदयाचा ठोका कमी होणे खालील प्रकरणांमध्ये गर्भपात दर्शवते: गर्भपात होण्याचा धोका निश्चित करण्यासाठी तुमचे डॉक्टर बाळाच्या डोक्यापासून पायापर्यंत मापन देखील करू शकतात. जर भ्रूणाची लांबी 5 मिलिमीटरपेक्षा जास्त असेल आणि त्याच्या हृदयाचा ठोका ऐकू येत नसेल तर ते गर्भपात झाल्याचे लक्षण असू शकते. तसेच, 8 मिलिमीटरपेक्षा मोठ्या असलेल्या गेस्टेशनल सॅक मध्ये  योक सॅक नसेल किंवा 16 मिलिमीटरपेक्षा मोठ्या असलेल्या गेस्टेशनल सॅक मध्ये भ्रूण नसेल तर ही परिस्थिती गर्भपात दर्शवू शकते.

7 व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये हृदयाचे ठोके ऐकू न आल्यास काय?

फॉलो-अप अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये हृदयाचे ठोके ऐकू आले नाहीत तर ते गर्भपाताचे लक्षण असते असे नाही. 7 व्या आठवड्यात सुद्धा बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू आले नाहीत तरी तुम्ही आशा कायम ठेवा. गरोदरपणाच्या 7 व्या आठवड्यात बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू येतात की नाही हे पाहणे तसे खूप लवकर असू शकते. तुमच्या मासिक पाळीनंतर सात आठवडे उलटले आहेत असे गृहीतधरले तर, तुम्ही तुमच्या पहिल्या अल्ट्रासाऊंड दरम्यान चार आठवड्यांच्या गरोदर असाल आणि अनियमित मासिक पाळीच्या बाबतीत पाच आठवड्यांच्या गरोदर असाल.

7 आठवड्यांनंतर तुम्हाला बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू येऊ शकतात का?

होय, 7 आठवड्यांनंतर बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू येतात का ते तुम्ही पाहू शकता. गरोदरपणाच्या 6.5-7 आठवड्यांच्या दरम्यान तुम्हाला पहिल्यांदा गर्भाच्या हृदयाचे ठोके ऐकू शकतात.

8 आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंडमध्ये बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू येत नसतील तर - काही आशा आहे का?

जर तुमची गर्भधारणेची तारीख अचूक असेल आणि 8 आठवड्यात सुद्धा बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू येत नसतील, तर तुम्ही तुमचे बाळ गमावले असेल. परंतु, 8 आठवड्यात सुद्धा हृदयाचे ठोके ऐकू येत नसलेल्या  निरोगी बालकांचीही अनेक उदाहरणे आहेत.

तुमचा गर्भपात झाला आहे असे तुम्हाला सांगण्यात आले तर?

तुमचा गर्भपात झाला आहे असे तुमच्या स्त्रीरोगतज्ञांनी तुम्हाला सांगितले आणि उपचाराचा एक विशिष्ट कोर्स सुचवत ते असतील तर उपचार घेण्याचा पर्याय योग्य पर्याय आहे ह्याची खात्री बाळगा. तुम्हाला 100% खात्री नसल्यास, दुसऱ्या फॉलो-अप अल्ट्रासाऊंडसाठी विचारा. जोपर्यंत तुम्हाला एक्टोपिक गर्भधारणेचा धोका नाही तोपर्यंत तुम्ही आणखी काही दिवस वाट बघू शकता. तसेच, दुसऱ्या स्त्रीरोगतज्ञांचे मत देखील घेऊन पहा.

हृदयाचा ठोका ऐकू येत नसतानाही बाळ जिवंत असू शकते का?

होय, तुम्हाला हृदयाचे ठोके ऐकू येत नसले तरीही तुमचे बाळ जिवंत असू शकते. असे विविध कारणांमुळे होऊ शकते, परंतु पालकांनी हृदयाचे ठोके ऐकू येण्यासाठी एक आठवडा वाट पहावी. तरीही तसे न झाल्यास, तुमचा गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते.

घरी बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकणे शक्य आहे का?

डॉक्टरांच्या मते, मानवी कानाने घरात गर्भाच्या हृदयाचे ठोके ऐकणे कठीण आहे. काही गर्भवती स्त्रिया  म्हणतात कि त्या आपल्या बाळाच्या हृदयाचे ठोके त्यांच्या पोटातून ऐकू शकतात, परंतु हे केवळ शांत खोलीत आणि गरोदरपणाच्या नंतरच्या टप्प्यात शक्य आहे. जर तुम्हाला तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके घरी ऐकू येत नसतील, तर योग्य स्त्रीरोगतज्ञाकडे जाऊन सोनोग्राफीची वेळ ठरवून घ्या.

तुम्ही तुमच्या बाळाचे हृदय कसे निरोगी ठेवू शकता?

गरोदरपणाच्या 6 आठवड्यापर्यंत तुम्हाला तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके का ऐकू येत नाहीत याची अनेक कारणे आहेत. तुम्ही त्याबद्दल फारसे काही करू शकत नसलात तरी सुद्धा, तुमच्या बाळाचे हृदय निरोगी राहण्यासाठी तुम्ही पुढील उपाय करू शकता लक्षात ठेवा की गरोदरपणाच्या 6 व्या आठवड्यात तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकणे हे खूप लवकर होऊ शकते. परंतु 8 आठवड्यांनंतरही तुम्हाला बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू येत नसेल, तर संभाव्य गुंतागुंत टाळण्यासाठी तुमच्या स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घ्या. आणखी वाचा: गरोदरपणात तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकणे गरोदरपणात छातीत जळजळ होणे: लक्षणे, कारणे आणि उपचार
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved