गर्भधारणा होताना

तुम्हाला गर्भधारणा होण्यास मदत होईल असे १५ सर्वोत्तम घरगुती उपाय

बाळाला जन्म देणे ही सर्वात समाधानकारक आणि आनंददायी भावना आहे. सकारात्मक गर्भधारणा चाचणी आणि त्याला स्त्रीरोगतज्ञांनी दिलेली संमती म्हणजे सर्वोच्च आनंद, ज्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. तुमच्या लहानग्याने ह्या जगात प्रवेश करण्याची तुम्ही आतुरतेने वाट पहात असता आणि गर्भारपणाचे हे नऊ महिने शांततेत जावेत असे तुम्हाला वाटत असते. परंतु, गर्भारपणाचा हा प्रवास प्रत्येक स्त्रीसाठी वेगळा असते. काही स्त्रिया पटकन गर्भवती होतात, तर काही स्त्रियांना गर्भधारणेसाठी वेळ लागू शकतो. जर तुम्ही आणि तुमच्या पतीने बाळ होण्यासाठीचा निर्णय घेतला असेल आणि गर्भधारणा लवकर व्हावी असे वाटत असेल तर ह्या लेखाची तुम्हाला मदत होऊ शकते! आम्ही वेगवेगळ्या घरगुती उपायांवर चर्चा करीत आहोत जे तुम्हाला गर्भवती होण्यास आणि तुमचे पालक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत करू शकतात. असे कोणतेही पूर्ण-पुरावे घरगुती उपचार नाहीत ज्यात गर्भधारणा होण्याची हमी दिलेली आहे, परंतु खालील मार्गांनी आपल्याला जलद गर्भधारणा होण्यास मदत होऊ शकते.

लवकर गर्भधारणा होण्यासाठी १५ नैसर्गिक उपाय

लवकर गर्भधारणा होण्यासाठी बरेचसे घटक लक्षात घेतले पाहिजेत जसे की ओव्यूलेशनचा काळ, तुमच्या पतीच्या शुक्राणूंची गुणवत्ता, तुमची जीवनशैली आणि आहार. त्यावर बरेचसे घरगुती आणि नैसर्गिक उपाय आहेत. बऱ्याचशा अन्नपदार्थांचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात करू शकता. जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत असाल तर खालील नैसर्गिक उपायांची तुम्हाला मदत होऊ शकते.

. खजूर

खजूर हे व्हिटॅमिन बी, के, लोह, पोटॅशिअम, फोलेट, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर इसेन्शिअल मिनरल्स ने समृद्ध असतात. लोह आणि फोलेट हे गर्भधारणा आणि गर्भारपणासाठी सर्वात महत्वाची पोषणमूल्ये आहेत. म्हणून, पोषणमूल्यानी समृद्ध खजूर खाल्ल्यास गर्भधारणेस आणि गर्भारपणात त्याची मदत होऊ शकते. १० ते १२ खजूर बिया काढून मिक्सर मधून बारिक करून घ्या. तुम्ही ही पेस्ट गाईच्या दुधात घालून उकळून घेऊ शकता. मासिक पाळी संपल्यावर एक आठवड्याने हे मिश्रण घ्या त्यामुळे तुमची प्रजनन क्षमता वाढेल.

. डाळिंब

डाळींबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि के तसेच अँटिऑक्सिडंट्स, फोलेट आणि पोटॅशिअम असते. डाळींबामुळे रक्तप्रवाह परिणामकरीत्या ओटीपोटाच्या दिशेला वाढतो. त्यामुळे स्त्रियांची प्रजननक्षमता वाढते आणि त्यामुळे गर्भाशयाच्या भित्तिका सुद्धा जाड होतात आणि गर्भपाताची शक्यता कमी होते. डाळिंबाच्या झाडाची साल आणि बिया समप्रमाणात घ्या आणि ही पावडर दररोज काही आठवड्यांसाठी घ्या.

. माका

स्त्री आणि पुरुषांमधील कमी प्रजनन क्षमतेवर उपचारांसाठी माका वावरतात. ह्यामध्ये व्हिटॅमिन बी, सी आणि लोह व पोटॅशियम असते. माका रूट मुळे संप्रेरकांची पातळी संतुलित होण्यास मदत होते. तसेच शुक्रजंतूंची संख्या आणि हालचाल वाढते. तसेच प्रजननक्षमता वाढण्यास सुद्धा मदत होते. तुम्ही अर्धा चमचा माका रूट पावडर गरम पाणी किंवा दुधात घालून घेऊ शकता. काही महिन्यांसाठी ही पावडर वापरून पहा परंतु गर्भधारणा झाल्यावर ती वापरणे बंद करा.

. व्हिटॅमिन डी

शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्यास वंध्यत्वाची किंवा गर्भपाताची शक्यता असते. व्हिटॅमिन डी हे शरीरासाठी खूप महत्वाचे पोषणमूल्य आहे. त्यामुळे हाडे, दात, स्नायू बळकट होतात तसेच कॅल्शिअमचे शोषण सुद्धा शरीरात चांगल्या तऱ्हेने होते.

. दालचिनी

ह्या मसाल्याच्या पदार्थामुळे स्त्रियांच्या अंडाशयाचे काम चांगले चालते आणि त्यामुळे वंध्यत्व कमी होण्यास मदत होते. दालचिनी पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम किंवा पीसीओस साठी सुद्धा वापरतात, आणि ते स्त्रियांमधील वंध्यत्वाचे मुख्य कारण आहे. तुम्ही एक टीस्पून दालचिनी पावडर एक कप पाण्यात घालून हा चहा काही महिने पिऊ शकता किंवा तुम्ही अन्नपदार्थांमध्ये वरून घालून घेऊ शकता.

. वडाच्या झाडाची मुळे

वडाच्या झाडाची मुळे गर्भधारणेसाठी खूप परिणामकारक असतात. तुम्ही त्याची पावडर करून गरम पाण्यासोबत पाळी नंतरचे तीन दिवस घेतली पाहिजे. चांगल्या परिणामांसाठी ही प्रक्रिया तुम्ही दोन महिने केली पाहिजे.

. लसूण

गरोदर राहण्यासाठी एक परिणामकारक उपाय म्हणजे लसूण खाणे. लसूण खाण्याने स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये प्रजननक्षमता सुधारते. तसेच शुक्रजंतू आणि स्त्रीबीज गुणवत्ता सुद्धा सुधारते. तुम्ही ४-५ लसूण पाकळ्या घेऊन त्या चावू शकता. त्यानंतर एक ग्लास गरम दूध घ्या. हे रुटीन हिवाळ्यात नियमितपणे पाळा त्यामुळे प्रजननक्षमतेमध्ये सुधारणा होईल.

. तुरटी

लवकर गर्भधारणा होण्यासाठी तुरटी हा सर्वात चांगला घरगुती उपाय आहे. जर तुमची मासिक पाळी नियमित असेल आणि तरी सुद्धा तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर तुरटी हा सर्वात चांगला उपाय आहे. तुम्ही तुरटीचा छोटा तुकडा कापसात गुंडाळून रात्री योनीमार्गात ठेवू शकता. जोपर्यंत कापूस स्वच्छ बाहेर येत नाही तो पर्यंत हे रुटीन पाळा. (कापसावर दुधाळ थर नसावा). हा पांढरा थर नसेल तर ते तुम्ही गर्भधारणा होण्यास तयार आहात ह्याचे ते लक्षण आहे.

. जायफळ

स्त्रीची प्रजननक्षमता वाढवण्यासाठी हा मसाल्याचा पदार्थ उपयोगी आहे. गर्भधारणा होण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात जायफळाचा समावेश करू शकता. तुम्ही सारख्या प्रमाणात जायफळ पूड आणि पिठीसाखर (साधारणपणे ३ ग्रॅम प्रत्येकी) एक कप दुधासोबत (गाईचे दूध) मासिक पाळी दरम्यान घ्या.

१०. रॉक सॉल्ट

गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात रॉक सॉल्टचा समावेश करा. वंध्यत्वाशी सामना करण्यासाठी,रॉक सॉल्ट उपयोगी आहे कारण त्यामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशियम आणि लोह इत्यादी आवश्यक खनिजद्रव्ये असतात. तुम्ही एक चमचा रॉक सॉल्ट घेऊन ७५० मिली पाण्यात घाला. हे पाणी सकाळी लवकर (सूर्योदयापूर्वी) प्या.

११. मोहरीची पेस्ट

हा साधा सोपा घरगुती उपाय करून तुम्ही तुमची गर्भधारणेची शक्यता वाढवू शकता. मासिक पाळीच्या चौथ्या दिवसानंतर तुम्ही तुमच्या दररोजच्या आहारात मोहरीची पेस्ट घालू शकता. मोहरी मुळे प्रजननक्षमता वाढते परंतु ती अतिप्रमाणात घेऊ नका.

१२. तुळस

आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी दूर करण्यासाठी तुळस गुणकारी आहे. स्त्रियांमधील वंध्यत्व नाहीसे करण्यासाठी तुळशीची पाने परिणामकारक ठरली आहेत. तुळशीची काही पाने (तीन ते चार) दररोज चावून खाल्ली पाहिजेत, त्यानंतर एक ग्लास दूध घेतल्यास तुमची गर्भधारणेची शक्यता वाढते. तसेच तुळशीच्या बिया खाल्ल्याने सुद्धा प्रजननक्षमता वाढते.

१३. बडीशेप आणि गुलाबाच्या पाकळ्या

गर्भधारणेसाठी दुसरा घरगुती उपाय म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या आणि बडीशेप (फेनेल). योग आणि व्यायाम केल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते. फेनेल आणि रोझ इसेन्स तुम्ही प्रजननक्षमता वाढवण्यासाठी वापरू शकता. १० ग्रॅम्स बडीशेप आणि ५० ग्रॅम्स रोझ जॅम एकत्र करा आणि गाईच्या गरम दुधासोबत ते घ्या.

१४. चेस्टबेरी

हार्मोनल असंतुलनाचा सामना करणार्‍या महिलांसाठी चेस्टबेरी खूप फायदेशीर आहे. हार्मोनल असंतुलनामुळे शरीरात प्रोलॅक्टिनची पातळी वाढल्यामुळे वंध्यत्व येऊ शकते. चेस्टबेरीचे सेवन पीसीओएसशी लढण्यासाठी आणि ओव्हुलेशन सुधारण्यास मदत करते. एक चमचा वाळलेल्या चेसबेरी घ्या आणि उकळत्या पाण्यात १० मिनिटे घाला. प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी काही दिवस हा चहा दिवसातून एकदा प्या.

१५. बडीशेप आणि लोणी

कमी वजन किंवा जास्त वजन असलेल्या स्त्रियांमध्ये प्रजननक्षमता सुधारण्यासाठी हे संयोजन आदर्श आहे. बडीशेप पावडर (अंदाजे ६ ग्रॅम) घेऊन शुद्ध बटरच्या २ भागांमध्ये मिसळा नंतर तुम्ही हे मिश्रण तीन ते चार महिन्यांपर्यंत खाऊ शकता. वर नमूद केलेले सर्व घरगुती उपचार गर्भवती होण्याची शक्यता प्रभावीपणे वाढवू शकतात. तुम्ही देखील मासिक पाळी अनियमित असल्यास गर्भवती होण्यासाठी या उपायांचा वापर करू शकता. तथापि, तुमची प्रजननक्षमता वाढविण्यासाठी यापैकी कोणत्याही घरगुती उपायांचा अवलंब करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या.

लक्षात ठेवण्यासाठी अतिरिक्त टिप्स

वर नमूद केलेल्या नैसर्गिक उपचारांव्यतिरिक्त, खालील टिप्स आपल्याला गर्भवती होण्यास मदत करू शकतात.

. कॅफिनचे सेवन मर्यादित करा

जास्त प्रमाणात कॅफिन सेवन केल्यामुळे रक्तातील लोह शोषण्यास अडथळा निर्माण होतो आणि यामुळे डिहायड्रेशन देखील होऊ शकते. एकत्रितपणे ह्या सगळ्या गोष्टींमुळे स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे प्रश्न उद्भवू शकतात, त्यामुळे गर्भवती होण्यास समस्या निर्माण होऊ शकते आणि गर्भपात किंवा अकाली प्रसूती होण्याची जोखीम उद्भवू शकते.

. साखर टाळा

साखर कर्बोदकांमधे आढळते. आवश्यकतेपेक्षा जास्त साखर घेतल्यास शरीरात इन्सुलिनची पातळी विस्कळीत होऊ शकते. कार्बोहायड्रेटयुक्त आहारामुळे शरीरात इन्सुलिन चा प्रतिकार निर्माण होतो आणि तुम्ही गर्भधारणेची योजना आखत असल्यास समस्या उद्भवू शकते. साखरेचा स्वस्थ पर्याय म्हणून नैसर्गिक स्वीटनर्स किंवा फळांचा पर्याय निवडा.

. पुरेसे पाणी प्या

जर तुम्ही बाळाचा विचार करीत असाल तर भरपूर पाणी प्यावे. पाणी केवळ गर्भाशयच निरोगी ठेवत नाही तर गर्भाशयाच्या मुखाच्या द्रवाच्या वाढीस देखील मदत करते. शुक्राणू गर्भाशयाच्या मुखाच्या घट्ट स्रावास चिकटतात आणि त्यामुळे तुम्हाला गर्भवती होण्यास मदत होते.

. निरोगी आणि तंदुरुस्त राहा

दररोज व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. जर तुमचे वजन जास्त असेल तर काही वजन कमी करणे चांगले ठरेल कारण यामुळे गर्भवती होण्याची शक्यता वाढते. तसेच, तुमचे वजन कमी असल्यास, तुम्हाला ओव्हुलेशनची समस्या उद्भवू शकते. निरोगी आणि तंदुरुस्त शरीराची देखभाल करा, कारण यामुळे तुमची गर्भवती होण्याची शक्यता सुधारते.

. चांगली झोप किंवा विश्रांती घ्या

आपल्या सर्व अंतर्गत अवयवांच्या योग्य कार्यासाठी आपण चांगली विश्रांती घेतली पाहिजे आणि हे फार महत्वाचे आहे. अनियमित झोपण्याच्या सवयीमुळे संप्रेरकांचा त्रास होऊ शकतो. विस्कळीत हार्मोनल बॅलेन्समुळे गर्भधारणेत समस्या उद्भवू शकतात.

. ताणतणाव दूर ठेवा

ताणतणावामुळे आरोग्यामध्ये गुंतागुंत आणि समस्या उद्भवू शकतात. ताणतणावाच्या वाढीव पातळीमुळे अंडाशयापासून अंडी सोडण्यास कारणीभूत असलेल्या हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ओव्हुलेशनला उशीर होऊ शकतो किंवा अजिबात ओव्यूलेशन होत नाही.

. धूम्रपान सोडा

धूम्रपान न करणार्‍या स्त्रियांपेक्षा धूम्रपान करणार्‍या स्त्रियांना गर्भवती होण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. तसेच, धूम्रपान करणाऱ्या गर्भवती स्त्रियांना आनुवंशिक विकृती असलेले बाळ जन्माला येण्याचा मोठा धोका असतो.

. मद्यपान करू नका

अल्कोहोलच्या सेवनामुळे अनियमित मासिक पाळी, ओव्हुलेशनची समस्या उद्भवू शकते आणि हार्मोनल पातळी विस्कळीत होऊ शकते. तुम्ही गर्भधारणेचा विचार करीत असल्यास ह्या सर्व गोष्टींमुळे गुंतागुंत होऊ शकते. तुम्ही गर्भवती होऊ इच्छित असल्यास तुम्हाला वर दिलेल्या टिप्सचा फायदा होऊ शकेल. तथापि, आहारात किंवा जीवनशैलीत बदल करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आणखी वाचा:गर्भधारणापूर्व तपासण्या आणि चाचण्या
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved